Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बच्चन चा आयकॉनिक डॉन जर
बच्चन चा आयकॉनिक डॉन जर शहरुखला घेऊन चालु शकतो तर मग शारुख ऐवजी डॉन ३ रणवीरला घेऊन केला तरी चालेलच !
रणवीर ला स्टार व्हॅल्यू नाहीय
रणवीर ला स्टार व्हॅल्यू नाहीय... त्याला म्हणून बघायला कोणी जात नाही...तो अर्जुन कपुर लेव्हल च आहे फक्त बॅकड बाय केजो ,रोशे आणि slb...
डॉन 3 मध्ये हृतिक बेटर ठरला असता...
आत्ता???? अरेबिक गायचा
आत्ता????
अरेबिक गायचा प्रयत्न करतोय अरिजीत तर तो बेसुरा.. मग परत म्हणायचं की एकाच सुरात गात बसतोय 
त्याची रोमँटिक गाणी झोपाळू आणि सेम टोन वाटतात. काल काल सॉलीड आहे.
हल्के घ्या लोक्स!
अँकी भिगे होंठ & काल ही दोन च ऐकलीत तुम्ही मेन्शन केलेल्या गाण्यांपैकी. बाकीची ऐकते
मी पीएस १ बघायचा प्रयत्न केला पण सबटायटल्स आणि इतके कॅरॅक्टर्स चा मेळ लागेना. चांगलाय का? १ &२?
बच्चन चा आयकॉनिक डॉन जर
बच्चन चा आयकॉनिक डॉन जर शहरुखला घेऊन चालु शकतो तर मग शारुख ऐवजी डॉन ३ रणवीरला घेऊन केला तरी चालेलच>>> +१
किंबहुना तोच आहे सध्या स्टॉक मधे बेस्ट. आयुष्मान डॉन च्या भुमिकेत ही स्वप्नाळू च वाटायची शक्यता आहे
@aashu29
@aashu29
खालील लिंक पाहा:
https://www.maayboli.com/node/83414
रणवीर फिट होइल डॉन भूमिकेत.
रणवीर फिट होइल डॉन भूमिकेत. ही कॅन कॅरी अॅक्षन रोल्स.
केजो वाइट दिग्दर्श क, अरिजित बेसुरा ....... ह्या ह्या. कुच्छ भी.
डॉन अमिताभच्या करीष्म्यावर
डॉन अमिताभच्या करीष्म्यावर चालला होता.
अमिताभ ची थंड नजर, आवाज यामुळं त्याचा डॉन जितका भेदक झाला तितकाच डबल रोल मधला युपीचा भैय्याही त्याने मस्त केला.
त्या त्या काळात त्या त्या अभिनेत्याची जादु असते. त्याचा रीमेक येउ शकतो हे झेपलं नव्हतं. आता अमिताभच्याच नजरेतला तो अंगार विझलाय. त्यामुळे नॉस्टॅल्जिक होण्यासाठी त्यालाच घेऊन (डॉन मेलेलाच नसतो, म्हातारा झालेला असे दाखवून) दुसरा भाग काढणेही शक्य नाही.
शाहरूख खान चा डॉन नाही पाहिला. रणवीरचा ही नाही बघणार.
बच्चन चा डॉन चांगला आहे..
बच्चन चा डॉन चांगला आहे..
आशु - ps भिकार दर्जा चित्रपट
आशु - ps भिकार दर्जा चित्रपट आहे... Character बिल्डिंग वर काहीही मेहनत नाहीय... जो ps आहे तो गेस्ट वाटतो चित्रपटात...
फुल गोंधळ आहे... चांगली स्टोरी वाया घालवली आहे...
Ps 2 तर अजून सुमार आहे...
बच्चन चा डॉन चांगला आहे..
बच्चन चा डॉन चांगला आहे..
>>>
चांगला हा शब्दही छोटा आहे. खूप भारी आहे.
शाहरूखचा तितका नाही आवडला.
पण त्यातला शाहरूख मात्र आवडला.
मात्र बघताना डोक्यातून बच्चनने साकारलेला डॉन वेगळा ठेवता आला पाहिजे. या दोन्ही सुपरस्टार कलाकारांची आपली शैली आहे ती एन्जॉय करता यायला हवी.
