चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आज वीकांत,. द वर्ल्ड इज नॉट इनफ जेम्स बॉड पट रेंट करुन लावला आहे. प्राइम वर माझे सर्व आवडते पिक्चर रेंट वर नेलेत्. टायटल साँग वर बॅले डान्स केला. मोठ्ठा टीव्ही व ड्रॉइन्ग रूम मध्ये डार्क पडदे लावुन बसले की एकदम मुव्ही हॉल माहोल बनतो. ब्रिटिश ब्रेक फास्ट बनवला. एग्ज पटेटो ऑरेंज ज्युस ब्रेड. आता पिक्चर चालू ठेवुन गेम खेळणार. मेंदू एकदम नटेला मध्ये बुडवल्या वाणी वाट्ते आहे. आय लव्ह द मुव्हीज.

बार्बी बिकेम हायेस्ट ग्रॉसिन्ग मुव्हीज ऑफ ऑल टाइम !!! गर्ल पावर झिंदाबाद.

Operation Mincemeat पहिला
त्या बद्दल इतकं वाचलं होतं, म्हणजे ऑपरेशन बद्दल त्यामुळे खूप उत्सुकता होती की कसं दाखवणार ते
सपशेल निराशा, इतका रद्दी सिनेमा
मुळात ते ऑपरेशन राहील बाजूला, यांचे साईड ट्रॅक, लव्ह स्टोरी म्हणलं तर लव्ह ट्रँगल म्हणलं तर नाही, रशियन हेर असल्याचा संशय
भाई अखिर स्टोरी कब दिखावगे असं झालेलं
चित्रपटाचा जेमतेम 20मिनिटे भाग बघण्यासारखा आहे, तोही तुकड्या तुकड्यात शोधून
न झेपणारे विषय घेऊन उंटाचा मुका घ्यायचा प्रयत्न करणाऱ्यात फॉरेन वालेही कमी नाहीत
#वेळ असेल तरी बघू नका

बार्बी बिकेम हायेस्ट ग्रॉसिन्ग मुव्हीज ऑफ ऑल टाइम !!! गर्ल पावर झिंदाबाद.
>>> टाईम ट्रॅव्हल केला कि काय... आज 26 ऑग 2023 - अजूनतरी असे झालेले नाही...

सहा महीने समुद्रावर इंग्रजी / हिंदी सिनेमे पाहिले होते. त्यातल्या काहींची नावे अजिबात आठवत नाहीत.
दोन आपत्तीपट होते ज्यात पृथ्वी पाण्यात बुडते. एकात न्यूयॉर्क शहरात पाणी घुसते. लोक वरच्या मजल्यावर जाऊ लागतात. यात मानवी स्वभावाचं चित्रण आवडलं होतं. आता तसले आपत्तीपट आवडत नाहीत.

दुसर्‍याचं नाव काल आठवलं. वॉटरवर्ल्ड.
यात ग्लेशिअर / अंटार्क्टिका मधले बर्फ पूर्ण वितःळल्याने पूर्ण पृथ्वी बुडते. काही लोक तरंगती गावे वसवतात. पण अन्नधान्य मिळत नसते. त्यामुळं कुंड्यातून जीवनावश्यक रोपं लावलेली असतात. मातीचा भाव सोन्यापेक्षा महाग असतो. एक खलाशी आपली विचित्र बोट घेऊन समुद्रात भटकत असतो. त्याच्यावर चाचे हल्ला करतात. पण तो त्यांनाच मारून त्यांच्या बोटीवरचे अन्न ताब्यात घेतो. त्याला एक तरंगते गाव दिसते. तिथे एक बाटली मातीच्या बदल्यात अन्न आणि राहण्याची परवानगी मिळते.

वेगळा वाटला होता. पण अशा कथेत मधेच म्युटंट घुसडल्याने फँटसीचा अनावश्यक अँगल खटकला. एरव्ही ज्यांना वेगळं काही पहायला आवडतं, त्यांनी शोधून घ्यायला हरकत नाही.
( हे सिनेमे व्हिडीओ कॅसेट्स लायब्ररीतून पाहिलेले असल्याने ओटीटी ची लिंक सांगता येणार नाही).

स्पेस मधून येणारे किडा मुंगी (चित्र विचित्र जीव ) हे तर किमान पाचशे सहाशे मूव्हीज पाहिले. हॉलिवूड मधे सुद्धा एखादा सिनेमा हिट झाला कि त्याच्यासारखे बी / सी ग्रेडचे शेकड्याने सिनेमे निघतात.

