क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अरे स्ट्राईक आउट करायची गरज नाही. तो चांगला स्पिनर आहे हा मुद्दा नव्हता तर स्पर्धा जिथे आहे त्या भारतीय पिचेस वर तो सुंदर पेक्षा चांगला स्पिनर आहे हा होता." - Happy स्ट्राईक आऊट नव्हतं करायचं. तुझा मुद्दा मान्यच आहे. मी टाईप करायचा कंटाळा करत, तो चांगला स्पिनर आहे हे मत पुढे ढकललं. Happy

एकंदरीत पैकेज म्हणून सुंदर अश्विन पेक्षा कधीही परवडतो, आणि आजकाल अश्विन व्हाईट बॉल क्रिकेट मध्ये variety च्या अति आहारी गेला आहे आणि चांगली ऑफ स्पिन गोलंदाजी करतच नाहीये

तो चांगला स्पिनर आहे हे मत पुढे ढकललं. >> चांगला ? वन ऑफ द बेस्ट स्पिनर आहे म्हण.

एकंदरीत पैकेज म्हणून सुंदर अश्विन पेक्षा कधीही परवडतो >> पॅकेज म्हणून म्हणजे ? अ‍ॅश जास्त उजवा बॉलर आहे नि सुंदर उजवा बॅट्स्मन नि फिल्डर आहे. जर जागा बॉलर ची भरायची असेल तर .... Happy कमकुवत बॉलर (नि चांगला फलंदाज घेऊन) घेऊन अधिक वेळा मोठा स्कोअर चेस करण्यापेक्षा/ डिफेंड करायला मोठा स्कोर टाकयला लागण्यापेक्षा अधिक उजवा बॉलर घेऊन ह्या प्रोबॅबिलिटी कमी करणे जास्त पटते. असो बघूया द्रविड नि रोहित काय ठरववात ते. (तिलक वर्म्ना जर वरच्या पाचात असता तर अ‍ॅश ऐवजी सुंदर ला मी अनुमोदन देईन).

जिंकलो बुवा
शामी च्या 5 विकेट्स अन् गायवाड गिल च्या ओपनिंग नंतर 9 रन मधे 3 विकेट्स गेल्यानी अवघड झालं होतं, पण फायानाली एकदाचा सूर्या वन डे मधे चमकला अन् गंगेत घोडं न्हालं...

अय्यर कडे मस्त मौका होता, पण मिस कम्युनिकेशन मुळे रन आऊट झाला

शार्दुलचा लेख वाचलेला...
नाईलाज को क्या ईलाज म्हणून आहे तो आहे संघात आणि राहील.
गेल्या वर्ल्डकपला नाही का आपण विजय शंकरला नेलेला.. त्याचा उल्लेख मिस झाला लेखात.

शार्दुल चा परफॉर्मन्स असल्यानी त्याला काढता येत नाही आहे

विजय शंकर प्री वर्ल्डकप प्लॅन मधे बिलकुल नव्हता. तसंच, त्याचा इंटरनॅशनल लेव्हल ला परफॉर्मन्स पण विशेष उल्लेखनीय नव्हता. तो का आला अन् रायडू का नाही ते एम एस के प्रसाद जाणे.

नाईलाज को क्या ईलाज म्हणून आहे तो आहे संघात आणि राहील. > मान्य. म्हणाजे त्याचा रोल जो आहे त्यासाठी इतर काही पर्याय नाही म्हणून तो आहे पण त्याचे ऑड स्किल्स इतक्या वेळात दिसले आहेत कि विजय शंकर शी तुलना चुकलेली वाटते.

"त्याचा रोल जो आहे त्यासाठी इतर काही पर्याय नाही म्हणून तो आहे पण त्याचे ऑड स्किल्स इतक्या वेळात दिसले आहेत" - I don't understand him. तू म्हणतोस तसा अधून मधून (बॉलिंग च्या बाबतीत) तो आऊट ऑफ नोव्हेअर विकेट काढून जातो, पण म्हणून त्याच्याकडे विकेट टेकिंग बॉलर म्हणून बघता येत नाही. बॅटिंगमधे त्याला गेम सिच्युएशन कळते अशी खात्री त्याचं शॉट सिलेक्शन पाहून वाटत नाही. मिडल ऑर्डरमधे एखादा ५-६ ओव्हर्स टाकू शकणारा बॅटिंग ऑलराऊंडर असता, तर ७व्या नंबरवर जडेजा येऊ शकला असता. पण शार्दूल ठाकूर मला तरी भारताची मजबूरी वाटते. (विजय शंकर हा सिलेक्शनचा आचरटपणा होता. ).

