पठाण - शाहरूख खान
हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था
यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था
अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !
तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..
(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )
और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है
और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये
जल्द ही मिलते है.....
पठाण से !!!!
............
हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्यांना चोख उत्तर द्यायला येतोय 
पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत 
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो 
पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको 
धन्यवाद,
ऋन्मेष
वर चर्चेत 2 गॅंग दिसत आहेत.
वर चर्चेत 2 गॅंग दिसत आहेत.
एक हिट आणि एक फ्लॉप. >>> आभार कुठल्या तरी एका ग्यांगचे सदस्यत्व दिल्याबद्दल. नाहीतर बॉयकॉट केलेय असे समजत होतो.
वर कोणीतरी हॅपी न्यू इयर चा
वर कोणीतरी हॅपी न्यू इयर चा कशाला उल्लेख केला रे.>> कुणीतरी ला नाव असेल ना साहेब!
आणि तो उल्लेख दुसऱ्या धाग्यावर आहे. 

To the best of my knowledge इथे नाही
थिएटर ओस असल्याचे बूक माय
थिएटर ओस असल्याचे बूक माय शोचे फेक स्क्रीनशॉट सुद्धा फिरत आहेत. त्यापासून सावध राहा >> हे कसे ठरवले हे समजावून सांगा.
>>>>>>>
ठरवले नाही हो, चेक केले स्वत: बूक माय शोवर.
बहुधा हे लोकं स्क्रीनशॉट बूकिंग उघडल्या उघडल्या घेतले गेले असावेत आणि जणू काही ईतकीच बूकिंग झालीय म्हणून फिरवत असावेत. काय मिळते यातून देव जाणे..
थिएटर ओस असल्याचे बूक माय
या फसव्या मार्केटींग पासून लोकांनी सावध राहीले पाहिजे.
>>>
योगी, हो नक्कीच.
मी फक्त दुसरी बाजू दाखवली.
दोन्ही बाजूंनी फसवेगिरी चालू आहे.
म्हणून मी माझ्या ओळखीच्या चारपाच लोकांच्या रिव्ह्यूची वाट बघतोय. जे नि:पक्ष आहेत हे मला माहीत आहे. त्यातील एकाचा पॉजिटीव्ह आलाय
. अजून तिघेचौघे या विकेंडला पिक्चर बघणार आहेत.
दोन म्हणी आहेत.
दोन म्हणी आहेत.
1. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
2. जो दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग..
एक वाक्प्रचार
#. उंटावरून शेळ्या हाकणे
Boycott gang ला विरोध. पण
Boycott gang ला विरोध. पण त्यासाठी असला third rate, mediocre trash बघणार नाही.
चारपाच लोकांच्या रिव्ह्यूची
चारपाच लोकांच्या रिव्ह्यूची वाट बघतोय>>> श्या ह्यो कसला फॅन?
फ.डे.फ.शो. तरी बघायचा, ३-४ हजार तिकीटं नाही वाटली निदान तरी
मी फॅन शाहरूख खानचा आहे.
मी फॅन शाहरूख खानचा आहे.
त्यासाठी त्याचे सारे चित्रपट थिएटरलाच बघितले पाहिजे असे गरजेचे नाही. यावर स्वतंत्र धागा काढूया
मी फॅन शाहरूख खानचा आहे.
मी फॅन शाहरूख खानचा आहे.
त्यासाठी त्याचे सारे चित्रपट थिएटरलाच बघितले पाहिजे असे गरजेचे नाही. >>>>> थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू:
यावर स्वतंत्र धागा काढूया >>> आक थू: आक थू: आक थू: आक थू:
शारुकने गोर्यांना पण पैसे
शारुकने गोर्यांना पण पैसे चारले. पठाण बाँडपटापेक्षा चांगला आहे म्हणे.
शारुकने गोर्यांना पण पैसे
शारुकने गोर्यांना पण पैसे चारले. ### CNN news च्या मते परकीय देश भारत अस्थिर करण्याच्या मोहिमेवर आहेत.पठाणचे कौतुक हा त्याच कटाचा एक भाग असेल काय?
पठाणचे कौतुक हा त्याच कटाचा
पठाणचे कौतुक हा त्याच कटाचा एक भाग असेल काय?
