चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आता dia बघा युट्यूब वर हिंदीत आहे...किंवा मराठी रिमेक सरी...
.>>>>

काय स्टोरी आहे?
हिंदी डब बघेन.. मला आवडतात तसे बघायला.
तसे असतील चांगले तर सुचवा .. धन्यवाद Happy

गदर २ पाहिला नाही पण सन्नी पाजी काय फिट दिसतो.. फिट म्हणजे हेल्दी/ताकदवान कॅटॅगरी, ६५ अजिबात दिसत नाही !
स्टेरॉइड ठोसलेल्या/ व्ही.एफ.एक्स ने केलेल्या सिक्स पॅक अ‍ॅब कॅटॅगरी पण चेन स्मोकर असल्याने अलहेल्दी/थकलेला दिसणार्‍या शारुख सारखा किंवा डोळे सुजलेल्या नशेबाज सलमान सारखा नाही दिसत सनी.. अ‍ॅट ६५ , हि इज जस्ट टु गुड !

Extraction 2 बघायचा आहे..म्हणून काल आधी extraction पहिला बघून घेतला.
खतरनाक ऐक्शन सिनेमा..नेटफ्लिक्सवर.

पाण्याचा हॅण्डपम्प त्याला उचलावाही लागलेला दिसत नाही. नुसता त्याच्याकडे बघतो तर शंभरएक पाकडे घाबरून पळतात असे होते.>>> Rofl
पण सनी कडे पाहता हे १% टक्का तरी convincing वाटते, शाखा च्या हेलिकोप्टर अ‍ॅक्शन पेक्षा!

स्टेरॉइड ठोसलेल्या/ व्ही.एफ.एक्स ने केलेल्या सिक्स पॅक अ‍ॅब कॅटॅगरी पण चेन स्मोकर असल्याने अलहेल्दी/थकलेला दिसणार्‍या शारुख सारखा किंवा डोळे सुजलेल्या नशेबाज सलमान सारखा नाही दिसत सनी.. अ‍ॅट ६५ , हि इज जस्ट टु गुड>>>> ++१

सैफ ही स्मार्ट दिसतो वयाच्या मानाने. बायको चा चेहरा सर्जरीने जर्जर झालेला खंगलेला वाटतो

मी ट्रेलर मधे पाहिले तर तो पाण्याचा हॅण्डपम्प त्याला उचलावाही लागलेला दिसत नाही. नुसता त्याच्याकडे बघतो तर शंभरएक पाकडे घाबरून पळतात असे होते.
>>>>>>
हो. ट्रेलर मध्ये बघितले. पाकिस्तानी लोक चाल करून येत असताना अचानक थांबतात आणि मागे सरकू लागतात. मग त्यांचा फोकस कुठे आहे ते दाखवलेय. बघते तर नुसताच हॅन्ड पंप....असे पिक्चर मेंदू बंद करून बघितले कि जाम मज्जा येते. त्यामुळे हा बघेनही कदाचित

अरे सगळेच जण शाहरूखशी का तुलना करत आहेत.
शाहरूख किंग ऑफ रोमान्स आहे.
तरीही त्याने ॲक्शन फिल्म करताना हजार कोटी क्लब बनवला ही गौरवास्पद गोष्ट आहे.

बाकी मला गदर पेक्षा घायल, घातक, दामिनीचा सनी देओल जास्त आवडतो. कारण त्यात शक्ती प्रदर्शन न करता जे करतो ते जास्त भारी वाटते.

फारएण्ड - बरोबर. दोन तीनशे आदरणिय पाकिस्तानी नागरिक सनीला घेरतात तेव्हां तो हँडपंप कडे फक्त बघतो. त्याबरोबर ते थबकतात.
पण एक जण चाल करून येतो तसे सगळेच पुन्हा हल्ला करायला येतात तेव्हां तो हॅण्डपंप ला फक्त हात लावतो. त्याबरोबर सगळे पळत सुटतात. आख्खं थेटर हसत होतं.

डेव्हीड धवनचा जसा सिनेमा असतो , तसाच सनीचा पण मारधाड वाला असतो. उचलून फेकाफेकी हे फक्त सनीला शोभतं. त्यात पूर्वी व्हीएफएक्स नसायचे. यात आगीचे सीन्स सगळेच सीजी आहेत. पण पूल कोसळत असताना खालून वर डब्यांवर पाय देत जायचं असला अचाट सीन नाही यात.

