पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे शाखा भक्त आहे असे म्हणवतात त्यांनी सिनेमा पाहिलेला नाही ते लाईनीत नाहीत. ज्यांनी पाहिलाय त्यांनी सलमान खान मुळे पाहिला हेच सत्य आहे. भाईजानच्या भक्तांना धागे काढावे लागत नाहीत, निरोप द्यावा लागत नाही कि बॉयकॉट मार्केटिंग करावं लागत नाही.

सिर्फ नाम ही काफी है ..... भाईजान दबंग खान !
स ल मा न खा न !

मला अजून एक सिन आवडला तो म्हणजे ट्रेन वरची मारामारी झाल्यावर सलमान आणि शाहरुख कंबर दुखते टाईप काहीतरी बोलत असतात ....
नशीब त्यांना जाणीव झालेली दाखवलीय की आपण आता म्हातारे झालो...

दीपिका मला अचानक खूप ह्युज वाटू लागली सिनेमात.. आणि आधीसारखी सुंदर ही वाटली नाही.... मला आवडते ती पण चेहऱ्याचं काहीतरी केलंय का तिने????

Collection from Pathan Day 1 – 104.8 crores (worldwide) = 70 Cr. from India + 34.8 Cr. from Globally

Collection from Pathan Day 2 – 125 crores (worldwide) = 85 Cr. from India + 40 Cr. from Globally

Collection from Pathan Day 3 – 116 crores (worldwide) = 82 Cr. from India + 30 Cr. from Globally

कोणीतरी टोटल मारा रे Happy

आकडेरत्न खात्रीचे आहेत का ?
पठाणांचं कामच कलेक्शनचं असतं. करीम लाला !
तरी पण यापेक्षा जास्त कलेक्शन माजी गृहमंत्री एकट्या मुंबईतून करायचे.

पठाणमय
छान शब्द च्रप्स...

आज फेसबूक चेक केले तर आता चित्रपट बघायला जाणाऱ्यांना देशद्रोहीचे लेबल लावले जात आहेत. त्यांच्या अभिरुचीला नावे ठेवली जात आहेत.
एकीकडे खुद्द अमरीकेत राहणारे भारतीय हा चित्रपट एंजॉय करत आहेत. तर दुसरीकडे भारतात राहणारे काही शाहरूख हेटर्स आम्हाला बाबा हॉलीवूडची ॲक्शनच आवडते म्हणून गळे काढत आहेत Proud

त्यांचा असा प्रयत्न आहे- .. एखाद्याला खरेच पठाण बघायचा असेल तर त्याला भीती वाटू शकते... पण आता पब्लिक हुशार आहे... पोकळ धमक्या कळतात...
आमिर चा चड्ढा असाच खड्यात घातला होता...
आता मी वाट बघतोय आपले प्रिय मोदीजी कधी कौतुक करून टॅक्स फ्री चा आदेश देतायत याचा...

टॅक्स फ्री होणे अवघड आहे.
ईतका टॅक्स मिळवून देणार आहे हा चित्रपट की एखाद्या शहरात मेट्रोचे जाळे विणता येईल, भारतातील दोन प्रनुख शहरांना बुलेट ट्रेनने जोडता येईल आणि उरलेल्या पैश्यात एखाद्या गावाची स्मार्टसिटी करता येईल.
एवढा विकास जर होणार असेल तर नाही केले तरी चालेल टॅक्स फ्री. आम्ही बघू हा चित्रपट देशासाठी..

ओय होय!!! जॉन अब्राहम - पैस्सा वस्सुल!!
मस्त अ‍ॅक्शन. जॉन काय दिसतो यार!! शाहरुख & सलमान ह्म्म्म!!! ओके ओके.
दीपिकाचे स्नेक इयररिंग्ज आवडले. बॉडी तर हॉट्ट!!
-------------------
शाहरुखच्या एन्ट्रीला शिट्ट्या मारतं पब्लिक. सलमानच्याही.
-----------
तू है मेरी कॅरेन!!! क-क-क-क कॅरेन ला इतकी हसले ना.

