दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही.

कृष्णा, बरोबर. पण ओळखतात इथे गाणं.

माझे मन ओके.

१. गाणे कृष्णधवल आहे.
२. एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका जी कि राजघराण्याशी संबंधित आहे, तिच्या भाच्या अभिनेत्र्या आहेत. त्यांची आजीही अभिनेत्री होती. यांच्या पैकी एक कुणीतरी नायिका आहे.
३. गाण्याची सुरूवात गायिकेच्या आवाजाने होते.
४. चित्रपटाच्या शीर्षकात एक शब्ब्द असा आहे ज्या शब्दाचा मुन्शी प्रेमचंद यांच्या किमान दोन कथांच्या शीर्षकात उपयोग केलेला आहे.

ही नायिका तनुजा किंवा नूतन असावी.बरीच गाणी पटापट पाहिली.सगळीकडे नुसता अंधार आणि नद्या आणि झाडं आहेत.बर्फ मिळालाच नाही.ग्लोबल वॉर्मिंग प्रॉब्लेम यु नो.

एक क्ल्यु राहिला.

५. नायकाच्या भावाने एका अभिनेत्रीशी गांधर्व विवाह केला.या अभिनेत्रीच्या एका चित्रपटात काव्यात्मक संवाद होते. त्यातले एक प्रचंड गाजलेले गाणे ज्या गायकाने म्हटले आहे त्याच्याशी संबंधित एक इव्हेण्ट येत्या एक दोन दिवसात आहे.

फैली हुई है सपनो की बाहे.

...
पण क्लूज वाचून (जे फारसे कळले नाहीत, शिर्षकाबद्दल वगळून) हे नसावे.

सुचित्रा सेन देव आनंद बम्बई का बाबू - दीवाना मस्ताना हुआ दिल
अभिनेत्रीच्या एका चित्रपटात काव्यात्मक संवाद होते. - या क्लू मुळे समजले

1) नायक 2 किंवा 3(तिसऱ्या बद्दल संभ्रम आहे.)
2 किंवा 3 नायकाच्या परिवारातील किमान 2 आणि कमाल 5 सदस्य बॉलिवूड संबंधित.
2) नायिका....हम्म.शोधल्या नाहीत तरी चालेल.
3) एका लोकगीतावरून प्रेरणा.
4) द्वयर्थी गाणी चित्रपटात, त्या काळच्या परंपरेनुसार.
5) गाणे जीवनाचा एक सिद्धांत सांगते.
IMG_20231222_131001.jpg

अजून हींट:
1. नायक 1 आणि नायक 2 यांचे छंद वेगळे पण परिणाम सारखा आहे.
2. नायक 1 आणि नायक 2 यांच्या बायका बॉलिवूड मध्ये ओके आहेत पण इतर क्षेत्रात यशस्वी.
3. नायक 1 आणि नायक 2 यांची मुले बॉलिवूड मध्ये नाहीत.

नायक1 आणि नायक2 यांची लोकमानसात प्रतिमा अगदी विरुद्ध होती.नायक 1 एकाच प्रकारचे चित्रपट करायचा/करतो.

गाणी शोधताना ती लावून देवादिकांच्या फ्रेम्स शोधणे हे चित्राच्या क्वालिटीमुळे जमत नाही. त्यामुळं आता या कोड्यातून माघार.

चक्क माघार?असा धीर सोडू नका.मोबाईल वरून स्क्रीनशॉट घ्यायला लागल्यामुळे असा येतो.पण चित्र नीट बघूनही विशेष उपयोग झाला नसता.उपयोग क्लूज ने होतो.
बरं अजून एक सोपा क्लू.यात ध्रुवपदात जे शब्द आहेत त्यावर विशिष्ट राज्यातील बायका हात गोल गोल फिरवत पदर सांभाळत गोल गोल नाचत नृत्य करतात.

Pages