पठाण - शाहरूख खान
हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था
यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था
अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !
तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..
(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )
और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है
और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये
जल्द ही मिलते है.....
पठाण से !!!!
............
हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्यांना चोख उत्तर द्यायला येतोय
पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो
पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको
धन्यवाद,
ऋन्मेष
हेटर्स कडून अपेक्षा ठेवू नका.
हेटर्स कडून अपेक्षा ठेवू नका. फॅन्स कसे असतात बघा.
एका चाहतीने आपल्या आयुष्याची कमाई ७२ कोटी रूपये संजय दत्तच्या नावे करून घेतला अखेरचा श्वास. हा घ्या पुरावा.
https://marathimaaj.in/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0...
ज्यांची एकापेक्षा जास्त घरे असतील त्यांनी एकच घर ठेवून बाकीची घरे आपल्या आवडत्या स्टार च्या नावे करायला काय हरकत आहे ? (कुणीही स्वतःवर ओढून घेऊ नये)
इथेच वर एका चाहत्याने पठाणची तिकीटे वाटल्याचा उल्लेख आहे.
असलं काहीही न करता फॅन म्हणवून घेणार्यांची लाज वाटते. थू: अशा फॅन्सवर.
आक थू आक थू . थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू:
(No subject)
रूनमेश तू पण दोन चार हजार तिकीटे वाट रे ....
आज सकाळ वर्तमानपत्रात पठाण चे
आज सकाळ वर्तमानपत्रात पठाण चे वार्तांकन आलंय !
सिनेमा लक्षात राहत नाही ,हिंदू चित्रपट सृष्टीला हवा असलेला सुपर हिट सिनेमा होण्याचा मान पठाण घालवला .
असे कौतुकाचे वर्णन आहे .....
हिंदू चित्रपट सृष्टीला.....??
हिंदू चित्रपट सृष्टीला.....???
https://www.ndtv.com
https://www.ndtv.com/entertainment/pathaan-review-shah-rukh-khan-doesnt-...
पठाणच्या दोन गाण्यांनी You
पठाणच्या दोन गाण्यांनी You tube वर धमाल केली आहे, केवळ एका महिन्यात ४० कोटी वेळा टिचकी मिळाली आहे. इतर साईटचा डेटा माहित नाही पण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच ४०० कोटी रु. पल्ला गाठला आहे. सगळ्या जगाला वेड लावले आहे king of Bollywood/ Romance शाहरुख खान याने. दीपिका पदुकोण या त्याच्या सहअभिनेत्रीला पण तेव्हढेच महत्व मिळत आहे.
बेशरम रंग गाण्याला २४ कोटी वेळा टिचकी मिळाली.
https://www.youtube.com/watch?v=huxhqphtDrM
झुमे पठाण, १५.१ कोटी वेळा बघितल्या गेले आहे.
https://www.youtube.com/watch?v=YxWlaYCA8MU
बॉलीवूड मधे त्याचा कुणीही गॉडफादर नसतांना केवळ अभिनय कौशल्याच्या जोरावर येथवरचा प्रवास थक्क करणारा आहे. गर्दी ओसरल्यावर चित्रपट नक्की बघणार.
बॉयकॉट गँग आधी पठाण सुपरफ्लॉप
बॉयकॉट गँग आधी पठाण सुपरफ्लॉप होणार , शाहरुखला त्याचं घर विकावं लागणार म्हणून नाचत होती. आता सुपरहिट होणार नाही पर्यंत आलेत. प्रगती आहे.
सकाळी आठपासून शोज लावले आहेत.
बंद पडलेली अनेक सिंगल स्क्रीन थेटर्स पठाणमुळे /साठी पुन्हा चालू झाली.
बर्नॉलचा खप वाढला.
काल वाचलेलं एक ट्वीट - पठाण आणि बीबीसीची डॉक्युमेंटरी दोन्ही हिट.
उदय
उदय
भरत
मी वर NDTV मधल्या रीव्युची लिंक दिली आहे. त्यातील शेवटचा परिच्छेद अत्यंत वाचनीय आहे.
