क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकूणच आपल्या बॅटर लोकांचा पळून धावा घेण्यावर भर नाहीये (चौकार / षटकार किंवा डॉट), अन् जमत ही नाहीये.
जयस्वाल नी मूर्खा सारखा कॉल देऊन गायकवाड ला खाल्ला.

आणि दोन तीन शॉट्स मारून बरोब्बर प्लेस केलेल्या स्मिथ कडे कॅच देऊन परतला

आयपीएल पासून पाहिलेली (आणि कदाचित इथे लिहिलंही असेल) गोष्ट म्हणजे बिश्नोई ची फिल्डिंग. त्याला फिल्डिंगवर कष्ट करायची गरज आहे. मॉडर्न क्रिकेटमधे फिल्डर लपवायची सोय राहिलेली नाहीये.

जैस्वाल टॅलेंटेड आहे पण अजून कच्चं मडकं आहे.

आयपीएलमुळे तरूण भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेत बराच फरक पडलाय. पण डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल क्रिकेटच्या दर्जातली तफावत बहुदा तशीच आहे.

आणखी किती दिवस त्या ऑसीजना इथेच खेळवत ठेवणार, तो विश्वचषक इथेच रहावा म्हणून !!!
20190124_233403_0.jpg

आज कुठेतरी मीम बघितले की रोहित आणि कोहली सुर्या ला म्हणतायत की लेका त्या दिवशी असा खेळला असतास तर कप आपला असता Wink

*.....for free in India.* - पैसे देवून आता बघतील का कुणी, ही शंका तर असणारच ना !!!! Wink

भाऊ
ते फ्री मध्ये पण दाखवत नाहीयेत. असे ऋन्मेऽऽष म्हणताहेत.

जिओ सिनेमा वर आहे मॅच..
माझ्याकडे जिओ सिम कार्ड असल्याने जिओ टीव्हीवर सुद्धा दिसली..
मध्ये मध्ये कधी याचा तर कधी त्याचा सर्वर डाऊन होत होता.. त्यामुळे मी अर्धी इकडे अर्धी तिकडे बघितली..

काल सामना क्लोज झाला तरी प्रेक्षक म्हणून तितके टेन्शन आले नाही..
कदाचित वर्ल्डकप फायनल पराभवामुळे, "अब इस से बुरा क्या होगा" अशा मनस्थितीत आहे

कुठे बघत आहात सामना
जिओ सिनेमा वर प्ले नाही होत आहे

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 November, 2023 - 20:1ञ
सर
भाऊ मला म्हणतील कि हा केशव कूल नंबर १ फेकू आहे.

हो तेच ना .. आधी तिथला सर्वर डाऊन होता.
मग लक्षात आले आपल्याकडे जीओ सीम आहे. मग जिओ टीव्ही इन्स्टॉल केला. त्यावर बघितला. थोड्या वेळाने जिओ टीव्हीचा सर्वर डाऊन झाला. मग जिओ सिनेमावर लागतोय का चेक केले. तर आता तिथला सर्वर चालू झाला होता. तिथे थोडी बघितली. थोड्या वेळाने पुन्हा जिओ टीव्हीवर बघितली. जिओ टीव्ही वर बघताना भारताचा खेळ चांगला होत होता म्हणून मग जास्त वेळ तिथे बघितली.

हे म्हणजे "समांतर विश्व" झाले.
एका सर्वर वर इंडिया जिंकतेय आणि दुसर्या सर्वर इंडिया हरतेय!
सर तुम्ही तर jioचे मालक आहात. काही तरी करा.

कुणी टी २० सिरीज फॉलो करत नाही आहे, की वर्ल्डकप वर टायपून थकलेल्या बोटांना विश्रांती देताय?

गंमत बघा, आपले गिल, अय्यर, राहुल विश्रांती घेताहेत पण स्मिथ, हेड, मॅक्सवेल वगैरे ऑसी खेळताहेत. ते वर्ल्डकप जिंकूनही दमत नाहीत.

