क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरफराज लूज बॉल बघून मारतोय बिनधास्त..
सो फार सो गूड... बघता बघता 40+ झाले त्याचे.. गिल अय्यर पाटीदार खेळताना कधी होताहेत असे व्हायचे.. आणि झाल्यावर चिक्कार झाले असे वाटायचे.

त्याला आज संधी मिळाली हे चांगले झाले. रणजीत इतक्या धावा करून सुद्धा संधी मिळाली नाही आणि आयपीएल चमकलेल्याना सहज संधी मिळू लागली तर नवीन पोरांचा विश्वास कसा बसणार डोमेस्टिक खेळण्यावर..

सरफराज ने मन जिंकले आज..
त्याला धावबाद झालेले बघून वाईट वाटले..
पण पहिल्या सामन्यात इतक्या आत्मविश्वासाने सहज सुंदर फटके मारत खेळणारा प्लेअर नाही पाहिला गेल्या बरेच दिवसात.. आजचे याचे स्पिन खेळायचे तंत्र आणि अप्रोच बघून वाटले की हा पहिल्या सामन्यात असता तर निकाल वेगळा असता..

“पण सरफराझ सवतीचा आहे” - आज खुश तो बहुत होगे तुम...आय!! Happy

very happy for Sarfaraz and glad that he grabbed the opportunity with both hands!! रन-आऊट फारच दुर्दैवी होता. शर्मा फायनली showed-up (thank god!!). जडेजा मस्त खेळला.

आज खुश तो बहुत होगे तुम...आय!! >> हे हे हे ! खरच बरं वाटलं पड्डीकल च्या मी विरोधात नाही फक्त सर्फराझला डावलले जाणे खटकत होते. जाडेजा समोर असला कि हे असले रन आऊट्स जास्त होऊ लागलेत. काय गडबड आहे कळत नाही. त्या विकेट ने आपण इनिशीएटिव्ह घालवला असे वाटले. Sarfaraz एकदम अय्यर आधी खेळायचा तसा खेळत होता.

स्पिन खेळायचे तंत्र आणि अप्रोच बघून वाटले की हा पहिल्या सामन्यात असता तर निकाल वेगळा असता.. >> +१

पटिदारने परत निराशा केली . दुसर्‍या इनिंग मधे खेळला नाही तर पड्डीकल साठी रस्ता मोकळा होणार. ह्या पिचवर पहिल्या दोन दिवसांमधे शंभरच्या खाली स्कोअर करणे फेल्युअर आहे.

"ह्या पिचवर पहिल्या दोन दिवसांमधे शंभरच्या खाली स्कोअर करणे फेल्युअर आहे." - खरं तर ह्या पीचवर इंग्लंडसमोर ५०० च्या आतलं टारगेट ठेवणंच घातक ठरू शकतं.

काल मस्त खेळाला सर्फराज. वजन पण कमी करून आलाय.
रन आऊट दुर्दैवी होता, जडेजा नी एक्स वर चुकीच्या कॉल ची जवाबदारी घेतलीये.
एका दृष्टीनी शतक नाही झालं ते बरं आहे. पहिल्या सामन्यात शतक मारणाऱ्यांचे करीअर सध्या फार लांब टिकत नाहीये (युवराज, रैना, शॉ, अय्यर ही नावं आठवली लगेच, आम्रे पण त्यातलाच)

रन पळताना आपले बॅटर पिच च्या मधनं पळाल्यानी आपल्याला 5 रन चा दंड, इंग्लंड चा डाव सुरू होताना या रन्स अवांतर म्हणून ऍड झालेल्या असतील.
काल वॉर्निंग मिळाली होती

अँकी
आपल्या कप्तानाचेच आहे की पहिल्या सामन्यात शतक Happy
कसोटी कारकिर्द त्याचीही अडखळलेली, पण संपता संपता काही विक्रम तो या फॉर्मेटला सुद्धा करून जाणार..

