दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षय खन्ना, तुषार कपूर यांचे लग्न झालेले नाही. कमल सदाना आणि सुनील शेट्टी यांच्या बायका हिट हिरॉईन असल्याचे ऐकिवात नाही.
पूजा भट्ट आणि तब्बूची मोठी बहीण या शक्यता वाढल्या.

अक्षय खन्ना तुषार कपूर कमल सदाना सुनील शेट्टी हे 2 नंबरच्या क्लू साठी हो, यांचे नातेवाईक बॉलिवूड मध्ये.

वो फिर आयेगी उत्तर आलं आधीच.हे मला जन्मात गेस नसतं झालं :)रियल साष्टांग खंगरी.

IMG_20231218_225200.jpg
1. ही मुख्य नायिका नाही
2. नायकाचे वडील व आजोबा चित्रपट सृष्टीत
3. कथा 2 भावांच्या संघर्षाबद्दल
4. नायिका गुगल करू नका.काहीच मिळणार नाही.
5. नायक बॉलिवूड आणि इतर चित्रपट सृष्टीत

२. रणबीर / रणधीर / ऋषी / राजीव /करण कपूर / कुणाल कपूर / सनी देओलचा मुलगा राजबीर देओल ..

song.png

हिरोईनची मावशी, हिरोचा मेव्हणा, पिक्चरमधला एका ऍक्टरचे आई-वडील, कोऍक्टरची बायको हे सर्व चित्रपटसृष्टीत नावाजलेले स्टार्स/ऍक्टर्स आहेत.

दिल दिल दिल मै तेरे प्यार मे खोया - आतिश. करिश्मा कपूर,अतुल अग्निहोत्री.

त्या हिरव्या बाईकला एकही क्लु आवश्यक नाही. Proud

बरं आता हे सांगा...
song_0.png

हिरो हा हिरोईनच्या वेगळ्या चित्रपटातील कोऍक्टरच्या वेब सिरीजमधल्या ऍक्ट्रेसचा (भूतपूर्व) सासरा

पहिल्यांदा वेळेत आले आणि बरोबर उत्तर देता आहे ... लैच भारी वाटतंय
हिरवी बाईक पण ओळखली होती पण तोवर उत्तर आले होते ....
कुठल्या कुठल्या फ्रेम्स डोक्यात घट्ट बसलेल्या असतात ना

सध्या कॅच अप मोड मधे असल्याने इथले सर्व क्लूज व ते ओळखणारे यांना एकत्रित टोटल रिस्पेक्ट देत आहे. इथले लोक That guy looks like the guy in the movie I went to see my ex-boyfriend with अशा क्लूजवरूनही कलाकार/चित्रपट ओळखतील.

मांजरावरून पिक्चर ओळखणे, हिरवी बाईक यांना स्पेशल लोल. अस्मिता - दिल दिवाना बद्दल इतरत्र बरेच मटेरियल आहे. पण ते माबोवर रानोमाळ आहे. सापडणे अवघड आहे. हिंदी रोमॅण्टिक गाण्यात तिसर्‍या कडव्यापर्यंत शहनाई चे संगीत व बरात लेके आओ/आयेंगे, अंगना मे फूल खिलेंगे चा उल्लेख अलाउड नाही. इथे ही करवा चौथला आल्यासारखी पिकनिकला येते. सलमानचा खांबाबरोबरचा डान्स म्हणजे तेथे रिहर्सल करून मग भाग्यश्रीबरोबर त्याच स्टेप्स केल्या पण एडिटिंग मधे चुकून हे आले असे झाले असावे. किंवा त्या सीन मधे केमिस्ट्री जास्त वाटली असेल.

क्लूज द्यायला चालू करते:
1. नायकाचा सासरा,सासू,बायको,मेव्हणी,मावस सासूबाई हे सगळे बॉलिवूड शी संबंधित आहेत.
2. नायिकेचा नवरा,सासरा, दीर बॉलिवूड शी संबंधित
3. सर्व गाणी प्रसिद्ध आहेत.
4. गाण्याच्या गायकाने 2 लग्ने केली आहेत.

Pages