Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तिचा गिन्नी वेड्स सन्नी पण
तिचा गिन्नी वेड्स सन्नी पण बघितला होता. सुंदर दिसली आहे त्यात.
>>>>
हो, तो चित्रपट सुद्धा छान होता. दोघांनी सहज सुंदर अभिनय केलाय.
गेल्या पंधरा दिवसात दोन ओटीटी
गेल्या पंधरा दिवसात दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्सची सबस्क्रीप्शन वारली. ती काही रिन्यू केली नाही.
कंटाळा येतो आता सिनेमे बघायचा. बघून होत नाही. प्राईम + युट्यूबवर दहा बारा मिनिटाचे व्हिडीओज बास झाले .
इंद्रा, धन्यवाद
mandar, अतुल, इंद्रा, धन्यवाद
गोरी तेरे प्यार में
गोरी तेरे प्यार में
इम्रान खान आणि करीना कपूर
काल का अचानक बघावासा वाटला हे मला आणि माझ्या बायकोलाही समजले नाही..
पण चक्क आवडला.. इमोशन ड्रामा कॉमेडी तरीही हलकाफुलका .. जरूर बघा..
इम्रान खान म्हणजे आटोपलाच
इम्रान खान म्हणजे आटोपलाच कारभार... हिंदीतील ललित प्रभाकर आहे तो.. नो एक्सप्रेशन्स.. माशी उडत नाही चेहऱ्यावरची...
नो एक्सप्रेशन्स.. माशी उडत
नो एक्सप्रेशन्स.. माशी उडत नाही चेहऱ्यावरची...
>>>>
अभिनयाची गरज नव्हती जास्त त्या रोलला. बाकी त्याचा वावर सहज असतो, संवाद सहज बोलतो, कुठे अती करत नाही. त्यामुळे भले तो आवडीचा झाला नाही तरी नावडीचा होत नाही.
म्हणूनच बॉलिवूड मधून गायब आहे
म्हणूनच बॉलिवूड मधून गायब आहे..
हो, तो कुठे अचानक गायब झाला
हो, तो कुठे अचानक गायब झाला कळले नाही.
गूगल केले तर 2015 लास्ट पिक्चर दाखवत आहेत.
पण अजून एक ताजी बातमी सुद्धा दिसली.
Imran Khan confirms Bollywood comeback as he says ‘I’m working on it'; impatient fans celebrate
Kate इंग्रजी नेटफ्लिक्सवर.
Kate इंग्रजी नेटफ्लिक्सवर.
भाडेकरू मारेकरी असणाऱ्या नायिकेला पॉईझन देण्यात आलेलं असतं..चोवीस तासांच्या आत ती मरणार असते, त्याआधी तीला हे कुणी आणि का केलंय हे शोधायचंय..खतरनाक ऐक्शन थ्रीलर वेगवान सिनेमा.
Overlord इंग्रजी प्राईमवर
दुसऱ्या महायुद्धावेळी जर्मनांच रेडिओ टॉवर उध्वस्त करायला एक अमेरिकन सेना तुकडी येते, हवाईहल्ल्यातून फक्त चार सैनिक वाचतात..त्या सैनिकांना मिशन पूर्ण करायच्या आधी जर्मनांच एक भयावह सिक्रेट रीव्हील होतं..हॉरर,ऐक्शन,वायोलंस, थ्रीलर सिनेमा.. चांगला आहे.
फर्स्टेश ?
फर्स्टेश ?
द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल
द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल पाहिला. खूप आवडला. साधी सुधी गोष्ट आहे, आणि गंमतशीर प्रकारे मांडली आहे. अगदी रंगीबिरंगी सिनेमा आहे. एका भल्यामोठ्या हॉटेल मध्ये एक लेखक थांबला असतो. तिथे त्याला त्या हॉटेलचा मालक भेटतो, झिरो मुस्तफा. तो त्याला हे हॉटेल त्याला कसे मिळाले ह्याची गोष्ट सांगतो. दिसायला अगदी सुंदर सिनेमा आहे आणि गोष्ट सुद्धा हार्टवॉर्मिग आहे.
(Hotstar वर आहे)
बुडापेस्ट हॉटेल >> नेत्रसुखद
बुडापेस्ट हॉटेल >> नेत्रसुखद आहे, त्यातला विनोदही चांगला आहे; पण मला एका पॉईंटनंतर कंटाळा आला. संपेच ना!
मी अर्धा बघितला आणि मग उशीर
मी अर्धा बघितला आणि मग उशीर झाला म्हणून उरलेला दुसऱ्या दिवशी बघितला. त्यामुळे मला तो पॉइंट आलाच नाही बोर होण्याचा
हा बुडापेस्ट वाला व या
हा बुडापेस्ट वाला व या खालच्या लिन्क मधला मेरिगोल्ड हॉटेल वाला - दोन्हींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? हा मेरिगोल्ड वाला आवडला होता इतके लक्षात आहे.
https://en.wikipedia.org/wiki/The_Best_Exotic_Marigold_Hotel
मलाही मेरिगोल्ड आवडला होता.
मलाही मेरिगोल्ड आवडला होता. बुडापेस्ट बघेन.
नेटफ्लिक्सवर It's complicated बघितला.
मेरिल स्ट्रीप, ॲलेक बाल्डविन, स्टीव्ह मार्टीन.
