बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा सिझन मागच्या सिझन पेक्षा जरा बरा चालु आहे कारण कोणी फारसे माहिती नाहीयेत:)
मला सध्या अब्दु , शिव , मान्या , टिना बरे वाटत आहेत .
साजिद खान एन्टरटेन करतोय पण भरपूर इमेज क्लिनिंगची संधी आणि फुटेज मिळतय !
अज्जिबात आवडले नाहीत अनॉयिंग : सुम्बुल, निमृत , शालिन

मी सध्या तरी follow करते आहे. पण साजिद खान सोडता कोणीही माहित नाही. शिव ठाकरे माबो वर वाचुन माहित आहे. पण बाकी कोणी अजिबातच नाहीत.

Contestant list -
अब्दु
अंकित
अर्चना गौतम
गौतम विज
गोरी नागोरी
मान्या सिंग
MC स्टॅन
निम्रित कौर
प्रियांका
साजिद खान
शालीन
शिव ठाकरे
सौंदर्या
श्रीजिता
संबुल
टिना

सुंबुलनी म्हणालेल्या दोन्ही कविता आवडल्या. तिचे वडील छानच लिहीत असणार.

MC स्टॅन फारच हरवलेला वाटतो. आणि ती गोरी नागोरी सुध्दा.

अब्दु आणि साजिद वर पुर्ण वेळ कॅमेरा असतो, त्यामुळे शिव देखील सतत स्क्रीनवर असतो.

अर्चना नामक भांडखोर बाई असह्य आहे. आणि नेमके अती बोलणारे किंवा सतत भांडणाऱ्या लोकांचा आवाज वाईट असतो. किती असह्य बोलत असते.

त्या अब्दु ची नेमकी काय कंडिशन आहे? तो खराच लहान बालक वाटतो. दिसायला आणि वागणे बोलणे पण तसेच. लहान मुलाला या लोकांमधे सोडल्यासारखे वाटते. लोकही त्याच्याशी तसेच बोलतात. मी थोडाच वेळ पाहिले अर्थात.

प्रियांका आहे फुल बिग बॉस मटेरियल... प्रत्येक मॅटर मध्ये घुसते.. चांगला होम वर्क करून आलीय... जाईल टॉप ला आणि हरेल...

अब्दु १९ वर्षाचा आहे, वागतो बोलतो आणि दिसतो लहान मुला सारखा पण जे काही आहे, तो आहे खूप एन्टरटेनिंग Happy

तो कोण स्टेन आहे (नाव बरोबर आहे का), त्याला 45 टक्के वोट्स, शिवला 35 टक्के, बाकी विभागून असं youtube वर समजलं.

मी सध्या भारतात आहे. त्यामुळे मला बिग बॉस बरेच वर्षांनी टीव्ही वर बघता येतेय. पण एकाचवेळी चालू असल्याने हिंदी बघावे का मराठी हा मोठा प्रश्न पडतो. आणि जर रिपीट दाखवत असतील तरी दोन्हीसाठी एवढा वेळ काढणे शक्य नाही. त्यामुळे बहुतेक हिंदीच बघीन सध्यातरी.
आजचा भाग मात्र बोरच वाटला ..
शेवटी एम सी स्टॅन आणि शिवचे काहीतरी भांडण झाले. पैशाचा विषय होता. स्टॅन काय बोलतो काहीच काळात नाही. बिग बॉसने तो बोलताना कॅपशन्स लावावेत म्हणजे काहीतरी कळेल.
शिव गौतम गुलाटीच्या दिशेने प्रवास करतोय बहुधा.

एम्सी स्टॅन पुण्याच्या स्लम एरीयातून आलेला आणि सध्या गडगंज श्रीमन्त रॅपर आहे !
त्याच्या गळ्यातल्या चेन्स, पेन्डन्ट्स वगैरे विकली तर एक उत्तम घर + मर्सिडिज वगैरे बरेच काही येईल असे त्यानीच सांगितलं Happy

तो पुण्याचा आहे, हे शिवला सांगत होता, तो शॉट बघितला. हे नाव कधी ऐकलं नव्हतं आधी. तसंही रॅपर मला फार माहीती नाहीयेत पण महाराष्ट्रातली काही नावं माहीती आहेत. हा माहीती नव्हता.

टीकला तर जिंकेलही बिग बॉस, त्याला शिवपेक्षा जास्त प्रमाणात वोटस आहेत.

मराठी पेक्षा हिंदी मला बरं वाटलं बघायला....
मराठीत bb म्हणजे भांडण बखेडा असा फुल फॉर्म आहे असं त्या कलाकारांना वाटतं , म्हणून मुद्दाम च भांडत बसतात....