बाकी दोघांची स्टाईल आणि स्ट्रेंथ वेगळी असूनही शाहरुखने हा सिनेमा केला हे गटस शाहरूख च दाखवू शकतो. म्हणून मी त्याचा चाहता आहे
बच्चनचा डॉन मास्ट्रपीस
बच्चनचा डॉन मास्ट्रपीस
शाखाचा डॉन १ नाही आवडला कारण बच्चनशी तुलना होतेच
डॉन २ आवडला हा स्वतंत्र सिनेमा आहे बच्चनचा संबंध नाही. शाखाने यात भारी काम केलय. ३ मधे पण शाखा हवा होता. Hope Ranvir will also do it better.
करण जोहर इंग्रजीत केजो कसा
करण जोहर इंग्रजीत केजो कसा काय होतो? केजे होईल ना?
आबा. धन्यवाद.
आबा. धन्यवाद.
बच्चन चाच डॉन एकमेवाद्वितिय! त्या वेळी ती कॉन्सेप्ट च किती थ्रिलींग होती..
केजे होईल ना?>>> हपा, श्रीमंत
केजे होईल ना?>>> हपा, श्रीमंत लोक आपले शॉर्ट फॉर्म स्वतःच बनवतात. तुषार साधे नाव जितूपुत्र तुषाआआर्र्र्र्र्र्र असं काहिसं स्पेल करतो
करण चा के इंग्रजीत नाही का ?
करण चा के इंग्रजीत नाही का ?
जोहर चा जो हिंदी मराठी लोकांसाठी.
त्याचा सेन्स ऑफ ह्युमर अत्युच आहे. त्याचा फायदा उचलत त्याने चांगल्या दर्जाचे विनोदी सिनेमे बनवावेत.
टोणगे झालेल्या हिरो हिरविनींना प्रेम आणि मैत्रीतला फरक कळत नसतो असे भाबडे चित्रपट राजकपूर, राजा गोसावीच्या काळातच ठीक होते.
के३जी वर फारेंडचा धागा आहे का ?
अरे हो की! स्वतःच शॉर्ट फॉर्म
अरे हो की! स्वतःच शॉर्ट फॉर्म बनवतात हे लक्षात नव्हतं आलं.
तुषाआआर्र्र्र्र्र्र >>

बच्चनचा डॉन द बेस्ट आहे. (
बच्चनचा डॉन द बेस्ट आहे. ( शेवटची आचरट फायटिंग सोडली तर)
माबोकर एक अख्खा सचित्र लेख आहे जुन्या डॉन चित्रपटावर.
राफा ने लिहिलेला. तो वाचा एकडाव.
डॉन च्या remake मध्ये डॉन चे गाणे फक्त आवडले.
शंकर एहसान लॉय म्युजिक वाटा भरपूर त्यात
त्यांनी आधीही डान्स मस्ती डान्स मस्ती वन्स अगेन मध्ये खूप चांगली गाजलेली हिंदी गाणी खूप उत्तम रिमिक्स केली आहेत.
Lucy पाहिला कन्सेप्ट चांगलीय
त्यातही टिपिकल बॉलिवूडच्या हिरोने करावी तशी mistake आहे की.
त्या कोरियन डॉन ला नुसते हातात चाकू खुपसून सोडून दिले. तिथेच मारले नाही.
शाहरुख नी डॉन केला तेंव्हा
शाहरुख नी डॉन केला तेंव्हा बच्चन चं लीड रोल मधून ट्रांझिशन झालं होतं.
पण रणवीर डॉन करतोय त्या काळातही शाहरुख लीड रोल मधेच आहे. त्यामुळे तो का नाही हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
पण वेगळे रोल अन् जॉनर करायचे या कारणास्तव डॉन 3 स्वतः शाहरुखनीच नाकारला असं कुठेतरी वाचलं / ऐकलं.
आता आजच्या जमान्यात जर डॉन करायचाच असेल तर रणवीर हाच ऑप्शन आहे. (जसं जुने सलमान / गोविंदाचे रिमेक करायला वरून खालून धवन)
पण म्हणून तो करायलाच हवा असं काही नाही...
पण म्हणून तो करायलाच हवा असं
पण म्हणून तो करायलाच हवा असं काही नाही...>> सब पैसेका चक्कर है बाबु भैया. मना कोण करेल?! शाहरुख लीड रोल्स मध्ये आता अपवादानेच आहे. सीजी किती करणार. एकदा टक्कल बघितल्यावर परत रिवर्स ट्रांझिशन अवघ ड जाईल.
