भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू चँप फार पाणी पीत असेल तर क्रिएटिनाइन चेक करा. किडनी डिसीज असू शकतो. व लवकर डिटेक्ट झाल्यास उपचार होउ शकतात.

किडनी डिसीज असू शकतो. व लवकर डिटेक्ट झाल्यास उपचार होउ शकतात.>>>>होप्फुली तसं नसावं, कारण गोळी दोन वरून एक केल्यावर त्या प्रमाणात पाणी पण कमी केले त्याने
म्हणजे गोळ्यांचाच साईड इफेक्टहोता, आणि डॉ ना कानावर घातलं हे तर म्हणाले काळजीचे कारण नाही

व्हेेटना विचारुन ओडीनला कॅलशियमची गोळ्या किंवा सिरप द्या.>>> त्याला आम्ही अंडी आणि त्याची फोलकते देतो कुस्करा करून, त्यात भरपूर कॅल्शियम असते, म्हणून आजवर कधी त्याला वरून वेगळं कॅल्शियम दिल नाही
पण विचारतो व्हेट ना

त्याची ती त्रास होतोय सांगण्याची केविलवाणी धडपड मी कधीही विसरू शकणार नाही>>> अगदी अगदी
एक भुभु/माऊ पालकच समजू शकतो त्यावेळी काय वाटतं ते

सिमबा चे इतक्यात केलं ऑपरेशन? किती वयाचा आहे तो?

किडनी डिसीज असू शकतो >> मलाही अगदी हेच मनात आले. स्टिरॉइडस किडनी संदर्भात देतात हे माहितेय. पण बर झालं तसे काही नाहीये ते.
ओडीन लवकर बरा हो रे!

हो, त्याचा बारीक कुस्करा करून भाकरीबरोबर द्यायचा
त्यात भरपूर कॅल्शियम असतं
अंडी सोलायची नाहीतच, उकडून तशीच कुस्करून द्यायची

अंड्यांच्या टरफलांत भरपूर कॅल्शियम असते हे ठाऊक आहे.तरी स्टिरॉईड्स चालू आहेत म्हणून सांगितले.माईल्ड असतील तर आवश्यकता नसावी.

ओह ओके, फार स्ट्रॉंग नाहीयेत
आता एकच बारकी गोळी आहे
ती आम्ही बिस्किटात किंवा पिनाट बटर मध्ये लपवून देतो त्याला

गोळी कमी केल्यापासून पाणी प्यायला पण कमी झालाय

अरे , बरं वाटू दे ओडीनला !!!

कुणीतरी न्यूटर सर्जरी नंतर घ्यायची काळजी यावर लिहा प्लीज. पुढच्या महिन्यात कोकोनटची करावी म्हणतोय. मायक्रोचिप वगैरे सगळं तेव्हाच होईल.

अस्मिता, इतक्या लवकर न्यूटरिंग? काही व्हेट ५-६ महिन्यात ओके म्हणतात पण काही एक्सपर्ट्स म्हणतात फार लवकर केल्यास त्यांची ग्रोथ लिमिट होऊ शकते , त्यामुळे पूर्ण वाढ झाल्यानंतर मग करा, घाई काही नसते तशीही. शक्यतो ८- १० महिने तरी होईपर्यन्त थांबावे असा सल्ला देईन.

ओके मैत्रेयी, मला रेस्क्यू सेंटरने शॉट्स संपले की न्यूटरची appt बूक करा असं सांगितलं होतं. व्यवस्थित माहिती घेऊन करेन आता. थॅंक्स Happy

हो प्रो ज / कॉन्स माहिती घेऊन मगच ठरवा. ते काही अर्जन्ट नसते.
ओडिन ला पण लवकर बरं वाटू देत!

ओड्या काय बरं नसलं तरी मस्ती काय कमी नसते
आजकाल मला रोज ऑफिस ला जावं लागतं
मी आलो की गेटपाशी येतो पळत पळत,शेपटी हलवत जोरदार स्वागत करून झालं की अक्षरशः सुमडीत बाहेर जातो निघून
आलोच हा मी जरा शु वैग्रे करून असं म्हणत

मी बाईक आतमध्ये आणून, चालत गेट पर्यंत जाऊन ते बंद करेपर्यंत तो बाहेरच असतो
तोवर ब्लॅक अँड व्हाईट ची जोडी येतेच
सगळ्यांना वेगळं करून त्याला आत आणणे म्हणजे दमछाक

बाहेर फिरुन येतो एकटा? तुमच्याकडे बाहेर रस्ता फारसा रहदारीचा नाहीये का? मला माउई असा आपला आपण बाहेर फिरुन आलाय हे इमॅजिनच करता येत नाही Happy अर्थात लहान आणि मोठ्या डॉग्ज चे टेंपरामेन्ट वेगवेगळे असते म्हणा.