काल शिव आणि एम्सी स्टॅनच्या भांडणाचं निमित्त नेमकं काय झालं ? तो पैश्याचा शो ऑफ करतो त्यावरून झालं का ?
बिबॉने डायरेक्ट राडाच दाखवला, मूळ कारण नाहीच.
स्टॅन इतका ऑफेन्ड झाला कि शेवटी चिडून एकदम मराठीवर आला, ‘अमरावतीला परत जा‘ वगैरे ओरडायला लागला आणि मराठी शिव्या द्यायला लागला ज्या म्युट झाल्या, त्या मानाने शिवच्या शिव्या सोबर ऐकु आल्या ‘ शेंबड्या‘ Biggrin
पण मला स्टॅन, शिव दोघेही आवडातस्येत इथे, वेगळे वाटतात फेक टि.व्ही अ‍ॅक्टर्स पुढे !
शिव इज डुइंग सो गुड , सतत कॅमेरा फुटेज असतं त्याच्याकडे, काल सॅड होऊन साजिदला सांगत होता कि हे लोक त्टि.व्ही अ‍ॅक्टर्स) मुद्दाम मला टारगेट करून एकटं पाडतात पण त्याला पक्कं माहित आहे कि सतत टार्गेट होणे/एकटे पडणे किती फायदेशीर आहे या गेम मधे !
त्याचा गेम हुशारीने खेळतोय फक्तं सॉरी म्हणतो नंतर ते नाही आवडते !
सध्या तो साजिद आणि अद्बुला धरून आहे.
आब्दु इज विनिंग हार्ट्स , पण टास्क्स वगैरे आली कि काय होईल माहित नाही.

आब्दुला यापूर्वी कधीच पहिले नव्हते. त्याला काही आठवडे ठेवतील नक्की.
यावेळी बिग बॉस स्वतः ऍक्टिव्हली भाग घेऊन आहेत. अजिबात कोणाला रिलॅक्स होऊ देत नाहीत. सर्वाना छान टोमणे मारत आहेत.
त्यामुळे हिंदी जास्त चांगला वाटत आहे.

आज कॅचप केले जरा फा फॉ करत. शिव चा गेम आवडतोय. आज डोक्यावर टोपली टास्क मधे डोके मस्त लावले त्याने . शालीन वगैरे टिव्ही आणि सोप ऑपराचे बालबच्चे डोक्यात जात आहेत. अब्दु वर मात्र स त त कॅमेरा आहे हे खरे. मला अजूनही कळत नाही नक्की अ‍ॅडल्ट चा ब्रेन आहे का त्याचा ? ! आणि असेल तरी लोक त्याला उचलून काय घेतात , तो ही कुणा कुणाच्या मांडीवर बसतो. मला तरी फार क्रिन्जी वाटले.

गोरी नागोरी एलिमिनेट व्हायची शक्यता होती तर बिग बॉस ने तिलाच वाचवली.. आता बाकीचे सगळे चांगले कन्टेस्टंट नॉमिनेटेड आहेत...

या आठवड्यात एलिमिनेशन नसणार बहुतेक.
त्या साजिद खानला कधी काढणार आहेत ? का तो एक दोनदा अश्रू ढाळून, स्वतःला पूर्ण व्हाईटवॉश करूनच बाहेर येणार आहे ?

शिवची एन्ट्री पाहिली, खरं सांगू का मला फार नाही आवडला, समोर खळीवाली डेंटिस्ट होती, तिच्याशी फ्लर्ट करत होता. माझ्याशी सूत जुळवेल तिला इथेच नाही, बाहेर पण साथ देईन वगैरे बरळत होता ( शब्द अगदी असे नाहीत पण आशय मला तरी असाच वाटला ) .

मराठीत पहिल्या क्षणालाच आवडलेला, ते मी लिहिलंही होतं, तसं इथे झालं नाही.

हे फक्त मी एन्ट्री आणि त्याची त्यावेळची बडबड एवढंच बघून लिहिलं आहे, बाकी काही बघितलं नाहीये.

तो अब्दु भारी आहे, त्याच्याकडे लक्ष जातं, काही छोटे सीन्स बघितले.

साजिद ची इमेज सुधरावून काढतील...
या सिझन च्या वॅम्पस - प्रियांका आणि मान्या

तो प्रियांका चा मित्र अंकित एकही शब्द बोलताना दिसला नाही.. शांत शांत असतो...

मलाही शिव हिन्दीत जास्तं आवडतोय, कंफर्टेबल वाटतोय इथे जास्तं आणि आल्यापासून फ्रंट फुट वर !

या सिझन च्या वॅम्पस - प्रियांका आणि मान्या >>>

प्रियांकापेक्ष टीना व्हॅम्प असेल असं वाटतंय
मान्याने काल एक वाक्य म्हटले श्रीजीताला "मी देशाची अम्बॅसॅडर होते, तू काय साधी टीव्ही स्टार आहेस !"
बिग बॉस मनातल्या मनात "सलमानला द्यायचा कन्टेन्ट मिळाला."
मान्या आधी गरिबीचे कार्ड खेळत होती. आता खरा चेहरा बाहेर येईल.

अरे मला ती प्रियांका अ‍ॅक्चुअली फनी वाटते, खूप बरी वाटतेय टि.व्ही अ‍ॅक्ट्स्र्स पेक्षा .
“बिग बॉस मैने आपको माफ कर दिया, आपने शुद्ध हिन्दी मे ‘घंटा’ नही कहा, गाँग कहा, मुझे पताही नही चला कि क्या बजाना है, आइंदासे ध्यान रखना“ Biggrin

Pages