डॉन ३ करायचा असेलच फरहानला,
डॉन ३ करायचाच असेल फरहानला, त्यालाही गरज आहे हिट ची!
धूम २ काळातला ह्र्थिक चालला असता पण तो आता इतका म्हातारा दिसतोय, त्यापेक्षा शारुख सुद्धा फ्रेश दिसतो मग अजुन
मला तरी रणवीर कधीही आवडेल एस.आर.के पेक्षा डॉन म्हणून , शारुख दर्शनाचा ओव्हरडोस चालु आहे तसाही !
शाहरूख 3 ब्लॉकबस्तर देतोय या
शाहरूख 3 ब्लॉकबस्तर देतोय या वर्षभरात.. एकटा वाचवणार का बॉलीवूडला.. बाकीच्यांनी सुध्दा जबाबदारी उचलायला हवी
डॉन ३ वरून रणवीर सिंग आणि एस
डॉन ३ वरून रणवीर सिंग आणि एस आर के फॅन्स मधे सोशल मीडियात युद्ध पेटले आहे. न्यूज पोर्टल्स सुद्धा बातम्या देऊ लागलेत.मामायबोलीवर त्या मानाने काहीच नाही.
https://www.maayboli.com/node/83856
के३जी वर फारेंडचा धागा आहे का
के३जी वर फारेंडचा धागा आहे का ? >>>
नाही. मला डुलक्या लागल्या होत्या तो पिक्चर पाहताना 
जितूपुत्र तुषाआआर्र्र्र्र्र्र >>>
डॉन-२ बद्दल सहमत. मलाही आवडला होता. पण डिग्निफाइड निगेटिव्ह कॅरेक्टर हा शाखाचा प्रांत नाही. सलीम-जावेदने अमिताभला बॉण्ड-लाइक पर्सोना दिला आणि अमिताभने तो परफेक्ट उभा केला होता. आता शाखाने केलाच आहे तर रणवीर टोटली चालेल डॉन म्हणून पण त्यालाही तो स्क्रीन प्रेझेन्स जमेल का शंका आहे. या रोलला फक्त अभिनय पुरेसा नाही. इतरांत उठून दिसणारे व्यक्तिमत्त्व, नजर आणि दमदार आवाज याच्या जोरावर कसलेही अॅण्टिक्स न करता ऑथोरिटी दाखवणे महत्त्वाचे आहे. अजय देवगणने "कंपनी" मधे ती दाखवली. वास्तविक तो उंचापुरा नाही - पण तरीही राम गोपाल वर्माने कॅमेरा अँगल्स बरोबर घेउन ते सफाईने दाखवले होते.
तिन्ही खान्स, रणवीर, अजय देवगण यांची ती पूर्वीची तगड्या पंजाबी हिरोंची पर्सनॅलिटी नाही. अगदी सुरूवातीचा आनंद, एक नजर मधला अमिताभ बघितला तर धर्मेन्द्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासमोर फुंकर मारली तर उडून जाईल असा वाटतो. पण नंतर तो अंगाने भरला आणि उंची, नजर आणि (स्वतःचा आणि किशोरचा) आवाज यामुळे वाइड अँगल शॉट्स मधे सुद्धा यांच्या समोर तोडीस तोड वाटू लागला.
https://www.youtube.com/watch?v=wrV1xiZF_Yw&t=168s
https://www.youtube.com/watch?v=_GO5zCkmHkk
"८३" हा रणवीरचा एकदम अंडररेटेड रोल आहे. तो पिक्चर पाहताना तो कधीही रणवीर वाटला नाही. कपिलच वाटला.
अमिताभचा डॉन च्या फॅन
अमिताभचा डॉन च्या फॅन असल्याने शारूकचे बघावेसे वाटले नाहीत .. कदाचित 3 रा बघिन
बाकी दोघांची स्टाईल आणि
बाकी दोघांची स्टाईल आणि स्ट्रेंथ वेगळी असूनही शाहरुखने हा सिनेमा केला हे गटस शाहरूख च दाखवू शकतो> त्याहीपेक्षा जास्त गट्स अमिताभ ने दाखवलेत. भविष्यात शाहरुख हा रोल करणार आहे या दडपणाखाली न येता त्याने आपल्या परीने रोल कसाबसा निभावून नेला आहे.
