Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओडिनला लवकर बरे वाटू देत.
ओडिनला लवकर बरे वाटू देत.
आमच्या हॅरीने पराक्रम करून ठेवलाय. रविवारी घरी हळद कुंकू होत. पाहुण्यांना देण्यासाठी मोतीचुर लाडू आणलेले. ते आतल्या खोलीत ठेवून दिलेले टीपोयवर..
हा आमची नजर चुकवून पटकन आतल्या खोलीत गेला आणि गपगप १०लाडू मटकवले. बाबा नेमके त्या खोलित गेले काही कामानिमत्त. बघतात तर मस्त लाडू मटकावतो आहे.
त्यांनी ओरडुन अकर्क्ष खेचत बाहेर आणलं त्याला . ऐकतच नव्हता.
बाहेर आणल्यावर नवरा रागावला त्याच्यावर पण हॅरीला काही फरक पडला नाही. तो आपला नवी चव मिळाली त्या खुशीत.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लाडवानी आपले प्रताप दाखवले. हॅरी काही खाईना पियीना. चिकन, किबलस्, गाजर सगळे देऊन झाले . कसलाही तोंड लावायला मागेना. बाहेर जायलाही अनुत्सुक. गेला तरी मरगळ करत. मान टाकून झोपणे एवढंच दिनक्रम. दीड दिवस असच चाललेलं. शेवटी धास्तावून आम्ही त्याला वेट कडे नेल.
तिथे डॉक्टरांनी पंक्रियाला २ % सूज आलीय अस निदान केलं. काही औषध दिली. आणि कुत्रे अश्यावेळी लंघन करतात असेही सांगितले. अजून तीन ते चार दिवस तो असाच उपाशी राहील. नंतर हळूहळू सावरेल अस सांगितल.
आता औषध दिल्यापासून किंचित फरक पडलाय. डॉक्टरांनी फक्त दही द्यायला सांगितलं आहे ते थोडे खाऊ लागलाय .
पण सतत उड्या मारणारा हॅरी झोपून राहतोय, जेवणाला तोंड लावत नहीं हे बघणे त्रासदायक आहे.
अरे देवा, चांगलाच उद्योग झाला
अरे देवा, चांगलाच उद्योग झाला की हा
10 लाडू म्हणजे गोडाचा मेजर डोस गेला की पोटात
व्हेट कडे लवकर नेले ते बरे झाले
दही बेस्ट उपाय आहे, त्याला बाहेर नेत असाल तर तो गवत, पाने पण खातोय का बघा
ओड्या पोटात काही गडबड झाली की मनमुराद पाला चरतो आणि ओकून बाहेर काढतो सगळं
त्यावरून आठवलं, मी ओड्या नेहमी खातो त्या पानांचा फोटो काढला आहे, माझं निरिक्षण असे की खूप पळल्यावर, दमल्यावर, पोहून झाल्यावर तो ही पाने खातो
इतर कुठल्याही झाडाची नाही, हीच स्पेसिफिक
आणि आम्ही जिथं जातो फिरायला तिथे काही विशिष्ट ठिकाणी आहेत, ती त्याला माहिती झालीयेत
बरोबर तिकडे जातो आणि किती दमलाय त्यानुसार कमी जास्त प्रमाणात
आणि लगेच रन किंवा वॉक सुरू करतो
ही पाने कशाची आहेत याचे मला कुतूहल आहे
मीही एक पान खाऊन पाहिलं
मला वाटलं त्यात एनर्जी देणारे किंवा घसा कोरडा पडल्यावर बरे वाटणारे काही तरी असेल, मला असे काही वेगळं जाणवलं नाही
हो आशू
हो आशू
बाहेर गेल्यावर पानं चरत असतो. पण आम्ही घाबरून जास्त खाऊ देत नाही , अजून दुसर प्रकरण नको म्हणून.
व्हेटला विचारून निर्णय घ्या,
व्हेटला विचारून निर्णय घ्या, पण मी अनेकांकडून ऐकल आणि इव्हन डॉग केअर फोरम वर देखील वाचलं आहे की ते त्यांचा इलाज स्वतच करतात बरेचदा. आणि ओड्याच्या बाबतीत अनुभवले देखील आहे. त्यांच्यात ते नॅचरल इन्टिक्ट असते. तो घाण, कचरा काही खात नाही इतकचं बघा, पाने, गवत खाउ द्यायला हरकत नाही.
हे ओड्याचे आवडते रोपटे आणि
हे ओड्याचे आवडते रोपटे आणि पाने, यातली बरीचशी त्याची खाऊन झाली आहेत, त्याला हुसकावून शेवटी फोटो काढता आला
त्यांचा इलाज स्वतच करतात
त्यांचा इलाज स्वतच करतात बरेचदा
हो, डॉक्टरांनी पण तेच सांगितल.
पाने, गवत खाउ द्यायला हरकत नाही.
>>>> होय
माझ्या मैत्रिणीच्या गोल्डन
माझ्या मैत्रिणीच्या गोल्डन रिट्रिव्हर लेकीनं असाच पराक्रम केला गेल्या आठवड्यात. काजूकतली खाल्ली. त्या रुममध्ये पोरं पण होती त्यामुळे नुडल्सनं किती मटकावल्या आणि पोरांनी किती याचा हिशेब नाही पण ते खाल्ल्यावर लगेच आनंदानं म्हणा की शुगर-रशनं ती एवढी हायपर झाली की चार हायस्कुलर पोरं तिच्याशी खेळून दमली
@जाई ---> गवतीचहा तुमच्या इथे
@जाई ---> गवतीचहा तुमच्या इथे मिळत असेल तर थोडा देऊन बघा किंवा मग दुर्वा खातोय का ते बघा. शक्यतो कुत्री पोट बिघडले कि त्यांचा त्यांचा इलाज करतात पोटासाठी वरील दोन्ही गोष्टी उत्तम. तसाच एक दोन दिवस जरा लंघन करू द्या आणि दही भात द्या.
भारतात असतांना माझा कुत्रा पोट बिघडलं तर गार्डन मधील गवतीचहा किंवा दुर्वा खायचा आणि १-२ दिवसात ठणठणीत
पाती चहाची पात जरा धारदार
पाती चहाची पात जरा धारदार असते क्वचित. तेवढे सांभाळा.
आमच्याकडे अजून एक आगमन .....
आमच्याकडे अजून एक आगमन ..... मुलीला रस्त्यात दिसले हे पिल्लू ... लोकांच्या मागेमागे करत होते . ते बघून हिला वाईट वाटले आणि मग ती घरी घेऊन आली . एक दिवस ठेव आणि नन्तर शेल्टर मध्ये दे अशा बोलीवर हे पिल्लू घरात आले. मग दुसऱ्या दिवशी ... आता राहू दे हे पिल्लू ... अशी मागणी आली ... मग त्यावरून माझे आणि तिचे जोरदार भांडण ... पण शेवटी नको ते झालेच ... मी प्रेमात पडलेच
आता गेल्या २५ दिवसात हे पिल्लू आता घरातील एक झाले आहे.
एलोन ने अजून पूर्णपणे हे स्वीकारले नाहीये ... पण होईल
इंडी डॉग आहे.... फिमेल ... नाव लाना
घरात आली तेंव्हा खुप अशक्त आणि अंडरनरिश होती ... आता टुणटुणीत झाली आहे

