बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिग बॉस कोणी एक माणूस तर नक्की नाही >>> ऑफ कोर्स Happy हे सर्वांना माहित आहेच, पण उलट म्हणूनच बेनिफिट ऑफ डाउट नाही देता येत.
आणि ऐकू आले नाही असे काहीही नाही, मागच्या भागात जेव्हा कॉल आपल्याला पहिल्यंदा ऐकवला तेव्हा व्यव्स्थित ऐकू येत होते.
बिबॉ कन्टेस्टन्ट्स आणि प्रेक्षकांशी पण खेळतायत दॅट्स इट.

मला तिचा बाप आधीपासून च आवडला नव्हता. काय ते मोठे मोठे शब्द आणि कविता ऐकवत होता.... इतकं च होतं तर तिला प्रॉपर कॉलेज वगैरे करायला लावायचं होतं...
फार विखारी आहे तो माणूस असं दिसतंय....
टिना के मूह पे लाथ मारो....
असं कोण शिकवतं... फार वाईट आहे हे... आणि ती मूर्ख आहे

त्यांनाही कळतंय आपली पोरगी चुकतेय ते, पण नॅशनल टीव्ही वर कबुल करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी टिना शालीनला दोषी ठरवलं. त्यापेक्षा त्यांना सुंबुलला पर्सनली भेटू द्यायला पाहिजे होतं. पण मग बिबी ला content कसा मिळणार...

बिग बॉसला नको तो मसाला हवाय, सुमबुलला काढू शकतात की.

तमाशा करून ठेवलाय तिच्या बाबांनी आणि बिग बॉसने तिचा आणि तिने स्वत:चा.

आता यु ट्यूब वर सुम्बुल च्या बाबांचा इंटरव्ह्यू पहिला...
माणूस सरळ सरळ पलटी मारतोय की मला अर्धवट शुद्धीत काय बोलतोय ते कळलं नाही....
सिरियसली???? चांगला च पोचलेला माणूस आहे....
मला तर राहून राहून अभिनेत्री मधुबाला आणि तिचे वडील आठवत आहेत...
म्हणजे सुम्बुल सोन्याचं अंड देणारी कोंबडी आणि तिने प्रेमात पडून बगावत करू नये म्हणून तिचे वडील वाटेल ते करतील...

सॉरी मी खूप हार्ष लिहिलं पण आता हे सर्व बघून मला हेच वाटलं

खरंच आहे.. मला पहिल्या पासूनच वाटतंय.. .. फालतू मोठ्या मोठ्या कविता. बाप ऐसा होता बेटी वैसी होती म्हणत खुळ्यात काढतात सगळ्यांना.. ती लहानपणा पासून असली काम करत आहे.. थोडे शोज ओक पण तिला शाळा कॉलेज सोडून इकडे कुठे टाकलाय.. धूर्त माणूस आहे.. त्याला वाटलं मुलगी गोड गॉड दिसेल लोकांना वाटेल काय महान वडील मुलगी.. झाला उलट असलीयत बाहेर आली.. ती पण आल्या पासून फालतू कविता झाडत होती..

तिच्या सीरिअल चे शॉर्ट्स दिसतात इन्स्टा वॉर ट्रेंडिंग .. लहान वयात बहू बिहू चे रोल्स केले आहेत.. लग्न सिंदूर वागौरे लावून.. आणि आत्ता १८-१९ ची मग ते सीरिअल करताना अजून लहान असेल.

Exactly मला पण सेम वाटलेलं ती आता 18 ची आहे
मग ते इमली वगैरे आणि दुसरी सिरीयल आधी होती म्हणजे 16 वगैरे वर्षाची असताना ती लग्न झालेल्या बाई चे रोल करत होती???? मी हिला इकडे च पहिल्यांदा पाहिलंय.....

चांगला च पोचलेला माणूस आहे....
मला तर राहून राहून अभिनेत्री मधुबाला आणि तिचे वडील आठवत आहेत...
म्हणजे सुम्बुल सोन्याचं अंड देणारी कोंबडी आणि तिने प्रेमात पडून बगावत करू नये म्हणून तिचे वडील वाटेल ते करतील...>>> अगदी हेच मनात आलेलं.

सलमान शाळेतल्या वर्गातल्या मुलांच्या भांडणांची सुनावणी करतोय असं वाटतंय.
प्रत्येकाला तू काय म्हणालास ,काय केलंस हे विचारून खरं खोटं करतो.
मग त्यांच्या पालकांना पण बोलावतो.
हे बिग बॉस आहे?

सलमान खान एपिसोड बोअर झाला. सगळे parents डोक्यात गेले, सुमबुल बाबा जास्त. शेवट काय झाला त्याचा बघितलं नाही.

