भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भांडे कुठे आहे म्हणलं तर कळतं, पण फुड कुठे आहे म्हणलं तरी भांडेच दाखवतो. किंवा मग जे समोर असेल ते. एकदा दोन्ही दाखवायला लागल्यावर मी त्यांची जागा बदलली तर आधी जिथें होतं रिकाम्या भिंतीला पंजा मारुन दाखवला हेच ते डॉग फुड >>>> हे फार फनी आहे! Happy
गणितात ढ मुले >> Lol

धन्यवाद, आमच्याकडे खरेच खूप गंमती जंमती सुरु असतात.
आमच्या घराबाहेरच दोन तीन भटकी भुभे आहेत, त्यातला एक काळू आहे आणि एक स्टेला, जिला आम्ही लेडी देवानंद म्हणतो. तर रात्री ओड्याला चक्कर मारायला बाहेर काढलं की काळू येतोच. मग दोघांची थोडावेळ मस्ती चालते. मग मी गेट उघडून ओड्याला म्हणतो, चला बास, आत व्हा.
की काळू लगबगीने आत जातो आणि ओड्या बाहेरच हिंडत असतो.
मग त्यांना नावे घेऊन सांगावं लागतं, ओड्या तू आत जायचं आहे, काळ्या तू बाहेर जायचं.
मग ते ओह, असं म्हणलं होतं का...:)

बरं हे एकदा झालं तरी ठीक, बरेचदा हाच प्रकार कारण काळूला गेटच्या आत काय आहे याचे भयंकर कुतुहल आणि ओड्याला बाहेरच्या वासांचे. त्यामुळे रोजची हाणामारी.

गेट बंद असेल तर जाळीतून दोघांचे हितगुज चालते.

WhatsApp Image 2023-01-05 at 9.54.00 PM.jpeg

ओडींचे दोन्ही किस्से मस्त!

सिंबा काय क्यूट दिसतोय त्या पोजमध्ये!

कोकोनट,गोड आहे.किती बिचारा,गरीब बापडा दिसतोय.

काळू लगबगीने आत जातो आणि ओड्या बाहेरच हिंडत असतो. >>> Rofl अशक्य आहे रे देवा!! त्यांचा फोटो तर अगदी 'कब के बिछडे हूए हम आज यहा आके मिले ' टाईप आहे.

ओडीन Lol
फारच फनी किस्से तुम्ही ज्या पद्धतीने सांगता अजूनच मजा येते वाचायला. डोळ्यासमोर प्रसंग येतो लगेच.

मंकी सॅमीचा बसण्याचा एक टॉवर आहे. त्यात वेगवेगळ्या जागा आहेत दोघांना तरीही हे भांडतात. एक बसलं असलं की दुसर्‍याला येऊ देत नाही. पंजाने फटके मारणं सुरु असतं.
दोघं एकमताने फक्त माझ्या मुलीच्या रूममधे असतात. सॅमी अगदी तिच्या पायाशी झोपलेली असते आणि मंकी तिच्या स्टडी डेस्कच्या खुर्चीवर झोपलेला असतो. बघणेबल दृश्य असतं.
मुलीने पण तिचा फर बाथरोब त्याला बसण्यासाठी घालून ठेवलाय. म्हटलं अगं तुला वापरायला आणलाय ना तो? म्हणते जाऊदे कोणीतरी वापरतंय ना ... Wink
मागच्या आठवड्यात थंडी खूपच जास्त होती म्हणून सोडलं नव्हतं बाहेर दोघांना. पण दाराशी जाऊन सतत घुटमळत आणि म्याव म्याव करत बसले दिवसभर म्हणून बेडरूमच्या अटॅच बाल्कनीत सोडलं. तर आधी दोघं अगदी मुंड्या बाहेर काढून साळसुदासारखे बघत बसले. मी मुलीला म्हणत होतेच की मंकीकडे लक्ष ठेव तो थोडा वाभरट आहे. आमची बाल्कनी वर आहे जसं पहिला मजला म्हणू. तर हा पठ्ठ्या चढलाच कठड्यावर. एकदम धस्स झालं की हा त्याला लागून दुसर्‍याच्या बाल्कनीत गेला तर काय? किंवा खाली उडी मारली तर. चपळाईने मुलीने त्याला उचललं म्हणून नशीब.

कोकोनट मस्त आहे. आवडला.
सात वर्षांपूवी मी ही एक पिलू घरी आणले. त्या आधी जर्मन शेफर्ड जातीची कुत्री घरी होती. त्यांचे केस घरात गळायचे. त्यामुळे शेवटचा गेल्यानंतर पुन्हा कुत्रं आणायचं नाही आणलंच तर केसवाले नको असे ठरले होते. दरम्यान गावठी कुत्री तिखट असतात या निष्कर्षाला येऊन पोहोचल्याने गावठीच आणायचे असे ठरले.
एक पिलू एक दिवस माझ्या पायांवर चढून मी उचललेल्या पिलाला ठेव आणि मला घे असे सांगत होते. ते मी घेतलेल्या कुत्र्यापेक्षा ठार काळे होते. याला दुसरे कुणी नेणार नाही म्हणून उचलून घेतले. घरी नेले. चांगले गरम पाण्याने स्वच्छ केले. उबदार कपड्यात ठेवले. डॉक्टरकडे नेऊन तपासण्या केल्या , कायदेशीर दृष्ट्या आणि व्यावहारीक दृष्ट्याही त्याला सर्व लशी देऊन निर्धोक केले.