आपल्या कप्तानाचेच आहे की पहिल्या सामन्यात शतक
>>
२०२० असतं तर शर्मा चं नावं पण घेतलं असतं
पण he has come a long way from there...
आज कप्तान आहे

पण या बाकी लोकांच्या नशीबी तितका लाँग रोप नव्हता
अय्यर ला मिळेल कदाचित, जर रणजी मधे प्रूव्ह केलं तर

कसोटीत कोहलीच कर्णधार हवा होता या बझबॉलला उत्तर द्यायला.. >> कोहली चे माहित नाही पण रोहित बॉलिंग च्या वेळी इंग्लंड जरा अ‍ॅग्रेसीव्ह झाले कि एकदम गोंधळलेला का वाटतो ते कळत नाही. तीच गोष्ट अश्विनची. त्यांनी असे काही आधी पाहिलेले नाही असे नाही किंवा टेक्निकल अ‍ॅक्युमेन कमी आहे असेही नाही. एक बुमरा सोअडला तर बाकीचे अन ऑर्थोडॉक्स अ‍ॅप्रोचसमोर एकदम भांबावलेले वाटतात.

मला उगाचच पुजारा हवा होता ह्या टेस्ट मधे असे वाटते. वेळ काढायला त्याला पर्याय नाही.

कालचे गिल चे डीसमिसल बघून एकदम काही वर्षांपूर्वी चा राहुल आठवला. गिल राजकोटसारख्या पिचवर असा बाद होत असेल तर बाहेर काय होईल ? होप राहुल सारखेच तो हि किंक सुधारेल.

काल सर्फराज बाहेर येऊन फ्रंट लेग बाजूला करून मारत होता ते बघून जुना सचिन वार्ण च्या समोर नि लक्षमण २००१ मधे खेळायचे ते आठवले, बर्‍याच इद्वसांनी कोणि तरी एव्हढे सुंदर फूटवर्क वापरलेले बघितले स्पिनसमोर.

Big breaking:
Ashwin has pulled out of the Rajkot Test due to family emergency.

ते बघून जुना सचिन वार्ण च्या समोर नि लक्षमण २००१ मधे खेळायचे ते आठवले,
>>>>>>
अगदी अगदी.. बॉल वर पोहोचून मारत होता त्यामुळे मोठे फटके जराही रिस्की वाटत नव्हते. त्यामुळे बघायला मजा येत होती.

अँडरसनला पुढे येऊन खेळू लागला. त्यावर त्यांना किपर पुढे आणावा लागला. आणि त्यासाठी देखील तो तयार वाटला... रन आऊट झाला नसता तर त्याने आज आपल्याला गेममध्ये खूप पुढे नेऊन ठेवले असते..

दुसऱ्या इनींगाला टॉप ऑर्डर खेळली तर त्याला चौथ्या नंबरवर बघायला आवडेल. तसेही आपण दर इनिंगल काहीतरी बॅटिंग ऑर्डर बदलातोच..

“ काल सर्फराज बाहेर येऊन फ्रंट लेग बाजूला करून मारत होता ते बघून जुना सचिन वार्ण च्या समोर नि लक्षमण २००१ मधे खेळायचे ते आठवले,” - सर्फराझ एकदम फर्स्ट क्लास क्रिकेट खेळून मुरलेला बॅट्समन वाटला. कुठे नवखेपणा जाणवलाच नाही. जुरैल पण मस्त खेळला. वूड ला अप्परकट ची सिक्स मारताना हा माणूस टेस्टमधे फक्त डझनभर बॉल्स खेळलाय असं वाटलंच नाही. पहिले १०-११ डॉट्स खेळताना सुद्धा व्यवस्थित डिफेंड करत होता. दोन्ही डेब्युटंट्स मस्त खेळले आहेत.

“ कसोटीत कोहलीच कर्णधार हवा होता या बझबॉलला उत्तर द्यायला..” - I miss ViKo’s aggression!!

आश्विन गेल्याने सामन्याचे अवघड आहे. आता. आज तो आणि बूमराह दोघेच विकेट काढतील असे वाटत होते. जडेजा दुसऱ्या इनिंगला चालेल. पहिल्या इनिंग मध्ये सामना हातचा जायला नको. उद्या सकाळी बुमराह पहिल्या स्पेल मध्ये दोन विकेट हव्यात.

