Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ताल सिलसिला व मॅड मॅक्स फुरी
ताल सिलसिला व मॅड मॅक्स फुरी रोड>>>>> तिन्ही मस्त.. सिलसिला एकदाच पाहिलाय ..ताल बर्याचदा..मॅड मॅक्स फुरी रोड चार वेळा तरी..
जुन्या सर्व फेवरिट पिक्चर ला रेंट ऑप्शन लावली आहे. >>>> ये तो सही में गलत बात है.
कीलियन मर्फिचा २८ डेज लेटर
कीलियन मर्फिचा २८ डेज लेटर बघितला. झोंबी पट. आवडला.
चांद का टुकडा बघायचा प्रयत्न
चांद का टुकडा बघायचा प्रयत्न केला. सावनकुमार टाक नाव पाहिल्यावर भीती वाटली. हे तेच ना सौ-तन वाले ?
के३जी चा रिव्ह्यू (माबो स्टाईल) सापडला नाही. पण अचानक या सिनेमात टाईमलाईनवर २.५६ असताना के३जी मधले ते प्रसिद्ध घर दिसले, ज्याच्या बाहेर शाखा हेलिकॉप्टर घेऊन उतरतो. घरात बाथरूमला ऑटोमॅटिक दरवाजे असण्यामागचा विचार कळला चहेनाही. दरवाजाजवळ गेलं कि दरवाजा आपोआप उघडतो आणि आत गेल्यावर बंद होतो ही व्यवस्था अनर्थकारी आहे. ४.५२ ला ते हेलिकॉप्टर पण दिसले ज्यातून शाहरूख उतरला होता. फक्त याच्यावर सलमानचे सिनेमातले नाव लिहीलेले आहे.
मानेच्या खाली केस वाढवलेला सलमान लंडनमधला इतका महत्वाचा व्यक्ती आहे कि तो इंडीयात परत का चालला आहे हे विचारण्यासाठी गोरे पत्रकार त्याच्या ऑफीसमधे आलेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे असे अनुपम खेर सांगतो. म्हणून तो पत्रकार परीषदेत सांगतो कि काही दिवसांपूर्वी आई जिवंत असताना तिने माझ्यासाठी एक चांद का टुकडा दिसणारी पक्की हिंदुस्थानी बहू आण असे वचन घेतले म्हणून मी इंडीयात चाललो आहे. एनी क्वेश्चन्स ? यावर ते गोरे चेहर्यावर कुठलाच भाव न आणता महत्वाची बातमी मिळाली म्हणून निघून जातात.
आशी सुरूवात असूनही पुढे तासभर पाहिला. कारण यात श्रीदेवी भूत कि परी असते असे ऐकले होते. पण हाय रे कर्मा !
५२ मिनिटे झाल्यावर बायकोने सांगितले कि तो चंद्रमुखी !
एव्हढा वेळ वाया गेला...
(No subject)
आदिपुरुश आला आहे नेट्फ्लिक्स
आदिपुरुश आला आहे नेट्फ्लिक्स आणि प्राइम ला. लाभ घ्या
हो, आदिपुरुषचा 'लाभच' घेतेय
हो, आदिपुरुषचा 'लाभच' घेतेय दोन दिवसांपासून. हे प्रकरण हप्त्यात सोसवणारं आहे. एका बैठकीत शक्य नाही.

-----
मस्त लिहिले आहे, आचार्य.
लहान झालेली पॅन्ट परत करायला जातोय असं चित्रातल्या तातडीच्या ॲक्शनवरुन वाटतंय.
मृणाली, किलोमीटर अँड किलोमीटर
मृणाली, किलोमीटर अँड किलोमीटर घरातल्या सगळ्यांना खूप आवडला.
मी आज एस्केप रूम आणि काल फायनल डेस्टिनेशन पाहिला.
आपण नवीन सायकल वर हौसेने नाव
आपण नवीन सायकल वर हौसेने नाव टाकून घेतो तसे हा 'श्याम' हेलिकॉप्टर व विमानावर नाव घालून घेतो ! त्याच्या घरी प्रत्येक ताटावर बहुदा 'श्याम' लिहिलेले असावे.
हो, आदिपुरुषचा 'लाभच' घेतेय
हो, आदिपुरुषचा 'लाभच' घेतेय दोन दिवसांपासून. >>> असले पिक्चर्स बघायचं डेरींग आहे बाई तुझ्याकडे, नंतर परीक्षण लिहून आम्हाला सावध करशीलच, आणि आमच्या डोक्याचा त्रास कमी करशील, हाहाहा.
रआ, भारी.मला हा आणि
रआ, भारी.मला हा आणि चांद्रमुखी मध्ये प्रचंड गोंधळ होतो.पण चंद्रमुखी जास्त लक्षात राहिलाय म्हणजे चांकातु बोअर असावा.
