भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ते टॉकिंग काक्ट्स घ्यायचं आहे ओडिन साठी
Happy

पण तो दोन दिवसात त्याच्या चिंध्या करेल

त्याच्या टोटो टर्टलची इतकी रया गेली आहे की विचारूच नका
पण तरीही ते घेऊन खेळायचं असतं त्याला

सरकारी दवाखान्यात फुकट मिळते
फॅमिली डॉकटर पैसे घेतात किंवा तुम्हीच घेऊन याम्हणतात लस <<>>> धन्यवाद. लेकाला येता जाता माऊ आणि भुभूंना खाऊ देणे, लाड करणे अशी सवय आहे म्हणून माहिती घेऊन ठेवली.

मागच्या आठवड्यात आमच्या माऊनी ( थिओ ) आमची चांगलीच धावपळ करवली. जिन्यात फिरतांना एका पेपरवाल्याला घाबरुन धुम पळाला तो गायबच झाला. मी होते बरोबर, घाईनी फोन करुन लेकाला बोलावून घेतलं आणि इथल्या कविनला थिओशी बोलायला सांगीतलं. तो बाहेर कुठे गेला नाहीये, घाबरला आहे एवढं कळलं, पण सापडेना. तब्बल एक तास वर खाली करत होतो, हाका मारल्या, खाऊ च्या पिशवीचा आवाज केला. शेवटी मी लिफ्टनी शेवटच्या मजल्यावर गेले आणि तिथून फाय र एक्झिटचा जीना उतरत आले तर आठव्या मजल्याजवळ जिन्यात बसला होता.
हुश्श हुश्श झालं बघून. आम्हालाही आनि त्यालाही.

बेबी सिंबा एकदम सॉफ्ट टॉय वाटतोय - मऊ मऊ फर, निरागस डोळे वगैरे. मोठा सिंबा एकदम अलर्ट, चतुर, राखणदार मोड मधे Happy

fotor_2023-2-23_18_12_3.jpg

कोकोनट खरेच पोस्टर बॉय
खोबरा बर्फी वाटतोय

सिमबा गोंडस बाळ ते हँडसम असा झालाय
फर एवढी बदलते का त्यांची

कोकोनट -- एकदम सुंदर आणि गोंडस फोटो

@@ आशुचँप --- बहुतेक GSD बाळं सुरुवातीला काळीफर असलेलेच असतात, साधारण ३-४ महिन्यात कलर बदलायला सुरुवात होते आणि मग working लाईन, शो लाईन तसेच ब्लॅक अँड टॅन, फुल्ल ब्लॅक, व्हाईट, ब्लॅक अँड रेड या प्रमाणे कलर बदल सुरु होतात। सिम्बा working लाईन मधला आहे

working लाईन, शो लाईन तसेच ब्लॅक अँड टॅन, फुल्ल ब्लॅक, व्हाईट, ब्लॅक अँड रेड या प्रमाणे कलर बदल सुरु होतात।>>> अच्छा हे नव्हतं माहिती
पण त्यांचे टेम्परमेन्ट पण त्या प्रमाणे असतं का?

ओड्याचा कालचा किस्सा
संध्याकाळी एक ताई एक लॅब ला घेऊन चालल्या होत्या, गेटपाशी ओडिन ला बघून थांबल्या. मग ओळख वगैरे झाली त्यांना म्हणलं खेळतात का बघू, आणि मग गेट च्या आत दोघांना मोकळं सोडलं. तो लॅब जॅकी, आकाराने मोठा होता, वयाने पण. त्याने लगेच ओड्यावर डोमीनेशन करायला त्याला हम्पिंग सूरु केलं, आम्ही इंटरफेर करून बाजूला केलं तर परत. दोन तीनदा असे झाल्यावर ओड्याचे डोकं सरकल आणि त्याने अक्षरशः पोटात खड्डा पडेल असा गुरुगराट करत अटॅक केला, पार अगदी लोळवलाच. आम्ही तिथेच लक्ष ठेऊन होतो म्हणून बरं, तातडीने त्याला मागे खेचून सुरक्षित अंतरावर नेलं. तो जॅकी इतका घाबरला होता की ताईंच्या मागेच लपून बसला.
ताई पण सटपटल्या होत्या पण त्यांनी ते लाइतली घेतलं, म्हणे होतं असं कधी कधी, आमच्याकडे खूप वर्षांपासून आहेत भुभे त्यामुळे मला माहितीय असं करतात कधी कधी
मग इकडे तिकडे बोलून त्या गेल्या, नंतर मी ओड्याला जाब विचारला तर म्हणे आपल्या घरात मलाच डोमीनेशन करत होता, मी बरे खपवून घेईन, म्हणलं आणि दुसरीकडे जाऊन बारक्या भुभ्यानवर करतोस ते?
म्हणे ते वेगळं असतं तुला नई कळणार Happy