विजय शंकर आयत्यावेळी आणला म्हणून आचरटपणा वाटतो.
शार्दुल ठाकूर दोन वर्षे खेळवून सुद्धा काहीच भरवशाचा वाटतं नाही म्हणून मजबूरी वाटतो.
पण दोघांच्या सिलेकशन मागचा विचार एकच आहे. किंबहुना नाईलाज एकच आहे. या संघात ना कुठल्या प्रमुख फलंदाजाला गोलंदाजी येते ना कुठल्या प्रमुख गोलंदाजाला फलंदाजी येते.

दोघांच्या सिलेकशन मागचा विचार एकच आहे. किंबहुना नाईलाज एकच आहे
>>
कुच्च बी

शंकर टोटली अनटेस्टेड होता
ठाकुर दोन वर्ष डीच न होण्याइतपत परफॉर्म करतो आहे

शंकर जखमी झाल्यावर लगेच पर्याय उपलब्ध होता
ठाकुर च्या स्लॉट मधे फिट होणारा पर्याय नाही. ठाकुर बाबत नाईलाज आहे. शंकर बद्दल नाईलाज कधीच नव्हता.

उगाच करायचं म्हणून ठाकुर अन् शंकर ला कंपेअर करू नको
लॉजिक दे.

गल्लत होतेय समजण्यात
शंकर च हवा हा नाईलाज नव्हता
तर संघात समतोल साधायला एखादा अष्टपैलू हवा हा नाईलाज होता.

काल ऑस्ट्रेलिया विजयानंतर भारत आयसीसी मानांकनात पहिला आला.
तिन्ही फॉरमॅट मध्ये एकाच वेळी आज आपण पहिल्या क्रमांकावर आहोत.
आपण कितीही प्रयोग चालतात म्हणून नावे ठेवली तरी आज आपण सगळीकडे पहिले आहोत Happy

वर्ल्ड कप सुद्धा भारतातच आहे.
त्यामुळे भारत हा फेवरेट संघ आहे. म्हणून मागच्या चर्चेत मी भारताला डार्क हॉर्स कसे म्हणायचा असा प्रश्न उपस्थित केला होता. कारण यात डार्क हॉर्सची व्याखा गंडते:)

संघात समतोल साधायला एखादा अष्टपैलू हवा हा नाईलाज होता.
>>
हार्दिक, जडेजा, केदार हे तिघे ट्राईड अन् टेस्टेड ऑल राऊंडर होते
शंकर, पंत, डीके वगैरे सगळे चार नंबर वर खेळले. जिथे प्रॉब्लेम होता.
कारण टेस्टेड रायडू टीम मधे नव्हता.

जडेजा तेव्हा अकरात नव्हता कारण कुलचा जोडी आपली ट्रंप कार्ड होती त्या वर्ल्डकपला. ज्यामुळे तिसरा स्पिनर जडेजाची जागा नव्हती तयार होत संघात. आणि जेव्हा जडेजा आला तेव्हा जाधव नव्हता. त्यात सामना ईंग्लडला असल्याने आपल्याला फिरकीचे तीन पर्याय नको होते..

आजच्या तारखेला जडेजा आणि पांड्या दोन अष्टपैलू आहेत, पण जाधव सारखे कोणी गोलंदाजी करणारा नाही.
जडेजा आणि पांड्या हे दोन अष्टपैलू पुरत नाही कारण वर म्हटले तेच, ना कुठल्या प्रमुख फलंदाजाला गोलंदाजी येते ना कुठल्या प्रमुख गोलंदाजाला फलंदाजी येते. हाच सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे.
गेल्या विश्वचषकात आपण अखेरच्या सामन्यात जडेजा आणि पांड्या पकडून पाचच गोलंदाज खेळवले होते. ती तयारी असेल तर आज देखील शार्दुलची गरज नाही Happy

भारतानी फास्ट bowling अष्टपैलू खेळाडूना ग्रूम करायला हवे,
हंगरकेकार, राज बावा, शिवम माही , रवी तेजा या काही खेळाडूंकडे लक्ष दयायला हवे

