भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दोस्त हो...

@ मैत्रेयी >> जर्मन शेफर्ड आहे का रॉक्सी? होय
आज ती ५० दिवसाची झाली. हळूहळू होतील म्हणे कान सरळ.

ED3F3C64-2175-4902-A19F-A06EF13C34DE.jpegFF00EF8A-E0E0-445E-9072-747DE84A4A5E.jpeg

I am always on Watch for family !!!

सिम्बाला कायमच सगळ्या कुटुंबाची काळजी असते. काल मुलगी २-३ घरं सोडून एका घरामागे खेळत होती, ती एकटीच घराबाहेर गेलीये म्हणून मंग सिम्बाने तिच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी उचलली. ती घरी परत येईपर्यंत म्हणजे जवळपास १ तास असा बाहेर बसून होता. त्याला मी एक दोन वेळा घरी बोलावले, बॉल फेकले पण हा काही तिथून हलला नाही. खरंतर बॉल म्हणजे त्याचा वीक पॉईंट, पण गार्ड पुढे त्यालाही किंमत नाही. मुलगी घरी आल्यावरच हा देखील घरात आला चेहऱ्यावर विजयी भाव घेऊन ...

वा, लानाचा फोटो बर्‍याच दिवसांनी पाहिला. आधी गरीब दिसत होती तशी नाही दिसत आहे आता, ऐटीत बसली आहे बाहेर बघत Happy एलॉनने पण कसली रुबाबात पोज दिली आहे! दोस्ती झाली नाहीच का अजून Happy कसं मॅनेज करता मग?

लाना बरीच मोठी झालीय. छान दिसतेय.
एलाॅन तर एकदम ( डार्क) चाॅकोलेट हिरो दिसतोय.
त्याचा मागची बाल्कनी पण खूप छान दिसतेय.

हरीतात्या, सिम्बाच्या चेहर्‍यावर एकदम "मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो अपने आप की भी नही सुनता " असे भाव आहेत.

मृणाल १ o ----> वा काय मस्त रुबाबदार पोझ दिलीये, लॉन्ग हेअर शोलाईन दिसतोय

धनवन्ती ---> Lol Lol

आई ग काय गोड गोड फोटो आहेत सगळ्यान्चे...एक्दम २००+ बघतल्यावर अगदी एक्साईट होउन घाई घाईत बघितलेत फोटोज आता आरामात वाचते Happy

सिम्बा किती जबाबदार आणि भारदस्त आहे. ताईवर लक्ष ठेवणं हे आद्यकर्तव्य आहे !! Happy
लाना किती मोठी झाली. एलॉन ऐटदार एकदम.
रॉक्सी किती गोंडस आहे.
माऊईला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि बेली रब.
मास्टर योडा Happy

#CoconutTrails
Vet visit च्या वेळी तंतरलेल्या अवस्थेत.
IMG-20230411-WA0005.jpg
दहीभात आहाहा.
IMG-20230411-WA0003.jpg
आईची स्ट्रॉबेरी चोरायच्या आधी.
IMG-20230411-WA0002.jpg
फिरायला गेल्यावर बघायची आवडती जागा.
IMG-20230411-WA0004.jpg
दमलो बुवा. एक डोळा झोपी गेलाय, दुसरा लक्ष ठेवतोय.
IMG-20230411-WA0001.jpg

@ अस्मिता - पहिला आणि शेवटचा फोटो म्हणजे एकदम झकास, काय भाव टिपलेयत तुम्ही

@ अंजली_१२ - हे फारच छान लपणे आहे, एकदम आवडले

सगळे भुभु गोड आहेत
एलॉन एकदम हँडसम आहे.लाना तटस्थ स्थितप्रज्ञ वाटते.

सुंदर, देखणे भुभु आणि माउ
सिम्बा म्हणजे अचाट शक्ती असलेला पण एकदम इनोसंट खोडकर
कोकोनट मोठा होतोय छान
ओडिन ला कधी भेटलो तर "काय लेका ओड्या, वळखल नाय का? " असा विचारावं इतका ओळखीचा वाटतोय.
परत एकदा लिहितोय स्ट्रेसबस्तर धागा:)

Pages