मला पठाण पहायचा होता ,
मला पठाण पहायचा होता ,
सरांच्या इथे चाललेल्या अति कौतुका मुळे
आता मला शिसारी आल्यामुळे मी बघणार नाही
केशवकूल - धन्यवाद. review
केशवकूल - धन्यवाद. review छान आहे. चित्रपट सृष्टीला अनेक वर्षांची आलेली मरगळ पठाण नक्की दूर करेल अशी आशा आहे.
भारत सरकारच्या तिजोरीत कोट्यावधीचा कर प्रामाणिक पणे भरणारा शाहरुखचा चित्रपट तुफान चालला म्हणजे एकट्या शाहरुख खानचा आर्थिक फायदा होत नसतो. लाखो लोकांची रोजीरोटी अवलंबून आहे या उद्योगावर.
केशवकुल, वाचला रिव्ह्यु.
केशवकुल, वाचला रिव्ह्यु. चांगला लिहिलाय. काही शब्दांचे अर्थ शोधावे लागले. ते नेमके वापरले आहेत. insouciant , cocky चपखल आहे शाहरुखसाठी.
माझ्या परिचयातल्या दोघांनी पठाण पाहिला. स्टेटसला थेटरमधला जल्लोष ठेवलाय. त्यातला एक दुसर्या खानाच्या सीनसाठी आहे.
आता मला शिसारी आल्यामुळे मी
आता मला शिसारी आल्यामुळे मी बघणार नाही >>
असं करू नका. तुमच्या नावातच चुंबक आहे. सजातीय ध्रुव एकत्र आले कि ढकर्षण होते या सिद्धांतानुसार बायकॉट ग्यांग सिनेमे हिट करते तर बेसुमार कौतुक ग्यांग प्रेक्षकाला सिनेमापासून दूर ढकलते.
बरेच तास येऊ शकलो नाही त्याबद्दल सर्वाची क्षमा मागतो. जे जे पठाण पाहून आले त्या सर्वांच्या मुलाखती घेण्याचे काम चालू होते. अगदी रात्रभर संपूर्ण देशात मुलाखती घेतल्या. त्यातून एक रहस्य उघडकीस आले ते म्हणजे....
या सिनेमात सलमान खान आहे ही गुप्त बाब लीक झाल्याने लोकांच्या उड्या पडताहेत.
ही असते स्टार पावर. अभिनय करून कुणीही सिनेमा हिट करतं. पण एकटे भाईजानच आहेत जे सूक्ष्म अभिनय करून सिनेमा चालवतात. कित्येकदा तर अभिनय, कथा, संगीत, पटकथा यातले काहीही नसले तरीही सिनेमा सुपरहीट होतो. किक नावाचा पिक्चर असाच हिट झाला होता. जळणारे म्हणतात कि प्रमोशनच इतकं करतात आणि इतक्या स्क्रीनवर भाईजानचे पिक्चर रिलीज केले जातात कि सिनेमा कसा आहे हे कळायच्या आत गल्ल्यावर डल्ला मारून निर्माता फरार झालेला असतो.
ईदला भाईजान हा चित्रपत रिलीज होणार आहे. खरे तर गेल्या ईदला धागा काढायला हवा होता. अर्थात भाईजान या नावावरच सिनेमे हिट होत असल्याने अशा धाग्यांची भाईजानला गरज पडत नाही. ट्रेलर रिलीज झालेला आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा. हा सिनेमा हिट व्हावा म्हणून महिनाभर रोजे ठेवणार आहे आणि प्रत्येक थिएटरवर जाऊन शिरखुरमा वाटप करणार आहे.
सूक्ष्म अभिनयाच्या जोरावर
सूक्ष्म अभिनयाच्या जोरावर सिनेमा चालवतात ?
ट्युबलाईट मध्ये तर भाईजान चा भव्यदिव्य अभिनय होता तरी सिनेमा आपटला !
बर्नालचे ट्रक माबो वरील काही
बर्नालचे ट्रक माबो वरील काही आयडींच्या घरी धाडावे लागतील अशी परिस्थिती शारुख ने निर्माण केल्याबद्दल त्याचा निषेध
दीपिका आय एस आय एजेंट असताना
दीपिका आय एस आय एजेंट असताना भारताची रक्षा करते आणि जॉन रॉ एजेंट असताना टरोरिस्ट कृत्य करतो !
