भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा ऑष्कु फार धमाल करतोय आज्जी आबा इथे आल्यामुळे Happy
पहाटे उठून त्यांच्या बेडरुमच्या दाराच्या फटीखाली डोकं घालून वाट पहातो कधी लाइट ऑन होऊन उठतील !
दार उघडताच प्रेमाचा वर्षाव , सतत त्यांच्या मागे असतो Proud

@आशुचँप -- >> Hope तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते --- >> नक्कीच एकदोन दिवस कौतुक करून झाल्यावर त्याच्यावर काम सुरु केले आहे त्याला हे शिकवणे सुरु आहे कि असा रिऍक्ट व्हायचे नाही. शिकेल २ - ३ आठवड्यात.

तुमचे म्हणणे बरोबर आहे अश्या मोठ्या ब्रीड बाबत जरा जागरूक राहून काम करावे लागते पण ते एकदा शिकले कि विसरत नाही .
सिम्बा सगळ्यात जास्त माझ्या लहानमुलीबाबत जागरूक असतो तिच्या जवळ कुठल्याही अनोळखी व्यक्तीला येऊ देत नाही. vet ला विचारले तर त्यांनी सांगितले कि घरातील सगळ्यात लहान सदस्यांबाबत GSD सर्वात जास्त प्रोटेक्टिव्ह असतात आणि हा गुण बदलणे शक्य नाही

तुमचे म्हणणे बरोबर आहे अश्या मोठ्या ब्रीड बाबत जरा जागरूक राहून काम करावे लागते पण ते एकदा शिकले कि विसरत नाही .>>> येस हेच म्हणायचं होतं

धन्यवाद पॉझिटिव्हली घेतल्याबद्दल

कॅनडा मधील कॅल्गरी शहरात उन्हाळ्यात "कॅल्गरी स्टँम्पीड" नावाचा मोठा फेस्टिवल होतो. ह्यात देश विदेशातून अनेक लोक येतात आणि इथे माणूस आणि प्राण्यांचे वेगवेगळे खेळ होतात. त्यापैकी एक म्हणजे हे डॉग शो.
अमेरिका आणि कॅनडा मधील स्ट्रे डॉग्स ना ऍडॉप्ट करून त्यांना खूप छान प्रकारे प्रशिक्षित केले जाते आणि त्यांचा मोठा शो सादर केला जातो ह्याला मोठे तिकीट सुद्धा असते. तसेच मोठ्या फार्म्स (रँच) वर असणाऱ्या शिप्स ना कंट्रोल करायला शिप डॉग असतात त्यांचा सुद्धा इथे एक शो होता हे शो आम्हाला इथे बघायला मिळाले आणि ह्याचा एक vlog तयार केला, लिंक इथे देत आहे. तुम्हाला हा शो नक्की आवडेल.

https://youtu.be/4e_VIt8iH5Q

अरे वाह, मध्यलोक. मी अनेक वर्षं होते तेथे. रस्त्याच्या कडेला बसून बघितला आहे हा शो. स्कॉटिश घोडेही असतात व मेयर (नाहिद नेन्शी होता तेव्हा) घोड्यावर बसून येतो व उद्घाटन करतो. Happy

अरे वा क्या बात Happy तुम्ही कॅल्गरीला होता है ऐकून (वाचून) फार छान वाटले.

हो, पहिल्या दिवशी परेड असते, त्यात घोडे देखील असतात. ८ दिवसांच्या ह्या फेस्टिवल मध्ये बरेच शोज होतात. हॉर्स शो सुद्धा होतो. इथे आल्यावर माझ्या सौ ने "mountain couple" नावाचे युट्यूब चॅनेल सुरु केले आहे, त्यावर आम्ही इथले विडिओ पोस्ट करत असतो.
सध्या "कॅल्गरी स्टॅम्पीड" च्या विडिओची सिरीज सुरु आहे. रोडिओ, हॉर्स शो, परेड, मोटोक्रॉस असे विडिओ आतापर्यंत ह्या सिरीज मध्ये पोस्ट केले आहे.

सध्या ज्योती गंडोक मेयर आहेत, यंदाच्या फेस्टिवलचे (२०२२) उदघाटन केविन कॉस्टनर ने केले होते.

तुमच्या यूट्यूब चॅनलला शुभेच्छा. बघायला आवडेल. Happy
हो, कॅल्गरी अगदी पाठ आहे मला Happy .
केव्हिन कॉसनर वॉव !

नमस्कार पराग,
हो, मी कॅल्गरी ला असतो. नक्की भेटूया कि आपण , या उन्हाळ्यात वॅनकूवर येण्याचा विचार आहे Happy
तुमचा हि कॅल्गरी बँफ्फ बाजूला येण्याचा काही प्लॅन असेल तर कळवा.

