Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग आई ग्ग... खूप खूप वाईट
अग आई ग्ग... खूप खूप वाईट वाटले हे वाचून.. अंजली, तुमचे दुःख समजतेय..
असला निर्णय घ्यायची वेळ कोणवरच येऊ नये...
आई गं अंजली! फार फार वाईट
आई गं अंजली! फार फार वाईट बातमी! तुमच्या दु:खाची कल्पना येतेय. फारच अनपेक्षित.
काळजी घ्या, सॅमीला डबल प्रेम द्या!
Rip मंकी
Rip मंकी
खूप देखणं माऊ होतं.इथे वाचून वाचून हे प्राणी आपणच पाळलेले वाटतात.
चांगल्या आठवणी सोबत राहतीलच.
(No subject)
Rip मंकी
Rip मंकी
या धाग्यावर अशी कुठलीच बातमी वाचायला मिळू नये …
आपला पेट जाण्याचे दुखः काय असतं ते लहानपणी अनुभवले आहे … तुम्हाला वारंवार आठवण येत राहील …
असेल तिथे सुखरूप राहा बाळा!>>
असेल तिथे सुखरूप राहा बाळा!>>>> +1000
आणि परत येशील तेव्हा अंजली ताईंसारखेच एक प्रेमळ कुटुंब मिळू देत तुला
<<इथे वाचून वाचून हे प्राणी
<<इथे वाचून वाचून हे प्राणी आपणच पाळलेले वाटतात.>>
हो ना... ..
अंजली, सावरा स्वतः ला!
अंजली, सावरा स्वतः ला!
ब्लड क्लॉट झाल्यामुळे असं ...... हे खूप वेदनादायी असते.
ओह मंकी! वाईट वाटल वाचून.
ओह मंकी! वाईट वाटल वाचून.
आइ ग ! काळजी घे अन्जली, चटका
आइ ग ! काळजी घे अन्जली, चटका लावणार जाण.
थँक्यू मंडळी... तुमचा खूप
थँक्यू मंडळी... तुमचा खूप आधार वाटतोय.
लोकांना वाटतं काय फक्त मांजरच तर होतं पण आपल्यासाठी ते इमोशन्स function at() { [native code] }असतात.
अजूनही विश्वास बसत नाहीये, बाहेरून आलं की वाटत तो नेहेमीसारखा येईल पुढे स्वागताला... काय सामान आणलंय बघायला सगळ्या पिशव्यात डोकं घालेल. एखाद्या रिकाम्या बॅगेत जाऊन बसेल.
आठवणीच आठवणी!!!
तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद!
मंकी! RIP.
मंकी!
RIP.
इथे वाचून वाचून हे प्राणी आपणच पाळलेले वाटतात. >> + १
थोडा मुड बदलण्यासाठी …
थोडा मुड बदलण्यासाठी … मस्तीखोर सिंबा
अंजली, फारच मोठ्ठा धक्का
अंजली, फारच मोठ्ठा धक्का बसला. पाणीच आलं डोळ्यात. जिथे असेल तिथे सुखात असेल तो.
लोकांना वाटतं काय फक्त मांजरच तर होतं पण आपल्यासाठी ते इमोशन्स function at() { [native code] }असतात. <<<>>>>> अगदी.
हो खरंच मुलालाही हेच समजावलं
हो खरंच मुलालाही हेच समजावलं तो आता सुखात आहे. नो मोर पेन फॉर हिम. आज पटलंय.
हायजॅक नाही करत धागा आता. बाकी गंमतीजमती येऊ द्या परत.
स्ट्रेसबस्टर होईल जरा.
सिंबाला खूप खूप बेली रब
क्यूट पोज.
काल कोकोनटने आमचं लक्ष नसताना
मागच्या आठवड्यात कोकोनटने आमचं लक्ष नसताना खूर्चीवर चढून टेबलवरचं मुलांचं वाटीतलं उरलेलं तूप साखर खाताना आम्ही पकडलं. इतका गोड दिसला की 'संसार का सबसे प्यारा चोर है' असं यशोदा लहान मुलांच्या लिटल क्रिष्णा मधे कृष्णाला म्हणायची , त्याचीच आठवण आली.
त्याला फार भूक लागते, सतत दिले तर कितीही खाऊ शकेल. ह्या फोटोत डिनरची वेळ सहा आहे , पण हा पावनेपाचपासून असा अधुनमधून येऊन 'झालं की नाही वाढा आता' पोजमध्ये.

