चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझी स्मरणशक्ती इतकी विलक्षण आहे कि मला सलग एक चित्रपट आठवण्याऐवजी वीस पंचवीस सिनेमांच्या दहा दहा मिनिटांच्या क्लिप्स मिळून एक सिनेमा पाहिलाय असे एक आठवते.

जेलर मधे रजनीकांत हॉस्पिटलमधे बेशुद्ध असतो. ( इथे पब्लीक भावुक होत असणार).
तेव्हां डॉक्टर येऊन त्याच्या मुलीला सांगतात ( ती फिरत असते इकडे तिकडे).
तुझ्याबरोबर कुणी मोठं नाही का दुसरे ? कारण अपघातात तुझ्या मेंदूत रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत. तू दोन तासच जगशील. त्यानंतर त्या गाठी तुझा जीव घेतील. पण तुझे वडील तर पाच तासांनी शुद्धीवर येतील. मग त्यांच्याकडे कोण पाहणार ?

असा श्रीमान सत्यवादी डॉक्टर पाहून टडोपा मोमेण्ट आली.

मग रजनीकांत उठून (डोळे मिटूनच, आणि डाव्या हाताने) त्या गाठी सर्जिकली काढून पुन्हा जाऊन बेडवर एक कोलांटी मारून आडवा होत नाही का? Proud

Lol

आचार्य Lol
रजनीला हसायचं नाही, त्याने ती गॉगल्सची गर्रकन फिरवायची ॲक्शन केली नसती तर विश्वनिर्मिती झाली नसती. आपण सगळे त्यामुळे आज इथं आहोत. श्रावण महिन्यात सगळे देव रजनीव्रत करतात. चला नमस्कार करा सगळे.

Lol
श्रावणात थलायवा बरसला
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार जेलर समजून जो सिनेमा (युट्यूबवर) पाहिला, तो वेगळाच होता.

तेच ना र आ वर जो हॉस्पिटल चा सीन लिहिलात तो पाहिल्यासारखा वाटला पण डोक्याला ताण देऊन पण नाव आठवेना..दरबार बहुतेक.. काला तर नाना पाटेकर वाला होता..

( ती फिरत असते इकडे तिकडे). >>
मग रजनीकांत उठून (डोळे मिटूनच, आणि डाव्या हाताने) त्या गाठी सर्जिकली काढून पुन्हा जाऊन बेडवर एक कोलांटी मारून आडवा होत नाही का? >>> Lol

बाप बेशुद्ध असताना मुलगी इकडे तिकडे फिरत असते हे निरीक्षण धमाल आहे Happy

अस्मिता - रजनीवर्ल्ड नीट समजावून घ्यायला आधी विजयकांत नावाच्या महापुरूषाचा हा व्हिडीओ- पाहिला नसेल तर- पाहा (पाहिला असेल तर पुढचा गायडन्स वाचायची गरज नाही)
https://www.youtube.com/watch?v=Y9eBvwL21Yk

म्हणजे मग एकूणच साउथ मधे "न्यू नॉर्मल" काय आहे याची बेसलाइन सेट होते. म्हणजे फ्रेण्ड्स मधे काही अफाट लॉजिक एक्स्प्लेन करायला "It's a world where Joey is a neurosurgeon" अशी लेव्हल सेट केली सगळे लॉजिक सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते तसे होईल Happy मग गॉगल गरागरा फिरवून बसवणे, आडवी असलेली सायकल तिच्या टायरवर लाथ मारून तिला (कधी नव्हे ते) न्यूटनचा तिसरा नियम पाळायला लावून उभी करणे, आजूबाजूला असलेल्या अनेक लोखंडी गोष्टीतून केवळ आपल्या मनात असलेली गोष्ट लोहचुंबकाला ओढायला लावणे वगैरे सगळे एकदम नॉर्मल वाटते.

हे सायकल लाथ मारून चं rrr वरून प्रेरित आहे का?त्यात हिरो लाथ मारून बाईक कोलांटी उडी घ्यायला लावतो आणि मग त्यावर बसतो.दुसरा हिरो पाय निकामी असताना, पायावर झाडाचा रस लावून त्याला राम मंदिरातला चिमुकला झेंडा बांधलेला असताना नंतर अर्ध्या तासात पूर्ण बरा होऊन झेंड्याच्या चिंधी चं पूर्ण 4 मीटर धोतर करून गुंडाळून थेट लढायला येतो.(जवळपास कुठेही धोतर बनेल इतका लांब झेंडा नाहीये.)

@ फारेण्ड - तो सीन पाहिला. Lol
सर्व उपमा संपल्या. साऊथचे अ आणि अ सीन्स पाहून झाले आहेत, आता धक्का बसण्यासारखे काहीही उरलेले नाही, या समजाला धक्का बसला. सोबत युट्यूबने आणखीही सीन्स दाखवले विजयकांतचे. ( आपली आवड या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याने पुढचे अचाट सीन्स सप्रेम भेट !).