नंतर मी ओड्याला जाब विचारला तर म्हणे आपल्या घरात मलाच डोमीनेशन करत होता, मी बरे खपवून घे.........2 सेकंद मला खरेच वाटले. Lol

हायला! ओड्याच्या बाबतीत झालेला किस्सा सेम आज हॅरीच्या बाबतीत झाला
हॅरीला आज डॉग पार्क मध्ये घेऊन गेलेलो. तिथं एक मुलगी पिटबुलला घेऊन आलेली.तो पिटबुल हॅरीवर हम्पिंग करायच्या प्रयत्नात होता
हरिभाऊ खेळाच्या मूडमध्ये होते म्हणून आधी काय केलं नाही. पण तो पिटबुल ऐकनाच
मग हॅरी चिडला आणि जोरात भुकुन पिटबुलला दमात घेतल. आम्ही पण आश्चर्य चकित
एवढ्या मोठ्या आवाजात भुंकलेल पहिल्यांदा ऐकल
शेवटी त्या पितबुलला बाजूला केलं मग हॅरी नॉर्मल लेव्हलला आला

एवढ्या मोठ्या आवाजात भुंकलेल पहिल्यांदा ऐकल>>>>
खरंय, त्यांना इतकं चिडलेला, आवाज मोठा आपण कधी पाहिलेलंच नसतं
आमचे तर पार शेजारी पण विचारत आले काय झालं म्हणून

आज त्या ताई परत त्यांच्या लॅबला फिरवून आणाताना दिसल्या. ओड्या आणि मी गेटपाशीच होतो, फिरायला निघालो होतो. ओड्याला बघताच तो एकदम डिफेन्सिव मोड मध्ये गेला. त्या ताई मग काहीशा तक्रार करु लागल्या, म्हणे तो खूपच घाबरलाय, पॅनिक झाला वगैरे.

मी आपलं तोंडदेखलं हो ना, समजू शकतो वगैरे म्हणून विषय टाळला. आता खरेच ओड्याची काही चुकी नव्हती, तो खोडी काढू लागला म्हणून याने उलटून वार केला. आणि त्याला अजिबात रिग्रेट्स नव्हते. त्यामुळे मी उगाच ओड्या कसा अॅग्रेसिव्ह आहे वगैरे ऐकून घेणारच नव्हतो, तरी त्या सांगायला लागल्या म्हणे त्याला नॉनव्हेज कमी द्या वगैरे, नाहीतर असाच अग्रेसिव्ह होईल वगैरे.

मनात म्हणलं तीन वर्षाचा आहे तो, आजवर कधीच कुणावर असा हल्ला केला नाहीये, एक ते भटक्या कुत्र्यांचा अपवाद वगळता, तिथेही त्या दोघांनी आधी हल्ला केला होता, याने रिएक्शन दिलेली. त्यामुळे हो हो म्हणत मी चक्क निघूनच गेलो तिथून.

बरे केले. ओडिन आणि त्यांचा कुत्रा दोघीही त्यांच्या स्वभावधर्मानुसार वागले . फूड चे काय त्यात. नॉन व्हेज कमी द्या हे कायच्या काय लॉजिक आहे.

हो ना, ओडिन तर सकाळ संध्याकाळ चिकन हाणतो
तो तर आतापर्यंत इतका अग्रेसिव्ह व्हायला हवा होता
पण आमचं येड्या कुणी दिसलं की तोंड पघळत, शेपटी हलवत समोर जातो Happy

इंडियन लोक नाही तिथे फुकटचे सल्ले (ज्ञान नसताना) देण्यात पुढे असतात !
ओड्या कुत्रा आहे, शेळी नाही.. नॉन व्हेज नाही तर काय खाणार ?
ऑष्कुलाही अजिबात व्हेज मिक्स केलेले आवडत नाही , भोपळ्याची पेस्ट /दही अधेमधे खातो .
राइस विथ चिकन असेल तर राइस ग्राउंड मिट मधे मिक्स केलेला असेल तरच खातो.

