भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुलकंद घ्यायला उभा आहे Happy
आमचा पान वाला त्याला थोडंसं गुलकंद देतो कागदावर घालून
त्याने नाही दिलं तर हे असं मागून घेतो ओड्या

त्याने नाही दिलं तर हे असं मागून घेतो ओड्या>>>> मलाही उत्सुकता होती की ओडीन नेमके काय करतोय त्याची.

D66C8D98-4491-48BF-8F9C-428BDE034F3F.jpeg

काल सिम्बाने उरलेला दह्याचा डब्बा पळवला आणि मस्त ताव मारला. दही जास्त नव्हते त्यात पण काहीतरी भारी मिळाल्याचा आनंद काय होता चेहऱ्यावर. पूर्ण तोंड लडबडले होते दह्याने पण आम्ही डब्बा काढून घेऊ म्हणून पळापळी करत होता आणि त्यामुळे नीट फोटो नाही काढता आला .

तोंड पुसले तरी थोडे दही उरलेच होते नाकाजवळ Lol Lol Lol

Hi it is summer time. Buy Vanilla icecream for the babies. Give a small icecream treat after the evening walkies. I got baskin Robbins yesterday.

ओड्यासाठी ओडीण शोधताय का आशुचॅम्प ? छोटे छोटे ओडुकले आले डोळ्यासमो>>>>>
हा हा हा, मलाही
लहानपणी ओड्या कसा कापसाचा गुंडा दिसत होता तसेच दिसतील

अर्थात ओडीण म्हणजे सिफ (Sif) आणि लेकरं म्हणजे थोर, हेलगा आणि लोकी Happy

असो, हे फारच बाजारात तुरी प्रकरण झालं Happy

Mumbai Veterinary College ने आयोजित केलेल्या डॉग शोमध्ये आज हॅरीला घेऊन गेलेलो. नाव आधी नोंदवलेल होत पण अशी काही खास पूर्वतयारी काहीच नव्हती. कारण ऑफीस मुळे जास्त वेळ नव्हता . जेवढं १० मिनिट रोज शिकवायचो तेवढंच. ते हो स्पर्धेच्या १० दिवस आधी. लहान असताना त्याला ट्रेन केलेलं. पण हॅरीच्याच कितपत लक्षात होत याची अम्हलच खात्री नव्हती. सगळ रामभरोसे.. आपल्या पाल्याची तयारी कितप्त झाली आहे याचा पालकांना अंदाज येतो परीक्षेच्या आदल्या दिवशी. त्यामुळे पास झालास तरी खूप यावर आधीच तडजोड केलेली असते. तीच सिच्युएशन इथेही Biggrin

तर हॅरी ने या सर्व हवामानाचे अंदाज चुकवत बेस्ट ब्रीड कॅटेगरी मध्ये दोन अवॉर्ड आणि हेल्दी डॉग कॅटेगरीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला चक्क.. आम्हाला एकदम टडोपा moment फिलिंग आलं. Lol

ही त्याला मिळालेली बक्षिस

१. हे सर्टिफिकट

20230319_222437~2.jpg

२. ही मेडल्स
20230319_222550~2.jpg

३. ही गुडीज बॅग
20230319_222607.jpg

हॅरीचे खूप अभनंदन!
आशुचॅम्प, ओडीन चा इंस्टा वरचा natu natu cha vdo पाहिला. खूप मस्त जमलाय.

अरे वा हॅरी! अभिनंदन!
बाकी अनुभव आणि स्पर्धेचे स्वरुप कसे होते वगैरे माहिती लिहा जमल्यास.

अरे भारीच की हॅरी
व्हिडीओ आहे का, तो युट्युबवर टाकून लिंक द्या ना इथे

आशुचॅम्प, ओडीन चा इंस्टा वरचा natu natu cha vdo पाहिला. खूप मस्त जमलाय.>>> धन्यवाद
बायको म्हणाली हे गाणं सूट होत नाही व्हिडिओ ला

या दोघांचा एक किस्सा लिहायचा आहे
टाकतो थोड्या वेळात

हॅरीतर्फे सगळ्यांना थँक्यू.