अशी आवडती स्टोरी असताना शाखा प्रेमींनी फक्त २५ कोटींचा धंदा करून द्यावा ?
उगी उगी . जेलुसिलपण हवं का?
उगी उगी . जेलुसिलपण हवं का?
मदरसे हुंगायचे सोडून तरण
मदरसे हुंगायचे सोडून तरण आदर्शचे ट्विट कागाळु सरांना वाचायला लावल्याबद्दल शारुख चे अभिनंदन
ठाण पाहिला. कसा पाहिला कुठे
ठाण पाहिला. कसा पाहिला कुठे पाहिला हे सांगू शकत नाही. पण पाहिला. जर कुणी खोदून खोदून विचारलेच तर दोन वर्षांनी या विषयावर नवीन धागा काढीन कथा विभागात. आता पाहिलाच आहे तर लोकाग्रहास्तव रिव्ह्यू हवा असेल तर लिहीन. इथेच लिहायचा कि वेगळा धागा कि चिकवावर ते कळवावे. मानधन दिले तरी चालेल.
Day 1 55.00 cr.
Day 1 55.00 cr.
Day 2 60.00 cr. Tentative
दोन दिवसात शंभर करोडचा पल्ला
आणि ईथेच हे थांबणार नाही. कारण पठाणच्या क्रेझची फुल्ल हवा आहे. लोकं थिएटरमध्ये कसे चेकाळतात याचे विडिओ फिरू लागलेत.
पाच पन्नास टाळकी स्टेज वर
पाच पन्नास टाळकी स्टेज वर जाऊन नाचू लागली म्हणजे तो मूव्ही हिट समजायचा का ?
हे मुद्दामहून (ठरवून) निर्मात्याने किंवा एखाद्या ग्रुपने केल्यासारखे वाटत आहे. शुक्रवार व शनीवारची ठाणे, बोरीवली, गोरेगाव, कांदीवलीची थेटरे ओस पडलीत. (बोरीवली तर फक्त १८० रु. तिकीट आहे तरी थेटर रिकामे आहे). उगाचच हवा करत आहेत की चित्रपटाचे बुकींग चांगले झाले आहे.
थिएटर ओस असल्याचे बूक माय
थिएटर ओस असल्याचे बूक माय शोचे फेक स्क्रीनशॉट सुद्धा फिरत आहेत. त्यापासून सावध राहा
काल रात्री ८ नंतरच्या शोज मधे
काल रात्री ८ नंतरच्या शोज मधे काही ठिकाणी फिलिंग फास्ट दिसले. १० नंतरचे शोज काही ठिकाणी फुल्ल दिसले. पण २५ तारखेपासून रोज बुक माय शो वर पठाणच्या सर्व थिएटर्सचे शोज हिरव्या रंगात ( उपलब्ध) दिसतात. क्लिक केल्यावर थिएटर रिकामे दिसते. आत्ताचा हा स्क्रीनशॉट. ताबडतोब बुकमायशो वर जा आणि या स्क्रीनशॉटमधे दिसलेले पुणे येथील थिएटर्स (बाकी ठिकाणी हीच परिस्थिती आहे) मधे फुल्ल असल्याचा स्क्रीनशॉट ताबडतोब इथे टाका. ही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी असल्याचे दिसतेय.

सगळी लोकं प्री बुक करतातच असे
सगळी लोकं प्री बुक करतातच असे नाही. आमच्या गावात सगळी थेट्रे बुक माय शो नुसार कायमच ओसाड असतील. स्पॉट वरच जास्तीत जास्त तिकिटे विकली जातात.
आणि, बॉक्स ऑफिस कमाई हा ओव्हरोल माहितीचा स्त्रोत उपलब्ध असताना बुक माय शो चे स्क्रीनशॉट घेऊन काय करायचे आहे ?
बर्नाल मध्ये जेलुसिल मिसळून
बर्नाल मध्ये जेलुसिल मिसळून लावा किंवा जेलुसिल मधे बर्नाल घालून प्या. काश्मिरात पण पठाण हाऊसफुल्ल.