आत्ताच आलो बघून. पैसा वसूल करमणूक एकदम. मजा आली. मला ते जॉन आणि सलमान बिलमान नै सारुकच आवडला. रॉ आणि आयेसाय ते पण सिरीयसली घेत नाहीत तर आपण कशाला लोड घ्या! त्यात शारुक टायमिंग साधत भारी पीजे मारतो काही काही. टंग इन चीक का कायसे. काय फायटिंग आणि काय चेस ... त्या अशा भारी असतील तर मग आम्ही पण विदेशी चित्रपटांत जसं लॉजिक न लावता मन लावून बघतो तसं बॉलिवूड बी बघूच की!
टोटल मजा आली.
आमचं थेटर हाऊसफुल्ल! इकडे कोणी शिट्ट्या वगैरे नाही मारल्या, आणि नाच वगैरे नाही केले. के(कि)रन च्या जोक ला मात्र जाम हसू आलं.

इकडे कोणी शिट्ट्या वगैरे नाही मारल्या, आणि नाच वगैरे नाही केले. >>>>>>>>>>

माझे तेच म्हणणे आहे !
पडद्या समोर डान्स करणे चुकीचेच आहे , चौकात dj लावून नाचा ना !

हे फोर डी एक्स काय आहे?

हजार हजार रुपयांची तिकीटे आहेत आणि पहिल्या रांगेपर्यंत फुल्ल आहेत.

IMG_20230128_131622.jpg

4 डी मधे पडद्यावर मारामारी चालू असते तेव्हा आपल्याला फटके देण्यासाठी बॉडीबिल्डर माणूस तैनात केलेला असतो.

दोन वर्षापूर्वी टॉम क्रुझ चा कोणतातरी मूव्ही बघताना खुर्ची खाली बॉम्ब फुटल्याचे अनुभव यायचे ,
रणगाडे चाललेले असताना खुर्च्या देखील घरररररर करायच्या !
एकदा तरी ४डी एक्स अनुभव घ्यावाच ..

माझे तेच म्हणणे आहे !
पडद्या समोर डान्स करणे चुकीचेच आहे , चौकात dj लावून नाचा ना ! >> क्या मामु, बिकीनी वरुन एकदम डिजेवर आला?

एकदा तरी ४डी एक्स अनुभव घ्यावाच .. >>> कडक रोमान्स असलेली फिल्म बघायचीय ४डी एक्स मधे.

युनिव्हर्सल स्टुडिओज, कॅलिफोर्नियाला २००३ मध्ये ४-डी चा अनुभव घेतला होता. पैकी असा एक लहान लहान उंदरांचा कळप आपल्या वरती तुरुतुरु चालून येतो आणि ते आपण ३ डी त पहात असताना, पायाखाली त्या<नी असे २ -३ वार्‍याचे (हवेचे) झोत सोडलेले होते.
आई ग्गं अक्षरक्षः असे वाटते की पायाच्या आसपास उंदीर धावतायत. आपण किंचाळून पाय वर घेतोच.

ॲक्शन सीन फाईट सीन सगळे एकाहून एक कै च्या कै आहेत. पण ते खटकत नाहीत कारण दिग्दर्शकाचा त्यावर विश्वास आहे. आपल्याकडे आता पावेतो त्या सीन चे रिटेक, त्यावेळी विचित्र मुझिक, परत परत क्लोजअप असलं काही करून ते मेलोड्रामा सीन करून टाकायचे. ते यात पूर्ण टाळून सीन वर विश्वास दाखवला आहे. आणि त्यामुळेच आपण ही टेक इट फॉर ग्रांटेड करून सहज पुढे जातो. आणि सिनेमाचा वेग कायम रहातो. तो रेंगाळत बसत नाही.