इंडियन लोक नाही तिथे फुकटचे सल्ले (ज्ञान नसताना) देण्यात पुढे असतात ! > सगळ्याच ठिकाणची लोक असे करतात इंडियन्स कुठेतरी अग्रेसर असू द्या .

कालची मज्जा

काल रात्री मला ओड्याला बाहेर फिरवून आणताना लक्षात आलं की त्याचा लीश सापडत नाहीये. बराच वेळ शोधला तेव्हा आठवलं बहुदा आपण संध्याकाळी फिरायला गेलो तेव्हा तिकडेच राहीला. कारण मी ओड्या आणि रीओ चे फोटो काढत होतो.
आता तो भाग तसा सुनसानच असतो कारण आम्ही सोडलं तर तिकडे कोणीच येत नाही. संध्याकाळ नंतर तर कुणीच नाही कारण सगळा झाडी-झुडपांचा ट्रेल आहे. त्यामुळे तो लीश कुणी नेला नसणार जर असला तिथेच तर याची खात्री होती पण उद्यापर्यंत कदाचित नाही राहणार म्हणून म्हणलं आताच जाऊन घेऊन येऊ. मग एक पॉवरफुल टॉर्च, काठी घेतली आणि सोबत असावी म्हणून ओड्याला पण. कारण मला भिती भटक्या भुभुंची. तिथे गँग हिंडत असते, ओड्या असेल तर मला जरा कंपनी. आणि तो निर्णय अगदी खरा ठरला.
आम्ही गेलो तेव्हा मिट्ट काळोख होता. ओड्याला काहीही नव्हतं त्याचं तो मस्त टळटळीत दुपार असावी असा हिंडत होता, झाडं बघून शू करत होता. मी आपला सगळीकडे टॉर्च मारत चालत चाललो होतो. आणि एकदम चहूबाजूने भुंकण्याचे आवाज यायला लागले. आम्ही दोघे जागीच थबकलो. ८-१० जणांची गँग असावी. त्यांनी एकदम गदारोळ सुरु केला. मी काहीच बोलत नाही, करत नाही म्हणल्यावर ओड्याने सूत्रे हाती घेतली आणि भ्यॉ भ्यॉ करत संवाद सुरु केला.

इतक्या अपरात्रीचे असल्या ठिकाणी झाडी-झुडपात जायला काय नडलंय अशी गँगकडून विचारणा झाली असावी.
त्यावर "काय नाही, नेहमीचेच, मला पॉटी करायची होती," असा ऑड्याचा जबाब.
"ही जागा आणि वेळ आहे का?"

"आता आली त्याला काय करणार..."

"ठीके, आटप लवकर आणि निघ...."

मला खात्री आहे याच स्वरुपाचे काहीतरी झालं असणार कारण या संवादानंतर सगळे भुभे भुंकायचे थांबले आणि आपापल्या जागी पसरले. त्यांचा लीडर सारखा एक होता तो मात्र एका उंचवट्यावर उभा राहून बघत होता. आम्ही आपले पुढे निघालो. ओड्या नेहमीच्या विजयी मुद्रेने.
आणि जिथे लीश राहीला असेल असा अंदाज होता तिथे जाऊन मी शोधाशोध करताना त्यालाही म्हणलं लीश शोध रे. त्याला अर्धा सेकंद पण लागला नाही. त्याने तत्परतेने अंधारात जाऊन शोधला आणि मला आणून पण दिला. म्हणलं बेस्ट.

मग आम्ही दोघे परत एकदा भुभुंची चौकी पार करून घरी परतलो.
त्याला आल्यावर ट्रिट दिली बक्षीस म्हणून.

हो ती भीती होतीच, पण हा तसा आमचा नेहमीचा भाग आहे, आणि त्यांनी मी आणि ओड्या यांच्यावर एकत्रितपणे हल्ला केला नसता याची खात्री होती.

Pages