भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी आले, ओड्याच्या गमती, ट्विन लुकिंग जर्मन शेफर्ड्स , सगळ्या नवीन पोस्ट्स खूप क्युट Happy
अस्मिता,
कित्ती गं क्युट आहे कोकोनट, अभिनंदन आणि वेल्कम नारळुबेबी !

उडी मारायच्या आधी निरीक्षण चालू आहे.
Screenshot_20230108_084631.jpg

कोकोनट उडी मारताना वाघाची शान दाखवतो. पोझिशन घेऊन उभा.
Screenshot_20230108_084255.jpg
आठवडाभरात मोठा आणि जड वाटायला लागलायं.

Iams puppy food (थोडं कोमट पाणी घालून)
तो फार इंटरेस्ट घेत नाही खाण्यात. आता कळले आहे की तो lab mix and golden retriever mix यांचे mix mix pup आहे. मोठा होऊन काय होतो की काय माहिती..!
त्याची adoption fee $350 होती, त्यात सगळे शॉट्स , स्पे न्यूटर कव्हर होतेयं. सध्या त्याला बाहेर न्यायचे नाही, पार्व्हो व्हायरसचा धोका असल्याने. पुढच्या आठवड्यात होतील ते शॉट्स.
फार चाव चाव करतोय, काही उपाय सांगा. च्यूटॉयज् आहेत, दुसरं काही करू शकतो का ?

न्यु जर्सीमध्ये खूप लोक म्हणजे आमच्या बिल्डिंगमधल्या खूप लोकांनी शेल्टर मधुन कुत्रे अ‍ॅडॉप्ट केलेले आहेत. कौतुकास्पद वाटते मला ते.

फार चाव चाव करतोय, काही उपाय सांगा. च्यूटॉयज् आहेत, दुसरं काही करू शकतो का ?>>>
नाही, ती फेज असतेच त्यांची
दात जाम शिवशवत असतात
फडकी, सॉक्स, बूट, फर्निचर काय मिळेल ते चावतात
आपले हात पाय सांभाळायचे इतकंच करू शकतो
थोडे मोठे झाले की बंद होतं

त्यातल्या त्यात त्याला भरपूर दमवणे, कॅल्शियम पुरेसे मिळते आहे हे पाहणे आणि मौल्यवान वस्तु त्याच्या रेंजमध्ये येणारे नाहीत हे करू शकता

थोडे मोठे झाले की बंद होतं
>>> म्हणजे किती? शी पाचसहा वेळा होते. ती कधी आळते ?
म्हणजे हा ओडीनचा लहान भाऊ वाटतोय म्हणून तुम्हाला सतावतेय. Happy

बाकी मलाही वाटले. सगळी खेळणी सोडून वस्तू खातोयं, चप्पल तर फारच. त्यामुळे मी आता स्वस्त चपलाच आणणारे. Lol

हो सामो, मलाही पपी मिल्स किंवा प्रायव्हेट ब्रीडर शक्यतो नको होते. कारण मगं रेस्क्यू सेंटर मध्ये संख्या वाढत जाते
व त्यांना युथनाईज करावे लागते. हे माझ्या शेजारणीने सांगितले होते, मला विशेष माहिती नव्हते. कदाचित घेतलेही असते प्रायव्हेट ब्रीडर कडून, पण तेवढा विचार करायला वेळच मिळाला नाही.

पण रेस्क्यू शेल्टरमधे मनासारखी ब्रीड मिळेलच असं नाही. आम्हाला जरा मोठा, हाऊस ब्रोकन, क्रेट ट्रेन्ड, लहान जात हवी होती. त्यापैकी एकही गुण नाही कोकोनट मधे. As they say, you get what you get and you don't get upset Happy

पपीज मध्ये शु आणि शी दोन्ही थोडी थोडी जास्त वेळाने करण्याचे प्रमाण असते कारण ते ब्लाडर वर कंट्रोल ठेऊ शकत नाहीत
साधारणपणे आता 4 तासांच्या गॅप ने खायला देणे चांगले म्हणजे दिवसातून तीन वेळा

सहा आठ महिन्यांचा झाल्यावर मग दिवसातून दोनदाच द्यायचं
आणि ती वेळ पाळायची म्हणजे मग त्यांचे पोट्टी टाईम पण त्यानुसार ऍडजस्ट होते
मोठे झाल्यावर दिवसातून दोनच वेळा शी ला जावं लागतं कधी कधी एकदाच
तेही त्यांना एकदा वेळ कळली की बरोबर त्याच वेळी करतात

ओडिन ला संध्याकाळी ग्राउंड वर नेल्या नेल्या पाचव्या मिनिटाला होते, पण एखादं दिवशी नाही नेलं तर करतच नाही
किंवा मग एकदम रात्री त्याला प्रेशर येतं मग अगदी केविलवाणा चेहरा करून दारात जाऊन बसतो
मग अंगणात सोडलं की मोकळा होऊन येतो
सकाळीही तेच, त्याची ठरलेल्या वेळी त्याला बाहेर सोडला नाही तर त्याचे गणित गडबडते आणि मग तो आपलीही गडबड उडवून देतो
शु मात्र कितीही आणि कधीही करतात
ते या धाग्यावर लिहिल्याप्रमाणे त्यांचे कम्युनिकेशन असते पी मेल Happy

सिम्बाने आता गुड बॉय हि पदवी स्वतःच स्वतःला देऊन टाकली आहे.
काल माझी मुलगी तिच्या एका सॉफ्ट toy शी खेळतांना त्याला गुड बॉय म्हणाली तर हा लगेच उठून गेला आणि ते toy लगेच ओढून बाजूला नेवून टाकले खेळण्यावर गुरगुरुन झाले आणि मग लगेच मुलीकडून पेट करून घ्यायला गेला. आता आमच्या घरात एकाच गुड बॉय आहे, दुसऱ्या कोणाला गुड बॉय म्हंटले कि याचे पित्त खवळते , अगदी गम्मत म्हणून उशीला जरी गुड बॉय म्हंटले तर तिची (म्हणजे उशीची) चिरफाड सुरु होते Lol Lol Lol

विडिओ आहे पण माबो वर कसा काय share करणार

थँक्यू Happy मंकी सॅमीतर्फे

अंजली, तुझ्या मांजरीचे नाव मंकी आहे नं,>>>>>येस्स.. बदलणार होतो पण त्याचा उपद्व्यापी स्वभाव बघून नाही बदललं Lol

सिंबा.. किती क्यूट पझेसिव्ह वागणं ते!

