चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Red, white and Royal blue >> बघतो.
लेडी प्रेसिडेंटलाच पहिला अडखळलो. लेडी प्रेसिडेंटचा क्विअर मुलगा हे आकलनापलिकडचे आहे.
ब्रिटिश मोनार्की परवडली अशी सध्याची अमेरिकेची अवस्था आहे.

रच्याकने: असाच अत्यंत सहज सुंदर गे रोमान्स आणि त्यात मुरत जात जात एजिंग 'लास्ट ऑफ अस' या टीव्ही शोच्या (एचबीओ) तिसर्‍या भागात आहे. आधी तो चेकमार्क डायवर्सिटी हायर प्रकार वाटलेला, कारण बरेचदा तसंच असतं. पण फारच मस्त दाखवलं आहे.

ह्यात रेशिअल, थोडीफार जेंडर न्यूट्रॅलिटी आणि सेक्शुअल डायव्हर्सिटी यांचे जवळजवळ सगळे चेकमार्क आहेत. तरीही ते अंगावर येत नाहीत किंवा उथळ वाटत नाहीत, नैसर्गिक वाटतात. सिनेमा तसा हलकाफुलकाच आहे.
लास्ट ऑफ अस बघेन.

पाकिस्तानी सिनेमा Joyland सुद्धा ट्रान्स पात्र असणारा चांगला सिनेमा आहे असे ऐकले आहे. अजून पाहण्याचा योग आला नाही.

Players पाहिला.. अभिषेक बच्चन.. नील नितीन मुकेश.. बॉबी.. बिपाशा.. सोनम कपूर.. आफताब.. विनोद खन्ना.. चतुर वगैरे..
छान होता..
हल्ली लक चांगले चालतेय.. जे बघू ते चांगले वाटतेय..

Italian job

हो का, कॉमी. ओके. Happy
मागे तुम्ही Rann का Raan नावाचा एक चिनी सिनेमा सुचवला होता. तो तुम्ही कुठं बघितला?

तोच तो.

Red, white and Royal blue >>>> @अस्मिता फार सुंदर वर्णन केलंय तुम्ही या चित्रपटाचे. आता बघणे आलेच.

Red, white and Royal blue >>>> @अस्मिता फार सुंदर वर्णन केलंय तुम्ही या चित्रपटाचे. आता बघणे आलेच.
>>> +१

अकिरा कुरोसावा चा रान (RAN) असेल तर प्राईम वर उपलब्ध आहे.
>>>>धन्यवाद, अक आणि कॉमी.

माझेमन आणि ललिता प्रीती, आभार. Happy

एम व्ही मॅग्डालिना ओल्डेनडॉर्फ (Magdalena Oldendorff ) या जहाजावर पाहिलेल्या सिनेमांपैकी उत्तम चित्रपटांची यादी.
( स्मरणशक्तीचा दोष असल्याने काही आधी व नंतर पाहिलेले सुद्धा यादीत येऊ शकतात.)
१. City of God
२. Run Lola Run
३. Air Force One
४. Navy Seals
5. Fargo
6. Se7en ( Serial Killer Movie)
7. Reservoir Dogs
8. The Silence of the Lambs ( राहुलला पाहिलाय असे वाटते)
९. Platoon
१०. Scarface
11. Indiana Jones and the Raiders of the Lost Ark
12. Airplane!
13. Alien ( या विषयावर लायब्ररीत किमान २०० मूवीज होते. )
14. Star Wars: Episode IV - A New Hope
15. Lawrence of Arabia
16. The Eagle has landed
17. Guns of Navron( आधी राहुलला पाहिलेला)
18. Ben hur
19. Die Hard
20. Matrix
21 Gone with the wind
22 GodFather
23. Dial M for Murder
24. Meet John Doe
25. 12 Angry Men
26. Mad Max 1, 2 ( Average Movie)
27. The Passage ( Good one but Not as impressive as GON)
28. Planet of the Apes ( Did not like)
29. Psycho
30. Roman Holiday
31. Singin' in the Rain
32. Two for the Road ( Many of us did not like this old 67 movie, but somehow I could enjoy )
33. Matahari ( True Story of Lay Spy)
34. Ghost
35. Gladiator
36. E.T. the Extra-Terrestrial
37. Pulp Fiction
38. Midnight Run
39. Commando
40. The Terminator
41. The Silence of the Lambs
42. The Green Mile ( Fantasy)
43. First Blood
44. The Good, the Bad and the Ugly
45. For a Few Dollars More
46. A Fistful of Dollars
47. Highlander
48. Indiana Jones and the Raiders of the Lost Ark
49. Lethal Weapon
50. Predator
51. Poltergeist
52. Rain Man
53. The Fly
54. The Exorcist
55. The Omen
56. Matrix
57. Titanic
58. Django Strikes again
59. The Ten Commandments
60. Around the World in 80 Days
61. 20,000 Leagues Under the Sea
62. The Dirty Dozen
63. The Longest Day
64. he Guns of Navarone
65. Cleopatra
66. My Fair Lady
67. Jaws ( Roy Shyder)
68. Grease
69. Beverly Hills Cop
70. Who Framed Roger Rabbit
71. The Fugitive
72. Saving Private Ryan
73. Blame it on Rio
74. Striptease ( Demi Moore)
74. Change of Seasons ( Bo Derek)