आदीपुरुष सीता हरण पर्यंत सहन केला.प्रत्येकाला समान संधी दिली पाहिजे. नंतर सीता वेलीत गुंडाळून स्वतःची स्वतः अपहरीत(हवेत अपलिफ्ट होऊन) झाली आणि वटवाघूळ बॅक वर खडबडीत काळ्या स्ट्रेचर सदृश पृष्ठभागा वर जाऊन बांधली गेली तिथे 'आता पुरे' म्हणून आदीपुरुष बंद केला.
दरवाजाजवळ गेलं कि दरवाजा
दरवाजाजवळ गेलं कि दरवाजा आपोआप उघडतो आणि आत गेल्यावर बंद होतो ही व्यवस्था अनर्थकारी आहे. >>>
यावर ते गोरे चेहर्यावर कुठलाच भाव न आणता महत्वाची बातमी मिळाली म्हणून निघून जातात. >>>
र.आ - धमाल लिहीले आहे. अजून थोडा वेळ यावर वाया घालवावा
जे सिनेमे लोकांनी पाहिलेले
जे सिनेमे लोकांनी पाहिलेले नाहीत त्यावर लिहीले तर न पाहिलेल्यांना काहीच समजत नाही.
इथे चाद का टुकडाची जाहीरात करून मग लिहावे लागेल.
अस्मिता, अनु, विकु धन्यवाद. :
आदिपुरूष साठी शुभेच्छा !
चां का तु असो वा चं, श्री तर
चां का तु असो वा चं, श्री तर परीच दिसणार ना? ह्यातले आयम वेरी वेरी सॉरी तेरा नाम भुल गयी गाणे खुप फेमस झाले होते. गाण्यात श्री ने विचित्र अभिनय आणि विचित्र कपडे घातलेत. हॉटेलात गाणे आणि हिच्या डोक्यावर भलीमोठी सन हॅट. असे का ते चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही :).
काल ओएमजी २०पाहिला. पहिला पाहिला नव्हता. हा खुप आवडला. विषय चांगला आहे आणि पंकज त्रिपाठीने छान काम केलेय. ठिकठिकाणी पंचेस खुप छान जमलेत, खळखळुन हसु येते. मुलाच्या रोलमध्ये योग्य वयाचा मुलगा घेतलाय पण शाळकरी मुलीच्या रोलमध्ये जी मुलगी घेतलीय ती नंतर मुलाच्या दुप्पट वयाची वाटते.
दरवाजाजवळ गेलं कि दरवाजा
दरवाजाजवळ गेलं कि दरवाजा आपोआप उघडतो आणि आत गेल्यावर बंद होतो ही व्यवस्था अनर्थकारी आहे>>>>
अनर्थ कसला होणारे??? तुमच्या घरात एकच बाथरूम आख्खे घर, पाहुण्यांसकट, वापरत असेल म्हणुन जो हेलिकॉप्टरवर पण स्वतःचे नाव घालुन घेतो तो सलमान असे करेल का?? प्रत्येकाच्या नावाची बाथरुम असणार हो.. आपोआप उघडणारा दरवाजा बघण्याच्या नादात त्यावर लाल अक्षरात श्याम असे लिहिलेले तुम्हाला दिसले नसणार..
आणि तसेही एवढ्या मोठ्या घरात प्रत्येकाला स्वतःची बाथरुमही नसेल तर करायचे काय एवढे मोठे घर??? मोठे घर दिसले की डोक्यात पहिला विचार साफसफाईचा येतो.
तिन्ही मस्त.. सिलसिला एकदाच
तिन्ही मस्त.. सिलसिला एकदाच पाहिलाय ..ताल बर्याचदा..मॅड मॅक्स फुरी रोड चार वेळा तरी..>> काल मी घरी बसून सिनेमे सर्च करत होते तेव्हा तुझी खूप आठवण झाली. आज हिने काय बघितले असेल असे वाटले. एक तेलुगु पिक्चर नवा दिसला प्राइम वर शोधुन लिहिले. आमच्या कडे मुले मुली एकाच वेळी अनेक ठिकाणी पिक्चर बघतात व कमेंट करत राहतात फोन वर तसे काहीत री माबो मुव्ही मॅरेथॉन केले पाहिजे. पिक्चर गटग.
अनर्थ कसला होणारे??? >>
अनर्थ कसला होणारे??? >> एव्हढे मोठे घर सलमान तर स्वच्छ ठेवणार नाही ना

कामाला मेड किंवा रामा गडी असेल. बघा विचार करून
तसे काहीत री माबो मुव्ही
तसे काहीत री माबो मुव्ही मॅरेथॉन केले पाहिजे. पिक्चर गटग. >> राजकुमार हिरानी चा डंकी येणार आहे. करूयात त्या वेळी. किमान आपापल्या शहरात. मुंबैतून पुण्यात, पुण्यातून मुंबैत असे नको. लोणावळ्यात स्पेशल स्क्रीनिंगचा पर्याय आहे.
