दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नो

नाही. अजून एक क्ल्यु देतो.
यातल्या एका अभिनेत्याच्या आंटीने यातल्याच दुसर्‍या अभिनेत्याच्या नात्यातल्या एका अभिनेत्याच्या चित्रपटात आयटेम नंबर केलेला आहे.

Lol

>>> यातल्या एका अभिनेत्याच्या आंटीने यातल्याच दुसर्‍या अभिनेत्याच्या नात्यातल्या एका अभिनेत्याच्या चित्रपटात आयटेम नंबर केलेला आहे.
म्हणजे नव्या डॉनमध्ये करीना? (आंटी मत कहो ना!)

आता आंटी शोधणे आले. ती सुद्धा आयटम नंबर करणारी.
अगोदर अक्षय, सैफ आणि लारा/ प्रियांका/ सुश्मिता असावे असे वाटत होते.

क्यों गुम है खुशियाँ
Help (2010)
https://www.youtube.com/watch?v=Hncwj6UUR_k

यातल्या एका अभिनेत्याच्या आंटीने यातल्याच दुसर्‍या अभिनेत्याच्या नात्यातल्या एका अभिनेत्याच्या चित्रपटात आयटेम नंबर केलेला आहे. >>> श्रेयस तळपदे - आंटी = जयश्री टी

>>> श्रेयस तळपदे - आंटी = जयश्री टी
ओह हे माहीत नव्हतं!
(आणि सिनेमाचं तर नावसुद्धा ऐकलं नव्हतं!)

मला श्रेयस लक्षात आलं होता पण उत्तर येणं शक्य नव्हतं. मी दुसरा ॲक्टर सैफ धरून चालले कारण घराण्यातील सहा जण अभिनय क्षेत्रात हा क्लू आणि फोटोतील केसांची स्टाईल, दोन्ही जुळत होतं.

शेवटचं कोडं असल्याने हेअर स्टाईल लगेच ओळखता यावी ही काळजी घेतली होती.
पण कोडं घालताना सोपं वाटलं तरी ओळखताना ते वाटेलच असं नाही. गुगल लेन्स, चॅट जीपीटी काहीही उपयोगाचे नाहीत.
इथे फक्त साँग जीपीटीच कामी येतात. मांजरावरून गाणं ओळखणे हा विश्वविक्रम आहे या धाग्यावरचा.
नव्या धाग्यावर असेच नवनवे विक्रम व्हावेत या शुभेच्छा.

मुग्धा गोडसे हिने "मराठी पाऊल पडती पुढे" या कार्यक्रमात जज्जची भूमिका निभावली होती. ती मिस इंडीया आहे. या कार्यक्रमाशी काही मायबोलीकरांचा संबंध आहे. हा क्ल्यू होता.

हे घ्या खूप दिवसांनी एक कोडे
१. एक हिरो दुसऱ्या हिरोच्या काकांच्या सेक्रेटरीचा मुलगा
२. हिरोईन्सचे ओरिजिन भारताच्या दोन टोकाचे आहे.
३. दिग्दर्शक चित्रपटीय रोमान्ससाठी प्रसिद्ध
olakha pahu.png

Pages