क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना रोहितने 63 चेंडूंमध्ये 86 धावा कुटल्या. यामध्ये सहा चौकार आणि सहा षटकार सामील होते. रोहितने या खेळी दरम्यान *अकरा विक्रम* केले.

आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये *300 षटकार* मारणारा रोहित पहिला भारतीय बनला.

अशी कामगिरी करताना त्याने सर्वात *कमी डाव* खेळले.

*धावांचा पाठलाग करताना* वनडे विश्वचषकात त्याने सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम ही आपल्या नावे केला.

तसेच *धावांचा पाठलाग करताना* सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावांची खेळी त्याने करून दाखवली.

याबरोबरच रोहित एका वर्षात 60 षटकार मारणारा *पहिला भारतीय कर्णधार* बनला.

*विश्वचषक इतिहासात सर्वाधिक सरासरी* राखणाऱ्या खेळाडूंमध्ये देखील तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

विश्वचषकात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला.

तसेच वनडे क्रिकेटमध्ये पन्नासाव्या वेळी त्याने *धावांचा पाठलाग* करताना 50 धावांची खेळी केली.

*भारतीय कर्णधार म्हणून* पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावे नोंद झाला.

तसेच पाकिस्तानविरुद्ध *भारतीय कर्णधाराकडून* एका डावात केली गेलेली ही सर्वोच्च खेळी ठरली.

तसेच *आयसीसी स्पर्धेच्या* सामन्यात एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकण्याची हे रोहितची *चौथी वेळ* होती.

Point table मजेशीर होणार आहे शेवटी.. बांगला लंका सुद्धा आता काहे सामने जिंकायला हवेत..

अजून एकही सामना क्लोज झाला नाही. अगदी अफगाण नेदरलेंड यांनी मिळवलेल्या विजयाचे सुद्धा नाही. आयपीएलने फार वाईट सवय लावली आहे. त्यामुळे चूकचूकल्या सारखे वाटत आहे.. पण रंगतेय स्पर्धा हळूहळू....

लोल फा. आज त्यांनी ९९ वर्ल्ड कप सेमि फायनलचा विडियो लावला होता. काही प्लेयर आणि जर्नलिस्ट लोकांच्या कॉमेंटरी पण होती त्यात. वाईट वाटलं बघून. होपफुली द अफ्रिका एकदा हा नेगेटिव विक्रम मोडेल.

अफघाणिस्तान आणि नेदरलंड्सनी आणखिन थोडी बाजी मारली तर मजा येइल. असाच तर भारत सुद्धा जबरी क्रिकेटिंग देश बनला. ८३ नंतर आपल्या देशातल्या युवकाला आपण पण हे करु शकतो हे जाणवलं असेल आणि तेव्हा पासून खुपच प्रगती झाली पुढे.

अफघाणिस्तानने टॉस जिंकला आणि बॉलिंग घेतली आहे
न्यू झीलंडसाठी अवघड सामना. अवश्य बघावा असा खेळ. विलींयम्स्न खेळत नाहीये.

१८ ओवर ९८-१
मजा नाई
विकेट हव्यात न्युझीलंडच्या..

हो नाही होत आता
उद्याच्या तयारीला लागा..
पाकिस्तानशी हरले तरी चालेल.. पण बांगलादेश विरुद्ध हरू नका.. तो नागीण नाच बघायचा नाहीये

तुलनात्मक स्टेटमेंट

तसेच आपण जेव्हा एकवेळ हे चालेल पण ते नको बोलतो तेव्हा आधीचे देखील चालण्या सारखे नसतेच म्हणून तर तुलनेला घेतो..

हार्दिकच्या इंज्युरीमुळे, ठाकूर ठाकूरसारखीच बॉलिंग करत असल्यामुळे आणि गहुंजेला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेचीच उरलेली २२ यार्डाची पट्टी असल्यामुळे आज इंडियन बॉलिंगची खडतर परिक्षा आहे.

हार्दिकच्या इंज्युरीमुळे, ठाकूर ठाकूरसारखीच बॉलिंग करत असल्यामुळे आणि गहुंजेला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेचीच उरलेली २२ यार्डाची पट्टी असल्यामुळे
>>
+1

If Hardik can’t get fit in time for the next match, India might want to bring SKY in for him and Shami for Thakur.

If Hardik can’t get fit in time for the next match, India might want to bring SKY in for him and Shami for Thakur. >> पांड्याला किवीज विरुद्ध न खेळवता थेट इंग्लंड विरुद्ध खेळवणे शक्य आहे - तेव्हढ्या वेळात रीक्व्हर होऊ शकेल.

