बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यातले दोन किलो किलो सोनेकर, पाहुणे म्हणून होते का. बाहेर त्यांचा इंटरव्यु बघितला. असंच वीणा पाहुणी म्हणून आली तर, वाईल्ड कार्ड म्हणून आणतील असं वाटत नाही.

ते पाहुणेच होते. त्यांनी दोन दिवस राहून काहीच केले नाही कारण त्यांना धड बोलताही येत नव्हते. त्यांना फक्त स्टॅन ला आधार मिळावा म्हणून आणले होते. पण तरी काही उपयोग झाला नाही शेवटी सलमानने गोड बोलून समजूत काढली तेव्हा कुठं साहेब उपकार केल्यासारखे तयार झाले बिग बॉसमध्ये राहायला.
शिव वीक झाला, एकटा पडला तरच वीणाला फॅमिली वीकमध्ये थोडा वेळ आणू शकतील. बाकी घरात भरपूर लोक झालेत अजून ऍड करतील असे वाटत नाही. तेवढे बेडस पण नसतील आता घरात.

आता साजिद शिवची मंडली नॉमिनेशनमध्ये आल्यावर परत बिग बॉसने वोटिंग बंद ठेवले आहे म्हणे, हा सलग चौथा आठवडा. नशीब आधीच सांगितले नाहीतर लोकांचा वेळ वाया गेला असता वोट करण्यात. बिचाऱ्या गौतमला तरी का काढले मग कोण जाणे. अर्थात ऑब्व्हियस होते मंडलीत नसलेल्याना काढायचे हेच ठरले आहे म्हणून काढले. अंकित, सौंदर्या नॉमिनेट झाले की सुरू करतील 'मोस्ट फेअर' बिगबॉस त्यांची वोटिंग लाइन !
अब्दु, स्टॅन याना तर कोणीच नॉमिनेट करत नाही कारण सलमानचा त्यांना असलेला पाठिंबा. कोण पंगा घेणार सलमानशी आणि बोलणी खाणार.

अंकित, सौंदर्या नॉमिनेट झाले की सुरू करतील 'मोस्ट फेअर' बिगबॉस त्यांची वोटिंग लाइन >>> अंकित नॉमिनेशन मध्ये होता तेव्हा तरी कुठे झालेले एलिमिनेशन. यंदा वोटिंग लाईन बंद ठेवण्याचं मुख्य कारण साजिद आहे. टट्टी प्रकरणामुळे लोक भडकलेत ऑलरेडी त्याच्यावर.
प्रियांका टॉप ला कशी असते ते मला समजतच नाही किती इरिटेटिंग आहे ती. सारखं मी किती फेअर, मी किती चांगली, मी किती प्रेमळ, मी कशी दुसऱ्यांसाठी करते हेच सुरू असतं. पब्लिक त्यांच्या आधीच्या कॅरेक्टरवरून त्यांना वोटिंग करत असते इथे बिग बॉस मध्ये कसे वागतात, काय करतात ते पाहिलं नाही जात. प्रियंका, सुंबूल, स्टॅन त्यामुळेच टॉपला असतात.

इथे वाचून एवढंच समजतंय की हिंदी मराठीपेक्षा उजवा असला तरी फार रंगतदार नाहीच.

मला वाटत नाही फॅमिली वीकमध्ये वीणाला आणतील, शिवच्या आईचा विरोध असेल.

प्रियांका आणि अर्चना इरिटेट करतात पण मला आवडतात दोघीही...अंकित सुद्धा .
मंडली पेक्षा छान खेळतात असं वाटतं मला.

मला फक्त अर्चना आवडते... कारण तीचं इरिटेट करणं हे मुद्दाम च असतं आणि ती ते सरळ सरळ बोलून करते....
प्रियांका मात्र मी सत्यवादी, मीच फेअर, मीच कशी चुकीचा साथ देणार नाही वगैरे बोलत राहण्यात धन्यता मानत असते....

मला पर्सनली घरात अशी बहीण किंवा सून येणार असेल तर आवडणार नाही...

अर्चना कशी ही बोलत असेल पण मुद्दे बरोबर असतात तिचे..

निमरीत आता ठार मेंटल वाटायला लागलीय

टिना as युजुअल व्हिलन नंबर एक... परवा इतकं त्या शालीन ला सुनावलं तरी लोचट माणसा सारखी त्याला काल ब्रेकफास्ट च विचारायला गेली आणि त्याने इंटरेस्ट दाखवला नाही तर ते पण तिच्या इगो वर आलं.... दुटप्पी पणा ची हद्द.... फार चिप आहे ती....