जहाजावरच्या तमिळ लोकांनी लायब्ररीचा ताबा घेतल्यावर फक्त तमिळ सिनेमे चालायला लागले. त्यातल्या एकाने बाबा हा मूव्ही शंभरपेक्षा जास्त वेळा पाहिला होता. संपला कि पुन्हा रिवाईंड करून लावायचा. त्यात रजनीकांतला खांबाला बांधून दांडक्याने मारतात तेव्हां हा प्रत्येक वेळी रडायचा. रजनी मात्र हसत असायचा. तेव्हापासून साऊथ म्हटलं कि डोकं बधीर होतं. Lol

Craps I heard on npr podcast about Barbie.
Raghu first movie is the day after. Waterworld is my favourite. The hero was quite promising at that time.

अमा, धन्यवाद तुमच्यामुळे एक कोडं सुटलं.

द डे आफ्टर टुमारो २००४ चा मूवी आहे. त्या आधी शाळेत असताना टीचरने तिसर्‍या महायुद्धात न्युक्लीअर अ‍ॅटॅकने जग नष्ट होतं, पण शेवटी एका लहान बाळाच्या रडण्याच्या (प्रसूती) आवाजाने सिनेमा संपतो अशी स्टोरी सांगितली होती. २००४ ला तर शाळा कॉलेज सगळं संपवून काही काळ गेला होता. त्या टीचरने भविष्य पाहिलं का हा प्रश्न पडला होता.

त्या मूव्हीचं नाव डे आफ्टर. टीव्ही साठी बनवलेला. तुम्ही हे नाव सांगितल्याने फरक लक्षात आला.

“I heard on npr podcast about Barbie.” - नॉर्थ अमेरिकेतला हाय्येस्ट ग्रॉसिंग मूव्ही ठरलाय ($५७४.४ मिलियन) हे बरोबर आहे.

अमा , फेरफटका- ओव्हर ऑल 20 नंबर आहे...
असे विषयाला धरून चर्चा असेल कि मजा येते..

The Adam project बघितला नेटफ्लिक्सवर..
मस्त आहे.. आवडला..

झी 5 वर मनोज वाजपेयी चा "सिर्फ एक बंदा काफी है "पाहिला .
स्टोरी केस सगळ्यांना माहीत आहे. वाजपेयी ने सुरुवातीला दबकत केस लढणारा मध्यमवर्गीय वकील छान उभा केला आहे पण कोर्टड्रामा त्यामुळे सुरुवातीला बोर होतं पण कदाचित हाय प्रोफाइल केस असल्यामुळे तसं केरेक्टर असेलही.बघायचा असल्यास शेवटच्या दहा मिनिटांचा मोनोलॉग (रावण वाल्या सीन) साठी बघा. तो सीन म्हणजे वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स आहे वाजपेयीचा .महापाप चं पुराणकाळातलं डेफिनेशन.

फोर्स २ पाहिला आताच
जॉन सोनाक्षी
चांगला आहे. बोर नाही केले जराही.
व्हीलन मजेशीर होता.

The Big Short - Netflix

पुन्हा पाहिला पूर्वी रिलीज झाला होता तेव्हा थिएटर मधे पाहिला होता. अगदी क्लिष्ट विषय असला तरी पूर्ण खिळवून ठेवणारा पिक्चर आहे. २००८ च्या अमेरिकेतील होम लोन्स, त्यावरचे बॉण्ड्स व त्यावरचे आणखी complicated financial instruments वापरून लोकांनी कसा मोठा बबल निर्माण केला आणि शेवटी त्यातून मार्केट आणि अमेरिकनच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्था कशी कोसळली त्याचे चित्रण आहे. बरेच तगडे कलाकार आहेत.

याच विषयावर लेहमन ब्रदर्स या तेव्हा बंद पडलेल्या कंपनीबद्दल (वाटणारा) मार्जिन कॉल नावाचा चित्रपटही जबरदस्त आहे.

The big short- I could not found on Netflix. But I watched The inside Job with same story line. The big short is on Prime in India

सत्यप्रेम कि कथा काल थोडा वेळ पाहिला. लव्ह स्टोरी बघून होत नाही. वीकडेज मधे तर कुठलाच सिनेमा बघून होत नाही.
याच्याबद्दल सर्वत्र पॉजिटिव्ह रिव्ह्यूज आहेत. एका नाटककाराने रिकमेण्ड केला होता.
गुजराथी मध्यमवर्गीय (!) वातावरण, गल्ल्या मस्त वाटलं बघायला. गुजरातेत पण मिडल क्लास असतो आणि सिनेमात दाखवतात हे विशेष !
कियारा अडवाणीला आजवर फोटोत पाहिलेली फक्त.
एक इंडीपॉप गाणं होतं. चहाची किटली सुरूवातीला दाखवलीय. त्यातली हिरॉईन आणि कियारा सेम दिसतात.
तिची हरवलेली खरी आई असू शकते.