कोणीही एव्हिक्ट झालं नाही. सुम्बुल १८-१९ ची वाटत नाही.
शिक्षक वर्गाबाहेर पडल्याबरोबर वर्गात मुलं आरडाओरडा करतात तसे सगळे एकमेकांवर ओरडायला लागले. यात शिव सगळ्यात पुढे.

साजिद महालबाड वाटला. अर्चना त्याची पत्रास ठेवत नाही एवढ्या एका कारणासाठी मला आवडली.
टीना फेक आहे. तिचा मेकप तिला आणखी फेक करतो.

आणि टीना ची आई महा चापटर
सुमबुल चा बाबा आता मूर्ख वाटतोय कारण काल काही पण मूर्खांसारखा बोलत होता,
शालीन चे आई बाबा फेक वाटले मला.....

येस्स अब्दु ला हाकला राव!! एक दोन दिवस फार तर एक वीक यापेक्षा जास्त त्याला ठेवायला नको होते. कम्प्लीटली युसलेस.

झलक दिखला जा बघत न्हवते पण फिनाले ५ मिनिटे पाहिला. त्यात सांगितले की म्हणे पहिल्यांदाच फायनल ३ मध्ये टाय झाला. सर्वांना बरोबर मते मिळाली. मग विनर गुंजन म्हणून एक छोटी मुलगी आहे तिला विनर घोषित केले.
बोला आता !

त्यात सांगितले की म्हणे पहिल्यांदाच फायनल ३ मध्ये टाय झाला. सर्वांना बरोबर मते मिळाली.<<<< त्यातले दोघं कलर्स फेस, तिसरा ही कलर्स वर येणारे. गश्मीरचं काय झालं? He is far more deserving than all of them. आता बिग बॉस मध्येहि हेच बघायला लागणारे. शेवटी प्रियांका किंवा निम्रित विनर.

प्रियांका नाही निम्रत फिक्स्ड विनर आहे. तिला पॉझिटिव्ह आणि प्रियंकाला निगेटिव्ह दाखवण्याचे बीबी चे उघड उघड प्रयत्न चालू आहेत. तिची एकपण चूक दाखवत नाही उलट सध्या तिला सहानुभूती मिळवून देतात. पण व्होट्स मध्ये प्रियांका खूप पुढे आहे. निम्रत, अब्दू आणि साजिदला नॉमिनेशन मध्ये शेवटपर्यंत येऊ देणार नाहीत कारण त्यांना वोट्स मिळणार नाहीत व ते बाहेर जातील हे उघड आहे.

आणि कलर्स त्यांच्या फेसेसला विनर करणारच. त्यांच्या बिझनेस पॉईंट ऑफ व्यूने पहिले तर चुकीचे नाही. त्यांच्या चॅनेलला उपयोग होईल हे ते पाहणारच. प्रियांका, निम्रत, अंकित, टीना, शालीन इतकेच काय शिवही कलर्स फेसच आहे. म्हणून तर त्याला इथे चान्स मिळालाच ना.

ओहह, सुमबुलला पाठवायचे ना बाहेर.

कोणीही एव्हिक्ट झालं नाही. >>> हे काल भरत यांनी लिहिलेलं पण मला वाटलं आज असेल एविकशन.

voting चं कूठे काय कंसिडर होतंय, देऊन टाका ट्रॉफी. सगळ्यांना कळंलच आहे काय होणारे.

फॉरमॅट नुसार सेलिब्रिटी .. अक्चुअल कोरिओग्राफर नाही . अशा लोकांचा शो आहे .. सेलिब्रिटी ला सोबत डान्सर देऊन मग जज केले जाते ...
त्या सगळ्यांमध्ये गश्मीर नाक्कीच फार पुढे होता.. शेवटचा उर्वशी डान्स तर क्लास होता..रुबिना फालतू वाटते.. बीबी जिंकली मग सगळीकडे तिला निदान फायनल मध्ये आणून सोडतात.. जस कि खतरोंके खिलाडी .. त्यात ती फायनल मध्ये नव्हती पण ढकलत फिनाले वीक मध्ये आली होती..

व्होट्स च्या बेसिस वॉर रुबी फैझू पुढे असूच शकतात .. पण डान्सर गश्मीर मच मच बेटर

आज एम्सी स्टॅनचा रॅपर मित्रं गोल्ड उर्फ ‘सनी वाघचुरे ‘ वाइल्ड कार्ड म्हणून येतोय म्हणे , फुल्ल ऑन सोन्याचा गळा एम्सी स्टॅन सारख्या जड माळा पण सोन्याच्या !

Pages