महिन्याभरातच ते अस्सल जर्मन शेफर्ड असल्याचे लक्षात आले. कामाच्या ठिकाणी उजवीकडच्या शेजारच्या कॉलनीतल्या कर्नलसाहेबांच्या धिप्पाड डबल हड्डी डबल लेयर गोत्राच्या जर्मन शेफर्डने डावीकडच्या शेजारच्या बंगल्यातल्या सिंगल हड्डी सिंगल लेयर स्वजातीय पण भिन्न उपजातीच्या जर्मन शेफर्ड कुत्रीशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याने इज्जतीचा सवाल म्हणून त्या मालक मालकिणीने तिची फिमेल पिल्लं आमच्या कामाच्या ठिकाणी हिरवळीत सोडून दिलेली होती.
बाकीच्या पिल्लांची व्यवस्था लावायचा प्रयत्न केला पण नाही जमले. बहुतेक कुणी कुणी नेली असावीत किंवा कॉर्पोरेशनच्या गाडीच्या तडाख्यात सापडली असावी. कारण नंतर दिसली नाहीत.

मस्तच किस्से. नव्या मेंबरांचे स्वागत. क्युटी पाय कोको बेबी.

सध्या थंडी असल्याने आमचे म्हातारे रात्रीचे फिरून आल्यवर लगेच बेडरुमात जायचा हट्ट करते. मला साधी फोडणी पण टाकू देत नाही.
बेड व र. एक मोठी क्विल्ट व त्यावर सुती चादर पाणी, फूड ट्रे सर्व ठेवते व तिथेच हे झोप्पुन जाते लगेच. मग मी गपचु प काही तरी ओर्डर करते किंवा बनवून घेते. मला ड्रॉइन्ग रूम मध्ये मोठ्या टीव्ही वर बघूच देत नाही काही.

काल संध्याका ळी माउचा किस्सा झाला. आमचे शेजारी काही माउं ना घरी घेतात. त्यांना त्याची सवय आहे. पण ते कपल सारखे बाहेरही जात असते मग माउ भुकेजल्या होउन तिथेच घोटाळत राहतात. काल आम्ही वॉकला बाहेर पड णार तर तसेच झालेले पण वेग्ळ्या कारणा ने. शेजारीण गावी गेलेली आहे. भाउ एकटेच घरी. फुल्टू मूड मध्ये असणार जोरात वो शाम कुच्छ अजीब थी गाणे ऐकू येत होते. एक माउ तिथे बसून केविलवाणी माव माव करत होती. मी लगेच तिथे डावभर फूड ओतले पण येइना बिचारी कारण आमचे हंटर हाउंड भुंकत होते. काका काही दार उघडेना. व मला अश्या परिस्थितीत बेल वाजवणे प्रशस्त वाटेना. एखाद्याचा स्वातंत्र्याचा क्षण का रुइन करा!!
मग आम्ही लिफ्ट आली वॉकला गेलो.

येताना बघितले तर माउ ने खाउ खाल्ला होता. काका फुल्टु रोमँटिक सेवंटीज गाणी ऐकत होते. व माउ उंबर्‍यावर भरल्या पोटी पहुडली होती.
क्या लॉयल्टी क्या लोयल्टी.

साडेसात झाले पण आमचे येडे झोपलेच आहे. उठवत नाही.

कोकोनट गोड आहे. क्यूट एकदम.

रघु आचार्य, आता आमच्या हॅरी चे केस ही थोडे गळू लागलेत. अम्ही तीन वेळा लादी आणि घर पुसून घेतो तरीही थोडे कपड्यांवर असतात
तुम्ही आणि इथल्या लोकांनी काय उपाय योजना केलेली आहे गळण्याऱ्या केसांसाठी?

रच्याकने हे हॅरीचे इंस्टा पेज
https://instagram.com/harryminati_?igshid=YmMyMTA2M2Y=

जाई, आमच्या माऊचे पण केस खूप गळत होते. तिच्या vet नी एक multivitamin सिरप लिहून दिलेय. 4 दिवसात चांगला फरक पडत आहे.