>>>>
शाहरूखचे चाहते आणि शाहरूखचे द्वेष्टे यांच्यामुळे देशभरात दंगली उसळल्या आहेत. लोक खुलेआम नंगी तलवार घेऊन एकमेकांची कापाकापी करत आहेत. ठिकठिकाणी कर्फ्यू लागले आहेत. जागोजागी नाक्यानाक्यावर स्पेशल कमांडो तैनात केले आहेत. पण त्यांना न जुमानता कुठे शाहरूखचे पुतळे जाळले जात आहेत तर कुठे शाहरूखची महाआरती होत आहे. शाहरूखचे चित्रपट ज्या थिएटरात लागले आहेत त्यावर विमानातून बाँबबर्षाव होतोय. थोडक्यात देशातले एकेक शहर गाव गल्ल्या पेटल्या आहेत....
असे काहीसे चित्र डोळ्यासमोर आले !
या ले इतं सगले हसायला . काका
या ले इतं सगले हसायला . काका ज्योक मालतात.
इंड्यातल्या थिट्रांची कल्पना
इंड्यातल्या थिट्रांची कल्पना नाही पण इथे कॅनडात आज उद्या परवाच्या सगळ्या शोजच्या फक्त पहिल्या एक - दोन रांगा शिल्लक दिस्तायत.
उद्या आमच्या गावात मराठी मंडळ
उद्या आमच्या गावात मराठी मंडळ ने अक्खा थेटर बुक केला आहे... बोलो जुबां पठाण...
हो माझ्याही एका तिथल्या
हो माझ्याही एका तिथल्या मैत्रीणीने हेच सांगितले. शाहरूखच्या चित्रपटाला तिथे माहौल असतो म्हणे..पठाणचीही तशीच हवा आहे. ती सुद्धा जाणार आहे या विकेंडला. मग त्यानंतर मलाही निर्णय घ्यायला सोपे पडेल
आता सहज बघितले बुक माय शो ऍप.
आता सहज बघितले बुक माय शो ऍप.
आमच्याकडे एकेका थेटरात एका दिवशी अठरा शो, शनिवार रविवारी.
सोमवार पासून कुठे १४ ते कुठे १० शोज दिसत आहेत.
इंड्यातल्या थिट्रांची कल्पना
इंड्यातल्या थिट्रांची कल्पना नाही पण इथे कॅनडात आज उद्या परवाच्या सगळ्या शोजच्या फक्त पहिल्या एक - दोन रांगा शिल्लक दिस्तायत.>>
आमच्याकडे पण फक्त पहिली रांग शिल्लक आहे. आता पुढच्या विकेंडलाच बघावा लागेल
अरे यार.. ईथला माहौल बघून तर
अरे यार.. ईथला माहौल बघून तर आता मलाही जावेसे वाटू लागलेय.. प्लीज उद्या जावा लोकही आणि लवकर रिव्यू टाका.. मग मी रविवारी जमवतो..
इकडं एका थेट्रात पाच सातच शोज
इकडं एका थेट्रात पाच सातच शोज आहेत, दुसर्यात १० एक असतील. आणि ज्या स्क्रीन वर लागतो त्या स्क्रीन पण मोस्टली इंड्याच्या मानाने अगदीच बारक्या असतात. पण आमच्या गावची लोकसंख्याच जेमतेम १० लाख असेल. त्यात साउथ एशिअन ५% म्हणजे ५०,००० असतील/ नसतील. आणि गावाचा आकार बघितलात तर मुंबईच्या पाच पट मोठा असेल. जनरली देसी पिक्चरला अजिबात गर्दी नसते. थेट्रात चार टाळकी दिसतात. त्यामानाने हाऊसफुल फारच मोठी गोष्ट आहे.
काश्मीर मध्ये बऱ्याच
काश्मीर मध्ये बऱ्याच वर्षानंतर हाऊसफुल बोर्ड लागलाय म्हणे....
साऊथ इंडियन चे बॉलिवूड संपवायचे स्वप्न भंग होणार... शाहरुख एकटा उभा आहे ... असेल हिम्मत तर रोकके दिखावो म्हणत... बेशरम रंग सिन न काटता ... बॉयकॉट गॅंग फक्त ट्विटर वर असते.. रियल लाईफ मध्ये शाहरुख फॅन च आहेत...
