दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिम मधील मित्र मैत्रिणी चे व्हिडिओ बघत च असतो सकाळी मी जॉगिंग la जातो तेव्हा एका ५५, पार व्यक्ती दिसतो .
उगाचच जीव तोडून चालणे , व्यायामाची काही उपकरणं रस्तावर आमच्या कडे आहेत.
तिथे अनैसर्गिक वेगाने कसरत करणे ते चेहऱ्यावर दिसते..हे मी बघतो.
हा काही जास्त दिवस healthy राहणार नाही ह्याची मला १००% खात्री आहे
माणसाच्या बाह्य हालचाली वर स्वतःचे नियंत्रण असते
पण शरीरातील अवयव वर माणसाचे काहीच नियंत्रण नसते.
तुमच्या मन मानी लं अंतर्गत अवयव adjust
करून घेतात
पण त्यांची पण काही मर्यादा असते.
ती पार केली की .
त्यांचा नाईलाज होतो.

माझं स्मार्टवॉच माझा स्ट्रेस लेवमीनि, हार्टबीट मॉनिटर करतं आणि सगळं ठीक आहे असं सांगतं.

युट्यूब व्हिडीओमधे एखाद्या विशिष्ट ठिकाणापासून पुढचा भाग दाखवायचा असेल तर त्याच ठिकाणापासून तो व्हिडीओ सुरु व्हावा याची लिंक कशी देतात..?

मोबाईल यूट्यूब ऍप मध्ये तो पर्याय येत नाही.

लिंक पुढे ?t=n
n time in seconds
असे दिल्यास तेवढ्या सेकंदापासून व्हिडिओ सुरू होतो.

उदा:
https://youtu.be/QKnuEUwjQrA
ही मूळ लिंक
https://youtu.be/QKnuEUwjQrA?t=152
ही अडीच मिनिट दोन सेकंद पासून सुरू होणारी लिंक.

वेळ मिनिट + सेकंद मध्ये सुद्धा देता येते, तो syntax लक्षात नाही.

धन्यवाद रघू आचार्य आणि मानव पृथ्वीकर.

मी मोबाईल वरुनच प्रयत्न करत होतो आणि जमत नव्हते.

मानव तुमच्या सूचनेनुसार करुन पहातो..

ही लिंक कॉपी करून यूट्यूबapp च्या सर्चमध्ये टाकल्यास 2:32 ला उघडत नाही. पण या लिंकवर ( क्रोम मध्ये मायबोली उघडले असल्यास) क्लिक केले तर क्रोम योग्य ठिकाणी यूट्यूबवर नेऊन विडिओ उघडतो मोबाईलवर.

युट्यूब ऍपच्या सर्च मध्ये लिंक पेस्ट केल्यास मूळात तो व्हिडीओपण येणार नाही. दोन्ही पैकी कोणतीही लिंक.
कुठल्याही ब्राऊजर मध्ये कॉपी पेस्ट केल्यास ब्राऊजर मध्ये यूट्यूब उघडून त्यात नमूद केलेल्या वेळेपासून दिसेल.

मोबाईल फोन वरून क्लिक केल्यास यूट्यूब ऍप उघडुन त्यात नमूद केलेल्या वेळे पासून दिसेल. संगणकावरन क्लिक केल्यास डिफॉल्ट ब्राऊजर उघडुन त्यात नमुद केलेल्या वेळेपासून दिसेल.

फार किरकोळ आहे पण माझ्या आय फोन वर ब्लु टुथ ऑन केल्या वर यादीत माझे वायरलेस ईयरफोन्स दिसत नाहीत.
ईयरफोन चार्ज आहेत.
म्युझिक ऐकत प्रवास करायची सवय आहे त्यामुळे फार चुकल्या चुकल्या सारखे होते..
काही उपाय? गूगल केले पण तरी होत नाही.

प्रथमच इअरफोन {कोणत्याही} फोनला जोडायचे असेल तर
सेटींग्ज>> ब्लु टुथ>>advanced>>search केल्यावर दिसेल . तरीही नाही आले तर पुन्हा off/on करणे आणि पाहणे.
(बाकी आइफोनचे DRM अडचण असू शकते.)
वायर्ड हेडफोन्सला वायर लावून आणि काढून ब्लूटूथ वर कनेक्ट होते का पाहता येते.

मला वाटते बहुतेक इअरफोन्स हे स्विच ऑन केले की ५ ते १० सेकंदात आपोआप डिस्कव्हरी मोड मध्ये जातात जेणे करुन इतर डिव्हाईसना ते डिटेक्ट करता येतील. डिस्कव्हरी मोड मध्ये असताना त्यावरचा निळा आणि लाल लाईट १ सेकंदाने आलटून पालटून फ्लॅश होतो. तसे होते आहे का?
नसल्यास इअरफोनवरील स्विच ऑन बटन एकदा दाबून (आणि लगेच सोडून) बघा ते डिस्कव्हरी मोड मध्ये जातात का. (नसेल तर बटन तीन सेकंद करता दाबून बघा आणि दाबले असता असे आलटून पालटून फ्लॅश होऊ लागले की सोडुन द्या. जास्त वेळ दाबून धरले तर स्विच ऑफ होतील, तेवढे पण नको.)