अंजली , वाचून बरं वाटलं.
अंजली , वाचून बरं वाटलं.
सिम्बाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
हा व्हिडिओ पहा धमाल आहे.
https://www.instagram.com/reel/Co7h_bLoRi8/?igshid=MDJmNzVkMjY=
हे काका फार व्यवस्थित बोलतात त्यांच्या भुभूशी. मी ही कोकोनटला ' सूज्ञ आहेस नं तू ! ' सुरू केले आहे.
अस्मिता ---> मस्त फोटो आहे,
अस्मिता ---> मस्त फोटो आहे, कसले भाव आहेत त्याच्या चेहऱ्यावर
कसला क्यूट फोटो आहे कोकोनट चा
कसला क्यूट फोटो आहे कोकोनट चा! आता आधीपेक्षा बराच मोठा दिसतोय की! ग्रोइंग बेबी! दे गं त्याला खायला लवकर
अगं हो, २१ पाऊंडाचा झाला.
अगं हो, २१ पाऊंडाचा झाला. आला तेव्हा ८ पाऊंड होता. दोन महिन्यांत. हो , साडेपाचला दिले एकदाचे
सिंबाची पोझ मस्तय. क्यूट.
सिंबाची पोझ मस्तय. क्यूट.
कोकोनटच्या चेहऱ्यावरचे भाव बघून फुटलेच
' मला कोणी देत नाही खायला ' टाईप. केविलवाणा मोड ऑन.
शहाणा आहे मग कोकोनट. आमच्या
शहाणा आहे मग कोकोनट. आमच्या बावळ्याला वाटते तो जेवतो म्हणजे आमचेच काहीतरी काम करतो, त्याला खाल्ल्याबद्दल बक्षिस हवे असते! मग जेवण संपवले की एक च्यूई स्टिक मिळते.
आईग.. मंकी वाईट झाले..
आईग.. मंकी वाईट झाले..
आमच्या बावळ्याला वाटते तो
आमच्या बावळ्याला वाटते तो जेवतो म्हणजे आमचेच काहीतरी काम करतो, त्याला खाल्ल्याबद्दल बक्षिस हवे असते! मग जेवण संपवले की एक च्यूई स्टिक मिळते -->

'झालं की नाही वाढा आता'
'झालं की नाही वाढा आता' पोजमध्ये.>>>>
हाहा
साडेपाचला दिले एकदाचे Happy >>>> ना तेरी ना मेरी. फुल्ल बार्गेन
आमच्या बावळ्याला वाटते तो जेवतो म्हणजे आमचेच काहीतरी काम करतो, त्याला खाल्ल्याबद्दल बक्षिस हवे असते! मग जेवण संपवले की एक च्यूई स्टिक मिळते.>>>>>>> वेडू एकदम!
कोकोनट गोड आहे
कोकोनट गोड आहे
आमचा ऑष्कु मस्तं झिपरा दिसतोय
आमचा ऑष्कु मस्तं झिपरा दिसतोय सध्या, विन्टर असल्यामुळे वाढु दिले केस
गोडपणा , दंगा आणि मिष्किलपणा वाढतच चाल्लाय बाळाचा !
आमच्या बावळ्याला वाटते तो
आमच्या बावळ्याला वाटते तो जेवतो म्हणजे आमचेच...
लबाड कोकोनट.
ऑस्करचा दुसरा फोटो एकदम गोड आहे.
आता तर पक्काच soft toy दिसतोय
आता तर पक्काच soft toy दिसतोय.. गोड झिप्रू
(No subject)
मुलांची नवीन हक्काची उशी

Pages