ओड्याला शु च्या इथं थोडं इन्फेक्शन रॅश दिसत होते म्हणून व्हेट कडे घेऊन गेलो
तोपर्यंत मस्त मजेत होता, व्हेट च्या इथं ही त्याला काही कळलं नाही आत जाईपर्यंत
पण आत गेल्यावर व्हेट आणि त्याचं टेबल दिसताच त्याला एकदम मेमरी हिट झाली आणि झुपकन वळून पळून गेला मागच्या मागे
नशीब मी लिश धरून ठेवला होता
तरी हेलपाटत बाहेर खेचला गेलोच
कसे तरी आंजरून गोंजारून आत आणले
पण हे आता परत इंजेक्शन देतील अशी बहुदा भीती बसली होती मनात
त्यामुळं चान्स मिळताच तो पळायच्या बेतात होता
गच्च पकडून ठेवला होता म्हणून बरं

आशुचँप ----- "तरी हेलपाटत बाहेर खेचला गेलोच" इमॅजिन केलं Lol Lol Lol

आमच्याकडे सिम्बा व्हेटकडे आनंदाने जातो कारण त्याच्या आवडीच्या ट्रीट त्याला तिथेच मिळतात। आमच्या व्हेटने त्या ट्रीट घरी आणू नका म्हणून मुद्दाम सांगितले आहे आणि अजून तरी हि ट्रिक छान वर्क होतेय

आमच्याकडे सिम्बा व्हेटकडे आनंदाने जातो कारण त्याच्या आवडीच्या ट्रीट त्याला तिथेच मिळतात>>> हे भारीच

आम्ही व्हेट कडे जाताना आमच्याच ट्रीट घेऊन जातो

पण अर्थात तुमच्या व्हेट चे काय, तगडी फी घेत असतील Happy
लाइतली घ्या

आमचे व्हेट खरेच खूप मस्त आहेत,उगाच काळजी करायला लावत नाहीत, उगाच टेस्ट करू, हे करू ते करू असे म्हणत नाही
आवश्यकता वाटली तरच, अगदी पिटुकले क्लिनिक आहे त्यांचे

एरवी तर चेकिंग, व्हिजिट मध्ये किरकोळ काही वाटलं तर त्याचे पैसेहीघेत नाहीत, फोनवर कधीही शंका विचारली तरी नीट शांतपणे उत्तर देतात

बरा आहे का ओडीन आता?>>>तसा ठीक आहे पण नाही पण
इन्फेक्शन च्या गोळ्या दिल्या आहेत त्या स्ट्रॉंग आहेत खूप
कारण तो गोळ्या सुरू केल्यापासून इतका पाणीपितोय ना
पोटात आग पडत असणारे त्याच्या, आजतागायत एवढं पाणीपिताना आम्ही कधी बघतील नाही
अक्षरशः तडस लागेपर्यंत पाणी पितो
आणि मग थोड्याच वेळात प्रेशर येतं, मग न्या बाहेर

शु करतानाही त्याला त्रास होतो बहुदा, एकतर इतकी करतो की मध्ये दमून थांबतो, आणि परत करतो
पूर्वी थोडी इकडेथोडीतीकडे करत हिंडत असायचा ते आता एकाच जागी सगळी

पण ते सोडलं तर बाकी ऍक्टिव्हिटी तशाच, रोज ग्राऊंडला जातो, पळापळ करतो, खाणे तसेच पण गॅसेस झालेत

पहिल्या दिवशी तर अक्षरशः खोलीचे गॅस चेंबर केलं होतं
शेवटी त्याला गच्चीत नेऊन खोलीच्या दारे खिडक्या उघडून फॅन लावावा लागला

आधी त्यानी रोज 2 गोळ्या सांगितल्या होत्या पण त्याला त्या फारच त्रासदायक व्हायलालागल्या, मग आता डॉ म्हणले की एकच द्या
अजून 4 दिवस वाढवा
स्टिरॉइड्स आहेत म्हणे त्यात
म्हणून तो इतका पाणी पितोय असे तें म्हणाले
एका रात्री तो आमच्या कॉटजवळ येऊन उभा राहिला
बिचाऱ्याला सांगताही येत नव्हतं काय त्रास होतोय ते पण चेहर्यावर दिसत होतं
मलाच कसातरी झालं, मग गादी खाली जमिनीवर टाकून त्यावर त्याला जवळ घेऊन झोपलो, लहान बाळाला थोपटून झोपवतात तसं
पहाटे पहाटे कधीतरी झोपला

मलाच कसातरी झालं, मग गादी खाली जमिनीवर टाकून त्यावर त्याला जवळ घेऊन झोपलो, लहान बाळाला थोपटून झोपवतात तसं ----->> नक्कीच समजू शकतो.

बिचारे मुके प्राणी धड सांगूही शकत नाहत, त्यांचे ते त्रासलेले चेहरे अगदी बघवत नाहीत. सिम्बाचे nutar झाल्यावर मी असाच झोपलो होतो त्याला जवळ घेऊन. ऑपेरेशन करून घरी आणला तेव्हा त्याला इतका त्रास होत होता कि दोन्ही पुढील पंजात माझा हात धरून दुसऱ्या हातावर डोकं ठेऊन झोपला होता बराच वेळ . त्याची ती त्रास होतोय सांगण्याची केविलवाणी धडपड मी कधीही विसरू शकणार नाही Sad

Pages