जर डिस्कव्हरी मोड मध्ये जात नसतील तर इअरफोनचा प्रॉब्लेम आहे.

जर डिस्कव्हरी मोड मध्ये जात असतील तर:
१. आधी दुसऱ्या कुठल्या डिव्हाईसला (उदा. लॅपटॉप, किंवा इतर कुणाचा फोन) कनेक्ट करून बघा. नसेल होत तर इअरफोन्सचा प्रॉब्लेम असू शकतो.
२. दुसऱ्या डिव्हाईसला कनेक्ट होत असेल आणि याच आयफोन मध्ये आधी हेच इअरफोन वापरले असतील तर: चार वर्षांपासून आयफोन वापरलेला नाही, पण मला आठवते की iPhone X पर्यंत तरी बहुतेक त्यामध्ये Setting > Bluetooth मध्ये गेल्यास सध्या कनेक्ट नसलेले पण आधीच पेअर्ड असलेले डिव्हाइस तिथेच लिस्ट होत नाहीत. तिथे सेटिंग मध्ये कुठेतरी वेगळा टॅब असतो. तेव्हा तिथे जाऊन आधीच पेअर्ड असलेल्या यादीत आहे बघा. असेल तर तिथुन रीमुव्ह करा. मग फोनचे ब्लु टूथ1 ऑफ आणि ऑन करून बघा आता डिस्कव्हर होतो का.

हे वायरलेस हेड फोन आधी दुसर्‍या कुठल्या डिव्हाईसला पेअर होते का? तसं असेल तर ते डिव्हाईस जवळ पास ठेवू नका, किंवा त्यातून अनपेअर करा म्हणजे स्कॅन मोडवर जातील.
एकुणच परत परत करत रहा. होतील. वेगळ्या ठिकाणी जसं बंदिस्त जागी, बंद कार मध्ये बसून ट्राय करा.

>>> हे वायरलेस हेड फोन आधी दुसर्‍या कुठल्या डिव्हाईसला पेअर होते का? तसं असेल तर ते डिव्हाईस जवळ पास ठेवू नका
बरोबर, तसं असेल तर तिथून 'फर्गेट धिस डिव्हाइस' करा. एकदा फोनही टर्न ऑफ / ऑन करा.

माझा प्रश्न - काही ओनलाइन पेमेंट ओप्शनमध्ये नेट बँकिंग पर्यायांत भारतातल्या झाडून सर्व बँका असतात पण एक सोडून - SBI. State Bank. कारण काय असेल? विकिच्या डोनेशन पेजवर हेच दिसते. SBI इल्ले.
Amazon pay इल्ले.
बाहुबली इल्ले?
( sbiएटीएम कार्डने मोबाईलवरून पेमेंट करायचं इच्छा नाही.)

प्रश्नोत्तरे धागा दर जानेवारीत अडमिनने नवा काढावा विनंती.
तसेच इतर काही गरजेचे धागेही नवेच काढावे. कामाचे असतात.
आता इथे पाहा ना help/answers dot com चे पेजच तयार झाले एक सोडून - "GOT IT?" YES/NO?

कुठलाही पेमेंट गेटवे वापरुन पेमेंट झालं पाहिजे ना?

ग्राहकाने एखादा मार्ग पकडलेला असतो - कार्ड, अमुक बँकेचे नेट बँकिंग, अमुक वॉलेट वगैरे. तो पर्याय नसला तर कसं होणार? म्हणजे दोन चार गेटवे हवेत. मोबाईलवर कार्डाची डिटेल्स साठवायला भीती वाटते. युपिआइची ( आणि कार्डाचीही )पेमेंट्स म्हणजे बँक बॅलन्स बदलतो आणि तेवढ्या एंट्रीज वाढतात. खरा पर्याय वॉलेटचा आहे.

वा.ले. ईयरफोन ची समस्या सुटली. ईयरफोन डबीतून बाहेर काढून मग कनेक्ट करायचे होते. तसे केल्या वर झाले Happy धन्यवाद सर्वांना!

ते खुल जा सिम सिम चं मराठीत तिळा तिळा दार उघड हे भाषांतर आठवून आता असं वाटतं आहे की सिम सिम म्हणजे sesame असावं का? मला दैनंदिन जीवनात पडलेला हा एक किरकोळ प्रश्न.

American type संडास भारतात आली पण नक्की ते वापरायचे कसे हेच येथील लोकांस माहीत नव्हते.
कोण वर पाय ठेवून इंडियन स्टाईल च वापरायचे.

तसे काही तरी झाले.
ब्लू टूथ head फोन विषयी .
आधुनिक वस्तू घेतली पण वापरायची कशी ह्याचीच बोंब.

Halkyat घ्या

अती आधुनिक गाड्या पैसे असणारे भारतात विकत घेतात.
पण गाड्या मध्ये असणाऱ्या अनेक आधुनिक सुविधा कशा वापरायच्या , system, . काय काय आहेत आणि त्याचा वापर कधी आणि कसा करायचा
ना त्या गाडी मालकाला माहीत असत ना ड्रायव्हर ल.
हा जोक नाही खरे आहे

Pages