बाप बेशुद्ध असताना मुलगी इकडे तिकडे फिरत असते हे निरीक्षण धमाल आहे Happy >>> धन्यवाद.
ती दोन तासात मरणार असते. ही एक सामान्य घटना असल्याने डॉक्टरांनी तिला मोकळे सोडलेले असते. एवीतेवी मरणारच आहे तर कशाला वाचवायचे प्रयत्न करायचे ? दोन तास जगू दे की असा त्यांचा विचार असावा.

तिला ते कॅज्युअली तू कशी मरणार हे सांगत असतात. कारण समस्या ती मरणार ही नसून हिरो शुद्धीवर आल्यावर काय ही असते ! तिला सांगून झाल्यावर आपण त्या गावचेच नाहीत या थाटात ते निघून जातात. आता तू आणि तुझे नशीब !

फा, (बेकरी वर ?) हा सीन आधी कुठं तरी दिला होता. फक्त त्यात आधीची दोन मिनिटे नव्हती. फार अचाट आहे. Lol असे सीन हातासरशी ठेवण्याचं महत्त्व पटलेलं आहे.

It's a world where Joey is a neurosurgeon" अशी लेव्हल सेट केली सगळे लॉजिक सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते तसे होईल >>>> Lol
कालच लेक म्हणाली की आपल्या कुत्र्याला हॅलोविनला कॅट करूया, तेव्हा मला हॅलोविन पार्टीत जोई शॅन्डलर होतो तो सीन आठवला होता. That world is not too far.... Happy

आचार्य, कवाला गाणं बघितलं. तमन्ना मुलगी आहे का ?

दोन तासात मरणार असते. ही एक सामान्य घटना असल्याने डॉक्टरांनी तिला मोकळे सोडलेले असते. एवीतेवी मरणारच आहे तर कशाला वाचवायचे प्रयत्न करायचे ? >>> Lol
दोन तास, एवढं ॲक्युरेट कसं सांगितलं. तेही इकडं तिकडं फिरण्याइतकी धडधाकट असताना..!

तो चित्रपट जेलर नावाने चार पाच चॅनेल्सवर अपलोड झालेला आहे.
एक चुकू शकेल, सगळे कसे चुकतील म्हणून विश्वासाने पाहिला. झंपु दामलेनी तमन्नाचा उल्लेख केल्यावर ट्यूब पेटली. Lol

Day shift पाहिला काल नेटफ्लिक्सवर इंग्रजी.
वैम्पायर, कॉमेडी, ऐक्शन पट..मजेशीर आहे.
नायक एक वैम्पायर हंटर असतो..वैम्पायर हंटिंग एजन्सीत जॉब करत असतो.वैम्पायर मारला कि त्याचे दात काढून आणून द्यावे लागतात..कथा अशी काही नाही सिनेमात पण मजा आली बघायला..

तमन्ना ती मुलगी असेल व ती दोन तासांत मरणार असेल, तर तिला "आज फिर जीने की तमन्ना है" गाणे द्यायला हवे होते Happy

आपली आवड या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याने पुढचे अचाट सीन्स सप्रेम भेट ! >>> Lol

हो ही लिन्क बेकरीवर तरी दिली असेल किंवा त्या जनरल अ & अ धाग्यावर. पण ती बहुतेक "मी नरसिंहा आहे, मला करंट बसला तर करंटलाच शॉ़क लागतो" या सीनपुरतीच होती. ही एक्स्टेण्डेड व्हर्जन्/डायरेक्टर्स कट आधी पाहिली नव्हती.

काय बहारदार सीन आहे! एण्ट्रीलाच आपल्याकडे पासपोर्ट फोटो काढून मिळेल च्या दुकानात जसे विविध फोटो लागलेले असतात त्या साइजमधले तसे या विजयकांतचे फोटो विविध कोनातून लावलेले आहेत. "यातले कोणते व्हॅलिड आहेत ओळखा" असे काहीतरी चॅलेंज असल्यासारखे. हा चेहरा इकडून असलेला फक्त फोटो बघितला तर तिकडून ओळखता येणार नाही अशा समजुतीतून ते काढलेले दिसतात. मग मिलिटरीच्या कॉम्प्युटर विभागातून सगळे जातात. तेथे सगळ्या स्क्रीनवर कोणीतरी एकच गेम खेळत असल्यासारखे सीन्स आहेत. "प्रिन्स" गेमची एखादी जुनी व्हर्जन असावी. मग त्याच्या हाताचे ठसे सगळ्या स्क्रीन्सवर दिसतात.