आमचा बंगला एका गल्लीत आहे मेन रोडपासून आत
रहदारी आता गेल्या काही वर्षात वाढलीये
पण रात्री सामसूम असते
एखादं दुसरी गाडी जाते अधून मधून

अस्मिता --- >> शक्यतो न्यूटर ९ महिन्यानंतर करावे अन्यथा त्याचा वाढीवर परिणाम होतो. सिम्बाचे ११व्या महिन्यात केले आहे.

न्यूटर नंतरची काळजी म्हणाल तर तुमचे व्हेट सांगतीलच परंतु ऑपेरेशन झाल्यावर पुढील दहा दिवस काळजी घेणे महत्वाचे असते कारण टाके तुटू नये म्हणून. सगळे व्हेट सिडेंशनच्या गोळ्या देतात त्यामुळे कुत्री जास्तीत जास्त झोपतात. १० दिवस त्यांना उड्या मारणे, जोरात धावणे किंवा ताकद लावून काही वस्तू ओढणे असले प्रकार करू देऊ नयेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना ती जागा आजिबात चाटू द्यायची नाही आणि त्याकरता कोन लावणे महत्वाचे. तुमचे व्हेट कोन देतीलच परंतु त्यात देखील प्लास्टिकचा नका घेऊ, त्यांच्या कॉलर मधून घालण्याचा घ्या म्हणजे काढघाल करायला सोपा जातो .
जास्त कॉम्पलेक्स ऑपेरेशन नसते, तसाच आता टाकेपण विरघळून जातात तेव्हा परत टाके काढण्यासाठी न्यावे लागत नाहीत।

अजून काही माहीत लागली तर सांगा .

ते कोन प्रकरण फार त्रासदायक असतं.. त्यांनाही आणि आपल्याला बघायलाही. Sad तो कोन लाऊन त्यांना काहीही फार करता येत नाही आणि मग अगदी गरीब बिचारं तोंड करुन बघत बसतात. ज्योई तेव्हा त्याच्या क्रेटमध्ये झोपायचाही नाही कारण त्याला पोझिशनच घेता यायची नाही नीट. मग पलंगावर उशी ठेऊन त्यावर तो तोंड ठेऊन झोपायचा.

ओडीन ला लवकर बरं वाटू दे. वाईट वाटतं कोणाचंही आजारपण ऐकलं की. त्यातून या मुक्या प्राण्यांचं अजूनच Sad

ते कोन प्रकरण तर मांजरांना अजिबात झेपत नाही बहुतेक. फारच विअर्ड फनी वागत होते मंकी सॅमी. उलटे मागे मागे जायचे कोन घातल्यावर.

अंजली_१२ --- >>>> सिम्बाने घरातील ३ कुंड्या फोडल्या कोनमुळे Lol Lol Lol , कारण त्यांना अजिबात अंदाज येत नाही त्याच्या घेराचा आणि मग आपटा आपटी सुरु होते

अजिबात अंदाज येत नाही त्याच्या घेराचा आणि मग आपटा आपटी सुरु होते>>>>>>>>>> हो बरोबर.. असंच काहीतरी होत होतं

इव्हन मंकीला ख्रिसमस ला स्वेटर (हौस म्हणून) आणला आणी घातल्यावर असंच काहीतरी वागायला लागला. Lol

ओडीनला लवकर बरं वाटु दे !
अस्मिता,
आम्ही ऑस्कर १ वर्षाचा होई पर्यन्त वाट पाहिली न्युटरींगची, व्हेट ६ महिने म्हणतात पण बरेच व्हिडिओज, डॉग ओनर्स ओपिनियन घेऊन वाट पाहून मग केलं.
एक आठवडा झाला न्युटरींगला , पटकन रिकव्हर झाला ऑस्कर.
२ दिवस कोनचा त्रास झाला बिचार्‍याला पण आनंदी प्राण्याने नंतर त्याचीही सवय केली, छोटी छोटी टॉइज घेऊन ठेवतो कोन मधे , कोनने ढुशी देतो आम्हाला अटेन्शन साठी आणि घुंगट की आडसे क्युट लुक्स देत बसतो कोन मधून !
कसली तक्रार, झोपायचा त्रास नाही कि रडारड नाही , प्राणी किती अ‍ॅडजस्ट करतात सगळे बदल !

रात्रीचे चांदणे --->> न्युटरींग करणे गरजेचे नसते। तुम्हाला जर त्यांची पिढी जन्माला घालायचे नसेल तर न्युटर करणे जास्त योग्य आहे नाहीतर ते aggressive होण्याचा संभव असतो। तसेच बरेच डे care वाले पण न्युटर डॉग्सलाच घेतात

हरितात्या , दीपांजली, पराग ..
धन्यवाद. चांगली माहिती मिळालीये आणि तुम्ही सर्वांनी लिहिलेयं फारच गोड Happy !

हो हरितात्या , इथे विचारीत जाईन Happy

Pages