Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तीट लाव आणि मीठ मोहोरी उतरून
तीट लाव आणि मीठ मोहोरी उतरून टाक ग.
खरंच.
वा कोकोनट चे फोटो मस्त !! (
वा कोकोनट चे फोटो मस्त !! ( यावेळी फोटोग्राफर ने काँपोजिशन ची अगदी काळजी घेतलेली आहे)
खरंच फार स्वच्छ पांढरा दिसतो त्याचा रंग.
हो, मै. तुझ्यामुळेच प्रयत्न
हो, मै. तुझ्यामुळेच प्रयत्न केले बघ.
अस्मिता — कोकोनटचे भाव कायम
अस्मिता — कोकोनटचे भाव कायम मी किती शहाणा, आज्ञाधार आहे असेच असतात. तसाच आहे ना कि हे फक्त दाखवायचे दात.
आज सिंबा एकदम शांत आहे कारण त्याच्या वार्षिक लसीकरणाचा दिवस आहे. त्याला गुंगीच्या गोळ्या द्याव्या लागतात, नाहीतर डॅाक्टरला जवळपण येऊ देत नाही. त्याला दवाखानापण कळतो, कारण आम्हाला दारातून आतच यायचे नसते. अगदी बिचारे भाव डोळ्यात आणून तू मला ईथे का आणलं हा प्रश्न असतो चेहर्यावर.
सगळे सोपस्कार झाले की मग डॅाक्टरकडून आवडती चीज ट्रीट मिळते, ती खाऊन झाली कि मग तिच्यावर भुंकून मगच बाहेर पडणार. ती देखील याच्या भूंकण्याची वाट पहाते :). परतीच्या वाटेवर एकदाही माझ्याकडे पहात नाही, डॅाक्टरकडे का नेलं याचा राग म्हणून. आता दिवसभर माझ्याजवळ येणार नाही, ऊद्यापासून मग परत दंगा सुरू.
वेट विजिट का. बॅड डे
वेट विजिट का. बॅड डे ! नेणार्याशी कट्टी मग.
तिने माउईच्या तोंडावर मझल घातले मग शॉट्स देताना. मग मात्र अगदि केविलवाण्या नजरेने बघत होता माझ्याकडे.
आम्ही मागच्या वेळी वेट विजिट ला गेलो तेव्हा ती वेट खोलीत येऊन माझ्याशी बोलायला माझ्याजवळ आली तर माउई इतका वस्सकन भुंकला तिच्यावर. मी म्हटले सॉरी, वेट कडे आला म्हणुन जरा घाबरला असेल. तर ती म्हणे तो तुला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय
सकाळचा टेकडी walk म्हणजे
सकाळचा टेकडी walk म्हणजे आमची आवडती activity. टेकडी वर कोणी नसते त्यामुळे लीश लावत नाही मी . पण माझ्यामागे पुढे १ ० पावले असा चालत पळत असतो . हे फोटो दुसऱ्या एका डॉग पॅरेण्ट ने काढले आहेत . त्याला माझ्यापाशीच थांबायचे असल्याने असे फोटो काढायला फार कष्ट करायला लागतात
सुंदर आलेत फोटोज, मृणाल.
सुंदर आलेत फोटोज, मृणाल.
@अस्मिता ,
कोकोनट एकदम सोनसळी दिसतोय
ओ ओडीन चे बाबा, इथे २२००
ओ ओडीन चे बाबा, इथे २२०० प्रतिसाद झाले आता.
नवीन धागा सुरू करण्याची वेळ झाली.
२२००... नाबाद ...
२२००... नाबाद ...
२२००... नाबाद —— ओडीनचे बाबा
२२००... नाबाद —— ओडीनचे बाबा लवकर धागा काढा, या चर्चा, हे फोटोज, या गमतीजमती बंद नको पडायला
हो हो उद्याच काढतो
हो हो उद्याच काढतो
उदघाटन करायला मस्त किस्सा आहे एक टाकतो उद्याच
Pages