Maitriyee, लवकरच लिहिते. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता. हॅरीने पपी असताना बक्षिसे मिळविली होती. यामुळे त्याला काही फरक पडला नाही. मलाच उत्सुकता होती . मजा आली भाग घेऊन .

बक्षिसे मिळवल्यानंतर घरी आलेले हॅरीभाऊ .. आय एम हॅप्पी व्हेन आय स्लीप मोडातले Biggrin

IMG_20230218_222956_772.jpg

ओड्या आणि त्याचा बडी रिओमध्ये लव्ह-हेट रिलेशनशिप आहे. दोघे कडाकडा भांडतात पण आणि एकत्र खेळतात पण. पहिल्यांदा भांडले तेव्हा आम्ही दोघे बाबा टेन्शन मध्ये. ओड्याने फुल ऑन अटॅक करून रिओला गवतात खाली लोळवलं. आणि भांडण कशाचे तर बारक्या काटकीवरून. बॉल खेळून कंटाळा आला की काठी टाकतो आणि हे दोघे पळत जाऊन घेऊन येतात. त्यात रिओ लहान आणि तुडतुडीत असल्याने तो पळण्यात ओड्याला मागे टाकतो. ओड्या पण जीव खाऊन पळतो पण नंतर नंतर डुलत डुलत जातो. त्यामुळे बरेचदा रिओच काठी घेतो. मग हा डांबिसपणा काय करतो तर मध्येच उभा राहतो आणि रिओ काठी घेऊन आनंदात पळत यायला लागला की त्याला पकडून त्याच्याकडून काठी हिसकावून घेतो.

रिओ बिचारा गरीबडा आहे, त्यामुळे तो सुरुवातीला निमूटपणे द्यायचा. आता त्यालाही स्वाभिमान वगैरे जागृती झालीये. त्यामुळे तो देत नाही. आणि त्यात कधी ओडीनच्या ताब्यात काठी आली की तो कुणालाच देत नाही. रीओ घ्यायला गेला की त्याला आडवाच पाडतो.

पहिल्या वेळी मी अक्षरश: झेप टाकून त्याला मागे खेचला. रिओचा बाबा पण थोडा पॅनिक झालेला. पण दहा मिनिटांनी काहीच न झाल्यासारखे एकत्र हुंदडणे सुरु केले तेव्हा लक्षात आले यांच्या मारामाऱ्या फार सिरीयसली घ्यायच्या नाहीत. ओड्याच्या दादागिरीला आता रिओची बंडखोरीचे आव्हान असे सध्याचे चित्र आहे.

पण दोघे एकमेकांना बॅकिंग पण देतात. रिओला दुनियाभरचे कुतुहल आणि अंगात मस्ती फार. तो कायम भटके भूभू दिसले कि त्यांना हुसकावून लावायला त्यांच्या मागे पळतो. एकदा असाच एकटे भूभू दिसले म्हणून पळत गेला, तर एकदम कुठूनतरी २-४ भुभू आली आणि रिओच्या अंगावर आली. आम्ही दोघेही त्याला वाचवयाला म्हणून पळत सुटलो, पळता पळता मी ओड्याला चुटकी वाजवून सांगितले की रीओला बघ, तो एकटा आहे.

देवाशपथ सांगतो, त्याला हे वाक्य कळलं का परिस्थितीची जाणीव झाली माहीती नाही पण आमच्या इथून तो तीरासारखा पळत सुटला आणि रिओच्या इथे गेला. आणि तो अंगावर जातो तेव्हाचा त्याचा आवेश एकदम भयप्रद असतो. पाठीवरचे केस फुलवून आणि पुढचे पंजे आपटत, छाती पुढे काढत जातो. त्याला बघून त्या भूभूंनी तात्काळ माघार घेतली. त्यावर मग काहीच न झाल्यासारखा तिथे जाऊन शू केली आणि ओडीन महाशय माघारी आले.

Pages