चिप पणा मध्ये नाम्बर एक प्रियांका आणि दुसरा नंबर टीना...

तो विकास पण मस्त समोर समोर कान टोचतोय एकेकाचे....

मला श्रीजिता पण बरी वाटली.. सौंदर्या कडे आता कंटेंट देण्यासारखं काही पण उरलेलं नाही...

सुम्बुल ( हीच नाव टाईप करताना गूगल की बोर्ड मला डुंबूल सजेस्ट करतंय..) hahaha
ही पण पागल आहे

साजिद पण अ‍ॅक्चुअल्ली चांगला खेळतोय.. दोन्हीकडे बॅलन्स ठेऊन डोक्याने खेळतोय !
सर्वात बिनडोक आणि अनॉयिंग म्हणजे प्रियंका , काही मुद्दे नाहीत कि लॉजिक नाही..
टिपिकल टि.व्ही सिरीयलची मठ्ठ बहु !
तिच्या पेक्षा अर्चना सुद्धा लॉजिकल वाटु लागली आहे !
एम्सी स्टॅनला फॅन्सची पॉवर कळल्यानी चांगलाच सूर गवसलाय !
मला अजुनही शिव, स्टॅन, साजिद आवडतात. अर्चना अ‍ॅज एन्टरटेनर.. बाकी पब्लिक फेक !

टिपिकल टि.व्ही सिरीयलची मठ्ठ बहु ! >> +१११. ती निम्रित, सौंदर्या , सुंबुल ,अंकित सगळेच तसेच युसलेस आणि बोअर आहेत. पण कुणीच एलिमिनेट होण्याचे नाव नाही त्यामुळे मजा जाईल अशाने.

अंकित नॉमिनेशन मध्ये होता तेव्हा तरी कुठे झालेले एलिमिनेशन. >> पण अंकितला अनेकजण पसंत करतात. त्यामुळे त्याला मते मिळतात, त्यामुळे तो काही मतांच्या आधारावर जाऊ शकत नव्हता. मग कसे करणार एलिमिनेशन ना !

मला शिवचा आवाज असह्य होतो. मोठा आवाज करून पोक करणे एवढाच त्याचा गेम आहे आणि बिगबॉस ने अनेकदा गाईड करूनही हा अजूनहि रामूच राहिला आहे, आणि हल्ली त्याने गेममध्ये बरच मूर्ख निर्णय घेतले आहेत.
अर्चना लॉस्ट हर गेम लॉन्ग बॅक.

टिपिकल टि.व्ही सिरीयलची मठ्ठ बहु ! >> +१११. ती निम्रित, सौंदर्या , सुंबुल ,अंकित सगळेच तसेच युसलेस आणि बोअर आहेत. पण कुणीच एलिमिनेट होण्याचे नाव नाही त्यामुळे मजा जाईल अशाने. >> + ७८६

बाकी प्रियांकामुळेच सर्वाना फुटेज मिळते अगदी बीबीला ही. रोजचे, विकेन्डचे प्रोमोही तिच्यावरच असतात. >> +11
मला शिवचा आवाज असह्य होतो. >> मला पण शिव चा आवाज असह्य होतो. निम्रीत पण जळत असते नेहमी प्रियांकावर.
स्टॅनने फालतु बोलणे सोडुन द्यायला हवं जे शक्य नाही.

मला तर प्रियंकाच्या आवाजासमोर कोणाचा आवाज ऐकूच येत नाही. तिची सुरुवातच एवढी लाऊड असते की समोरच्याला पण आपला आवाज वाढवावा लागतो. परवाच्या भागात ती अंकितला पण अशीच ओरडून बोललेली तेव्हा तोसुद्धा म्हणाला की तू जोरात बोलतेस तर तेव्हा म्हणते नाही माझा आवाजच असा आहे पण बाई जेव्हा तू गुलूगुलू बोलतेस तेव्हा तुझा आवाज नाही निघत नाही तसा.

शिव सुरुवातीला आवडायचा पण नंतर फक्त साजिद च्या पाठी हांजी हांजी सर सर करणं चालू झालं ! जुन्या तमाशा पटात व्हिलन सरपंचाचा चमचा असायचा ,जो सरपंच कांड करताना दरवाजावर उभा राहायचा ,हेरॉईन ला टोमणे मारायचा त्याची आठवण होते . निम्रत च मेंटल हेअल्थ इशू फक्त स्वतःवर आला कि आठवतो बाकी दुसर्यांना बुल्लिंग करताना मजेत असते आठवडाभर . स्टॅन तर काही ना करता बस फॅन च्या जीवावर टाकलाय.ना टास्क मध्ये,ना काही घरात काम करत,साधं झुंबा ला पण पेन्शनर काका सारखा साजिद बरोबर बसून चहा पितो. सुमबुल हरकाम्या झालीय मंडळी गँगची .