रघू आचार्य भारी लिव्हलत.
रघू आचार्य
भारी लिव्हलत.
सेम सेम
साधना मोठं घर साफसफाई
नंतर सीता वेलीत गुंडाळून
नंतर सीता वेलीत गुंडाळून स्वतःची स्वतः अपहरीत(हवेत अपलिफ्ट होऊन) झाली आणि वटवाघूळ बॅक वर खडबडीत काळ्या स्ट्रेचर सदृश पृष्ठभागा वर जाऊन बांधली गेली तिथे 'आता पुरे' म्हणून आदीपुरुष बंद केला.

>>>>
बाय द वे अपहरीत की अपहृत?
अमा
अमा
अनु थँक्यु.
काल आदिपुरूष द हा मिनटं बघून बंद केला पण उत्सुकता काही गप्प बसू देईना मग आज परत पुढचा बघून पूर्ण केला..
शब्द नाहीत माझ्या कडं रिव्ह्यू लिहायला.. हा अनुभव आहे ज्याचा त्याने घ्यावा...नक्की बघा
वेब सिरीजच्या धाग्यावर 'फर्झी
वेब सिरीजच्या धाग्यावर 'फर्झी'च्या चर्चेत विजय सेतुपतीच्या '96' बद्दल वाचलं होतं. तो यूट्यूबवर हिंदी डब्ड सापडला.
एकदा बघण्यासारखा आहे.
त्याचं काम आवडलं. तरी काही सीन्स अ आणि अ आहेत.
त्रि.कृ. चाळीशीच्या वयोगटातली वाटत नाही. (रियुनियनच्या वेळचं त्या बॅचचं साधारण वय)
रियुनियनची पार्टी संपल्यानंतरच्या सिनेमात टाइमलाइनचा मेजर घोळ वाटतो. आणि शेवटी विमानाचं तिकीट काढण्याचा सीन
एखादं आयत्यावेळचं विमानाचं तिकीट किती आयत्या वेळचं असू शकतं याचं ते आदर्श उदाहरण. (एखादं मळखाऊ कापड किती मळ खाऊ शकतं.... या चालीवर वाचा.)
रॉकी राणी पाहिला ... आवडेश...
रॉकी राणी पाहिला ... आवडेश...
बादवे - व्हॉट झुमका गाणे ओरिजिनल नाहीय... किती जणांना माहित होते? बहुतेक 80s मध्ये झुमका गिरा रे बरेली के बाजार मे असे actual गाणे आहे... खोटे वाटत असेल तर युट्यूब वर सर्च करून पहा...
झुमका गिरा रे - मेरा साया -
व्हॉट झुमका हे गाणे झुमका
व्हॉट झुमका हे गाणे झुमका गिरा रे गाण्यालाच ट्रिब्युट आहे. इथे मेरा सायाचे स्वप्नाने लिहिलेले एक परीक्षण पण आहे ह्या सिनेमाचे .
अरे हो,
अरे हो,
अपहृत. माझं मन मला सारखं सांगत होतं की अपहरित काहीतरी ऑफ वाटतंय
झुमका गिरा रे , नैनो में बदरा
झुमका गिरा रे , नैनो में बदरा छाये, नैनोवालीने हाय मेरा दिल लुटा, एकापेक्षा एक सुंदर गाणी आहेत मेरा साया मधली. हे न माहिती असायला काय झालं. जुन्या प्रसिद्ध गाण्यावरची फ्री राईड आहे हे नवं गाणं. Playing safe and being lazy on someone else's Zumka..!
अनु
गिर गया झुमका, गिरने दो.
गिर गया झुमका, गिरने दो.
कान मे झुमका, तुळजापूरका, लगे सातारी झटके
मिला है किसी का झुमका
झुमका गाणं असलेल्या सिनेमात धर्मेंद्र किंवा मनोजकुमारला घ्यावं लागतं.
च्रप्स,
च्रप्स,
सार्कॅस्टिक लिहिलं आहे कि तुम्हाला खरच ‘द फेमस’ झुमका गिरा रे माहित नवह्ते??
मी_अनु यांनी अपहरित क्रांती
मी_अनु यांनी अपहरित क्रांती केली
हार्ट ऑफ स्टोन - नेटफ्लिक्स
हार्ट ऑफ स्टोन - नेटफ्लिक्स
सिनेमा ठिकठाक आहे पण आलिया भटचा बहुतेक पहिलाच हॉलिवूडपट असावा. पण त्याहून भारी म्हणजे तीचे कॅरॅक्टर पुण्याचे असते आणि पुण्याचा उच्चार णे सकट बरोबर केला आहे.
Pages