एक पिलू एक दिवस माझ्या पायांवर चढून मी उचललेल्या पिलाला ठेव आणि मला घे असे सांगत होते. ते मी घेतलेल्या कुत्र्यापेक्षा ठार काळे होते. याला दुसरे कुणी नेणार नाही म्हणून उचलून घेतले. >>>>
हे किती साहिये, खूप आवडले मला हे गेश्चर
अगदी मनापासून अभिनंदन

इज्जतीचा सवाल म्हणून त्या मालक मालकिणीने तिची फिमेल पिल्लं आमच्या कामाच्या ठिकाणी हिरवळीत सोडून दिलेली होती.
>>> अरर, काय लोकांना बोलावं आशा सुचत नाही, कसली मेंटलिटी ही

रच्याकने हे हॅरीचे इंस्टा पेज>>> केलं फॉलो
जर्मन शॉर्टहेअर पॉइंटर - हे ब्रीड माहितीच नव्हतं, पण व्हिडिओत बघूनच कळत होतं, हंटिंग वाला आहे कडठ्याला धरून उभा आहे तयार मसल्स कसले दिसत आहेत स्ट्रॉंग

तुम्ही आणि इथल्या लोकांनी काय उपाय योजना केलेली आहे गळण्याऱ्या केसांसाठी? सवय करून घेतली Happy
जोक्स अपार्ट, एक लिमिटपर्यंत त्यांचे केस गळणे कमी करू शकतो, त्यानंतरही ते गळत राहतातच
लॅब चे तर वर्षातून दोन किंवा तीन वेळा जोरदार शेडिंग होतं
इतर वेळीही गळत असतातच

आम्ही म्हणजे मीच खरेतर एक दिवसाआड एकदा त्याला स्लीकर ब्रश ने विंचरून काढतो, त्यांच्या अंडरकोट मध्ये गळलेले केस तसेच असतत आणि अंग झटकले की घरभर पसरतात
तितके जरी कंट्रोल करता आले तरी पुष्कळ आहे

बाकी मग खाण्यातून मल्टी व्हिटॅमिन, जवस किंवा खोबरेल तेल आणि फिश ऑइल असं दिल्यानेही फरक पडतो

भाउ एकटेच घरी. फुल्टू मूड मध्ये असणार जोरात वो शाम कुच्छ अजीब थी गाणे ऐकू येत होते. एक माउ तिथे बसून केविलवाणी माव माव करत होती. >>> बिचारे माऊ, तुमचा मूड तुमच्यापाशी
माझं खाणं करा आणि मग एन्जॉय करा म्हणत असेल मनात Happy

आमच्या इथल्या मांजराची धिटाई पण वाढत चालली आहे
काल तर किचन मधून चालत आले आणि रुबाबात मागच्या दारातून बाहेर
आणि ओड्या पुढच्या दारात लोळत पडलेला
त्याला कळलंही नाही, त्याला म्हणलं अरे क्या वॉच डॉग बनेगा रे तू
ते मांजर अक्षरशः चालत गेलं घरातून
शून्य उपयोग आहे, मग जाऊन भुंकून आला कोणावर तरी
म्हणलं आता काय

अंग झटकले की घरभर पसरतात

>>>> हॅरीच असेच होतेय
केस झटकतो आणि केस घरभर पसरतात.

हंटिंग वाला आहे
>>>> हांटिंगच्या नावाला बट्टा लावतो हॅरी. इतका घाबरट आहे. शेजारच्या बिल्डिंगमध्ये सिंबा नावाचा जर्मन शेफर्ड आणि बॉनी नावाचा बिगल आहे
दोघेही हॅरीवर दादागिरी करतात
हा आपला कान पाडून गप राहतो. कवीच्ट भुंकतो.
सगळ हुशारी खिडकीत बसून नवा आवाज आला की भुंकत राहणें इतपतच.

इटीज नाट डाव्ग हेअर , इटिज डाव्ग ग्लिटर. असे म्हणून समोरच्याला गार करायचे.

माझ्याकडे एक बारका व्हेक्युम क्लीनर आहे. तो फिरवते. कुत्रे व लहान मुले असली की घर फार स्वच्च्छ नीट नेटके राहात नाही. पण अशी रौनक कुठेच नाही.

दोघेही हॅरीवर दादागिरी करतात>>> हाहाहा बिचारा

इटीज नाट डाव्ग हेअर , इटिज डाव्ग ग्लिटर. असे म्हणून समोरच्याला गार करायचे.>>> वाह, हे लै भारी आहे

बरिटो बाऊल आमचा Wink अशी भेंडोळी करून झोपणे बहुतेक मांजरांना फार आवडतं.

monkey sleep.jpg

ताणून देणे यावरून शब्द आला का?

IMG_3484.jpg

इथे दोघांची क्यूट फाईट! कधीकधी खूप जोरात आवाजाने पण भांडतात. या विडीओवर जाऊ नका Lol

https://youtube.com/shorts/zfM65mI8SeU?feature=share

सर्वांना धन्यवाद. बाळ झोपले की इथे येऊन पोस्टतेयं.
रघू आचार्य, फार सुरेख अनुभव.
अंजली, तुझ्या मांजरीचे नाव मंकी आहे नं, कोकोनटचे नाव डकी होते तेव्हा हीच गंमत आठवली.अर्थात आम्ही त्याने भो भो करावे व क्वॅक क्वॅक नको म्हणून बदलले. Happy

Pages