Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आउट ऑफ सीलॅबस >>> भारी
आउट ऑफ सीलॅबस >>>
भारी किस्सा आहे
आउट ऑफ सीलॅबस >>>>>> :हहपुवा:
आउट ऑफ सीलॅबस >>>>>> : हहगलो:
नवरा जहाजावर असे तिथे काही
नवरा जहाजावर असे तिथे काही लोकांनी (भारतिय नाही) कुत्रा खाल्ला होता. पण ते सांगत की अनेक वर्षांनंतरही कुत्र्यांना वास येतो. कुत्री भुंकतात-घाबरतात वगैरे. त्यांना कळतं म्हणे.
ओड्याला सध्या एक नवीन मित्र
ओड्याला सध्या एक नवीन मित्र मिळाला आहे रिओ नावाचा
एक वर्षाचा लॅब आहे, अगदी सेम लहानपणी चा ओडिन
आम्ही फिरायला जातो तिथेच एक कपल घेऊन आलेलं
मग अमच्यासोबय ते आम्ही जिथं रनिंग ला जातो तिथेही आले आणि दोघांना सोडलं खेळायला
पण ओड्या ने खेळणं सोडून हम्पिंग च सुरू
किती त्याला आवरलं तरी ऐकतच नव्हता
दुसरे दिवशीही हेच, रिओ चा बाबा आणि मी सातत्याने त्याला उचलून बाजूला काढत होतो, पण मोकळं सोडलं की तेच
वैताग झाला नुसता, ओढत घरी घेऊन आलो
म्हणलं अशाने एकटाच राहशील आयुष्यभर, कुणी खेळणार नाही तुझ्याशी
नेट वर चेक केलं, त्यात त्यांनी पॉझिटिव्ह पद्धतीने कसे त्यांना डायव्हर्ट करता येईल याबद्दल होत, म्हणून तिसऱ्या दिवशी बिस्किटं नेली पण कारट्याला त्याचीही काही तमा नव्हती
मग दोन्ही गोष्टी वापरायच्या ठरवल्या. चौथ्या दिवशी काठी आणि बिस्किटं दोन्ही नेलं. हम्पिंग करायला लागला की सटकन फटका आणि करायला थांबला की लगेच बिस्कीट
असं 4-5 वेळेला झाल्यावर बुद्धू च्या डोक्यात प्रकाश पडला की हे आपण करायचं नाहीये
मग एकदम मस्त भावंडे असल्यासारखे पकडा पकडी, पळापळ खेळ सुरू झाले, आणि मी निःश्वास सोडला. पण आता खरोखरच भावंड असल्यासारखं सुरू आहे, दोघांना एकच काठी, एकच बॉल हवा असतो, दुसरा दिला तर पहिला टाकून दोघेही त्याच्या मागे धावतात
मग गुरुगुर, पंजाने ढकलून देणे प्रकार
रिओ बिचारा वयाने आणि आकाराने लहान असल्याने ओड्या खुशाल त्याच्यावर दादागिरी करतो
पोहायला पण मज्जा, रिओ ला कधी त्यांनी स्विमिंग ला नेलं नव्हतं पण आम्ही कॅनाल ला जाणार म्हणल्यावर त्यालाही घेऊन आले
बाटली टाकताच ओड्याने धडमकन उडी मारून पोहायला सुरू केलं, त्याच्या नादाने या येड्याने पण उडी मारली आणि तांतरली चांगलीच. कसातरी पाय मारत, घाबरून काठावर आला
मग थोड्या वेळाने ओड्या दे दणादण पोहतोय म्हणल्यावर त्याचा धीर चेपला आणि मग तोही उतरला. अर्थात त्याला बाटली टाकलेली कळतच नाही, तो फक्त ओड्या ला फॉलो करतो, त्याच्या मागून पोहत जातो आणि परत येतो. ओड्या इथंही दादागिरी करायची सोडत नाही, आम्ही रिओ ला पकडता येईल अशी बाटली टाकली की तो असेल तिथून येतो आणि अक्षरशः हिसकावून घेतो. हा माझा एरिया, मै यहा का दादा है म्हणत
छोटी भावंडे कशी दादाने नुसतं फिल्डिंग साठी उभा केला तरी आपल्याला खेळायला घेत आहेत यानेच खुश होतात तसा रिओ आहे सध्या
ओड्या आणि रिओची धमाल इमॅजिन
ओड्या आणि रिओची धमाल इमॅजिन करुनच मस्त वाटत आहे. लव यू ओडीन.
