भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच क्यूट! आपण एक सिरियस स्केअरी डॉग असणे अपेक्षित आहे हे बिचार्‍या सिंबाला माहितच नसल्यामुळे तो स्वीट आणि गूफीच दिसतो नेहमी Happy

आपण एक सिरियस स्केअरी डॉग असणे अपेक्षित आहे हे बिचार्‍या सिंबाला माहितच नसल्यामुळे ---> हे रूप फक्त घरच्यांसाठी बरं का. कोणी नवखा जवळ आला तर मग मात्र आम्ही लगेच रौद्रावतार धारण करतो विशेषतः तो माझ्या मुलींबाबत खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. आम्ही कोणी तिला जोरात ओरडून रागावले तरी याला आवडत नाही लगेच भुंकाभुंक सुरु होते.

आमच्या बावळ्याला वाटते तो जेवतो म्हणजे आमचेच काहीतरी काम करतो >>> Lol

ऑश्कु एकदम सॉफ्ट टॉयसारखा दिसतोय Happy

सिंबाचा दंगा मस्तच.

ओड्याचे दोन किस्से

टिनेज टँट्रम - परवा रात्री चांगलाच गडगडाट होऊन पाऊस पडला. मला आवाजाने जाग आली. आणि बेडरूमच्या दारावर नखाने घासल्याचा आवाज. दार उघडले तर चिरंजीव. आवाजाने घाबरगुंडी उडाली होती. आला तो काही न बोलता बेडखाली घुसला. मी "बबी, घाबरलीस का, मी माया करू का?" असं म्हणून जवळ ओढायला गेलो तर माझ्यावरच गुरुगुरला. म्हणलं हे रे काय नवीन?
म्हमजे त्याला भिती तर वाटत होती पण ते मान्य करायचं नव्हतं बहुदा, आता आपण मोठे झालोय असं कुठतरी वाटत असेल का.

गरीबडा - पण तसा तो खूप गरीबडा आहे. इन्स्टावर मी बाकी भुभ्यांचे व्हिडीओ बघून तशी गंमत त्याच्यासोबत करत असतो. आज त्याला चांगलच पळवून आणलं होतं आणि खायची वेळ झाल्यावर मी एरवी त्याला पाऊण वाटी भरून डॉग फुड देतो. म्हणलं आज मज्जा करू आणि भांडं कुठं आहे, फुड कुठं आहे सगळं बरोबर दाखवल्यावर वाटी भरून फुड घेतलं पण त्याच्या बाऊल मध्ये मोजून दोन दाणे टाकले. आधी त्याने वाटीकडे, मग बाऊलकडे पाहिलं, मला वाटलं भुंकेल, भांडेल दे अजून म्हणून, ते सोन साखळी वालं भुभु करतं तसं. पण आमच्या बाळाने तसं काहीही केलं नाही, ते दोन दाणेच खाल्ले आणि ओके आज एवढंच असेल तर ठिके. मी करीन एखाद दिवशी एजस्ट करत बसून राहीला.
मलाच इतकी दया आली ना त्याचे असे ते टप्पोरे डोळे आणि त्यातले करूण भाव बघून.

अरेरे बिचारा.
अंजली, तुमच्या मंकीबद्दल वाचून वाईट वाटलं.

ऑश्कु एकदम सॉफ्ट टॉयसारखा दिसतोय +१गोड आहे अगदी. मी लेकीला हा फोटो दाखवला awwe झाले तिचेही. Happy तिला इथले सगळं भुभू बघायचे असतात.
ओडीन , गरीब आहे अगदी.
हरितात्या, हा असाच दंगा चालतो आमच्याघरीही. मस्त फोटो. जेंटल जायंट आहे सिम्बा.

हो सायो पेरू आता बरेच बरे आहोत. सॅमी कडे विशेष लक्ष देणं चालू आहे. ती खात नव्हती १-२ दिवस नीट पण आता ठीके ती पण.

ऑश्कू - खूप पाप्या गोंडसला.
ओडीन - हा हा टीनेज टँट्रमस!
आणि तो साखळीवाला भूभू डांबीसच वाटतो. आपला ओडू खरंच मुळात चांगला आहे, लबाड नाही.

