Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34
हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्यांसाठी आहे शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल
आपल्याला आवडणार्या, माहिती असणार्या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही एक शेपूची भाजी मला आवडती -
ही एक शेपूची भाजी मला आवडती - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/09/blog-post_18.html
मिनोती, वेगळीच आहे ग ही
मिनोती,
वेगळीच आहे ग ही रेसिपी, तेल पण नाही !
छान लागेल भाकरी बरोबर :).
सही ब्लॉग आहे तुझा, रेसिपिज आणि फोटोज पण झक्कास !!
हे चिप्स आणुन बघितले पहिजेत.
हे चिप्स आणुन बघितले पहिजेत. अजय, तुम्ही शेपू आवडते की नाही ते लिहिलेच नाहीत
वा! कसला भारी थ्रेड! "शेपूची
वा! कसला भारी थ्रेड!
"शेपूची भाजी-----" य्ये.
भाजीवाला/ली येते दारावर आमच्या कोल्हापुर्च्या घरी... मस्त शेपु....
इथे "शेपु" नाही मिळत राव....
लय भुक लागली...
>>>इथे "शेपु" नाही मिळत
>>>इथे "शेपु" नाही मिळत राव....
एका कुंडीत बाळंतशोपा पेरा.
(Dill seeds मिळतात का बघा अमेरिकन दुकानात.)
"बाळन्त शेपु पेरु" म्हणता
"बाळन्त शेपु पेरु" म्हणता का?
चालेल!
पण तेवढे अमेरिकेला जायचे तिकिट देता का हो?
कारण मी जपान मधे राहतो.
बाय द वे.. कुन्डी मिळते इथे
(पिन्च ओफ सौल्ट
)
आमच्या इथे शेपूच्या भाजीला
आमच्या इथे शेपूच्या भाजीला भला मोठ्ठा त्याचा कांदा बरोबर येतो. त्याच काय करता येईल? तो भाजीत चालतो का? का उग्र लागेल?
आर्च माझ्यामते तो शेपू नसून
आर्च माझ्यामते तो शेपू नसून फेनेल ची भाजी असते ( म्हणजे बडिशेप का ? ) तो कांदा मस्त गोडसर असतो. सॅलडमध्ये वगैरे छान लागतो. त्याच्या पानांना फ्रॉन्ड असं म्हणतात. खाली फेनेल चा फोटो देत आहे.
http://www.seedfest.co.uk/seeds/herbs/fennel.jpg
हो ग हो. पण मी त्याची
हो ग हो. पण मी त्याची शेपूसारखीच भाजी करते. आता तो कांदा ठेवून बघते आवडतो का सॅलडमध्ये. पण इथे ग्रोसरी स्टोअरमध्ये त्याला डिल लिहिल होत. फेनेल नाही. आमच्या इथे चायनीज स्टोअरमधेपण तसच. बरं झालं सांगितलस ते. नाहितर जीवावर येतं तो कांदा टाकायला.
माझा नवरा शेपू हे नावच कसतरी आहे म्हणून शेपूची भाजी खात नाही. त्यामुळे अगदी क्वचीत केली जाते. माझी बहीण वगैरे आली की. आता इथे वाचल्यामुळे आणली गेली एकटीपुरती.
>> माझा नवरा शेपू हे नावच
>> माझा नवरा शेपू हे नावच कसतरी आहे म्हणून शेपूची भाजी खात नाही.
नवर्याला, शेपूच्या भाजीला 'सोवा' किंवा 'सुवा' म्हणतात हे सांगून बघ.
माझा नवरा शेपू हे नावच कसतरी
माझा नवरा शेपू हे नावच कसतरी आहे म्हणून शेपूची भाजी खात नाही>>>
आर्च तुझ्या नवर्याला माझा प्रेमाचा रामराम सांग. लवकरच शेपू हटाव क्लबचे मेम्बरशिप फॉर्म पाठवीत आहे त्याच्या साठी.
"डाऊन विथ शेपू"
आर्च, तो फनेल म्हणजे
आर्च, तो फनेल म्हणजे बडिशेपेचा कांदा. त्याचा उपयोग कान्द्यासारखा करता येतो. पण तो जास्त गोड लागतो.
हूडा, शेपूचा महिमा काय सांगु
हूडा, शेपूचा महिमा काय सांगु तुम्हाला. 'हम पे ये किसने...' हे गाणं लिहायच्या आधी गीतकाराने शेपूची भाजी खाल्ली होती असे ऐकिवात आहे
शेपूचे पराठे कसे लागतिल हे
शेपूचे पराठे कसे लागतिल हे शेपू प्रेमी सांगु शकतिल का?