बघितला पठाण
बघितला पठाण
सगळ्यात मज्जा सलमान च्या एन्ट्री वर आली.... पैसा वसूल
.
.
>>>
अगदी अगदी.. च्रप्स
ओनली शाहरूख कॅन सेव्ह बॉलीवूड
थेट्रात चार टाळकी दिसतात.
थेट्रात चार टाळकी दिसतात. त्यामानाने हाऊसफुल फारच मोठी गोष्ट आहे. >>>
सेम. आमच्या इथल्या दोन AMC मध्ये हि फक्त आज (शुक्रवार) दुपारी अडीच चा शो रिकामा दिसतोय.
उद्या / परवा चे शो जवळपास फुल्ल आहेत.
आज पठाण ला जाते आहे आत्ता
आज पठाण ला जाते आहे आत्ता अर्ध्या तासात
आल्यावरती सांगेन.
शेवटची अक्षरक्षः शेवटची २ तिकीटे मिळाली. न्यु जर्सीत तूफान इन्डियन पब्लिक आहे व पाकिस्तानी.
-----------
अर्ध्या तासात असलेला शो फुल्ल आहे. ९:४५ च्या रात्रीच्या शो ला जातेय.
डेली मेल वाल्यांनी पण लिवलंय
डेली मेल वाल्यांनी पण लिवलंय कि बॉलीवूडच्या वन अॅण्ड ओन्ली भाईजानच्या एंट्रीला ब्रिटीश पब्लीक शिट्ट्या मारून थेटर डोक्यावर घेतं. भाईजानची बातच न्यारी. वेड सुद्धा भाईजानच्या कॅमिओ अॅपिअरन्समुळे धो धो चालला आणि आता पठाण सुद्धा.
वेडमधेही भाईजानने सूक्ष्म नृत्य केलंय. तेव्हढ्यावरच ५० करोडचा धंदा !!
ईदला माझ्यातर्फे "भाईजान" च्या रिलीजला माझ्यातर्फे मोफत वाटप !!
सूक्ष्म अभिनयाच्या जोरावर
सूक्ष्म अभिनयाच्या जोरावर सिनेमा चालवतात ?
ट्युबलाईट मध्ये तर भाईजान चा भव्यदिव्य अभिनय होता तरी सिनेमा आपटला ! >>> भाईजान या वेळी मानवी अवतारात आहेत. जर सगळेच सिनेमे सुपरहीट झाले तर पब्लिकला संशय येईल.
स्वतः भगवान कृष्णाने सुद्धा पायाचा अंगठा व्याधाच्या बाणासाठी मोकळा ठेवला होता. प्रभू श्रीरामांनी सुद्धा आपल्या चरित्रात टीकेला जागा ठेवली. ख्रिस्ताला सुद्धा क्रूसावर लटकवता आले. बुद्धाला सुद्धा विषबाधा झाली.
कारण यांना आपण आत्ता अवतार घेतलाय याचे भान होते. मानवी अवतारात चमत्कार करून चालत नाही.
#ओनली_शाहरूख_कॅन_सेव्ह
#ओनली_शाहरूख_कॅन_सेव्ह_बॉलीवूड
शुक्रवारचे बॉक्स ऑफिस आकडे आले का लोकांनो?
शाहरूखला सुद्धा भाईजानने
शाहरूखला सुद्धा भाईजानने तारले.
भाईजान तुस्सी ग्रेट हो !
लाईनीत या लाईनीत या..
लाईनीत या लाईनीत या..
सर्वांना श्रेय मिळणार पठाणच्या यशाचे
तीन दिवसातच हि परीस्थिती.. पिक्चरच्या यशाचे श्रेय लाटायची धडपड
लोकहो आजपासून जोपर्यंत पिक्चर थिएटरात आहे तोपर्यंत मी रोज पठाणची १०१ तिकीटे वाटणार आहे..
मेरा सपना... सब के दिलों मे शाहरूख अपना
फक्त धक्काबुक्की नको.. चेंगराचेंगरी नको.. लाईनीत या लाईनीत या
Pages