Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम हिरो आहे...
एकदम हिरो आहे...
इथल्या भुभु आणि माऊंच्या
इथल्या भुभु आणि माऊंच्या गंमती जंमती वाचतांना त्या अगदी डोळ्यांसमोर घडत आहेत असा भास होतो. आणि हो, सुलेखा तळवलकर ह्या यूट्युब चॅनेल वर एक 'टेलकथा' नावाचा सेगमेंट आहे त्यावर विविध सिलेब्रेटींच्या भुभु, माऊ, व चिऊसोबत मन प्रसन्न करणाऱ्या मुलाखती दाखवतात.
लपलेला सिंबा
लपलेला सिंबा

आम्ही असेच लपतो, मला तुम्ही दिसत नाही म्हणजे मी खूपच छान लपलो आहे मग भलेही शेपूट पूर्ण बाहेर का असेना

Simba is looking awesome
Simba is looking awesome
हा हा हा, कसलं येडू आहे हे
हा हा हा, कसलं येडू आहे हे
सिंबा जातीने इतके सिरियस
सिंबा
जातीने इतके सिरियस इन्टिमिडेटिंग वगैरे आणि वागणं हे असं गूफी! शोभतं का असं?! 
हेहे हे खूपच भारी आहे.शेपटी
हेहे हे खूपच भारी आहे.शेपटी दाखवत लपणं.
लपलेला सिंबा >>> केवढं
लपलेला सिंबा >>>
केवढं निरागस असावं एखाद्याने! गोडू आहे नुसता.
हाहाहा , भारी आहे ती शेपूट
हाहाहा , भारी आहे ती शेपूट आणि सिंबूअण्णा
हा आमचा हिरो , डायनिंग एरीया
हा आमचा हिरो , डायनिंग एरीया मधल्या स्टेअरकेस व्ह्यु मधून हळुच डोकावतोय आम्ही जेवत असताना