319 सर्वबाद
फुल्ल राडा

याला बोलतात कसोटी क्रिकेट
काल एक सेशन त्यांनी आपल्याला तुडवला आज आपण त्यांना उडवला..
जो पर्यंत ही मजा आहे तो पर्यंत कसोटी क्रिकेटला मरण नाही..

यशस्वी पेटलाय नुसता...
इगो हर्ट झाल्यासारखा किंवा इंग्लंडला दाखवून द्यावे इथले बॉस आम्हीच आहोत असा खेळतोय.. बस ठोकून काढायचे आहे असा विचार आहे.

बाई दवे,
आज सुद्धा रूट शहाणपणा करत बुमराहला रिव्हर्स स्वीप मारण्यात बाद झाला आणि तिथून सगळा खेळ पटलला.

पाटीदारचा खेळायचा मूडच नव्हता वाटते आज.
या मॅचनंतर आपली कसोटी करीअर संपली अश्या विचारात होता बहुधा.. एकदम फालतू बॉल होता आणि काहीतरी मारायचे म्हणून मारून बाद झाला.

यशस्वी ने पाहिले द्विशतक सुद्धा मारले नव्हते तेव्हाच म्हटले होते की या मालिकेत सर्वाधिक धावा त्याच्या असतील... आणि आज त्याने दुसरे द्विशतक मारले.. क्या बात !!

अँडर्सनला लागोपाठ तीन षट्कार!
सर्फराज स्वतःला किंवा जयस्वालला धावबाद करेल की काय असे वाटत होते. किती ही घाई? कसोटी सामना आहे नि त्यातहि ८ पेक्षा जास्त धावांच्या सरासरीने खेळ चालू आहे, मग एव्हढी घाई कशाला?
पण त्याचे पन्नास नि जयस्वालचे दोनशे बघून धन्य झालो. ४ बाद ४३०!!

पण इंग्लंड का बरे एव्हढे लवकर बाद झाले? आपली गोलंदाजी नि क्षेत्ररक्षण एव्हढे चांगले आहे? की त्यांचा खेळायचा मूडच गेला?

भाउ, एक व्यंगचित्र येऊ द्या!!

भारताचा जबरदस्त विजय!! गिल, कुलदीप, जैस्वाल, सर्फराझ, जुरैल, जडेजा - कौतुक करावं तितकं कमी आहे. मला लगान मधला ‘रौंद डालो कैप्टेन रसेलकें अहंकार को’ म्हणणारा कुलभुषण खरबंदा आठवला (रेफरन्सः डकेट चं ‘त्यांना हवा तेव्ह्ढा स्कोअर करू दे, आम्ही तो चेस करू‘). Happy

रोहीत शर्मा 11 कसोटी शतक सर्व सामने भारत विजयी... कमाल आहे हे
या सामन्यात सुद्धा ओपनिंग करत 32-3 वगैरे स्थितीमधून 137 ची कप्तान इनिंग खेळत बाजी पलटवली.

>>मग एव्हढी घाई कशाला?
पण त्याचे पन्नास नि जयस्वालचे दोनशे बघून धन्य झालो.

on a lighter note
कारण ड्रेसींग रुम मध्ये द्रवीड बसला होता.... न जाणे कधी डिक्लेअर करेल Wink

पण कम्माल खेळले दोघेही!!
पूर्ण मॅचमध्ये तेव्हढाच तासा-दोन तासाचा खेळ सलग बसून बघितला.... मज्जा आली Happy

इंग्लंडने फारच निराशा केली. भारताची गोलंदाजी दुसर्‍या इनिंगमधे पहिल्या बॉलपासून मस्त झाली. रन होत नसल्याचाच जास्त दबाव आला त्यांच्यावर असं दिसतंय. शनिवारीसुद्धा धावा रोखल्याचा जास्त परिणाम झाला. जयस्वाल फारच छान खेळला. मुख्य म्हणजे शतक झाल्यावर सुद्धा जबाबदारीने खेळला.

Pages