क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारुण पराभव, येवढच म्हणावं लागेल. गूड फॉर सौथ अफ्रिका. चवताळूनच आले आज खेळायला. सेमि फायनल पर्यंत जाऊ द्या, पण कप भारतालाच मिळू दे म्हाराजा!
Happy

पण कप भारतालाच मिळू दे म्हाराजा!>>>>
होय महाराजा!!

८-१२४

१६९ च्या आत आटोपले तर १० व्या क्रमांकावर जातील.

बरोबर १ धाव जास्त केली.

कृष्णा Happy

आता उद्या बॅटल ऑफ द जायंट्स म्हणता येइल. सब तैय्यार???!
Happy

ऑस्ट्रेलिया दहाव्या वर असली तरी इंग्लंड अफागणाशी हरल्याने त्यांची स्थिती त्याहून वाईट आहे म्हटलेले. आज हरून आले तळाला...

न्यूझीलांड सुद्धा आता सर्वात वर असली तरी चार पैकी तीन सामने अफगाण, बांगला, नेदरशी जिंकले आहेत. त्यांचीही खरी परीक्षा आता सुरू होईल..

प्रत्येक मॅच नंतर कोण कुठे आहे हे ग्राफिकली पाहण्यासाठी एक प्रोग्राम लिहीला.
एक ग्राफिक खाली दिले आहे. इतरही आहेत.
तो प्रोग्राम आता पब्लीक केला आहे. रोज टेबल अपडेट करणार आहे. सुचना असल्यास नक्की कळवा.

https://wc2023.streamlit.app/

20231021.png

वरच्या चित्रात त्या लाईन बघून कोणाचे सामने कोणाकोणाशी झाले हे समजेल. पण लाईन वाढत जातील तसे गुंतागुतीचे किंवा दाटीवाटीचे होईल का?

सर्कलची साईज पेक्षा नंबर बघून कोणाची पोझिशन काय आहे हे चटकन समजते असे मला वाटते. तसेच टेबल मध्ये जसे नंबर एक दोन तीन चार वरपासून खाली सुरू होतात त्यामुळेही पोझिशन चटकन समजते.

It has been 20 years since India defeated New Zealand in an ICC event

आज हा इतिहास बदलणार का?

.
वर्ल्ड कप मध्ये चेस करताना सर्वाधिक धावा

रोहीत शर्मा ७७१
शाकिब अल हसन ७४३
रणतुंगा ७२७
फ्लेमिंग ६९२
लारा ६८१
कॅलिस ६८०
तेंडुलकर ६५६

सुंदर 15 मध्ये असता तर त्याला आज 11 मध्ये खेळवू शकले असते. तो 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि भारत 6 गोलंदाज पण खेळवू शकला असता. बॅलन्स बिघडला नसता पंड्या च्या अनुपस्थित असल्याने.

aschig
त्यावर क्लिक केले की काहीतरी हेंग होतेय. म्हणजे स्क्रोल करून खाली गेले की पुन्हा वर येत नाही. मी मायबोली ऍप मधून वापरात असल्याने होत असावे. नंतर लेपटॉप उघडला की चेक करेन

टॉस जिंकलो !
अपेक्षेप्रमाणे चेस मास्टर टीम ने पहिली गोलंदाजी स्वीकारली...

पण.....

या विश्वचषकात धर्मशाळाला आधीच्या दोन्ही दिवसरात्र सामन्यात चेस करणारा संघ हरला आहे.
त्यात एक आफ्रिका नेदरलेंडशी हरली आहे.

बरे झाले हा आधीच गेला
हा स्पिनर भारी खेळतो. मग अवघड झाले असते
सिराजला विकेट मिळाली हे त्याहून बरे झाले. त्याला पुन्हा तसाच विकेट टेकिंग फॉर्म गवसायला हवा..

दुसऱ्या रवींद्र ला >>>
बॅटर च्या बापाचे नांव रवींद्र आहे. त्याचे नांव राचिन आहे.

बाबांचे नाव Ravi Krishnamurthy दाखवत आहेत. स्कोर बोर्डवर त्याचे नाव रविंद्र लिहिले आहे.
कॉमेंट्री करणारे त्याचे नाव रविंद्र घेत आहेत.
क्रिकबझ कॉमेंट्री मध्ये सुद्धा रविंद्र लिहिले आहे.

फेसबूक वरून...