हा सिग्नेचर वाकडी मान

माझा सिम्बू बाळ (वय २ वर्षे ७
माझा सिम्बू बाळ (जर्मन शेफर्ड - वय २ वर्षे ७ महिने) फिट च्या आजाराने त्रस्त आहे. MRI केला, रिपोर्ट नॉर्मल आले. पण तरीही १२-१५ दिवसात फिट येते. आणि एकदा फिट आली कि ती सारखी येतच राहते. कधी कधी ऍनेस्थेशिया देऊनही तो झोपत नाही. शेवटच्या आठवड्यात तो ३ दिवस झोपला नव्हता आणि रेस्टलेस फिरतच होता. त्याला आतून किती त्रास होत असेल याची कल्पना करवत नाही. कुणाकडे काही यावर उपाय असेल तर PLZ कळवा.
जर्मन शेफर्ड जरा येडू च
जर्मन शेफर्ड जरा येडू च असतात का ? दिसायला मोठे पण वागायला अगदी बाळ
आमच्याकडे लाना त्रास देतेआणि एलोन घाबरतो असं दृश्य असते सध्या
@सूर्या - डॉक्टरांचे काय म्हणणे आहे
@सुर्या--- अरे बापरे...
@सुर्या--- अरे बापरे... वाचून वाईट वाटले
काही कारण सांगितले का व्हेटने?
माझ्या माहिती प्रमाणे फिट या आजाराला पूर्ण उपचार नाहीये, परंतु स्ट्रॉंग स्टिरॉइडने कंट्रोल करता येते , मला वाटतं तुम्ही १-२ व्हेटचे ओपेनिन घ्या
सूर्या, हे पहा, काही उपयोगी
सूर्या, हे पहा, काही उपयोगी पडते का-
https://www.ufaw.org.uk/dogs/german-shepherd-idiopathic-epilepsy
सुर्या.. बापरे.. वाचून वाईट
सुर्या.. बापरे.. वाचून वाईट वाटले खुप. सिम्बूला लवकर बरं वाटो हीच प्रार्थना!
आमच्याकडे लाना त्रास देतेआणि एलोन घाबरतो असं दृश्य असते सध्या >> हाहा
डीजे क्यूट एकदम!
डीजे
क्यूट एकदम!
@सुर्या, सिम्बूला लवकर बरं वाटूदे.
लपलेला सिम्बा
लपलेला सिम्बा
त्याला लवकर बरं वाटू दे. किती लहान आहे तो !
ऑस्कर किती गोग्गड !
सुर्या,
सूर्या
सूर्या
लपलेला सिंबा << हाहा..
लपलेला सिंबा << हाहा..
सिग्नेचर वाकडी मान << क्युट
सुर्या, काळजी घ्या सिम्बू ची..
<<<हा आमचा हिरो , डायनिंग
<<<हा आमचा हिरो , डायनिंग एरीया मधल्या स्टेअरकेस व्ह्यु मधून हळुच डोकावतोय आम्ही जेवत असताना Proud >>
भाव बघा चेहर्यावरचे - कसे सगळे मला न देता खाऊ खात बसलेत, बोलवलं पण नाही मला ...
गाल फुगवलेली बाहुली डोळ्यासमोर आणा इथे..
<<<त्याला आतून किती त्रास होत
<<<त्याला आतून किती त्रास होत असेल याची कल्पना करवत नाही. कुणाकडे काही यावर उपाय असेल तर PLZ कळवा.>>
सुर्या, सिम्बूचे वाचून वाईट वाटले. खरेच अजून 2-3 व्हेट ना दाखवा त्याला. बरे वाटू दे.
आम्ही अनेक dr कडे गेलो.
आम्ही अनेक dr कडे गेलो. सर्वांचं एकच मत आहे, फिट बरी होत नाही किंबहुना त्याचे कारण सुद्धा स्पष्ट सांगता येणार नाही. औषधाने फक्त त्याच प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करता येतो. काही डॉक्टरांना तर व्यवस्थित हॅन्डल पण करता येत नव्हतं. मग वेळेत इंजेकशन नाही मिळालं कि नुसती टोचा टोची, त्याचे हाल होतात, त्यामुळे आता एकच डॉक्टर कडे नेतो. त्यांच्याकडे तो शांत असतो आणि २-३ min. मध्ये इंजेकशन देऊन तो शांत होतो.
तो कसलाही आवाज झाला कि घाबरतो आणि मग फिट येते, अमोनिआ वाढल्याने फिट येते, जास्त खाल्ल्याने फिट येते किंवा जास्त थंडी अथवा गर्मीने फिट येते. त्यामुळे खरं कारण अद्याप समजू शकल नाही. जेव्हा आणला होता तेव्हा सुरुवातीचे ५-६ महिने काही त्रास नव्हता म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होण्याचं कारण नसाव.
हे झालं आजाराचं, पण जेव्हा २-३ दिवसांनी तो नॉर्मल होतो तेव्हा फार एनर्जेटिक असतो. मी कामावरून येण्याची वाट पाहत राहतो, आणि घरी आलो कि पूर्णपणे माझ्या अंगावर झेपावतो. मग लहान बाळासारखा त्याला ५-१० मिनिट घेऊन बसावं लागतं. माझे गालं चाटुन घेतो. आणि कुशीत शिरतो. आणि घरी जायला उशीर झाला तर माझे कान हळुच चावतो. माझ्या डोक्यावर पायाने टपली देतो आणो माझे केस खेचतो. घरात लपाछपी आणि पकडा पकडी खेळ त्याला खूप आवडतात.
त्याच्यामुळे कामाचं किंवा इतर कसलाही तणाव असला तरीही तणाव निघून जातो.
सुर्या--- कित्ती मस्त वर्णन
सुर्या--- कित्ती मस्त वर्णन केलाय तुम्ही. त्यांचे प्रेम खरंच अनकंडिशनल असत. काही फोटो टाका कि तुमच्या सिम्बूचे
माझ्या माहिती प्रमाणे अजून तरी फिट्सला कुठलाही पूर्ण बरा करणारा उपचार नाही
तरी तुम्ही काळजी घ्या
सिम्बूला अॅनिमल कनेक्टरकडे
सिम्बूला अॅनिमल कनेक्टरकडे नेऊन काही फायदा होइल का? माझी आपली शंका. तो घाबरतो ना आवज झाल्यावर म्हणून वाटले.
आधीच मुका जीव त्यात असे आजार.. लवकर बरं कर रे देवा त्याला!
अॅनिमल व्हिस्परर?
अॅनिमल व्हिस्परर?
सो स्वीट सिंबू! लवकर योग्य
सो स्वीट सिंबू! लवकर योग्य व्हेट/ औषध सापडू दे आणि बरे वाटू दे त्याला!
मीही त्यांनी इथं पोस्ट
मीही त्यांनी इथं पोस्ट टाकल्यावर नेट वर चेक केलं
https://www.winston-salem.carolinavet.com/site/pet-health-advice-blog/20...
हे सापडलं, काही उपयोग होईल का
सुर्या--- कित्ती मस्त वर्णन
सुर्या--- कित्ती मस्त वर्णन केलाय तुम्ही. त्यांचे प्रेम खरंच अनकंडिशनल असत. काही फोटो टाका कि तुमच्या सिम्बूचे>>>
+ 100
लवकर योग्य व्हेट/ औषध सापडू
लवकर योग्य व्हेट/ औषध सापडू दे आणि बरे वाटू दे त्याला!>>>>>+++११
गोंडू
शेपटी दिसतेय >>>>>
त्यांचे प्रेम खरंच अनकंडिशनल असत. >>>>>+++११ खरंच याचा अनुभव घेतला खूप वेळा. ज्या मित्र मैत्रिणींकडे डॉग्स आहेत. त्यांना पहिल्यांदा भेटलं तरी खूपच जीव लावतात. मलाही मग त्यांना हात लावायला त्यांचे कान कुरवाळायला आवडतं. मैत्रिणीचा प्युअर ब्रीड लॅब आहे त्याला परवा भेटले. दोन चार वेळा लाड केले तर परत येऊन माझ्या हातात त्याचं डोकं खूपसून खूपसून हात फिरवायला लावत होता. फार गोड वाटलं.
आज एका भटक्या भुभ्या ची मज्जा
आज एका भटक्या भुभ्या ची मज्जा
एका गल्लीतून जात होतो, हा लोळत होता, अचानक भुंकत अंगावर आला. मी बाईक थांबवली लगेच आणि त्याला म्हणलं ए टोण्या, का भुंकतोय उगाच? मी काय केलं तुला?
यावर तो अशक्यप्राय कन्फ्युज झाला, त्याला मेबी हाड म्हणून ओरडणारे किंवा जोरात अक्सीलेतर वाढवून पळून जाणारेच माहिती असतील
आणि त्यामुळे तू का भुंकतोय हा त्याच्यासाठी फारच आउट ऑफ सीलॅबस प्रश्न होता
त्याने तातडीने भुंकणे थांबवले आणि विचार करत आपल्या जागी गेला
Pages