उरलेल्या भाताचे (साधा पांढरा
उरलेल्या भाताचे (साधा पांढरा भात) त्यात क्शेपुची भाजी चिरुन टाकली की मस्त लागते.
माझा एक मित्र लेमन राईसमधे (त्याच्या भाषेत लेमन बाथ) कोथिंबिरीच्या ऐवजी शेपू घालतो ते पण मस्त लागते.
DJ धन्यवाद!
अमृता, पराठे माहित नाही पण
अमृता,
पराठे माहित नाही पण पुर्या मस्तं लागतील.:)
पराठे पण कदाचीत छान लागतील.
पराठे पण कदाचीत छान लागतील. पण नाहि केले, शेवटी नीच्या पद्धतीने भाजी केली. मस्त झाली. जुईने पण आवडीने खाल्ली. ती तर मी शेपू चिरत असताना कच्चापण खात होती. तशी ती बर्याच भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या कच्या खाते अगदी तोंडली आणि भेंडी पण.
परवा मशरुम मागत होती कच्चा खायला, तो मात्र नाही दिला मी.
का ग? कच्चा मश्रूम चांगला
का ग? कच्चा मश्रूम चांगला लागतो. सॅलडमध्ये असतो न. माझी मुलगी कच्चा मश्रूम नेहेमी खाते. आम्हीपण
अरे... मला वाटलेल खात नाहित
अरे... मला वाटलेल खात नाहित कच्चा मश्रुम... देइन आता पुढच्या वेळेस
खुष होइल ती. 
अमृता. शेपुचे पराठे सुंदर
अमृता. शेपुचे पराठे सुंदर लागतात. नवरे मंडळींना डोळे झाकुन खायला घालावेत. त्यांना कळत सुद्धा नाही. शेपु आधी थोड्याश्या तेलावर परतून घेऊन, किंवा कच्चा शेपु बारिक चिरून कणकेत भिजवूनही करता येतात.
धन्यवाद रैना.. पुढच्या वेळी
धन्यवाद रैना.. पुढच्या वेळी डोळे मिटुन करेन आता.. गम्मत म्हणजे नवराच मगाशी म्हणत होता पराठे कर म्हणुन.
अमृता. शेपुचे पराठे सुंदर
अमृता. शेपुचे पराठे सुंदर लागतात. नवरे मंडळींना डोळे झाकुन खायला घालावेत. त्यांना कळत सुद्धा नाही
>>
पूर्वीच्या काळी राजघराण्यात विषप्रयोग असाच करीत असावेत....
RB, तुम्ही कधी बायकोला
RB, तुम्ही कधी बायकोला विचारलं आहेत का हो तिला शेपू आवडतो का म्हणून? आणि आवडत असेल तर तिच्यासाठी कधी आणून दिला आहेत का?
हो हो, वॅलेंटाइन डे जवळ
हो हो, वॅलेंटाइन डे जवळ आलाच्चे. एक शेपूची जुडीच आणा सौं.साठी
अहो, तिकडे तर फार आवडतं
अहो, तिकडे तर फार आवडतं प्रकरन आहे शेपू म्हणजे! म्हणून तर इथे येऊन मी माझा शेपूद्वेष प्रकट करतोय...
मग तर यंदा न्याच शेपूची
मग तर यंदा न्याच शेपूची जुडी...
अहो, तिकडे तर फार आवडतं
अहो, तिकडे तर फार आवडतं प्रकरन आहे शेपू म्हणजे! म्हणून तर इथे येऊन मी माझा शेपूद्वेष प्रकट करतोय...
>>
हे 'तिकडे' कळवा...
शिक्षा म्हणून सलग महिनाभर शेपू खायला लागेल...
तिकडे आवडते म्हणुन आम्हा
तिकडे आवडते म्हणुन आम्हा सर्वाना का त्रास देताय हो?
आईशपथ! शेपू येवढा फेमस असेल
आईशपथ! शेपू येवढा फेमस असेल असं वाटलं नव्हतं. (माझ्या नवर्याला चक्कर येईल
मला अजाबात आवडायचा नाही शेपू.
पण माझ्या मामीनं मला मुगाची डाळ हिरवी मिर्ची घालून केलेला शेपू खायला घातला.. तो मस्त होता!
सह्ह्ही!!! सिंडे जबरी काम
सह्ह्ही!!! सिंडे जबरी काम केलंस हे!!
३ आठवडे माबो पासून दूर होते त्यामुळे हे प्रकरण पहायचं राहिलं होतं. मी पण शेपू पंखी आणि एवढ्या शेपूपंख्यांना पाहून भरुन आलं!
आता इथल्या सगळ्या रेसिप्या एकत्र करून प्रिंटआउट काढून नेते घरी!
Pages