गहुंजेला मॅच नको रे बाप्पा

द्वारकानाथ संझगिरी

बृहस्पति वारी पुण्याला वर्ल्ड कप मॅच कव्हर करायला जाण हा एका डोळ्यात अश्रू आणि राग आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद आणि कौतुक होत.
पहिली वेळ सकाळची , दुसरी रात्रीची.
एक गोष्ट मला कबूल केली पाहिजे की सामान्य जनतेच्या तुलनेत पत्रकाराची व्यवस्था खूप चांगली होती. अपवाद प्रेस बॉक्स आणि शौचालय. सहाशे कोटीपेक्षा अधिक कोटीचा स्टेडियम बांधल्यावर ह्यापेक्षा अधिक चांगल्या प्रेसबॉ क्सची अपेक्षा होती. शौचालय अस होत की पेशंटला दोन फेऱ्या त्यातून मारल्यानंतर वेगळा अनेस्थेशीआ द्यायची गरज नव्हती. पत्रकार जे त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या गाडीतून पुण्याहून निघून मैदानावर आले त्यांचे हाल झाले नाहीत. पण ते बहुदा अकरा पर्यंत मैदानावर सुखात पोहचले . काही स्मार्ट पत्रकारांनी गाडीचे पार्किंग पास मिळवले आणि स्वतःच्या गाडीतून प्रेसबॉक्स पर्यंत सुखुरुप पोहचले. माझ्यासारखे मूर्ख जे सकाळी मुंबईहून निघाले आणि मॅच कव्हर करायला गेले ते फसले. मला जितका वेळ मुंबईहून गहुंजेला पोचायला लागला तितकाच वेळ मुख्य रस्त्यावरून स्टेडियम मध्ये जायला लागला. म्हणजे किमान दोन तास. एक्सप्रेसवे वरून जाताना ते मैदान एखाद्या माळरानावर उगवलेल्या सुंदर फुलासारखं दिसत. पण इतक्या वर्षात माळरान माळरानच का राहावं? स्वतःची गाडी सोडून मैदानावर पोहचतात कसं? ह्या माझ्या प्रश्नाचं कुणी उत्तर देऊ शकलं नाही . तिथे बसने यायची सोय मला तरी दिसली नाही. स्वतःला मॅच पाहायला जायचं असल्याशिवाय किंवा डोकं फिरल्या शिवाय रिक्षा , टॅक्सीवाला गाडी, पेशव्यांच्या काळातल्या रस्त्यावर घालणारच नाही. आणि चालत जायचं असेल तर दीड दोन किलोमीटर दुपारी एकच्या चांदण्यात चालावं लागतं. तिथं चालताना मायक्रोवेव्ह मधल्या गरम होणाऱ्या चहाच्या भावना काय असतील ते कळत. त्यादिवशी माझ्यासारखी शेकडो माणसं त्या मायक्रोवेव्ह मधून चालली होती. मी नशीबवान. माझा एक तरुण पत्रकार मित्र माझ्या बरोबरच होता. त्याने बिचाऱ्याने माझी बॅग हातात घेतली. दुसरा मित्र प्र्सबॉक्स मधून गाडी काढून मला शोधत आला. चारधाम यात्रा कदाचित जास्त कमी कष्टात पुरी करता येत असेल. आम्ही पत्रकार तसे नशीबवान पाऊण तासाच्या वॉक नंतर एसी
प्रेसबॉक्सच्या खोक्यात विसावलो. आमच्या बरोबर चालणारे क्रिकेटचे वारकरी दोन अडीच तासांनी स्टेडियम मध्ये शिरले असतील आणि छप्पर नसलेल्या स्टँड मध्ये विसावले असतील. आपण ऑलिम्पिक भरवण्याची स्वप्न पाहतो आणि दहा वर्षात एका स्टेडियम मध्ये जाणं सुसह्य आपल्याला करता येत नाही. मेट्रो सिटीच्या गप्पा मारतो अणि साध्या सुविधा स्टेडियम जवळ पुरवता येत नाहीत. राग आला आणि वाईट ही वाटलं. इंग्लंड मध्ये South hamton ला मॅच असताना रेल्वे स्टेशन ते मैदान अशी शहराची फ्री बस सर्व्हिस ठेवली जाते. त्या शहरासाठी तो सामना हे भूषण असतं. पुणं हे महाराष्ट्राचं वैभव आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र आहे. मॅच ही त्या शहराच भूषण म्हणून पहिलं पाहिजे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये खांदेपालट झाला आहे. त्यामुळे काही चांगल्या गोष्टी झाल्या अस मी ऐकलं. त्यांनी स्टेडियमच्या सुविधा आणि आयोजन सारख्या गोष्टी गंभीरपणे घ्याव्यात. नाहीतर माझ्या पुण्यातल्या मित्राप्रमाणे घरात बसून मॅच पाहणं उत्तम अस अनेकांना वाटेल. तो महाराष्ट्राचा माजी कर्णधार असून त्याला वाटत तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल.
पत्रकार कक्ष , तिथले पोलीस, तिथले कार्यकर्ते ह्यांनी माझ्या वयाकडे पाहत खूप काळजी घेतली जाताना दूर देशी पार्क केलेल्या गाडी पाशी सोडलं. इतराच काय झालं देव जाणे.
पण भारताचा विजय आणि कोहलीच्या त्या गणिती शतकाने त्यांना दिवसभराचे कष्ट विसरायला लावले असावेत.

191-३. म्हणजे 300+ च लक्ष्य येणार भारतासमोर . चांगला सामना होईल असां वाटतंय.
*जडेजाने हातातला कॅच सोडला* - पण लगेचच त्याला गोलंदाजी देणं ही चांगली खेळी !

कशाचेही कौतुक!!

चांगला लावलाय ब्रेक.... हमखास ३००+ मॅच २८०च्या आसपास आणून ठेवतायत असे दिसतेय!!
पिचमध्ये बॉलरसाठी फारसे काही नाहिये त्यामुळे आपल्याला फारसे कष्ट पडू नयेत Happy

स्वरूप +१

बोल्टच्या लेफ्ट आर्म स्विंगवर टॉप ऑर्डर चांगली खेळायला हवी.

Pages