वरच्या पैकी कुठला तरी एक बघितलेला आहे. नवी पोरं लेब्र ला जॉईन होतात आणि त्यातल्या एकाला गफला दिसतो. त्याच्यावर कसा कोणीच आधी विश्वास ठेवत नाही इ. तो यातलाच आहे का? असला तर कुठला?

सत्यवान सो सो आहे. आजकाल च्या मुलं/मुली (ती ही गुज्जू) इतक्या सोवळ्या असतात का हाही प्रश्न आहेच. काही असतातही..(मी गुज्जू कॉलेजात होते, मुलं मुली कशा असतात ते पाहिलेय म्हणुन ओव्हरॉल लिहिले.. आक्षेपार्ह्य असेल तर काढून टाकीन.
कियारा ला फारशी अ‍ॅक्टींग येत नाही. कबिर सिंघ मधली ठोकळा इमेज च इमानाने करत असते.
लस्ट स्टोरी मधे बरी होती.

आजकाल च्या मुलं/मुली (ती ही गुज्जू) इतक्या सोवळ्या असतात का हाही प्रश्न आहेच. काही असतातही..(मी गुज्जू कॉलेजात होते, मुलं मुली कशा असतात ते पाहिलेय म्हणुन ओव्हरॉल लिहिले.. आक्षेपार्ह्य असेल तर काढून टाकीन >> छे हो आक्षेपार्ह काही नाही.फक्त गुज्जुच नाही तर हे जनरली सगळ्यांनाच लागु आहे. Happy

छे हो आक्षेपार्ह काही नाही.फक्त गुज्जुच नाही तर हे जनरली सगळ्यांनाच लागु आहे.
आजकाल च्या मुलं/मुली (ती ही गुज्जू) इतक्या सोवळ्या असतात का हाही प्रश्न आहेच. >>>
असं लिहिण्याचा हक्क प्राप्त झालेले कमालीचे सोवळ्या आहेत/ होते असं अस्सुमे करतो

'बंदिवान मी ह्या संसारी' बघितल्यानंतर जो काही अल्गोरिदम प्राईमवर तयार झाला आहे, त्याचा सर्वनाश करण्यासाठी Red, white and Royal blue बघितला.

गे-बाय असलेल्या दोन तरुण मुलांचा अगदी फेअरी टेल रोमॅन्स आहे. जो प्रथमच इतका सुंदररित्या चित्रीत करण्यात आला आहे. अमेरिकन लेडी प्रेसिडेंटचा मिश्रवर्णी मुलगा ॲलेक्स (Taylor Zakhar Perez) आणि ब्रिटिश ड्यूक प्रिंस हेन्री (Nicholas Galitzine) एकमेकांच्या प्रेमात पडतात व काय काय घडू शकते व काय घडू शकण्यास विघ्न येऊ शकतात याची कथा.

ट्रान्स वुमन बॉडी गार्ड, स्त्री प्रेसिडेंट(उमा थर्मन), मोनार्कीचा दबाव, अमेरिकन इलेक्शनचं प्रेशर, वेगळ्या रंगाची जवळची मैत्रीण, देशी रॉयल असिस्टंट हे सगळं एकत्र करून कथेला जास्तीत जास्त नॉर्मल केले आहे. लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक लोकांच्या आयुष्यात सेक्शुअल ओरिएंटेशन सोडलं तर ती इच्छा,आकांक्षा, स्वप्न, भावनिक जवळीक अशा सर्व बाबतीत ती अगदी इतरांसारखीच असतात हे नॅरेटिव्ह अगदी खरं असल्याने , शिवाय इतक्या प्रसन्न शैलीत मांडलेलं असल्याने खूप आवडलं. हे नॅरेटिव्ह वारंवार आलं तरच स्वीकार वाढून हे नॉर्मलाईज होणार. तेवढं वगळलं तर ख्रिसमसच्या आसपास येणाऱ्या कुठल्याही प्रिन्सेस मुव्ही सारखा आहे.

मागच्या आठवड्यात इंग्रजी सिनेमे
१.रेड नोटिस- टैमपास सिनेमा
२. द adam प्रोजेक्ट - टाईम ट्रैवल, आवडला,
३. किलर्स बुक क्लब,- भयंकर रक्तपात, कापाकापी.. नका बघू.
४.Escape plan- ऐक्शन थ्रीलर, चांगला आहे.
बघितले नेटफ्लिक्सवर.

लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक लोकांच्या आयुष्यात सेक्शुअल ओरिएंटेशन सोडलं तर ती इच्छा,आकांक्षा, स्वप्न, भावनिक जवळीक अशा सर्व बाबतीत ती अगदी इतरांसारखीच असतात हे नॅरेटिव्ह फार आवडलं. >> आणि हे सत्यच आहे.

Pages