क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये रे माझ्या मागल्या...

रोहित ची 50, गिल बरा खेळत आहे म्हणेपर्यंत बाद, कोहलीची आज फक्त हजेरी, किशन अन् राहुल जरा जम बसवू लागले तर राहुल आऊट
३२ ओव्हर मधे १६५/४
किशन ३१ अन् पांड्या ३ वर खेळत आहेत

अरे बाबांनो असं नसतं रे Rofl हा एक ट्रॅप आहे. जाऊ दे नंतर समजेल तुम्हाला.

Submitted by बोकलत on 11 September, 2023 - 22:56>>> तुम्ही सगळे काल आनंदाने उड्या मारत होतात तेव्हा मी ही कमेंट केली होती. अजून 24 तास पण उलटले नाहीत. त्यात लिहिलंय पण की नंतर समजेल तुम्हाला. आशा करतो तुम्हाला समजल असेल मला काय म्हणायचं होतं ते.
चीते की चाल बाझ की नजर और बोकलत के क्रिकेट ज्ञान पर कभी संदेह नही करते कभी भी मात दे सकते है.

आवरा! Lol म्हणजे बाझ, संदेह, चित्ता आणि वाट्टेल ते तोंड सोडणार्‍या सगळ्यांनाच.

स्कोअर अगदी जेमतेम आणि पाऊसही पडला म्हणून लवकर लावलीच नाही मॅच. आता लावली तर ३ विकेट! ते पण पेसरांना! भारी!

बाझ, संदेह, चित्ता आणि
>>
मेरी उडी हैं ना, ये बिबळ्या वाघ की उडी है, ढाण्या वाघ की उडी है
वालं भाषण आठवलं

लिंक देणे अँकी. Happy

अरे काढा म्हणा अजून एक दोन. नाहीतर होम क्राउड आहे, बिल्ड करतील हे लोकं.

अरे काढा म्हणा अजून एक दोन. नाहीतर होम क्राउड आहे, बिल्ड करतील हे लोकं. >> तीन नंतर तसे वाटलेले. जुन्या लंके ने नक्कीच सोडला नसता चान्स. सध्याची टीम अननुभवी आहे नि त्यांचेही सारखे मेरी गो राऊंड सुरू असते त्यामूळे धोका कमी आहे .

सामना तोडीस तोड चालू आहे..
लांकेबद्दल मी म्हणालोच होतो की फसवा संघ आहे. त्यांना हलक्यात घेऊ नका.. त्यांचे गोलंदाज कधीही त्यांना गेम मध्ये आणू शकतात.

कुलदीप सध्या ज्या जबरी फॉर्म मधे आहे त्यात आपला ट्रंप कार्ड ठरू शकतो.

+७८६
हे मी देखील आयपीएल वेळीच म्हटले होते.
तसेच कुलदीप आणि जडेजा मस्त कॉम्बिनेशन आहे. बॉल सुद्धा दोन वेगळ्या दिशेला वळवतात.. एक बोटांनी एक कलाईने..

अहो, आशिया कप व विश्वचषक विजेत्याबद्दलच तुमचं भाकीत असं रोजच बदलत रहाणार का, अगदीं दोन्ही फायनल्स होईपर्यंत !!

20190118_205549.jpg

टारगेट २५३ - ४२ ओवर
मारणार आज लंका असे आतून वाटत आहे. बघूया पीच कसा खेळतो ते..
फायनल भारत पाक बघायला जास्त मजा येईल..
तरी लंका आज जिंकावे असे वाटत आहे

फायनल भारत पाक बघायला जास्त मजा येईल..
तरी लंका आज जिंकावे असे वाटत आहे >> चतुर नार मधले "एक तो घोडा बोलो या .. " आठवले Wink

बांग्ला देश विरुद्ध सेम टीम खेळेल कि बुमरा/हार्दिक्/राहुल ला ब्रेक देतील इंजरी रिस्क नको म्हणून ?

"बांग्ला देश विरुद्ध सेम टीम खेळेल कि बुमरा/हार्दिक्/राहुल ला ब्रेक देतील इंजरी रिस्क नको म्हणून ?" - अय्यर फिट असेल तर त्याला खेळवतील असं वाटतं (मॅच प्रॅक्टीस). बुमराह च्या जागी शामी खेळेल असाही माझा अंदाज आहे.

लंका-पाकिस्तान आत्तातरी evenly poised वाटतीय.

चतुर नार मधले "एक तो घोडा बोलो या .. " आठवले
>>>

मारणार लंका असेच स्पष्ट आधी लिहिले आहे ना.. आणि इच्छा देखील तशीच आहे असेही लिहिले आहे.. काहीच दिवसांपूर्वी मी लंकेला डार्क हॉर्स म्हटले होते आहे ना लक्षात Happy

पण मजा भारत पाकला आणि फायनलला पाकला हरवनयात जास्त येईल हे देखील खरे आहे इतकेच..

लंकेला डार्क हॉर्स म्हटले होते आहे ना लक्षात >> आम्ही भले लाख विसरायचा प्रयत्न करू रे पण तू विसरू देशील तर ना Lol तू हॉर्स म्हटले होते म्हणूनच घोडा वापरला . श्या सगळे समजावून सांगावे लागते.

लंका-पाकिस्तान आत्तातरी evenly poised वाटतीय. >> +१

Pages