आज बांग्लादेशने शेवटी कोहली ची सेंच्युरी होउ न देण्यासाठी वाईड टाकणे पटले नाही. पण अगदीच अनपेक्षित नव्हते बांग्लादेश असल्यामूळे.

सेंच्युरी साठी फलंदाजांनी सिंगल न घेणे..
समोरच्याची सेंच्युरी होऊ नये म्हणून गोलंदाजांनी वाईड टाकणे...
आणि जो तटस्थ म्हणू. ओळखला जातो त्या अंपायरने नियम डावलून वाईड न देणे..
कश्याला नाव ठेवायचे, की हे सगळेच योग्य आहे म्हणायचे, हा प्रश्न आहे Happy

सेंच्युरी साठी फलंदाजांनी सिंगल न घेणे.. >> एरवी तुला अनुमोदन दिले असते पण तुलाही माहित आहेत कि अजून १-२ ओव्हर्स नी काही फरक पडत नव्हता (तसा असता तर कोहली ने नक्कीच वाया घालवल्या नसत्या) त्यामूळे नुसत्या टेक्निकलॅटीज मधे अडकायची गरज नाही.

गहुंजेला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेचीच उरलेली २२ यार्डाची पट्टी असल्यामुळे >>> Lol त्या खेळपट्टी बद्दल काहीच माहीत नाही. पाटा विकेट का?

कोहली मध्यंतरी बांगलादेश विरूद्ध सातत्याने फेल होत होता. हे बर्‍याच दिवसांनी शतक मारलेले दिसते. त्याला ट्रोलही करत ते लोक.

फेफ - सूर्याबद्दल - कोणी फिट असेल/नसेल तरी सूर्याला पुढच्या गेम्स मधे वरती चान्स द्यायला हवा. एकदम क्रूशल सिच्युएअशन मधे वरचे ३-४ आउट झाले आणि आता वर्ल्ड कप मधे पहिल्यांदाच बॅटिंग करतोय असे होऊ देऊ नये.

शतक असं मारलं पाहिजे की नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या खेळाडूला पण समजलं नाही पाहिजे. कसलाही मोह नसावा, मन गुंतवू नये. देशासाठी खेळावं

अजून १-२ ओव्हर्स नी काही फरक पडत नव्हता..
>>>
तसा रनरेट वर फरक पडतो.
त्यामुळे काहीच फरक पडत नव्हता असे बोलणे चुक. क्षुल्लक का असेना फरक पडत होता.
आणि मी वरच्या तिन्ही गोष्टी गेम स्पिरीटला अनुसरून लिहिल्या आहेत. हेच जर सचिनने केले असते तर सचिन शतकांच्या विक्रमासाठी खेळतो म्हणणाऱ्या लोकांनी किती गोंधळ घातला असता असाही एका विचार मनात आला..

बरे खेळाडूंचे सोडा, अंपायर ने वाईड दिला नाही याचे आता कोण कसे समर्थन करेल?
यात कसल्या स्पिरीटचा देखील संबंध नाही. हे तर सरळ नियमबाह्य झाले Happy

तसा रनरेट वर फरक पडतो. >> एक काम कर - कोहली चे शेवटचे वीस रन्स किती बॉलस मधे आले ते बघ. मी वर म्हटलेय कि टेक्निकॅलिटी मधे न जाता विचार कर नि मग ठरव. बाकी समर्थन वगैरे कुठून आले ते मला माहित नाही.

कोहली चे शेवटचे वीस रन्स किती बॉलस मधे आले ते बघ.
>>>>>
या हिशोबाने शातका जवळ आलेल्याचे शतक होऊ द्यावे म्हणून बरेचदा समोरचा स्लो होतो त्यानेही रनरेट घसरतो.

पण मुद्दा तो नाहीये.
जर कोणी वैयक्तिक शतकाचा विचार करून खेळत असेल तर प्रतिस्पर्धी संघाच्या कोणी खेळाडूने देखील वैयक्तिक पातळीवर विचार करून, जा नाही करू देत मी तुला आमच्या विरुद्ध शतकअसा विचार केल्यास त्याच्या एकट्याच्या स्पिरीटलाच नावे ठेवण्यात अर्थ नाही Happy

कारण उद्या कोहलीचे शंभर शतके झाल्यावर त्याने कोणाविरुद्ध किती केली म्हणजेच कोणाला किती धोपटला यात ते बांगलादेशच्या विरुद्ध मोजले जाणार. जर गोलंदाजाने असा विचार केला की नकोय मला हे आमच्या देशाविरुद्ध तर काय चुकले Happy

मला तरी वाटते फलंदाज गोलंदाज दोघांना मग एकच न्याय हवा...

अंपायर मात्र चुकलाच !

Pages