मला चुकीची ऐकू आलेली गाणी -३

Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33

पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.

आधीची पाने इथे पहायला मिळतील..

http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आभाळमायाचे गाणं ऐकताना हल्लीच माझ्या लक्षात आलं की मी एक शब्द चुकीचा ऐकलेला आणि तोच म्हणत होते. गंमत म्हणजे नवरा दोन दिवस गुणगुणतोय, तोही तो शब्द चुकीचाच म्हणतोय मग मी त्याला योग्य शब्द सांगितला.

घननीळा डोह,
पोटी गूढ माया (असं आहे ते)

हयातलं पोटीच्या ऐवजी मी अति म्हणत होते. ते पोटी आहे मला हल्लीच समजलं. नवराही अतिच म्हणत होता.

Lol सहीच.

पोटी कोटी match तरी होतं. अति कुठून ऐकलं मी काय माहित.

'येथोनी आनंदू रे' या अभंगातील 'लक्ष्मी चतुर्भुज झाली' ही ओळ 'लक्ष्मीची टरबूज झाली' अशी ऐकायला यायची. मनात यायचं, संत एकनाथ असं कसं काहीही लिहतील!

अनुप जलोटा चे भजन.. वो काला एक बासुरी वाला आहे original..
मी काल पर्यंत गोपालाएक बासुरी वाला म्हणत होते..

नका हो बिचारीच्या डोळ्यात फूल पाडू >> मला वाटायचं प्रियकराला त्याच्या प्रियेच्या डोळ्यात काय वाट्टेल ते दिसू शकेल. आवडत असेल त्याला सोनचाफा खूप.

अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांनी मूलतः गायिलेले "डोळे कशासाठी..." हे गाणे. दिवाळी पहाट ला गाताना त्या गायिकेने त्यातली एक ओळ "सारी कशासाठी? तुला बिलगून भिजुन जाण्यासाठी" अशी गायिलेली ऐकून क्षणभर चमकलो. अरुण दातेंच्या गाण्यात अशी ओळ? मग पटकन गुगलून बघितले. तर ते "सरी कशासाठी?" असे आहे. गायिकेने समोरच्या स्क्रीनवर इंग्लिशमधल्या sari चे सारी केले असावे.

'अवचिता परिमळू' गाण्यात आताआतापर्यंत मला ही ओळ अशी वाटायची

सासरची सासरची, माहेरी निघाले

ती खरी 'चाचरती चाचरती, बाहेरी निघाले' अशी आहे असं नुकतंच कळलंय.

ते - शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा - गाणं आहे ना, त्यात - माकड म्हणाले, कधी वर कधी गुडी, शेपटीवर मी मारीन उडी - असं ऐकू येतं.

गुडी म्हणजे काय? की तिथे उडी पाहिजे किंवा कुठला दुसरा शब्द? हे अनेकांना कळलेलं दिसत नाही. नवीन लोकांनी गायलेली व्हर्जन्स ऐकली तर त्यात सोयीस्करपणे "कधी वर कधी खाली" असं केलेलं आहे. पण जुन्या गाण्यात खाली नक्कीच नाहीये.

हो, बुडी आहे. झाडाबुडी म्हणतो तशा अर्थाने.
त्या गाण्यात 'ध्यानात धरीन, ध्यानात धरीन' असं आहे, ते कुठल्यातरी सीडीमधे 'ह्याला धरीन, त्याला धरीन' असं गायलं आहे Lol

किसी पत्थर की मूरत से महोब्बत का इरादा है
परस्तिशकी तमन्ना है किफायत का इरादा है

इबादत का इरादा है म्हणे original
परस्तिशकी म्हणजे काय?

परस्तिशकी तमन्ना है किफायत का इरादा ह >> किफायत नसून इबादत आहे. परस्तिश म्हणजे वरणे/ पूजा करणे नि इबादत म्हणजे प्रार्थना करणे.

या वरच्या गाण्याची दुसरी ओळ मला कधी समजलीच नाही, ती आज समजली. परस्तीश किती कठीण शब्द आहे, तो शब्दच कधी समजला नाही. ईबादत ऐकू यायचे पण तमन्ना कसली ते आज समजलं.

तुम्ही पार वाट लावलीत Lol

मला एकदम परस्त्री म्हणतोय म्हणून बायको लाटणे घेऊन धावतेय त्याच्यामागे असं दृश्य दिसलं.

Pages