Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33
पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.
आधीची पाने इथे पहायला मिळतील..
http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दूस दूस आहे ना ते?
दूस दूस आहे ना ते?
बापरे! पियू!
बापरे! पियू!

कुठे मिळाले हे लिरीक्स ?
गुगलवर
गुगलवर
माझा भाऊ प्रिटी वूमन हे गाणं
माझा भाऊ प्रिटी वूमन हे गाणं ग्रिडी वूमन.. असं ऐकायचा.
आज काल हे व्हायरल झालंय:
आज काल हे व्हायरल झालंय: जल्दी आ गॅस वाला
मूळ शब्द:
क़लबिया क़स्स वल्लाह
क़लबिया क़स्स वल्लाह
क़लबिया क़स्स वल्लाह
आज कळलं की गाणं चुकीचं ऐकू
आज कळलं की गाणं चुकीचं ऐकू येण्यासाठीही एक शब्द आहे.
mondegreen is a misheard word or phrase, usually from a song or a poem, that makes a new kind of sense. The word was made up in 1954 by writer Sylvia Wright. She misheard the old Scottish song line "laid him on the green" as "Lady Mondegreen".
छान माहिती भरत. इंग्लिशमध्ये
छान माहिती भरत. इंग्लिशमध्ये बरेच शब्द असे खूप specialized आहेत, कधीकधी फार नवल वाटते. याप्रमाणेच, बरेचदा मंगळावर माणसाचा चेहरा दिसला किंवा अवकाशात डोळ्यासारखी नेब्यूला आढळली वगैरे दावे केले जातात. म्हणजे, कोणतेही तर्कसंगत कारण नसताना एखादी अनोळखी वस्तू अन्य परिचित वस्तूसारखी भासते. यासाठीही एक इंग्लिश शब्द आहे, तो आता पट्कन आठवत नाही. असो, थोडे विषयांतर झाले.
परवा "फिर छिड़ी रात, बात फूलों
परवा "फिर छिड़ी रात, बात फूलों की" गझल गुणगुणत होतो. त्यात एक ओळ आहे "ये महकती हुई ग़ज़ल मख़दूं". कॅसेट्सच्या जमान्यात हा मख़दूं शब्द नक्की काय कळत नव्हता. मकडू, मगदूम असे काहीही ऐकायला येत असे. पण तो शब्द नसून गझलकारांचे नाव आहे हे आत्ता आत्ता उमगले. शायर मख़दूम मोहिउद्दीन यांची हि गझल आहे.
ओह्ह मला माहित नव्हते, मला
ओह्ह मला माहित नव्हते, मला वाटायचे, ते काहीतरी भारी गझल आहे, अशा अर्थाने आलेय कडव्यात
मुकेशचं "येतो कहो, कौन हो तुम
मुकेशचं "येतो कहो, कौन हो तुम , कौन हो तुम" गाणं आहे.
ते लहानपणी हिंदी अजुन धड येत नसताना "येता का हो? कोण(कौन) हो तुम?" असं ऐकू यायचं.
म्हणजे एक विचारतंय "येता का हो?" आणि त्यावर दुसरा म्हणतोय "कोण हो तुम्ही? (ऑं) कोण हो तुम्ही?" असं वाटायाचं.
कधीकधी काय होतं की हिंदीची
कधीकधी काय होतं की हिंदीची नीट समज नसल्याने गाण्याचा भलताच अर्थ वाटतो, म्हणजे शब्द नीट ऐकू आले तरी.
माझ्या बाबतीत हे दोन गाण्यांसाठी झालं आहे.
दिल है के मानता नही - ही हिंदीतील एक phrase आहे हे नीट माहिती नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा हे गाणं/चित्रपटाचं नाव बघितलं तेव्हा त्याचा अर्थ 'मला हृदय आहे हेच मी मानीत नाही!' असा घेतला होता
मै अगर कहू - ओम शांती ओम मधील गाणं. त्यातील 'तारीफ ये भी तो सच है कुछ भी नही' या ओळीचा अर्थ 'मी तुझी फक्त तारीफ करतोय, हे यातलं खरं काहीच नाही' असा घेतला होता.
अर्थात खरे अर्थ कळाल्यावर मीच मला वेड्यात काढलं होतं!!
अगदी लहानपणी हिंदीची /
अगदी लहानपणी हिंदीची / उर्दूची जेमतेम समज होती तेव्हा ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नहीं‘ चा अर्थ ‘तुझ्याशिवाय आयुष्यात कुणी काही शिकवलं नाही‘ असा लावला होता.
घन रानी साजणा ....
घन रानी साजणा ....
ह्यातील घनरानी मला वनराणी सारखी कुणी वाटायची.
मै अगर कहू - ओम शांती ओम मधील
मै अगर कहू - ओम शांती ओम मधील गाणं. त्यातील 'तारीफ ये भी तो सच है कुछ भी नही' या ओळीचा अर्थ 'मी तुझी फक्त तारीफ करतोय, हे यातलं खरं काहीच नाही' असा घेतला होता.>>>> अर्रे मी हाच अर्थ घेतेय
अनेक वर्षं मी गरवा लगाना
अनेक वर्षं मी गरवा लगाना म्हणजे गरबा खेळणे समजत होतो. ते वडोदरा शब्दात व चा ब होऊन बडोदा करतात तसंच हे वाटायचं.
गरवा लगाना >>> मला तर अजूनही
गरवा लगाना >>> मला तर अजूनही नेमका अर्थ माहीत नाही. मी आपलं अंदाजे गळाभेट घेणे मानून चालले आहे.
सगळेच हहपुवा सुटलेयत.
सगळेच हहपुवा
सुटलेयत.
गरवा लगाना = गले लगाना बरोबर
गरवा लगाना = गले लगाना बरोबर आहे. 👍
संत फार पंढरीत असं वाटायचं.
संत फार पंढरीत असं वाटायचं.
समजायचं नाही की मग प्रॉब्लेम काय आहे?
समजायचं नाही की मग प्रॉब्लेम
समजायचं नाही की मग प्रॉब्लेम काय आहे?
संतभार पंढरीतनेही तसंच
संतभार पंढरीतनेही तसंच वाटायचं. पंढरीवर संतांचा भार पडलाय.
मग त्याचा अर्थ संत मेळावा आहे असं कळलं.
समजायचं नाही की मग प्रॉब्लेम
समजायचं नाही की मग प्रॉब्लेम काय आहे? >>>
मन क्यों बहका रे बहका मध्ये
मन क्यों बहका रे बहका मध्ये मला 'बिना सिन्दूर की सौ' ऐकू यायचं. अनुराधा पटेल ही लग्नाची बायको मोठ्या मनाने रेखाला ऍक्सेप्ट करत म्हणत असेल असं वाटायचं. खूप वर्षांनी समजलं की ते 'दे ना सिंदूर की सौ' (सौगंध या अर्थाने) आहे.
ह पा, मेधावि
ह पा, मेधावि
(No subject)
Pages