आपण टणक शेंगदाणे असल्याने निर्भय आहोत. ठोको ताली. Lol >> अस्मिताज्योतसिंग सिद्धू Proud

@ ललिता प्रीति जी >> Lol

गदरची तुलना त्या विशिष्ट चित्रपटाशी कुणीच करत नाही. या वर्षीचा सर्वाधिक चाललेला असा खिताब होता म्हणून ती होतेय.
पुढील प्रतिसाद केवळ प्रौढांसाठीच.
आपण वय वर्षे १८ किंवा जास्त आहात काय ? होय / नाही. होय असेल तर वाचू शकता. नाही उत्तर असेल तर पालकांची संमती घेऊन या.

तर तो विशिष्ट सिनेमा चालला तो दीपिकाच्या चड्डीचा रंग कोणता यासाठी. पूर्वी कधी तरी हिरॉईनची चड्डी दिसली हा चर्चेचा विषय असायचा. पण आता फक्त चड्डीच्या रंगाने भावना दुखावल्या कि नाही इतकंच लोकांना औत्सुक्य आहे. ती भगवी असती तर मग एक गट म्हणाला असता, बघा म्हणालो नव्हतो यांनी भगवी चड्डी दाखवली. तर दुसरा ग्रुप म्हणनार कि बघा, आम्ही सांगत होतो कि, भगव्या रंगाची चड्डी असली तरी काहीही फरक पडला नसता.

पण दीपकेच्या अनेक रंगाच्या चड्ड्या दिसल्या त्यात नेमका तोच रंग नव्हता. जे हुषार पब्लीक होतं ते त्या गाण्यानंतर उठून आलं. पण ज्यांना अजूनही आशा होती ते थांबून राहीलं, कि आत्ताच दुखावतील, मगच दुखावतील.... भावना हो !
एक चड्डी सोडली तर काहीही नव्हतं त्या सिनेमात !

चांदणी चौकात कुठून कसं जायचं याचे क्लासेस लवकरच सुरू करत आहोत, जोडीला कोणता सिनेमा कसा बघायचा, कुठल्या सिनेमाला कुठला क्रायटेरिया लावायचा याचेही क्लासेस सुरू करत आहोत. मायबोलीकरांना स्पेशल डिस्काउंट !

मी जाणून बुजून आदिपुरुष च्या वाटेला गेले नेफ्लि वर Happy महा भयाण आहे . जंगलातले "फनी मश्रूम्स" खाऊन ओम राऊत ने बघितलेले हॅलुसिनेशन कम नाइटमेअर अशी एक शक्यता वाटली. इतका इल्लॉजिकल, विअर्ड आणि क्रीपी.
एक क्षणासाठीही बघणेबल नाही. काही सिनेमे सो बॅड इट्स गुड कॅटेगरी असतात हा तोही नाही. टिंगलीसाठी सुद्धा करमणूक होतच नाही. जस्ट हेडेक. संबंधितांना काहीतरी शिक्षा करावी असे वाटते जितका पाहिला तितका वेळ.

मी जाणून बुजून आदिपुरुष च्या वाटेला गेले नेफ्लि वर-> मी पण . मला असा जाणवल कि मुद्दाम अशी प्रचलित नावे वापरली नाही कुठे. रामाच्या ऐवजी राघव, लक्ष्मणाच्या ऐवजी शेष , सीते ऐवजी जानकी.
संवाद पण खूप कमी केले आहेत. वाद नको म्हणून काट छाट खूप केली आहे. जुन्या अनेक रामायणात सीतेला रावण खांद्यावर टाकून नेतो असे दाखवले आहे पण इथे तो पण वाद नको म्हणून वेली गुंडाळून अपहृत झालेली आहे. आणि या सगळ्या नादात अक्षरश: गुंडाळून टाकलाय. एक तर ऍनिमेटेड पाहातोय का काय अशी शंका येत होती. खूप वाईट . लॉर्ड ऑफ द रिंग्स ज्यांनी बनवला त्यांना सांगितला पाहिजे बनवायला.

हो ना मोस्ट ऑफ द टाइम कुणी काही बोलतच नाही Lol सीता अपहरण पर्यन्त हार्डली २-४ ओळीचे डायलॉग झाले असावे . राघव, जानकी तरी ठीके, लक्श्मणाला शेष हे काहीही वाटते!

शेषनाग

पाण्याचा हॅण्डपम्प त्याला उचलावाही लागलेला दिसत नाही. नुसता त्याच्याकडे बघतो तर शंभरएक पाकडे घाबरून पळतात असे होते. >> Lol Lol इथे त्या पाकड्यांनी भविष्यात जाऊन पहिला गदर बघून मग पुन्हा भूतकाळात येणे अपेक्षित आहे.