अभिनंदन
अभिनंदन

We parents never win against kids in such situations.. अनुभव आहे मला पण..
याच कारणास्तव मी पण स्वतःला एका मांजराकडून पाळून घेतले आहे
स्वतःला एका मांजराकडून पाळून
स्वतःला एका मांजराकडून पाळून घेतले आहे >>

लाना चे स्वागत! क्यूट आहे. एलॉन आणि तिचे पटते की कसे याच्या गमती जमती येऊ द्या!
लाना खूप क्यूट आहे.एकदम गरीब
लाना खूप क्यूट आहे.एकदम गरीब दिसतेय,पण ही वस्ताद होईल.
>>>>>>>>याच कारणास्तव मी पण
>>>>>>>>याच कारणास्तव मी पण स्वतःला एका मांजराकडून पाळून घेतले आहे Happy
हाहाहा
लाना गरीबडं दिसतय गं!!
क्युट आहे लाना.
क्युट आहे लाना.
कसलं क्युट
कसलं क्युट
माबो फॅमिलीत स्वागत लाना
इंडी डॉग खूप प्रेमळ असतात आणि त्यांना अगदी थोडस प्रेम दिल तरी त्यांना खूप वाटतं
आपले हे लाडोबा ब्रीड वाले हक्काने सगळं वसूल करतात
मलाही एक इंडी डॉग आणायचं आहे घरी, पण घरचे ऐकत नाहीयेत
स्वतःला एका मांजराकडून पाळून घेतले आहे>>>