WhatsApp Image 2023-03-10 at 12.20.23 PM.jpeg

अंजली_१२ तुम्हाला खरे वाटणार नाही. पण त्या आठव्ड्यातल्या शुक्रवारी मी जी पहाटे उठते साडेपाचला तेव्हा एकदम मंकी आणि सॅमी ची अगदी मनापासून आठवण आली. तिकडे दोन माउ आहेत किती गोड ना अशी. मग नंतर पुढे बातमी वाचली. मंकीचा आत्मा नक्की मला टच करुन पुढे गेला. लिहू की नाही अश्या विचारात होते पण मग मी पण दोन दिवस दु:खात घालवले. काही व्यक्त होता येइना. आमच्या बिल्डिन्ग मधील माउ भूभू काव्ळे माझी फॅमिली आहे. त्यामुळे त्यांना छोटा बाउ झाला ठ्वरी मी धावत पळत औषध घेउन जात असते. पुर्वी डब्यात कोरडी हळद नेत असे. आज तेल हळद मिक्स बनवून घेतले आहे.

कामाची धावपळ व तब्येत दोन्हीत कुत्र्यांची औषधे आणायला जमतच नाही आहे पण एक चक्कर मारून आणायला हवीत. सध्या बरोबर तेल
हळ द ट्रीट्स, एक बाटली पाणी व पिशवीत पे डिग्री बिस्किटे घेउन फिरते. सोसाय टीच्या बाहेर कायते खायला घालते.

शेजारी माउज ना कधी खायला घालतात कधी नाही तेव्हा ते एकदम बाहेर येउन बसतात त्यांनाही खाउ ठेवते. कॅट फूड परवडत नाही.

माय प्रेयर्स आर विथ यु.

बाकी बाफ वरील सर्व बेबीज ना उत्तम आयुरारोग्य लाभो.

अमा.. सो स्वीट! अगदी तुम्ही म्हणताय तीच वेळ होती तेव्हा भारतात बरोबर! काय हा योगायोग. यु आर ब्लेस्ड!
खूप खूप धन्यवाद!

१९९९ साली, मह्या बुड्यानं मले शेतीगितीत लक्ष टाक्याले सांगतलं, त्या वक्ती मह्या वावरात बंबाट हरबरा होता, त बुडा म्हणे बाबू रातीचा झोप्याले जाजो, म्या म्हणो बरं बा.

त्या वक्ती, आम्ही एक देशी कुत्र्याचे पिलू पोशेल होते. ब्रीड का का जी म्हणते लोकं ते का आपल्याले मालूम नोय. मी बाज लावून झोपलो का बाजी पाशी पडून राय गडी .

एक डाव रातीचा म्या मस्त झोपेल होतो, साधारण १२-१२३० ले मला उलसक प्रेशर आल्यानं जरासा हलका व्हाले मी उठलो, खाली उतरो तर कुत्रं सायचं उतरू नाही दे.

जिकुन उतरा वसवस् करत अंगावर ये लेकाचं, ह्याले म्हणलं का झालं बाप्पा, कुत्रं बुझाडलं लेक म्हणो मी, घंटा एक भर त्यानं मले झुलोलं.

त्यानंतर त्यानं एक बाजू सोडली मी तिकून उतरून हलका होऊन वापस झोपलो, सकाळ सकाळ उठून पायतो तर ज्या बाजूनं उतरलो त्याच्या वायल्या अंगाले एक चांगला ८-९ फुटाचा अजगर बसून होता राजेहो.

