क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यरचा दुसरा सिक्स...
याला बहुधा अंदाज आला वाटते की आज मारले नाही तर पांड्या परत येता सुर्या राहील आणि आपण बाहेर जाऊ..
आफ्रिकेच्या बाऊन्सर समोर मारणे अवघड जाईल याला.. आजच स्कोप आहे

अय्यर बद्दलचा अंदाज बरोबर ठरला. तुटून पडला स्वताला सिद्ध करायला आणि हा फारसा पेस नसलेला बोलिंग अटेक सुद्धा त्याला साजेसा होता.
यातून मिळालेला आत्मविश्वास पुढच्या सामन्यात घेऊन जावा..

India's 357/8 is the highest team total without an individual century at the men's ODI World Cup. Previous highest was 348/8 by Pakistan vs England in 2019.

This is also India's highest ODI total without an individual century, as their previous highest was 351/5 vs WI earlier this year.

दोन रन तीन विकेट..
तीन स्लीप लावल्या शर्माने.. तिसऱ्या स्लीप ला कॅच..

लंका पाहिली गोलंदाजी घेतली
त्यांना आशिया कप फायनलला जे झाले ते नको असेल..
पण लाईट लागल्यावर सुद्धा तेच होण्याची शक्यता आहे..
Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2023 - 13:50

^^^^^^^^^^^

घ्या पुन्हा अंदाज बरोबर ठरला...
तेच झाले
२ ओवर २ रन ३ विकेट
संपला सामना..
रात्री भेटूया:)

बाई दवे,
गिल, अय्यर आणि सिराज या तीन टिक व्हायच्या बाकी होत्या...
आज एकाच सामन्यात झाल्या Happy

जब्बरदस्त! हे म्हणजे इतिहास घडत असताना बघण्यासारखं आहे. काय बॉलिंग!
आता तर मला वाटतं अर्धी टीम स्लिपला लावेल रोहित. Lol
जिंकणे तर जाऊच द्या फक्त आता बॅटी खाली ठेवून कमीत कमी रनांनी हरण्याचा प्रयत्न करणे येवढेच उरले आहे.

पण अंदाज कोणीही लावू शकतं आणि ते बरोबर यायची प्रॉबॅबिलिटीही काही फार खास नाही. त्या करता म्हणत होतो. की क्षुल्लक गोष्टी वापरुन स्वता:ची सारखी ........ कॉलर टाईट करताना थोडी तरी..... खंत वगैरे वाटली पाहिजे. Proud

8-29

अक्षरशः लंका दहन सुरू आहे.

*बुमराह एक खुप मोठा फॅक्टर आहे. * - +१. बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत जी काळजी घेतली व विश्वचषकासाठी तो पूर्ण ताकदीनिशी उपलब्ध होईल हे नियोजन केलं, हे कौतुकास्पद !

Pages