हम्पिंग करायला लागला की सटकन फटका >> आमच्या लाडोबाला मारु नका हो
मस्त मस्त ओडीन आणि रियो!
मस्त मस्त ओडीन आणि रियो!
हंपिंग त्यांचे डॉमिनेशन
.
तू का भुंकतोय हा त्याच्यासाठी
तू का भुंकतोय हा त्याच्यासाठी फारच आउट ऑफ सीलॅबस प्रश्न होता -->>

सुर्या - वर कुणीतरी सुचवलेय
सुर्या - वर कुणीतरी सुचवलेय ॲनिमल व्हिस्पररचे, ते ट्राय करुन पहा. काही उपचार सापडो लवकर.
सुर्या, आताच एक ओळखीचे काका
सुर्या, आताच एक ओळखीचे काका भेटले. त्यांच्या भूभूला व्हेटनी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधे दिलीत. फीट नाही पण काहीतरी वेगळा आजार आहे त्या भूभूला. पुणे-औंध च्या सरकारी रुग्णालयात दाखवले होते. तशी काही औषधे बघा लागू पडतात का.
>>>>>>>तू का भुंकतोय हा
>>>>>>>तू का भुंकतोय हा त्याच्यासाठी फारच आउट ऑफ सीलॅबस प्रश्न होता

ओड्या आणि रिओचा किस्सा मस्त.
ओड्या आणि रिओचा किस्सा मस्त. मजा आली वाचायला.
ओड्याला फटका देताना मन धजलं का रे चँप?
ओड्याला फटका देताना मन धजलं
ओड्याला फटका देताना मन धजलं का रे चँप?>>>
असं जोरात वगैरे नाही हो मारलं त्याला, पण त्याला जाणवेल इतक्याच जोरात.
मी जितके त्याचे लाड करतो तितकाच स्ट्रिक्ट बाप आहे त्याचा. त्यामुळे जिथे पाहिजे तिथे शिस्त लावायला अजिबात मागेपुढे बघत नाही. त्यालाही ते माहीतीय, की आता बाबा चिडलाय पण थोड्यावेळात शांत होईल.
त्याची तीही एक गंमत आहे. त्याला आम्ही ट्रेलवरून जात असताना मोकाट सोडलेलं असतं, तो मग पाने चरत, वास घेत, शू करत वगैरे बागडत असतो. त्यात त्याला शेण खाण्याचा मोह आवरत नाही. आणि मी त्याला ओरडतो हेही त्याला माहीतीय. त्यामुळे त्याचा जसा माझा एक डोळा त्याच्यावर असतो तसा त्याचाही माझ्यावर असतो. माझी नजर चुकवून तो खायला बघतोच. आणि मला कळतंच ते, मी मग म्हणतो ये इकडे बाळा. मग शिक्षक कसे व्रात्य पोराला पुढे बोलावून हातावर फटका मारतात, तसा मी हाताने त्याच्या ढुंबीवर एक फटका देतो. त्यालाही माहीती असतं आता आपण फटका खाणार, तरी बिचारा कान पाडून येतो, एक फटका खातो आणि मग परत जातो. पण म्हणून परत कधी शेण दिसलं तर खायला बघतोच.
मी नेटवर वाचलंय की भुभ्यांना शिक्षा वगैरे करू नये, पॉझिटिव्ह ट्रेनिंग द्याव वगैरे, पण मी माझ्या पद्धतीने त्याला हँडल करतोय, आणि सो फार आमचं मस्त चाललंय....
मला एका भटक्या माऊच नख लागलं.
मला एका भटक्या माऊच नख लागलं. हलकासा ओरखडा आहे. रक्त नाही आले. तर injection घ्यावे लागेल का?
I m Really scared of needles
डॉक्टरला दाखवून घेणे. रेबिज
डॉक्टरला दाखवून घेणे. रेबिज भयंकर गंभीर आहे. प्लीज ! अजिबात हयगय नको. नुसत्या ओरखड्यातूनही संसर्ग होऊ शकतो. मला घाबरवायचं नाही हं मनिम्याऊ , पण हे असंच असतं.
हो.डॉ ला दाखवून रॅबीप्युर चे
हो.डॉ ला दाखवून रॅबीप्युर चे 5 कोर्स घ्यावे.मांजरी पंजे चाटत असतात.त्यामुळे लाळ पंज्यावर असते.(कदाचित ओरखडा अगदी लाईट असेल तर सांगणार पण नाहीत.लगेच डेटॉल किंवा जंतुनाशक लावले आहे का?)