असो, परवा तिसऱ्या सामन्यात ऋतुराज च्या कडाक १०० नंतर मॅक्सवेल नी आपला अफगाण केला.
त्यानी अन् वेड नी शेवटच्या २ ओव्हर मधे ४५ चोपले.
प्रसिध कृष्णा नी ४ ओव्हर मधे ६८ रन दिले (शेवटच्या ओव्हर मधे २३). सूर्या नी सहावा बॉलर न वापरायची परंपरा कायम राखली अन् तिलक वर्मां ला बोलिंग दिली नाही.
आता उद्या आपण मालिका खिशात घालू का शेवटच्या सामन्याला महत्त्व द्यायला प्रयोग करू ते बघायचं. उद्या अय्यर खेळेल बहुतेक.

मॅक्सवेल नी आपला अफगाण केला.>> आणि वेड ने पाकिस्तान केला Happy

अजून विश्वचषकाने mood off च आहे..
या सामन्यातील हार जीत अजून सुख दुख देत नाहीये..
स्कोअर फॉलो करतोय.. फार वेळ लाईव्ह बघत नाहीये..

मी आता आफ्रिका दौराची वाट बघतोय. तिथले विजय आनंदी करतील.. त्यातही कसोटी मालिका विजय मिळवला तर हे दुःख जाईल आणि चेहऱ्यावर हास्य फुलेल.

परवाची मॅच भारताने हारायला नको होतं. २ ओव्हर्समधे ४३ रन्स इंटरनॅशनल गेममधे चेस व्हायला नको होते. लीग क्रिकेटमधे हे होऊ शकतं, पण इंटरनॅशनल मॅच मधे नाही. शेवटच्या ओव्हरमधे २१ रन्स काढताना मॅक्सवेल शांत होता, आणि प्रसिध कृष्णा स्ट्रेस्ड होता. Uhoh

असो. सपोर्ट स्टाफला टी-२० वर्ल्डकपपर्यंत एक्स्टेंशन मिळालं ही चांगली बातमी आहे.

द. अफ्रिका दौर्यासाठी टीम्स डिक्लेअर झाल्या. वनडे मधे ऋतुराजला मोठी संधी आहे. टी-२० मधून शर्मा-कोहली हळू हळू फेड आऊट होतायत का?

शर्मा कोहली २०-२० विश्वचषकात खेळतील.
त्यांना सर्व कसोटी खेळायच्या आहेत. आयपीएल खेळायची आहे. आपण इतके क्रिकेट खेळतो की सगळे खेळणे कोणालाच शक्य नाही.
मुळात शेड्युल प्लॅनिंग तसेच केले जात असावे की इतके खेळाडू आहेत भारतात ते सारे खुश राहतील.. मात्र महत्त्वाची कसोटी मालिका आणि आयसीसी स्पर्धा यात बरोबर तेच ठरलेले चेहरे येतात. अगदी आश्विन जो कुठे गिनतीत नसतो तो सुद्धा येतो Proud

मी सगळ्या पाहतोय पण इथे बोलायचे टाळले.

परवाची मॅच भारताने हारायला नको होतं. २ ओव्हर्समधे ४३ रन्स इंटरनॅशनल गेममधे चेस व्हायला नको होते. >> =१. पण हाच अनुभव शिकवेल त्यांना अशी आशा करूया. शेवटच्या ओव्हर मधे परत ऑफ पेस का गेला नाही कळले नाही. मॅक्सवेल पण चकित झालेला वाटला.

सूर्या नी सहावा बॉलर न वापरायची परंपरा कायम राखली >> एकंदर पार्ट टाईम बॉलर्स वर आपला फारसा भरवसा दिसत नाही. खाईन तर तुपाशी (पांद्या) नाहितर उपाशी असा प्रकार वाटतो सगळा. कदाचित जैस्वाल, रिंकु किंवा तिलक कोणीही डोमेस्टीक मधे रेग्युलरली पार्ट टाईम बॉलिंग करत नाहीत म्हणून असावे हे.

विल्यम सन गेला
एन झेड एल ला आज पराभवाचा धक्का?

Pages