बुक माय शो मधे मल्टीप्लेक्स
बुक माय शो मधे मल्टीप्लेक्स येतात. पूर्वी सिंगल स्क्रीनसुद्धा दिसायचे पण आता ते दिसत नाहीत. ऑफलाईन बुकींग सुद्धा त्यात दिसतेच. कारण सीट्स कुठल्या बुक करायच्या हे फीचर द्यायचे असेल तर ऑफलाईन बुक झालेल्या सीट्स सुद्धा दिसायला हव्यात. बुक माय शो वर संध्याकाळचे शोज भरल्याचे आणि रात्रीचे हाऊसफुल्ल असल्याचे दिसत होते हे बरोबर आहे.
यावरून पठाणचे गणित मांडले तर..
५७०० स्क्रीन्स भारतात
२३०० स्क्रीन्स युरोप अमिरेका ऒस्ट्रेलिया इत्या्दी
मोठ्या मल्टीस्क्रीन्समधे जवळपास सगळे शोज पठाणचे आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून. प्राईमटाईम मधे फक्त पठाणच. सरासरी पाच स्क्रीन्स असतात. त्यात संध्याकाळचे सगळे शोज हाऊसफुल्ल किंवा ७०% फुल्ल झाले तरी सिनेमा सुपरहीट ठरतो. सकाळच्या शोज ना सरासरी ९% उपस्थिती असते. ती वाढत जाऊन २०ते ३०% पर्यंत राहते. धंदा संध्याकाळी सहानंतरच्या शोज मधेच ठरतो.
५७०० स्क्रीन्स मधे सायंकाळी प्रत्येकी ५ शोज फुल्ल गेले आणि सरासरी तिकीट ३०० रूपये आणि सरासरी प्रेक्षक ( एका स्क्रीनमागे) ३०० धरले तर
५७०० * ५ * ३०० * ३०० = 85,50,000 * ३०० = 2,565,000,000 ( २५ कोटी) देशभरात
यात दिवसभरातले १५ करोड जमा केले तर दिवसाला ४० करोड गल्ला जमत असेल.
ओव्हरसीजचे २ करोड धरले तर ४२ करोड दिवसाला.
पण विविध वेबसाईटवर ९७ करोड, १५० करोड, २०० करोड असे आकडे दिसत आहेत. काही ठिकाणी ५७ करोड असे सांगितलेय. यात गाणी, सॅटेलाइटचे हक्क पण धरले असतील का ?
एका वेबसाईटवर बॉक्स ऑफीस कलेक्शन देताना सकाळच्या शोज मधे किती उपस्थिती होती, दुपारच्या किती हे नेहमी देतात. तिथे हे आकडे गायब होते. ५७ करोड कलेक्शन दिलेले होते आणि ठळक अक्षरात प्रमोटेड कंटेट असे म्हटले होते. तसेच या फिगरचा अॅक्चुअल फिगरशी संबंध आहे असा कोणताही दावा ही वेबसाईट करत नाही असा इशाराही दिलेला आहे.
पठाण सुपरहीट होईल सुद्धा. पण सध्या तरी खबरदारी म्हणून बॉक्स ऑफीस चे आकडे देणार्यांना मॅनेज केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पठाणला शुभेच्छा !
पूर्वी boxofficeindia.com ही वेबसाईट आकडे द्यायची. ती बंद झाली आहे.
आता https://www.sacnilk.com/ इथून ते आकडे मिळू शकतात. या वेबसाईटवर इतर कोणत्याही सिनेमाचे बॉक्स ऑफीस देताना सकाळ, दुपार, संध्याकाळ असे दिलेले दिसते. फक्त पठाणच्या बाबतीत अपवाद दिसला. इशारा पण आहे.
वेडचे कलेक्शन या पद्धतीने दिले आहे.
https://www.sacnilk.com/quicknews/Ved_2022_Day_26_Box_Office_Collection?...
पठाणचे या पद्धतीने
https://www.sacnilk.com/articles/entertainment/box_office/Pathan_2022_Bo...
याच वेबसाईटवर लेटेस्ट रिपोर्ट मधे प्रमोटेड कंटेन्ट लिहीलेले आहे.
बुक माय शो चे स्क्रीनशॉट घेऊन
बुक माय शो चे स्क्रीनशॉट घेऊन काय करायचे आहे ?
