पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथलीच एक कॉमेंट

Another lame attempt by boycott gang...

Second video is from Eid and from promotion during MY NAME IS KHAN movie.

So no relevance at all in the context it has been uploads here.

मला तर हे लिहायची गरजही भासत नाही.
हास्यास्पद वाटला तो विडिओ
मला अश्या विषयावर चर्चा करायलाही आवडत नाही. निरर्थक वाटते Happy

मी तरी सारुक बद्दल वाईट कशी लिहिलंय का ?
लिहिले तर कॉमेंट्स उडणारच ना ? Happy
उलट गरजे वेळेनुसार विचार बदलण्याच्या त्याच्या कृतीला पाठिंबाच आहे.

पूर्वीच्या नायिका अंगभर कपडे घालून अशा रोमँटिक भावना व्यक्त करायच्या की . >>>>>>>एक फार जुने मराठी गीत पाहिले होते, गाण्यात हिरो हिरोईन पाण्यात पोहत उरलेले गाणे गातात व शेवटी हिरोईनीचा ब्लॉउज व हिरोची चट्टेरी पट्टेरी प्यांट पाण्यात एकत्र येते। हि रोमान्स व्यक्त करायची कोणती पद्धत ?????

Amazon नी १०० कोटी ल पठाण चे ott वर दाखवण्याचे अधिकार घेतले आहेत.
१०० कोटी गुंतवत आहेत म्हणजे cinema इतका पण वाईट नसणार

सेन्सॉर बोर्डाने पठान मधील आक्षेपार्ह दृश्य वगळायला सांगितली आहेत म्हणतात !
दीपिका , सारुक ला जर त्या गाण्यातील बिकनीत अश्लीलता दिसत नाही तर सेन्सॉर ला कशी दिसली ?
हा ! येथील बऱ्याच स्वयंघोषित फेमिनिस्ट ना पण दिसली नव्हती हा भाग वेगळा .
वाद सुरू झाला तो बेशरम रंग गाण्यात भगवा रंगाची बिकनी वापरल्यामुळे .
यावर एक रामबाण उपाय होता !
त्या गाण्यात हिरव्या बिकनीत जायरा वासिम ला घ्यायला हवं होत . म्हणजे राईट विंग वाल्यांनी पठान ला ban केले नसते आणि कट्टर मुस्लिमांच्या सहनशीलतेचे कौतुक झाले असते .

जगप्रसिद्ध चिन्मय मंडलेकरच्या बहुचर्चित भव्य खर्चिक नथुराम चित्रपटाच्या समोर स्थानिक पातळीवरचा पठाण रिलीज करायची घोडचूक गल्लीस्टार शाहरूख ने केली आहे. आता तर सरळच भगवा विरूद्ध हिरवा युद्ध होणार. कोणता रंग जिंकतो ते कळेलच.
( भगवे चोप्राज सपशेल तोंडघशी पडले तरी हिरवा शाहरूख खान चेक घेऊन जाणार आहे).

20230106_062946_0.jpg
डायलॉग मध्ये देशाला उद्देशून श्रीमती भारत ?
भारतमाता म्हणायला लाज वाटते ?
यांनी यांचा धर्म सांभाळून डायलॉग बोलायचे आणि इतर धर्मियांनी स्वतःचे पैसे खर्च करून खानावळ चे सिनेमे पाहायचे ?

अक्षयकुमार चे रॉ एजंटचे पात्र असलेले किमान पाच सिनेमे पाहिलेत ज्यात रॉ किंवा आयबी असे उल्लेख आहेत. कहानी मधेही आहे. वेबसिरीज मधे पण आहे.

जाऊ द्या, ते चोपडाज आणि सेन्सॉर बोर्ड आपसात बघून घेतील. पोलिसांनी अडवले तर कागदपत्रे दाखवून किंवा चिरीमिरी देऊन आपण सटकतो. कोर्टबाजी करत नाही.

त्या गाण्यातील अश्लीलता आणि श्रीमती भारत सोडले तर सेन्सॉर बोर्डाचे बाकीचे ऑब्जेक्शन फालतू वाटतात ....

कागाळूसर , पुन्हा एकदा तुमचं footinmouth.png
मिसेस भारतमाता आहे ते.. मिसेस भारतमाताचं हमारी भारतमाता असं केलं असं म्हटलंय त्यात.

भुरटे सराना मिसेस / श्रीमती भारतमाता मान्य असेल तर त्यांची मेंदू साफ करून घ्यायची वेळ आलेली दिसतेय ....Screenshot_20230106_132441_Google.jpg

कागाळू सर, वर तुम्हीच काय लिहिल़य ते वाचा. मग तुमचा मेंदू शोधायला जा.

श्रीमती शब्द शिवी आहे का?
'वीर' सावरकरांनी स्वत़ंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची असं लिहून ठेवल़ंय.

https://youtu.be/huxhqphtDrM
बेशरम रंग
आजही हे गाणे वरचेवर ऐकतो मी. १८० मिलिअन व्यू झाले. अजूनही दिवसागणिक वाढत आहेत. बरेच लोकं ऐकत असतील. एक सॉफ्ट नशा आहे गाण्यात. उगाच नको त्या गोष्टींमुळे चर्चेत आले. आणि आता कोणाला हे ऐकायला आवडत असेल तरी कबूल करणे अबघड असे झालेय. पण आकडे बोलके आहेत..

हे गाणे नंतर फार बोअर झाले मला, दुसरं तर बघवलं पण नाही. त्यापेक्षा गो गो गोलमाल चांगलयं. मी बेशरम रंग सोडून देऊन 'ठुमकेश्वरी' बघतेयं. क्रिती सॅनन फारच सुंदर वाटते. बॉलीवुडचा ठेका व ठुमका दोन्ही आहे. बघा मित्रांनो.
https://www.facebook.com/watch/?v=5951427144915262&extid=CL-UNK-UNK-UNK-...
हे अशोक सराफचे मीम बघा. ममव व्हर्जन ऑफ बेशरम रंग. हहपुवा आहे. खास फनहितार्थ !!! Proud

Web page not available
शाहरूखच्या शत्रूंनी गेम केला की काय..

हो अर्थात दिसतेय म्हणून शेअर केलेय.. पण मला ते क्षणभर ब्लिंक होते आणि मग नॉट अवेलेबलचा बोर्ड झळकतोय.. बघूया आणखी कोणाला दिसते का.

हे गाणे नंतर फार बोअर झाले मला, दुसरं तर बघवलं पण नाही. >>> सहमत.
बेशर्म रंग हे गाणं दोन ते तीन गाण्यांची ढापाढापी आहे असे वाटते ऐकताना. कोणती गाणी हे आठवले नाही. त्यासाठी ते पुन्हा ऐकण्याची तयारी नाही. रेकॉर्डिंगसुद्धा फ्लॅट झाले आहे. कजरा रे गाणं आत्ता ऐकलं तर आवाज फ्लॅट वाटतो तसंच.

Pages