काय कर्कश्य आवाजात बोलतात या बायका! नॉमिनेशन टास्क मध्ये काहीच कळलं नाही. साजिदने पहिल्यांदा डोकं लावलेलं पाहिलं. कालचं टास्क करायला पाहिजे होतं दोघांनी. अर्चना आणि प्रियंका खूप फेक आहेत. भांडणं किंचाळणं माफी, कॅमेरा हालला नाही पाहिजे त्यांच्यावरून. निम्रित, सौंदर्या , सुंबुल ,अंकित ,अब्दु बोर करतात. कोणाला तरी बाहेर काढा.

जुन्या तमाशा पटात व्हिलन सरपंचाचा चमचा असायचा ,जो सरपंच कांड करताना दरवाजावर उभा राहायचा ,हेरॉईन ला टोमणे मारायचा त्याची आठवण होते >>> biggrin.gif+१०००००

तो बिग बॉसचा खास लाडका आहे म्हणून तर शालिनच्या अंगावर खुर्ची घेऊन धावला तरी बीबी ने सोयीस्करपणे लपवून, झाकून टाकले. अर्थात मराठी बिग बॉसपासूनच त्याला violence बद्दल फेवर चालू आहे. दूसरा एखादा असता तर कधीच काढले असते.
निम्रत आणि शिव प्रियांकाबद्दल प्रचंड obsessed आहेत. त्यांचा गेम तेवढाच आहे.
स्टॅन छपरी mcp आहे. पिरियड !

प्रियांका अँनॉयिंग असेल किवा दुसऱ्यांच्या मुद्द्यात मध्ये पडत असेल ( जे शिव पण करतो त्याचा संबंध नसताना ) पण तिचा स्टॅन्ड क्लिअर असतो ती बोलण्याची पातळी घसरवत नाही जे अर्चना बऱ्याचदा करते,स्टॅन करतो . पण ती अर्चना चुकली किंवा अंकित चुकला तरी त्यांना सुनावायला कमी करत नाही ,इव्हन बिग बॉस ला पण कितींदा तरी प्रियांका ,अंकित,सौन्दर्य ने क्वेश्चन केलं आहे. आतापर्यंत एक तरी प्रसंग आठवतो का ज्यात शिव ने साजिद किंवा निमरीत किंवा स्टॅन ला चुकीच्या गोष्टीसाठी जाब विचारलाय.? मंडळींचं ठेवतो झाकून ... !फक्त फेमेल स्पर्धकांबरोबर भांडण्यात वाघ बनतो . आपल्या ऑफिस मध्ये वगैरे असा एक एम्प्लॉयी असतो जो सर्वात आधी येतो ,सुट्ट्या घेत नाही ,बॉस ला घरातून खाऊ घेऊन येतो,बॉस ची लफडी लपवायचं काम करतो ,बॉस ने सांगितलं कि फक्त बॉस ला खुश करायचं म्हणून लाळघोटेपणा करतो तसा दिसतोय शिव. साजिद काय त्याला काम देणार नाहीय बाहेर गेल्यावर पण हा बिचारा त्या कामाच्या आशेवर बिग बॉस ट्रॉफी पण देऊन टाकेल साजिद ला .
खरंतर शिव जास्त ओळखीचा चेहरा होता चॅनेल साठी रोडिस आणि बीबी मराठी मुळे पण बहुतेक तो या बाकी लोकांच्या स्टेटस पुढे दाबला गेला आणि त्याने शॉर्टकट निवडला झुंड मध्ये राहायचा. अब्दू इंट. सेलिब्रिटी आहे , साजिद नाही म्हटलं तरी इंडस्ट्री मध्ये इन्फ्लुएन्शिअल आहे,स्टॅन गळ्यात २ कोटींचं लॉकेट घालतो आणि मर्सडिज फिरवतो,निमंत्रीत सिरीयल ची लीड ,या सगळ्यात बहुतेक त्याला स्वतःची सेफ स्पेस वाटली असावी आणि त्याने इंडीव्हिजुअल गेम सोडून चमचेगिरी कारण पसंद केलाय ( तो मराठी बीबी जिंकला कारण तो नॅचरल होता,उस्फुर्त होता ,खरेपणा लोकांना भावला. ) पण इथे खूप प्लॅनिंग करून खेळतोय आणि त्यामुळे फेक वाटतोय. आणि मंडळी ग्रुप चे टास्क आणि फेअरनेस याबद्दल न बोलणंच बरं !