विडिओ आहे पण माबो वर कसा काय share करणार>>>>>>>>>>> तुमचं युट्युब अकाऊंट असेल तर तिथे विडीओ अपलोड करून इथे लिंक देता येईल.

हरितात्या Lol हे खूप भारी आहे.

चॅम्प : मांजर आणि ओड्याचे किस्से मजेशीर एकदम.

मंकी आणि सॅमी जाम आवडतात. तो बरीटो बोल कसला क्यूट आहे!

अस्मिता: गोड आहे गं लेकरू Happy

<<ओके धनवन्ती. आमच्या वेटला विचारुन पाहते.
शक्य असल्यास multivitamin सिरपचे नाव संपर्कातून पाठवाल का ?

Submitted by जाई. on 6 January, 2023 - 12:0>>

जाई, विपु बघा. त्या बाटलीवर माऊ आणि भूभू दोन्हीची चित्रे आहेत. पण तरी व्हेट ना विचारून द्या.

दुसऱ्या कोणाला गुड बॉय म्हंटले कि याचे पित्त खवळते , अगदी गम्मत म्हणून उशीला जरी गुड बॉय म्हंटले तर तिची (म्हणजे उशीची) चिरफाड सुरु>>>
हे क्युट आहे पण त्याच्या पझेसिव्हनेसला वळण द्यायला आतापासूनच सुरुवात करा असा माझा काळजीचा सल्ला
स्पेशली लार्ज डॉगच्या बाबतीत
कारण आपण अनवधानाने काही गोष्टी करतो, काही वेळा आपलं लक्ष नसतं, किंवा त्रयस्थ व्यक्ती काही बोलताना, वागताना वेगळी वागली तर भुभे त्यांच्या स्वभावानुसार वागतात, कारण त्यांचे फंडे क्लिअर असतात आणि त्यात त्यांची चूक नसते पण परिणाम सगळ्यांना भोगावा लागतो

Hope तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते

क्युट Happy हे टिपिकल पपी बिहेवियर! थोडे मोठे झाले की असे टमी एक्सपोज करून झोपत नाहीत.

गुड बॉय लोल.

क्युट फोटोज सगळे..
टमी एक्सपोज करून झोपत नाहीत. << मला वाटतं थंडी असेल तर गुडपुन झोपतात. गरम होतं तेव्हा असं बॉडी एक्सपोज करुन झोपतात..

मला वाटतं थंडी असेल तर गुडपुन झोपतात. गरम होतं तेव्हा असं बॉडी एक्सपोज करुन झोपतात..>> होय हे बरोबर आहे
पोटाकडे फर कमी असते त्यामुळे
ओड्या अजूनही असा झोपतो पण गरम असेल तेव्हा
सध्या गुंडाळी करून झोपतोय

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' चाललयं तुझ्या पेढ्याचं धनवन्ती Happy

Submitted by अस्मिता. on 7 January, 2023

इतर कोणापेक्षा तो तुला जास्त जीव लावेल बघ. कधीकधी घरच्यांना सांगायची वेळ येते की अरे शिका याच्याकडून कसा जीव लावायचा आणि आईचा मूड कसा ओळखायचा हे..

आज इंस्टा रिल वर इतका गोड विडीओ बघितला. तो भुभू बघून ओडिनच आठवला.

कलिंगडाच्या मोठ्या फोडी ह्युमन्स उचलतात पण भूभूला छोटी फोड ठेवतात. तो नाराज होऊन जणू काही संवाद करतोय. तुम्हाला मोठ्या मला का छोट्या? मग मोठी माणसं कसं जाऊदे याला नकोच मग तू खा असं म्हणून देऊन टाकतात समोरच्याला. मग भुभू खातं जे मिळेल ते.. फार फनी एकस्प्रेशन्स होते! सापडला तर टाकते इथे.

आणि अजून एक माऊचा होता. ती टबबाथच्या काठावर बसली असते. तिची शेपटी टबमधल्या पाण्यात बुडलेली असते. मालकीण सांगतेय तुझी शेपटी बाजूला कर त्या पाण्यातून. ती माऊ अगदी आज्ञाधारकाप्रमाणे पंज्याने शेपटी उचलते Lol

मग भुभू खातं जे मिळेल ते.. फार फनी एकस्प्रेशन्स होते! सापडला तर टाकते इथे.>>>
तो फार फेमस आहे, गळ्यात सोन्याची साखळी वाला
त्याला सगळं माणसासारखे हवं असतं
नुसतं फ्रेंच फ्राईज दिल्या तर खात नाही, सॉस मध्ये डीप करून दिल्या तरच
पैसेपण मोजून बघतो तो
फुल कॉमेडी आहे Happy

मी या सगळ्यांना फॉलो करतो
माया पोलर बेअर - ही समोईड आहे
Rabbit foot - सेम ओड्या सारखा आहे हा लॅब
टकर तर काय एकदम फेमस आहे

Pages