बरेचसे लक्षात नाहीत. हिंदी शिप वर कुठले आणि हॉल मधे / टिव्हीवर कुठले हे आठवत नाही.
तमिळ मधला बाबा आठवतोय कारण हा दिवसभर चालू असायचा. एक तमिळ रोज बघायचा.

लेडी प्रेसिडेंटलाच पहिला अडखळलो. लेडी प्रेसिडेंटचा क्विअर मुलगा हे आकलनापलिकडचे आहे. >>> "द बर्डकेज" नक्कीच पहा मग. भावी व्याह्यांपासून आपले गे असणे लपवण्यासाठी केलेला आटापीटा . हसून हसून पोट दुखायला लागते.

पहिल्यांदा पाहिला तेंव्हा त्यातला विनोद तेवढा एन्जॉय केला होता. मग "फिलाडेल्फिआ" बघितला. त्यानंतर "द बर्डकेज" पुन्हा बघताना विनोदामागची व्यथा पण जाणवली. नेथन लेनने अफलातून काम केलंय.

लेज पाहिला.द फॉल मधल्या बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत.एकाच माणसाचे असावे दोन्ही चित्रपट.
एका ट्रेक ला आलेलं असताना 2 मुलींपैकी एकीचा खून होतो.तो दुसरीच्या कॅमेरा मध्ये रेकॉर्ड होतो.आणि मग 5 मुलांचं टोळकं या मुलीच्या मागावर, सगळे एका उंच उभ्याच्या उभ्या डोलोमाईट रॉक वर.काही दृष्य जरा जास्त अपसेट करणारी आहेत.

प्राइम वर "तीन बहुरानिया" पाहिला. छान आहे, हलकाफुलका, मला आवडला.
जुन्या जमान्यातील कौटुंबिक कथा आहे. उत्तम व वेगवान पटकथा, छान संवाद, छान अभिनय, छान दिग्दर्शन.
तीन भाऊ राहत असलेल्या कुटुंबाशेजारी एक सिनेतारका राहायला येते. तिला भेटण्यासाठी, इंप्रेस करण्यासाठी हे तीन भाऊ व त्यांच्या बायका काय काय करतात व त्यामुळे काय धमाल उडते, हे या चित्रपटात आहे.
मधल्या भावाची भूमिका रमेश देव यांनी केली आहे.

हिंदी विक्रम वेधा पहिला...पण ओरिजनल ची सर नाही..हेमावैम...
विजय सेतुपती शोभतो वेधा म्हणून..सर्वसामान्य लोकांमधून आलेला... ऋत्विक रोशन कसेही कपडे घाला..कुठलाही लूक द्या..मध्यमवर्गीय / साधा माणूस नाही वाटत ..काम छान आहे त्याच तरीही .

नीयत - मोस्टली साने( प्राजक्ता कोळी), विद्या बालन, राम कपूर,अमृता पुरी आणि इतर बरेच...

एका स्कॉटलंड मधल्या रिमोट कॅसल मध्ये उद्योगपती राम कपूर पार्टी देतोय.. चुने हुए मेहमान आहेत... आणि एक खून होतो...
चांगला बिल्ड केला आहे आणि क्लायमॅक्स मध्ये डिसपोइन्टमेन्ट होते...

मोस्टलीसेन चे फॅन असाल तर नक्की बघू नका... अत्यंत छोटासा रोल आहे....

“ नीयत” - चांगला आहे. काही गोष्टी प्रेडिक्टेबल आहेत. पण ते ठीक आहे. अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या ‘Hercule Poirot's Christmas' ला क्रेडिट दिलं असतं / उल्लेख केला असता तर बरं झालं असतं.

मी काल बघायला सुरुवात केली. थोडाच वेळ पाहिला.
मला यात विद्या बालन अजिबात आवडत नाहीये. काहीतरी खोटा आव आणल्यासारखी दिसते आहे. केस आणि एकूण लूक पण फार बोअर आहे.

येस विद्या बिलकुल सूट होत नाही.. काही कास्टिंग जमली नाहीय ... तो राम कपूर चा बिलोनियर मुलगा गिरणी कामगार वाटतो...

Pages