आमच्या कुत्र्याने महा जीव वाचोला का नाही मले काई मालूम नाई ते अजगर मले काय करू शकत होते ते बी मले गमत नाई पर त्या कुत्र्याने बेज्या प्रयत्न केलते महा जीव वाचवाचे इतके खरे

ओड्याचा किस्सा
काल नेहमीप्रमाणे पान आणायला गेलो होतो तेव्हा ओड्या सोबत होताच. तिथं एक अजून एक जण फिमेल लॅब आलेली. मी लगेच बोलणी सुरू केली
मला कधी कधी वाटतं वरपित्याच्या भूमिकेत जातो
चांगलं स्थळ दिसलं की मग काय आहे का योग वगैरे Happy
आणि जसं सांगतात आमचा मुलगा चांगला शिकलेला आहे, मोठ्या कँपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे तसा मी आमच्या मुलाची चॅम्पियन लाईन आहे, केसीआय पेपर्स आहेत, व्हकासिनेशन रेकॉर्ड आहे असे सगळं सांगतो Happy

तर ती लॅब होती बरोबर याचाच वयाची, 3 वर्षांची
तेही इंटरेस्ट घेऊन बोलू लागले,पण इथं नवरा मुलगा कुठं धीर धरायला तयार, ते तुमची बोलणी करत बसा तोवर आम्हला जरा मोकळं सोडा करत चिरंजीव चाललेच जोशात
त्याला मागे ओढून, लिश खेचून अक्षरशः हात दुखायला लागले तेव्हा त्यांना म्हणलं हा माझा नंबर, असेल इंटरेस्ट तर फोन करा म्हणत कसं तरी गाडीवर घातलं आणि घेऊन आलो Happy

तेही इंटरेस्ट घेऊन बोलू लागले,पण इथं नवरा मुलगा कुठं धीर धरायला तयार, ते तुमची बोलणी करत बसा तोवर आम्हला जरा मोकळं सोडा करत चिरंजीव चाललेच जोशात >>
ओड्या बी लाईक.....
आता उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधल, तुझ्या नावच मी इनिशिअल टॅटू न गोंदल
हात भरून आलोया
लई दुरून आलोया
अन करून दाढी भारी पर्फुम मारून आलोया
आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया

समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई, कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई
आता तर्राट झालुया
तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधा वरून आलोया कल्टी मारून आलुया
आगं धीन्च्याक जोरात टेक्नो वरात दारात आलूया

स्मिता श्रीपाद ----> Lol Lol Lol

मी ओड्या आणि आशुचँप यांना नाचताना इमॅजिन केलं Lol Lol Lol Lol Lol Lol

मी ओड्या आणि आशुचँप यांना नाचताना इमॅजिन केलं >> सेम! Lol

अरे काय हे Happy Happy

अरे वा.वर पिता ऐटीत एकदम.लॅबकन्येला मंगळ आहे का विचारलं नाही ना>>>
कसली ऐट आणि काय
लॅब कन्यांची संख्याच इतकी कमी आहे की आमच्या पोराचा कधी नंबर लागेल माहीत नाही, कदाचित लागणार सुद्धा नाही
त्यामुळे जिथं कुठं कळेल तिथं सोयरीक जमवू पाहतोय Happy

त्यामुळे जिथं कुठं कळेल तिथं सोयरीक जमवू पाहतोय -- म्हणजे तुम्ही हुंडा देणार कि घेणार Lol Lol

आता सगळेच लग्नाचे इमॅजिनेशन करताय तर मग सांगा लग्नात जेवणाचा मेनू काय असेल ?

लग्नात जेवणाचा मेनू काय असेल ?

चिकन भात ( व्हेज वाल्याना दही भात) Happy
भाकरीचा काला आणि ताक
पिनट बटर, काकडी, गाजर, उकडलेली अंडी Happy
आणि स्वीट डिश म्हणून व्हॅनिला आईस्क्रीम

पोरगा आज म्हणत होता म्हणे ओडिनला आपली भाषा बोलता अली असती तर कसलं भारी झालं असतं
म्हणलं माझे हाल झाले असते, दिवसातून बक बक करून डोकं उठवलं असतं Happy
आज काय चिकन शिजलं नव्हतं नीट
दही जरा आंबट होतं
ताकात पाणी घालून वाढवलं ते कळलं मला
एकाच ट्रीट चे दोन तुकडे करून देतोस ते नाही चालणार

आणि त्याहून वैताग म्हणजे बाबा माझा बॉल गेलाय कॉट खाली
बाबा मला शु आलीये, खूप घाईची Happy

ही वाक्ये दिवसभर ऐकत राहावी लागली असती Happy

Pages