खरंतर बीबी चा ओरिजिनल फॉरमॅट पुन्हा आणायला हवा ,कन्फेशन रूम मध्ये सीक्रेट नॉमिनेशन्स ,कॅप्टन ला एक दोघांना वाचवायची पॉवर,दर वीक मध्ये कंपलसरी एव्हिक्शन .लग्झरी बजेट टास्क .. आता तर खूप इंटरफेरेन्स , जस कि चुगली बूथ ,बिग बॉस आपल्या फेव्हरेट लोकांना बोलावून गाईड करतोय ,कुणाचे वडील येऊन कस खेळायचं ते सांगताहेत .त्यामुळे सगळे जपून खेळतात. आणि कोणाच्या डोक्यातून ती दळभद्री रेशन टास्क ची आयडिया आली देवाला ठाऊक !रॉडिझ मध्ये तसे अँनॉनिमस नॉमिनेशन्स व्हायचे आणि कोणाला समजायचं नाही कारण नॉमिनेशन डिस्कस कारण अलाऊड नवत . सगळी मज्जा घालवली . आणि का बिग बॉस ग्रुप्स शफल करत नाहीत नाही मस्त डायनॅमिकस चेंज होऊन जातील आणि टास्क नॉमिनेशन चा असेल तर सगळे जीव लावून खेळतील पण आणि हल्लीचे टास्क तर एकाहून एक बंडल .जेवढा पैसे आणि डोकं ते टास्क च्या प्रोडक्शन वर लावतात त्याच्या १०% तसेच डिजाईन करायला लावतील तर किती बर होईल.

वेंगुर्लेकर तुमच्या दोन्ही पोस्टना अनुमोदन.
मलाही बिग बॉसचा आधीचा फॉरमॅटच आवडतो. विशेषतः सीक्रेट नॉमिनेशन्स. त्यात लोक खूप खेळायचे.
शिवाय सध्या बिग बॉसचा अति फॅमिलॅरिटी, एखाद्या सासूसारखे टोमणे नको वाटतात.. या सीझनमध्ये त्यामुळे वाट लागली आहे.. पण चक्क हा सिझन हिट झाला आहे. त्यामुळे कदाचित हेच पुढच्या सीझनलाही पाहायला मिळेल.

मला तर आता शिवच सगळ्यात बरा वाटत आहे.. म्हणजे वासरात लंगडी गाय म्हणा हवंतर..
प्रियांका खूप इर्रिटेटिंग , स्वतः चुका करते , रडते ओके पण सेम डिट्टो चुका कोणी दुसर्याने केल्या कि आकांडतांडव .. अंकितशी फालतूची लघट.. मी म्हणजे कोण हा सतत अटीट्युड ..
अंकित आधी ओके वाटायचं .. आता टॉक्सिक वाटतो.. अगदीच प्रियांका म्हणेल त्याला हो.. प्रियांका गर्ल फ्रेंड नाही म्हणतो .. पण अगदी चाळे म्हणावा असा दोघांच चालूच असत .. फिजिकल काही ना काही..
साजिद स्टॅन निमरीत अब्दू अर्चना सौन्दार्या शालीन टिना हे सगळे विनर मटेरियल नाहीतच वाटत ..
त्यातल्या त्यात थोडं डोकं लावून आणि ह्यूमर जिवंत ठेऊन शिवच आहे

मला कालचा टास्क आवडला. आत आलेल्या लोकांना इग्नोर करायचे आणि रिअ‍ॅक्शन दिल्यास स्ट्राइक Happy अजून त्यात बरेच व्हेरिएशन करता आले असते. त्यात पत्र वाचायला येणारा माणूस म्हणजे आधीच्या सीझन्स मधे बिबॉ चा आवाज असलेला व्यक्ती आहे! भारी वाटले मला.

त्यात पत्र वाचायला येणारा माणूस म्हणजे आधीच्या सीझन्स मधे बिबॉ चा आवाज असलेला व्यक्ती आहे! भारी वाटले मला. >> नाही बिबॉचा आवाज सर्व सिजनला एकच आहे. जे आले होते ते नरेटर होते.