>>>>
काहीतरी सिद्ध करायची धडपड.
मार्केंटींग स्ट्रॅटेजी म्हणून तो हिट दाखवला जात आहेत यामागे फिल्ममेकर प्रोड्युसर असणे समजू शकतो. त्यांचा तो व्यवसाय आहे.
पण तो फ्लॉप दाखवण्यासाठी काही लोकं का धडपडत आहेत हे अनाकलनीय आहे.
अर्थात कोणी चित्रपट बघत असेल आणि त्यांना तो आवडला नसेल तर हे चार लोकांना सांगून सावध करणे समजू शकतो. पण न बघताच हि धडपड अनाकलनीय आहे
थिएटर ओस असल्याचे बूक माय
थिएटर ओस असल्याचे बूक माय शोचे फेक स्क्रीनशॉट सुद्धा फिरत आहेत. त्यापासून सावध राहा >> हे कसे ठरवले हे समजावून सांगा. आम्हाला हिट किंवा फ्लॉपशी संबंध नाही. ना पठाण कडून आम्हाला फीस मिळते ना बायकॉट गँग कडून. पण कसलाच डेटा न देता धडक विधाने करणे हे जास्त अनाकलनीय नाही का ?
थिएटर ओस असल्याचे बूक माय
थिएटर ओस असल्याचे बूक माय शोचे फेक स्क्रीनशॉट सुद्धा फिरत आहेत. त्यापासून सावध राहा
मी स्वतः पाहिले हो. .. स्र्किन शॉट नाही घेतले.
पठाण हिट झाला काय किंवा फ्लॉप झाला काय मला काही फरक पडत नाही हे खरे. पण उगाचच कुठल्याही गोष्टींचे अतिकौतूक नको म्हणून हे बुकिंग चेक केले. या फसव्या मार्केटींग पासून लोकांनी सावध राहीले पाहिजे.
५७०० स्क्रीन्स मधे सायंकाळी
५७०० स्क्रीन्स मधे सायंकाळी प्रत्येकी ५ शोज फुल्ल गेले आणि सरासरी तिकीट ३०० रूपये आणि सरासरी प्रेक्षक ( एका स्क्रीनमागे) ३०० धरले तर >>> ५ शोज कसे काय फुल्ल जातील ओ एका स्क्रीनला ? १५ तास होतात. दोन शोज धरा जास्तीत जास्त. एक शो दिवसभराचं बॅलेन्स करण्यासाठी फुल धरा. ३ शोज घ्या. ३०० रूपये तिकीटाची सरासरी पण जास्त नाही का ? वर योगी म्हणतात तसे १५० रूपये तिकीट पण आहे. मुंबई पुण्यात २५० रूपये तिकीट आहे. चेक करा बुक माय शो वर. उत्तर भारतात कमीच असेल.
पहिल्या दिवशी जास्तीत जास्त १५ ते २० कोटी गल्ला जमला असेल. दुनियाभराचे हक्क विकून ते पण दाखवले असतील.
हायला .
हायला .

पठाण हिट होणे न होणे हाच जगातला सर्वात मोठा प्रश्न झालाय की
हिंदी चित्रपट, यशराज बॅनर, त्यात war मध्ये 2 सुपर डान्सर सुपर फिट हिरो असूनही माती करणारा दिग्दर्शक असल्याने OTT वर आल्यास बघू बघायचा की नाही ते.
फॅन लोकांनी बघावाच.
ज्यासाठी सलमान फॅन भाईचे चित्रपट बघून भाई इज ग्रेट तसे शाखा फॅन साठी शाखा इज ग्रेट.
उगीच विरोध केला की फॅन भक्त चेकाळतात.
वर चर्चेत 2 गॅंग दिसत आहेत.
एक हिट आणि एक फ्लॉप.
त्यात इंटरेस्ट नाहीये.
बॉक्स ऑफिस वर चित्रपट हिट होणे आणि दाखवणे हे ही फार अवघड नसतंय.
100 कोटी तर नक्कीच जमवेल डोन्ट worry सगळेच.
वर कोणीतरी हॅपी न्यू इयर चा कशाला उल्लेख केला रे.
आरारा, लै वाईट आठवणी त्या.
Pages