आता त्याच्या रक्ताचे सँपल घेतात. ते मिलिटरीच्या बहुउद्देशिय लॅब मधे अ‍ॅनेलाइज करायला आणले असावे. तेथे सर्व रंगाचे द्रव आहेत. एक कवटीही आहे. एखाद्या मेलेल्या व्यक्तीची कवटी अशी शेल्फ वर सहज ठेवत नसतील हे गृहीत धरून मग कवटीची प्रतिकृती तेथे कशाला हवी? तेथे याच्या रक्ताचा ३६० डिग्री अ‍ॅनेलिसीस करतात. म्हणजे मायक्रोस्कोप मधून बघणारा माणूस गोलगोल फिरत ते करतो.

याला बर्फाच्या लादीवर झोपवतात तेव्हा खालचा बर्फ शिल्लक राहतो हेच आश्चर्य आहे. मला वाटले एक मोठा प्लॉप आवाज करत त्याचे पाणी होईल एका मिनिटात.

बाहेर रजनी आणि चित्रपटातील रजनी पूर्ण वेगळा आहे... चित्रपटात तो तम्मना चा मुलगा देखील होऊ शकतो...

Rajni's talent is truly remarkable. At times, I find myself wishing I had been born in India to fully experience it. - Regina Phalange

Regina Phalange Lol

हिट पाहिला, रॉबर्ट डीनिरो आणि Al Pacino. डीनिरो एका चोरांच्या गँगचा प्रमुख असतो आणि पचिनो पोलीस असतो. चोर पोलीस पकडपकडीची गोष्ट. मनोरंजन उत्तम झाले.

God's crooked lines. Spanish, नेटफ्लिक्सवर हिंदीत.
एलिस, मानसिक रूग्ण बनून एका मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती होते, खरा उद्देश असतो हॉस्पिटलमध्ये झालेल्या खुनाचे पुरावे शोधणे..अप्स एन्ड डाऊन्स ने भरलेला सायकोथ्रीलर,माईंडट्वीस्टिंग सिनेमा.. आवडला.

आयपीटीव्ही वर ट्रायल पिरिअड नावाचा सिनेमा बघितला. जेनेलिया देशमुख, मानव कौल आणि एक छोटंसं पोरगं लीड रोल मधे आहेत.
जेनेलिया सिंगल मदर असते, पण तिच्या लहानग्याला शाळेत बुलिंग पासून वाचवायला एक सुपरहिरो डॅड हवा असतो. त्या छोटूला शेजारच्या घरात एका टीव्ही चॅनलवरून सतत मागवले जाणार्‍या वस्तूंना पाहून ट्रायल पिरेडवर बाबा आणण्याची युक्ती सुचते. आता ते कसं जमतं, त्याचा शेवट काय होतो याबद्दल हा सिनेमा. मस्त हलकाफुलका वाटला.
जेनेलियाला अजिबात अ‍ॅक्टींग येत नाही हे पुन्हा सिद्ध झालं पण मी मानव कौल साठीच बघितला फक्त. माझा फार आवडता अ‍ॅक्टर आहे. त्याने नेहेमीप्रमाणेच मस्त काम केलंय. शक्ती कपूर चक्क सहन करणेबल नॉर्मल रोल मधे आहे. छोटूचे काही काही संवाद कळत नव्हते पण भारी काम केलंय त्याने. नाव माहित नाही.

Vivarium - एक बंडल हॉरर सिनेमा. घरांच्या भूलभुलैय्यात एक जोडपे हरवते.

सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबुक पाहिला. बहुतांश सिनेमा प्रचंड बोर झाला पण शेवट आवडला त्यामुळे अंतिम विचार काहीशे सकारात्मक झाले ह्या सिनेमाबाबत.

इथे सर्वानी पहिलाच असेल, प्राईम वर क्यूब नावाचा सिनेमा पाहिला. मेझ, पझल बद्दल.थोडा थ्रिलर आहे.
एकंदर श्रीमंत देशातल्या लोकांना सिनेमात स्वतःच प्रश्न तयार करून लोकांना त्रास देणे खूप आवडते Happy आणि त्या त्रासामागे काही मोटिव्ह पण नसतात.आपल्या बॉलिवूड मध्ये जसे, एकदम स्पष्ट कारणमीमांसा असते कोणी वाईट वागले तर त्याची Happy
1. हिरोच्या बहिणीला का मारले? हिरोवर सूड घ्यायला
2. हिरोला का मारले? त्याने खून पाहिला.

Kapoor and sons पाहिला
छान आहे
आधीच बघायला हवा होता.
टाळत होतो इतके दिवस.
कारण तेव्हा तो हिरो आवडायचा नाही. आता आवडतो.

Pages