मला चुकीची ऐकू आलेली गाणी -३

Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33

पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.

आधीची पाने इथे पहायला मिळतील..

http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हपा Lol

बाकीच्यांना धन्यवाद ..अर्थ कळला

सध्या तुळशीची लग्नं चालू आहेत.
त्यात ती शेवटची मंगलाष्टकातली पहिली ओळ बरेच वर्ष मला अशी ऐकू यायची.
आली लग्न घटी समीप नवरा घेऊनि या वाघरा..

परस्तिश की याँ तक कि ऐ बुत तुझे |
नजर में सभों की ख़ुदा कर चले || >> सभू के आहे ते. ती ओळ नितांत सुंदर आहे. मी प्रेयसीची एव्हढी आराधना केली कि सगळ्यांना ती देवच वाटायला लागलीस.

परस्तिश की याँ तक कि ऐ बुत तुझे |
नजर में सभों की ख़ुदा कर चले || >> सभू के आहे ते. ती ओळ नितांत सुंदर आहे. मी प्रेयसीची एव्हढी आराधना केली कि सगळ्यांना ती देवच वाटायला लागलीस.
वॉव थँक्स असामी. खूप आवडते हे गाणं, अर्थ आज कळाला. फुल्लं टँजंट जायचं हे कडवं.

मी स्वयंपाक करत असताना रमाने विचारले हे काय आहे, मी सांगितलं मसाला.
तर म्हणाली ह्यावर गाणं आहे आणि गायला लागली.
आई माझी मसाला वाली
(आई माझी नवसाला पावली ओरिजिनल गाणं आणि तीच चाल )

रमा Lol

माझा 5 वर्षीय मुलगा एकदा दुकानात गेलो असता जोरजोरात गाणं म्हणायला लागला.." तेरी बातोने ऐसा मुंज्या किया ..बैठे हि
बैठे मैने दिल खो दिया".. अख्या दुकानात लोकं हसायला लागली...

शाहरुखचे एक गाणं होते ते कालच बर्‍याच वर्षांनी एकले. तेव्हा आम्ही खुपच जोके केलेले आठवले,

हा गा लेते है, हा गा लेते है..

कितीही चांगले एकायचा प्रयत्न केला तरी ते विचित्रच तेव्हाही वाटलेले आणि आताही.
नवीन नवीन आलेला शारुख अगदी मन लावून नाचह्तोय…

Pages