रॅबीज वर एकदा झाल्यावर इलाज नाही.लक्षणं दिसू लागल्यावर मृत्यू.
भटके असल्याने अजिबात रिस्क
भटके असल्याने अजिबात रिस्क घेऊ नये
फक्त रेबीज नव्हे अन्यही संसर्ग होऊ शकतो
पाळीव असते आणि त्याचा इंजेक्शन कोर्स पूर्ण असतं तर गरज लागली नसती पण या ठिकाणी भटके आहे
अजिबात वेळ न घालवता इंजेक्शन चा कोर्स करा
Thanks. आताच जाऊन आले dr कडे.
Thanks. आताच जाऊन आले dr कडे. Rabiwax-s चा course सुरू केला आहे.
मनिम्याऊ --- योग्य निर्णय
मनिम्याऊ --- योग्य निर्णय
मला चावलेला कुत्रा एकदा.
मला चावलेला कुत्रा एकदा. मलाही तो कोर्स करावा लागलेला.
ही इन्जेक्शन्स कुठे मिळतात ?
ही इन्जेक्शन्स कुठे मिळतात ? म्हणजे सरकारी दवाखान्यात जायला लागतं की फॅमिली डॉक्टर देऊ शकतात ( म्हणजे सहज उपलब्ध असतात का ?)
सहज उपलब्ध असतात
सहज उपलब्ध असतात
थॅन्क्स मनिम्याऊ.
थॅन्क्स मनिम्याऊ.
म्हणजे सरकारी दवाखान्यात
म्हणजे सरकारी दवाखान्यात जायला लागतं की फॅमिली डॉक्टर देऊ शकतात ( म्हणजे सहज उपलब्ध असतात का ?)>>>>
सरकारी दवाखान्यात फुकट मिळते
फॅमिली डॉकटर पैसे घेतात किंवा तुम्हीच घेऊन याम्हणतात लस
आम्हाला पोराच्या वेळी सरकारी दवाखान्याच्या खूप चांगला अनुभव आहे
एकदम व्यवस्थित पणे देतात
माझा अजूनही एक अनुभव आहे, तो मानिम्याउ यांचा कोर्स पूर्ण झाला की सांगीन
चांगल्या मोठ्या मेडिकल मध्ये
चांगल्या मोठ्या मेडिकल मध्ये इंजेक्शन मिळतात.किंवा त्यांना लगेच सांगून मागवावी लागतात.कुत्रा चावल्याच्या पहिल्या 24 तासात पहिला डोस.
सरकारी दवाखान्यात स्टॉक असल्यास आणि दवाखाना जवळ असल्यास उत्तमच.
<<<<माझा अजूनही एक अनुभव आहे,
<<<<माझा अजूनही एक अनुभव आहे, तो मानिम्याउ यांचा कोर्स पूर्ण झाला की सांगीन Happy
नवीन Submitted by आशुचँप on 17 February, 2023 -
Any side effects?
कुठला इंटरॅक्टिव्ह टॉय सांगता
कुठला इंटरॅक्टिव्ह टॉय सांगता येईल का कुणाला भू भू साठी ?
Any side effects?>> नाही
Any side effects?>> नाही
पझल्स मिळतात डॉग्ज साठी.
पझल्स मिळतात डॉग्ज साठी. वेगवेग़ळ्या डिफिकल्टी लेवल्स ची. चेक करा. ऑटोमॅटिक रोल होणारे बॉल्स मिळतात. BarxBuddy Busy Ball किंवा PetDroid Interactive Dog Ball Toy असे सर्च करून पहा. अॅमेझॉन वर आहे.
आउटडोर मधे बॉल्स एजेक्ट करणारी मशीन्स पण असतात. डॉग्ज ना बॉल रिकवर करून परत मशीन मधे टाकला की मशीन पुन्हा तो बॉल लांब उडवते. All for Paws Dog Automatic Ball Launcher सर्च करून पहा. किंवा iFetch Too Interactive Ball Thrower. हे जरा एक्सपेन्सिव असतात.
माउईला हा रीमोट कन्ट्रोल उंदीर फार आवडला होता , बहुतेक ते कॅट टॉय होते. ही पहा एक क्लिप
https://www.instagram.com/reel/CnfU-v-v7Ql/?utm_source=ig_web_copy_link
अर्थात माउई च्या आदळाआपटीत हा उंदीर जास्त टिकला नाही. पण फार महाग नव्हता तसा.
maitreyee --- > धन्यवाद
maitreyee --- > धन्यवाद
Pages