कालच्या मस्त विजयानंतर एकही पोस्ट नाही?? >> वीकेंड बिझी असतात गणपती मधले. परत मॅच नि न. एफ. एल. असते. वेळ नाही मिळत रे. मस्त जिंकले वगैरे ठिक आहे पण ऑसीज इंजरी हँपर्ड टीम आहे हे विसरू नये म्हणजे झाले. दुसर्‍या इनिंग मधे बॉल टर्न व्हायला लागला तेंव्हा अ‍ॅश नि जडेजा फारसा वाव देणार नाही हे उघड होते. वॉर्नर चॅ टॅक्टिक्स खतरा होते. हि सिरीज ऑसीज ऐवजी पाकिस्तान किंवा इंङ्लंड विरुद्ध हवी होती म्हणाजे पूर्ण तावून सुलाखून निघालो असतो.

उगाचच धमाला होईल असे वाटलेला चेस पण तश्यातला काई चिमित्कार नाही बघायला मिळाला Wink

सुंदर ने मस्त बॉलिग नि फालतू बॅटींग करून प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवले असे म्हणू शकतो. तरणाबांड गिल असताना त्याला विश्रांती का दिली असेल ?

गिलने आज पुन्हा शतक मारले असते तर law of average नुसार विश्वचषकात यांच्या समोर पहिल्या सामन्यात फेल गेला असता असे द्रविड मला म्हणाला..

बाकी आज सामना सुंदरला पुढे पाठवले तिथे फसला.. जसे शर्मा मारत होता तसे दोन्हीकडून धुलाई हवी होती. बोल टू रन ला सामना खेचणे गरजेचे होते. नंतर धावा जमवणे अवघड झाले दोन्ही इनिंगला..

बाई दवे
त्या सुंदरने लिमिटेड फोर्मेटला आजवर फलंदाजीत काहीच विशेष केले नाहीये हे त्या दिवशी सुद्धा म्हटलेले..

आज संध्याकाळी आपली इनिंग सुरू होती तेव्हा मैदानाबाहेर काय खतरनाक देखावा टिपत होता कॅमेरा. लाल भडक आभाळ आणि खाली हिरवं मैदान. भारताचा झेंडा जणू काही. जबरदस्त एकदम. वाटतं होतं सुपरमॅन बनून तिथे जावं आणि याची देही याची डोळा ते दृश्य नजरेत साठवून घ्यावं

त्या सुंदरने लिमिटेड फोर्मेटला आजवर फलंदाजीत काहीच विशेष केले नाहीये हे त्या दिवशी सुद्धा म्हटलेले..
>>
सुरुवातीच्या बऱ्याच सामन्यांमध्ये रोहित नी पण काही विशेष केलं नव्हतं, अगदी नाही मॅगी नूडल्स / नोहिट म्हणण्या इतकं

जर पुढे संधीच दिली नसती तर आज खिजगणतीतही नसता

याला पण मिळूदेत की संधी
होईल क्लिक
बॉलिंग तर चांगली केली ना

मला रोहीत आवडतो म्हणून दरवेळी त्याच्याशी तुलना का...
बरे केलीच आहे तर हे देखील लक्षात घ्या की याचमुळे रोहीत २०११ विश्वचषक खेळला नाही. संधी देणे वेगळे आणि खेळेल या विश्वासावर थेट वर्ल्डकपला खेलवणे वेगळे..
बर रोहीत कडे जे एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट होते ते तेव्हाही दिसत होते. सुंदर बाबत ती केस नाही. तो गुणी खेळाडू आहे. गिफ्टेड नाही..

असो, त्यावर फुली मारत नसून आता ती रिस्क घेण्यात अर्थ नाही इतकेच.

बरे केलीच आहे तर हे देखील लक्षात घ्या की याचमुळे रोहीत २०११ विश्वचषक खेळला नाही. >> माझ्या तुटक आठवणींनुसार तो फूटबॉल्खेळताना इंजर्ड झाला होता नि त्याच्या फिटनेसबद्दल शंका असल्यामूळे खेळला नव्हता. त्याच दिवसांमधे नायर नि पॉल वाल्हाल्टी बरोबर तो बांद्र्याला राहायचा. काहीही करून फिटनेस वाढवायचा ह्या वेडाने ह्या तिघांनी काही काही प्रयोग केले होते. त्याच्या नंतर एकदम बदललेला रोहित आयपील मधे खेळला होता - तो नि गिब्स दोघे डेक्कन कडून खेळताना वन अप करत असत.

Pages