मलाही आवडला कालचा टाक्स. याआधी असे इग्नोर करण्याचा टास्क होता पण त्यात स्ट्राइक नव्हते. पण एकंदर मजा आली. आणि मला वाटतं जास्त स्ट्राइक साजिद मुळे झालेले आहेत. ज्यामध्ये साजिद सुंबुलला म्हणतोय तिच्यामुळे स्ट्राइक झालेला आहे पण मला वाटते ते साजिद मुळे झालेला. बिग बॉस ने टास्क संपल्यावर सांगितलं पाहिजे कोणता आणि कोणामुळे झालाय ते.

मला तर आता पूर्ण विश्वास आहे की बिग बॉस प्रियांकालाच विनर करणार आहेत. प्रियंकाचा फॅन बेस बघता प्रियांकाला जर निगेटिव्ह दाखवलं तर ते चवताळून तिला अजून जास्त वोट करतील हे बिग बॉसला एवढ्या सीजन नंतर नक्कीच कळत असेल. काल जेव्हा प्रियांकाला पंचवीस लाख किंवा अंकित यामध्ये चॉईस दिला तेव्हाच सगळ्यांना माहिती होते की ती अंकितलाच निवडणार. स्वतः बिग बॉसला पण अंकित बाहेर जायला नकोय कारण त्याच्यामुळे प्रियांकाला इमोशनल सपोर्ट आहे. बिग बॉस मस्त खेळत आहेत. एखाद्याला कॉर्नर केलं का त्याला सिम्पथी मिळते हा तर बिग बॉसचा वर्षानुवर्षाचा गेम आहे. तोच ते प्रियंका सोबत खेळत आहेत.

रिअ‍ॅक्शन टास्क भारी होते Proud
शालीनच्या थोबाडापाशी जाऊन चिकन खाणारा माणुस बघून खूप हसु आलं !
आज अर्चना कंप्लिट्ली रॉक्ड .. ओव्हरॉलच अर्चानाने शो मधे इतक्या शेड्स दाखवल्या आहेत , ज्या प्रकारे कन्टेन्ट/एन्टरटेन्मेन्ट देतेय , तिने टॉप २ मधे असायला हवे !
स्टॅनने पण भरपूर फुटेज घ्यायला सुरवात केली आहे !
शिवला खूप साइडलाइन केलय , प्रियंकाला बघवत आणि ऐकवत नाही.. हॉरीबल मेकप करूनही मायग्लॅम विनर Biggrin

शिवला खूप साइडलाइन केलय >>> हो. त्यामुळे त्याचा गेमपण खराब होतोय. त्याला वीकेंडच्या वारमध्ये पण साईडलाईन केलं जातं. तो मागे बोलत पण होता की वीकेंडच्या वारमध्ये समजतो आपला गेम कसा चाललाय पण इथे मला काहीच रिएक्शन येत नाही त्यामुळे समजत नाही मी व्यवस्थित खेळतोय का चुकीचा खेळतोय.

<<हॉरीबल मेकप करूनही मायग्लॅम विनर
मलाहि नवल वाटतं हिच कशी पहिली? बिल्कुल आवडत नाहि मला प्रियंका... नुसता आततायीपणा असतो तिचा मै मै चालु असतं.
सध्या रॉक तर अर्चनाच आहे... काल तिचीच चिठ्ठी तिला मस्त बसुन ऐकायला मिळाली ..भैया बोलते ते मस्त वाटतं तिचं Happy शिवने तिला बरोबर सांगितल.. तु अकेली कहा है..सबके बराबर एक है तु.. Happy

अतिशहाण्याचा गाढव रिकाम म्हणतात तेच खरं. साजिद स्वतःला शहाणा समजतोय पण त्याला समजत नाही तोच बिन्डोकपणा करतोय. कालच्या भागात तर जास्तीत जास्त स्ट्राइक त्याच्यामुळेच झालेत. स्वतः बोलतोय आणि दुसऱ्यांना ब्लेम करतो. कोणामुळे कधी स्ट्राइक झाल्या ते बिग बॉस ने दाखवायला पाहिजे. शिव आणि स्टॅनला समजत होतं साजिद मुळे स्ट्राइक होतात पण ते का बोलत नाही तेच कळत नाही. फ्रेंडशिप ठीक आहे पण जिथे बोलायचे तिथे बोला ना यार. ते स्टॅन्ड घेत नाही म्हणून तर त्यांना चेले, चमचे बोलतात हे समजत नसेल का त्यांना.

Pages