पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्यावर द कश्मीर फाईल्सचा उल्लेख आला नाही. कॅज्युअल अ‍ॅप्रोच म्हणावा कि निष्काळजीपणा ?
( आला असेल तर सबंधितांची सपशेल माफी )

भुरटे सर , तुम्ही माबो वरील कर्तुत्व सिद्ध नारद मुनी .
मान्य आहे की कोणत्याही धाग्यावर कसल्याही रंगाच्या पिंका टाकण्याचा अगोचरपणा करण्याचा हक्क तुम्हाला आहे तरीपण ............

31 डिसेंबर कसा साजरा करणार?
हा धागा कसा काय आला नाही अद्याप?

पठाणच्या नवीन गाण्याची लिंक हे कदाचित विषयांतर ठरू शकतं. सापळा लावलाय.

31 डिसेंबर कसा साजरा करणार?
हा धागा कसा काय आला नाही अद्याप?>>>>>>> नको नको नको ( भयचकीत होऊन सैरावैरा पळत सुटलेली बाहुली )

मग तो साजरा कसा केला, याचे आणी त्यातल्या डान्सचे पण व्हिडीओ येतील. या वेळी केसावर फुगे च्या ऐवजी मग बघतोय किंवा मला आमदार यावर डॅन्स असतील. गेला बाजार चंद्रा वर नाचतील.

https://www.youtube.com/watch?v=R08AmAUjyAc

चावट आहेत अभिनेत्री मंडळी.
शरीर हेचं मुळ भांडवल समजून त्याचा वापर करतात.
अभिनय हा फक्त तोंडी लावण्यासाठी आहे.
पूर्वीच्या नायिका अंगभर कपडे घालून अशा रोमँटिक भावना व्यक्त करायच्या की .
"तिर निशाणे पे ही लगता था "
आताच्या अभिनेत्री नी पूर्ण कपडे उतरवले तरी तो परिणाम नाही.
आदर आणि रोमँटिक भावना एकत्रित व्यक्त करण्याची कुवत पहिल्या अभिनेत्री मध्ये होती.
आताच्या फक्त भावना चाळवावतात.

चावट आहेत अभिनेत्री मंडळी. >> आपण लक्ष देऊ नये. ज्या प्रमाणे मायबोलीवर आपले प्रतिसाद इग्नोर करतात त्याच टुकीने अभिनेत्र्यांनी काहीही नेत्रदीपक केले तरी डोळे झाकून घ्यावेत. आपण आपले सत्त्व काहून सोडावे ?
मी तर नक्कीच सोडले नसते. पण काय आहे ना राहवत नाही. त्याशिवाय बिकिनी कुठल्या रंगाची कसे कळले असते ?

पठाणचे दुसरे गाणे बोअर आहे.
तरीही एका दिवसात २४ मिलियन व्यू आहेत आणि १.४ मिलिअन लाईक्स आहेत.
शाहरूखची जादू म्हणावे का याला?

मला पर्सनली ते गाणे वरून धवन कम टायगर श्रॉफ छापाचे वाटले.
शाहरूख तरुण कलाकारांच्या पोटावर पाय देतोय का?

आउटडेटेड म्युझिक, भगार अतिसामान्य लिरिक्स, त्यापेक्षाही अ‍ॅव्हरेज कोरियोग्राफी , मुव्ही सुपरफ्लॉप असल्याची लक्षण म्हणावी का?

>>>>>>>.पूर्वीच्या नायिका अंगभर कपडे घालून अशा रोमँटिक भावना व्यक्त करायच्या की .
"तिर निशाणे पे ही लगता था "
आताच्या अभिनेत्री नी पूर्ण कपडे उतरवले तरी तो परिणाम नाही.

पूर्वी आपण तरुण होतो व आता ..... Wink असेही असू शकतेच की.

Lol

सरकारने पंधरा वर्षानंतर (अजून पाच वर्षे जास्तीत जास्त चालवून) गाडी भंगारात काढा आणि नवीन घ्या असा कायदा बनवलाय.

आमच्यावर असल्या दृश्यांचा परिणाम होत नाही अशी जाहीरात करणारेच जास्त बिकिनी चघळत बसलेत. इतकेच नाही तर कुठल्याही धाग्यावर कधी "विषयांतर" होऊन "विषयावर" यायची संधी मिळते याची वाट न बघता सरळ धागा "विषयाकडे" कसाही नेण्याचे कौशल्यच काही जणांच्या अंगात असते. आव तर असा आणतात कि बस्स...

अरे हम तो फकीर है, कभी भी चोली उठा के चले जाएंगे

दुसरे गाणे आले हे इथे कळल्यावर लगेच यु ट्युबवर पाहिले, उगीच आपल्याकडुन महत्वाचे काही सुटायला नको Lol

शाहरुख थकलेला वाटला, चेहरा तर बघवत नाही.. अर्थात पडद्यावर वय बोलतेय, एनर्जीच नाही कशात.. दीपिका छान दिसलीय,बेशरम रंग मध्येही छानच दिसलीय पण तिला दिलेल्या मुव्ह्ज खुप चीप वाटल्या.

Pages