हे भारिये
लाना किती गोड आहे.
लाना किती गोड आहे.
कसलं क्युट आहे ... माबो
कसलं क्युट आहे ... माबो फॅमिलीत स्वागत लाना
ओड्याचा आजचा किस्सा
ओड्याचा आजचा किस्सा
त्याला पोहायला नेलं कॅनॉलवर. पोरगाही आला होता सोबत. त्याला म्हणलं फार वेळ नको याला दमवायला, १५-२० मिनिटे खेळू दे पाण्यात, जास्तीत जास्त अर्धा तास मग बाहेर यायला लावू.
त्याप्रमाणे आम्ही बाटली फेक खेळलो. तोही उत्साहाने पोहत जाऊन फेकलेली बाटली आणत राहीला. अर्ध्या तासानंतरही त्याला खेळायचं होतंच. पोराला म्हणलं अशी टाक बाटली की त्याला आणताच येणार नाही. त्याने जोर लावून फेकली ती गेली पलिकडच्या काठावर. ओड्या गेला मोठ्या तडफेने आणतोच आता ही बाटली म्हणून. पण त्याला कितीही प्रयत्न केला तरी पलिकडच्या काठावर चढताच येईना. तीन चार वेळा प्रयत्न केला, पण घसरुन पाण्यात पडला.
मी आपला काळजीने बस आता, राहू दे, गेली ती बाटली म्हणत त्याला परत बोलवत होतो तर पोरगा त्याला अजून चेव आणत होता. काय तू ओड्या बाटली आणता येत नाही वगैरे.
मग ओडयाने हा प्रश्न फारच प्रतिष्ठेचा केला. जिथे वाट मिळेल तिथून घुसुन वरती जायचा चंग बांधला. पण त्याच्याच्याने ते काही जमेना. मी जेव्हा परत ये म्हणून सांगितले तेव्हा तिथे एक झाड होतं त्याची फांदी पाण्याला टेकली होती. ती तोंडाने धरुन तोडून ती आणायच्या उद्योगाला लागला. म्हणलं अरे क्राईम मास्टर गोगो आहेस का, आया हु तो कुछ लुट के जाऊंगा....:)
बाटली नाही मिळाली म्हणून तो फांदी तोडून आणत होता. अर्थात तीही हिरवी असल्याने त्याला तुटली नाहीच. येताना मग जो काही भकास चेहरा केला होता विचारु नका.
आपण एवढे भारी असून आपल्याला काही पण आणता आल नाही याचे दुख चेहऱ्यावर दिसत होते.
अरे वा गोडू ओडू
अरे वा गोडू ओडू
बिचाऱ्याला परफॉर्मन्स प्रेशर आलं
Odin is sincere champ. Give
Odin is sincere champ. Give him one treat for that
Harry's update
Harry is fit and fine now. Eat, pray and love started . All good.
Thank you all from Harry
बिचारा ओड्या..... काय तुम्ही
बिचारा ओड्या..... काय तुम्ही पण त्याच्यावर परफॉर्मन्स प्रेशर टाकताय

काही फोटो असतील तर टाका कि इकडे
ओडिन आणि क्राइम मास्टर गोगो
ओडिन आणि क्राइम मास्टर गोगो
हॅरीची अपडेट वाचून छान वाटले!
लोकांच्या मागेमागे करत होते .
लोकांच्या मागेमागे करत होते .>>>>>
असं काही बघितलं की जीव कासावीस होतो.
वेलकम लाना.. एकदम गोड दिसतेय.
ओडीन परफॉर्मन्स प्रेशर
त्याचं त्यानेच घेतलेले
त्याचं त्यानेच घेतलेले
मी म्हणत होतो जाऊ दे बाटली ये तू, पण नाही महाशय जिद्दीला पेटले होते
आज परत एकदा व्हेट कडे जाऊन आलो, 80 टक्के रिकव्हरी झाली आहे म्हणाले
आता एक दिवस आड गोळी द्या म्हणाले
त्याला अजून थोडी अकटीव्हीटी पाहिजे असेही सांगितले
ओड्या रे ओड्या मस्त किस्से
ओड्या रे ओड्या
मस्त किस्से असतात ओडूचे नेहमीच
लाना क्यूट!
>>>>>>>>याच कारणास्तव मी पण
>>>>>>>>याच कारणास्तव मी पण स्वतःला एका मांजराकडून पाळून घेतले आहे -- हे अगदी बरोबर आहे ... तेच आपल्याला पळत असतात
लाना जाम दंगेखोर आणि आगाऊ झालेली आहे महिन्याभरातच
खरे आहे. शेल्टर मधले बिचारे
खरे आहे. शेल्टर मधले बिचारे गरीब पिलू आणि घरी आणल्यावर लाडावलेले पिलू असे इन्स्टा वर वगैरे बरेच बिफोर आणि आफ्टर फोटो दिसतात, खरोखर इतका जमीन आस्मानाचा फरक असतो ! नूरच बदलतो त्यांचा जरासे प्रेम मिळाले की. खरी पर्सनॅलिटी समोर येते.
लानाचा पण "आफ्टर" वाला क्यूट खट्याळ फोटो येऊ दे आता!!
लानाचा पण "आफ्टर" वाला क्यूट
लानाचा पण "आफ्टर" वाला क्यूट खट्याळ फोटो येऊ दे आता!! >> ++१
आज सिंबाचा सहज काढलेला फोटो,
आज सिंबाचा सहज काढलेला फोटो, आमचं बाळ ११ महिन्याचे झाले
Pages