ओपेनहायमर U/A रेटींग आहे भारतात. १२+ असेल तर हरकत नाही. पण त्यापेक्षा लहान मुलांना घेवुन जाऊ नका. एकतर सिनेमा खुप मोठा आहे. ती बोअर होतील.

ओपनहायमर काल पाहिला. अशा विषयावरचे चित्रपट पाहताना आधी त्या घटनांविषयी थोडेफार वाचून जायला हवे तर चित्रपट पाहण्यात मजा येते. आइन्स्टाइन, निल बोहर, फेनमॅन, हायजेबर्ग इत्यादी प्रसिद्ध नावे माहितीची होती. आणि त्यांच्या तांत्रिक चर्चा कळत होत्या (पूर्ण नसल्या तरी बऱ्याच अंशी). कारण त्यावर पूर्वी वाचले/अभ्यासले आहे. पण राजकीय संवाद फारसे कळत नव्हते. ते सारे थोडे वाचून जायला हवे होते असे वाटले. ओपनहायमर वर अमेरिकेने शेवटी प्रतिबंध आणले होते हे सुद्धा माहीत नव्हते.
असो. यात रस असणाऱ्यांसाठी चित्रपट छान आहे. तांत्रिक व राजकीय संवाद, कोर्टरूम संवाद खूप आहेत. जनरली चित्रपटात असते तसे यात व्हिज्युअल नाट्य फारसे नाही. किंबहुना विषयच असा की त्यासाठी तसा फारसा स्कोपच नाही. तरीही एकुणात, चित्रपट छान वाटला Happy

यामी गौतम बेष्ट आहे! >>> हो तिच्यासाठीच बघायला घेतलेला. माझ्या एका गर्लफ्रेंडची आठवण येते तिला बघताना. त्यामुळे बाकी काही नाही तरी बघताना छान वाटत राहते. आणि हा पिक्चर तर पुर्ण तिचाच होता.

काल गेट आउट नावाचा एक सिनेमा नेटफ्लिक्स वर पाहिला.आवडला.(सध्या मला एस्केप रूम/माइण्ड गेम या प्रकारचे सिनेमे जास्त येत आहेत अल्गो मध्ये.)

हो तिच्यासाठीच बघायला घेतलेला >> करेक्ट! पिक्चरच्या नावावरून काहीच अंदाज येत नव्हता. म्हटलं यामी आहे ना, मग बघायलाच पाहिजे. तिचा गिन्नी वेड्स सन्नी पण बघितला होता. सुंदर दिसली आहे त्यात.

गेट आउट -
त्याच दिग्दर्शकाचा नोप सुद्धा उत्तम सिनेमा आहे.

गेट आउट -
त्याच दिग्दर्शकाचा नोप सुद्धा उत्तम सिनेमा आहे.>>>>+१
त्याच दिग्दर्शकाचा अस बघायच्या यादीत आहे..बघितलाय का कॉमी तुम्ही?

काल beckett बघितला इंग्रजी, नेटफ्लिक्सवर.
एक अमेरिकेन जोडपं ग्रीसमधे ट्रिपला जातात.. त्यांच्या कारला अपघात होतो आणि तरुणी मरण पावते..तरूणाच्या मागे लोकल पोलीस त्याला जीवे मारायला बघतात.. बेकेट पळतो पळतो सापडतो जखमी होतो पुन्हा निसटतो पळतो जखमी होतो..कसाबसा युएस एम्बेसीत पोहोचतो.. पुढे काय होते पहा सिनेमात.. थ्रीलर, पॉलिटिकल सिनेमा.. चांगला आहे.. एंगेजींग..

होय, अस पण बघितलाय. पण मला गेट आऊट आणि नोप इतका आवडला नाही तो.

जॉर्डन पिल (दिग्दर्शक) आणि त्याचा मित्र किगन ह्यांचे की अँड पिल म्हणून शॉर्ट स्किटचे एक युट्यूब चॅनल आहे. त्यावरील जवळपास सगळे व्हिडिओ मी किमान दोन वेळा पाहिले आहेत. जबरदस्त आहेत. उदाहरण - मिगन आणि आंद्रे प्रेमकथा

ओपेन हायमर बघितला मुला बरोबर वय १२ वर्षे , ओके आहे बघू शकता . त्यात जे adult सिन आहेत त्या पेक्षा कितीतरी जास्त दाखवतात आपल्या मुवि मध्ये. मला ओव्हरऑल ठीक वाटला , खूप आवडतोय लोकांना , पण मला पटकन लिंक लागली नाही तरीही पाहून घ्या

Pages