हलकाफुलका आहे, मेरिलचे पात्र एकोणीस वर्षे नवऱ्याबरोबर संसार करून त्याने विशीच्या मुलीसोबत अफेअर केल्याने वेगळी होते. त्यांचा घटस्फोट होतो, नंतर दहा वर्षांनंतर आपल्या तरूण बायकोला दुसरं मूल हवं असताना म्हाताऱ्या एक्सला फर्टिलीटी सेंटर मध्ये भेटते व मुलाच्या ग्रॅड पार्टीला एक्स विथ बेनेफिट्स सुरू होते. एक्सच्या हॉट गर्लफ्रेंडला कशी अद्दल घडवली हे मैत्रिणींना अभिमानाने सांगते, रिअली ?? मला एवढी तगडी स्टारकास्ट असूनही धमाल वगैरे वाटला नाही. थोडा उच्छृंखल आहे पण उत्तम वाटला नाही. स्टीव्ह मार्टीन अतिशय सालस-सरळ पात्र करताना बघून थोडा रसभंगच झाला. कंटाळाही येत नाही किंवा खूप मजाही येत नाही. अधलामधला आहे.
मग नाही पहात. इंट्युशन येतं
मग नाही पहात. इंट्युशन येतं हल्ली की हा सिनेमा, मालिका पहावी की नाही याबद्दल … तसे याला ‘पाहु नको“ हे आले होते.
कंटाळाही येत नाही किंवा खूप
कंटाळाही येत नाही किंवा खूप मजाही येत नाही. अधलामधला आहे. >>> म्हणजे रिव्यू वरून कोणी ओव्हरऑल मत मागितले तर पिक्चरचे नावच वापरता येइल
(No subject)
हो फा, मला तर हलक्याफुलक्या
हो फा, माझं तर हलक्याफुलक्या लेखनाला 'विनोदी' म्हटलं की सुद्धा थोडं सरकतं. काय सांगू, It's complicated

सुनिधी, इंट्यूशन बरोबर निघालं.
लोक हो .. heart of stone
लोक हो .. heart of stone बघितला का नाहि नेटफ्लिक्सवर ? आलिया भट्ट चा पहिला होलिवुड सिनेमा आहे बहुतेक. त्यात ती पुण्याची आहे अस दाखवलय. एकदा पाहायाला हरकत नाहिये. वन्डर वुमेन वालि पण आहे त्यात.
जेलर पाहिला शेवटच्या
जेलर पाहिला शेवटच्या हाणामारीपर्यंत.
रजनीचे भक्त असलेल्यांसाठी परफेक्ट ट्रीट आहे. त्याचे बाबा पासूनचे सिनेमे हे फक्त त्याच्या भोवती फिरणारे असतात. एक कथा नावाला असते. बाकि सगळा थलायवा ! पडद्यावरचा त्याचा वावर, एनर्जी, दिसणं बघून हा ७२ वर्षांचा आहे हे खरं वाटत नाही. बाकिच्यांना फारसे काम नाही. नयनतारा, सुनील शेट्टी पण आहेत.
कमिशनर असून त्याला कुठेही एकट्याने घुसुन मारामारीची आवड असते आणि ड्युटी फारच पर्सनली घेत असतो अशी एका ओळीची कथा आहे. प्रत्येक शहरात असा एकच कमिशनर असेल तर मग अग्निवीर भरतीची गरज नाही. सिनेमाचं नाव जेलर का आहे हे अजून तरी समजलं नाही. शेवटी नावं सुरू असताना पाटी येतेय का ? परत बघायला पाहिजे.
रजनीचे तमिळ फॅन्स काय असतात याचा अनुभव चार महीने घेतलेला आहे. उगीच इतका जोरात चालला नसणार !
जेलर तमन्नाच्या गाण्यासाठी
जेलर तमन्नाच्या गाण्यासाठी पाहण्यात येईल.
मेरिगोल्ड सिनेमाची कथा वेगळी
मेरिगोल्ड सिनेमाची कथा वेगळी दिसती आहे. आणि बुडापेस्ट मध्ये पटकथा, संवाद, चित्रीकरण सगळेच अगदी युनिक वाटले. एकूण सिनेमाला परिकथेचा फिल येतो, काही जादू नसताना पण.
Race 2
Race 2
पाहिला आज
मस्त आहे ! फुल माचो
Respect Rajni Sir
Respect Rajni Sir
ढंपूजी, नेम धरून अनुमोदन देऊ
ढंपूजी, नेम धरून अनुमोदन देऊ नका. इथं आधीच संशयकल्लोळ चालु आहे.
No escape room इंग्रजी
No escape room इंग्रजी नेटफ्लिक्सवर
एक बाप-लेक अन्य तीन जणांबरोबर एका घरात एक खेळ खेळायला जमतात..बंद खोल्यांमधून कोडी सोडवून, चावी शोधून,चावीचे दरवाजे शोधून बाहेर पडायचंय..मधेमधे भुताटकी, भुलभुलैय्या वगैरे वगैरे लागणार..
इतका काही खास थ्रीलींग वाटला नाही.. नाही बघितला तरी चालेल.
मीही पाहिला.या एस्केप रूम चे
मीही पाहिला.या एस्केप रूम चे सिनेमे बनवणाऱ्या लोकांचा आपल्याला हॉरर बनवायचा की थ्रिलर यात गोंधळ होतो असं वाटतं कधीकधी. म्हणजे लॉजिकल खेळ चालूं असतो, मध्येच काहीतरी भुताटकी.
तो सेल्फी फ्रॉम हेल तर मला शेवटी शेवटी नीट कळलाच नाही.कोणाला कळला तर मला विपु मध्ये किंवा स्पॉयलर्स देऊन इथे सांगा.
माय लेकी घरात बनवलेल्या
माय लेकी घरात बनवलेल्या vault मध्ये अडकतात, त्यातून मारेकरी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात त्या चित्रपटाचे नाव काय? मी तो कुठेतरी दहा मिनिटे बघितला, आता नाव आठवेना, तो बघायचाय.
पॅनिक रूम?
पॅनिक रूम?
Pages