पठाण शोलेचा विक्रम मोडणार बघा. पठाण ला थेटरातून काढायचा विचार जरी कोणी केला तरी त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागेल बघा.

Submitted by वीरु on 21 December, 2022 - 00:05>>
आम्ही आधीच भविष्य सांगितलं होतं.

ब्रेक संपल्यावर छोट्टासा माहितीपूर्ण लेख वाचा.
https://www.thehindubusinessline.com/data-stories/why-screens-and-seats-...

मराठी सिनेमे का सुपरहिट होत नाहीत या दुखण्याचं मूळ समजू शकेल. महाराष्ट्रात चांगल्या चाललेल्या वेडच्या स्क्रीन्स कमी झाल्यात. मागेही माऊली चांगला चालला असताना सलमानच्या कुठल्या तरी रीलीजसाठी तो थांबवला होता.

अरे हो सामो, तुम्ही, अमितव आणि म्हाळसा, आपले सर्वांचे विशेष आभार. तुमच्या सकारात्मक रिव्यूमुळे चेन्नई एक्सप्रेस आणि डिअर जिंदगीनंतर एक शाहरूखपट थिएटरला बघायला जातोय Happy

>>>>>>>>हो सामो, तुम्ही, अमितव आणि म्हाळसा, आपले सर्वांचे विशेष आभार.
तुमचेच आभार. इथे वातावरण्निर्मिती केल्याबद्दल. काल मी नवर्‍याला म्हटलं ना की पाहूच- पाहूच वगैरे उत्साहात. तर तोही खूष झाला. कौतुकाने. कारण सिनेमांबाबत मी प्रचंड उदासीन, अन-आग्रही व निरुत्साही असते तो बिचारा एकट नेटफ्लिक्स, प्राईम, हुलू हे अन ते करत बसतो. मधे मधे मला म्हणतो "कंपनी दे. सिनेमा पहाणे ही सोशल अ‍ॅक्टिव्हीटि आहे" वगैरे Happy पण मी दाद देत नाही.

तर काल मी आल्यावरही -
बाकी सब भंगार है
अपना जॉन अंगार है " वगैरे गात बसलेले. तो म्हणाला तुमच्या फोरम वरती दीपिकाचे कौतुक करुन ये माझ्यातर्फे Happy
एकंदर मस्त गेला आमचा शुक्रवार.

वाह !

कंपनी दे. सिनेमा पहाणे ही सोशल अ‍ॅक्टिव्हीटि आहे"
>>>>
हे मात्र अगदी खरे.
चित्रपट पाहणे आणि मग त्यावर चर्चा करणे दोन्हींना हे लागू. याचसाठी असे चर्चेतले चित्रपट पहिल्याच आठवड्यात बघायचे असतात. मग त्यावर चर्चेचाही आनंद लुटता येतो Happy

आत्ताच पाहून आले. मज्जा आली! एन्टरटेनिंग होता मूव्ही. शारुख मला आवडतोच. पण ट्रेलर मधे नव्हता आवडला म्हणून शंका होती , फार अपेक्षा न ठेवता गेले. पण त्याचे टिपिकल एसार्के ह्यूमर मोमेन्ट्स, वन लायनर्स आहेत. दीपिका आणि हो जॉन पण स्मोकिंग हॉट दिसलेत. अ‍ॅक्शन सीन्स स्पेक्टॅक्युलर , एकदम हॉलिवुड लेवल. त्यामुळे थोडे लॉजिक बाजूस ठेवता येते.
बर जाणार्‍यांनी एन्ड क्रेडिट् पर्यन्त नक्की पहा. त्या झूमे पठाण गाण्यानंतर एक फार भारी सीन आहे Happy आधी बघितलेल्यांनी प्लीज सांगा तुम्ही तो मिस केला नाही !!
इथे २ चा शो अल्मोस्ट फुल होता, म्हणजे फक्त पहिल्या दोन रो शिल्लक होत्या.

Pages