पण डिग्निफाइड निगेटिव्ह
पण डिग्निफाइड निगेटिव्ह कॅरेक्टर हा शाखाचा प्रांत नाही. सलीम-जावेदने अमिताभला बॉण्ड-लाइक पर्सोना दिला आणि अमिताभने तो परफेक्ट उभा केला होता. >> फा त्या काळामधे प्रोटोगॉनिस्ट निगेटिव्ह कॅरेक्टर डिग्निफाइड नसेल तर करत होते का ? परिस्थितीमूळे निगेटिव्ह झालेत हे शेपूट सगळीकडेच लागायचे. विनोद खन्ना, शत्रू वगैरे ने निगेटिव्ह रोल सुरूवातीला केले नि जंप केली. अमिताभ ने निगेटिव्ह म्हणू शकतो असा रोल सौदागर मधे केला . दिलिप कुमारचा अगदी सुरूवातीला अमर केला. राजेश खन्नाचा दुष्मन डिग्निफाइड निगेटिव्ह कॅरेक्टर च्या आसपास जाईल असा म्हणता येईल. "सलीम-जावेदने अमिताभला बॉण्ड-लाइक पर्सोना दिला आणि अमिताभने तो परफेक्ट उभा केला होता." हे डॉनच्या यशाचे गिमिक होते.
अरे डिग्निफाइड म्हंटलो ते
अरे डिग्निफाइड म्हंटलो ते त्या अर्थाने नाही. "मै पहले ऐसा नहीं था. इस जालिम समाजने ...." मुळे निगेटिव्ह झालेला नव्हे.
मी डिग्निफाइड म्हणतोय ते मॅनरिजम बद्दल. एक टॉप लेव्हलचा स्मगलर स्वतःला कसा कॅरी करतो त्याबद्दल. त्याची ऑथोरिटी त्याच्या बॉडी लॅग्वेज मधून दिसते वगैरे वगैरे. बॉण्ड साधारण तसा दाखवत.
मला डुलक्या लागल्या होत्या तो
मला डुलक्या लागल्या होत्या तो पिक्चर पाहताना >> मलाही तो एका सिटींग मधे बघता आला नाही. वर्षभरात बघून झाला.
८३" हा रणवीरचा एकदम अंडररेटेड रोल आहे. तो पिक्चर पाहताना तो कधीही रणवीर वाटला नाही. कपिलच वाटला. >> सहमत. रणवीर फक्त याच चित्रपटात आवडला. बाजीराव टपोरी उभा केलाय त्याने.
डॉन अमिताभ मुळे बघणेबल झाला
डॉन अमिताभ मुळे बघणेबल झाला असे म्हणायचे होते. सलीम जावेदची ही कमजोर स्क्रीप्ट अडगळीत पडून होती.
चंद्रा बारोट हे मूळचे कॅमेरामन. त्यांनी एक चित्रपट सुरू केला पण त्यात ते कर्जबाजारी झाले. त्या वेळी अमिताभ सहीत सर्वांनी त्यांना त्या कर्जातून वर आणण्यासाठी डॉन स्विकारला होता. सलीम जावेदने त्यांची परिस्थिती बघून अडगळीतली स्क्रीप्ट गळ्यात मारली.
डॉन चालला तो गाणी आणि अमिताभ, अमिताभ आणि अमिताभ मुळे.
झीनत अमानच्या छोट्या केस मधला लुक त्या वेळी हटके होता. पण ते तिच्या बॉडी डबल ने (मेल) लांब केसांचा विग घेऊन स्टंटस करायला नकार दिल्याने तिचेच केस आखूड दाखवले होते. त्या वेळी ती बहुतेक सत्यम शिवम करत असल्याने केस कापणे शक्य नव्हते. मग लांब केस घट्ट बांधून त्यावर घट्ट बसेल असा विग बनवला गेला.
आवरतो.
बरंच मटेरिअल आहे.
<<<८३" हा रणवीरचा एकदम
<<<८३" हा रणवीरचा एकदम अंडररेटेड रोल आहे. तो पिक्चर पाहताना तो कधीही रणवीर वाटला नाही. कपिलच वाटला. >> सहमत. रणवीर फक्त याच चित्रपटात आवडला. बाजीराव टपोरी उभा केलाय त्याने.>>>
एकदम सहमत
Pages