Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या मंडळींना पण समजत का नाहीय
या मंडळींना पण समजत का नाहीय कि साजिद कस गॅसलाईट करतोय सर्वाना .आधी गोरी ,मग निमरीत ,सुमबुल आणि आता अब्दू .>>>
साजिदला शो मध्ये आणून बीबीने खूप मोठे उपकार केले आहेत. ज्या काही लोकांना त्याच्यावर ९ स्त्रियांनी केलेल्या आरोपांवर शंका होती, त्यांनाही नाइलाजस्तव आता पटेल. साजिदने शो मध्ये येऊन पूर्णपणे सिद्ध केले आहे की त्याने कसे मेंटॉर बनून किंवा गॅसलाइट करून त्यांना त्रास दिला असेल. मला तर वाटते त्याने शेवटपर्यंत शो मध्ये राहावे आणि बाहेर जाऊन बघावे की जी इमेज सुधरवयाला आलेला त्याची काय वाट लागली आहे.
पण हेही कबुल करावे लागते की साजिद अतिशय हुशार, इंटेलिजन्ट प्लेयर आहे व स्वतः कोणतीही तोशीस लावून ना घेता, फिझिकल टास्क न करता त्याला सर्व राशन मिळते, सर्वचजण त्याचे ऐकतात, त्याला नॉमिनेटही कोणी करू शकत नाही किंवा केले तरी तो त्यांना नंतर manipulate करून पुढच्या वेळी स्वतःकडे वळवतो.. उदा सौंदर्या. अर्थात बीबी पण आपल्या जावयाला वाचवतेच म्हणा, त्यामुळे त्याला कसलेच टेन्शन नाही.
काल सुमबुल त्याला म्हणत होती की मला अंकितच्या एव्हिक्शन साठी मत दिल्याचे वाईट वाटले. कारण साजिदने स्वतः त्याला मत दिले नव्हते. अंकितने सुमबुलला नेहमीच चांगलेच वागवले होते पण तिला स्वतःचे मतच नाही. भेडचाल मध्ये राहणे हेच तिचे काम. आधी शालीन टीना आणि आता मंडली सांगतील तसे वागणे हीच तिची गेम. साजिद, स्टॅन तिच्या डान्सच्या वेळी (जो तिने खूप छान केला)कसे हसत होते. disgusting ! पण ही स्वतःचा स्टॅन्ड घेणारच नाही.
मी देखील प्रियांका फॅन...
मी देखील प्रियांका फॅन...
अर्चना आणि विकासला अजिबात
अर्चना आणि विकासला अजिबात अक्कल नाही. खरंच कोणालाही चांगलंच भाजलं असते. बीबी कशाची वाट बघत बसले होते. नको तिथे लक्ष घालतात. इथे लगेचच त्या दोघांना का थांबवलं नाही.
साजिद अब्दू परत आल्यापासून नाराज आहेच. त्यामुळे त्याने त्याचं प्रमोशन नीट केलं नाहीच. शिव बद्दल मात्र भरपूर बोलला. तिघांनी unity दाखवली त्याचं मात्र कौतुक.
साजिदला सारखं कोणी ना कोणी टार्गेट हवं असते. कधी अब्दू निम्रित नाही तर सुंबुल. सुंबुलला आता सारखं तिच्या रडण्यावरून टोचायला लागला आहे. नुसता आव आणतो मेंटोर असल्यासारखा. सतत कंट्रोल करायला बघतो.
यात प्रियांका फॅन्सना काय
यात प्रियांका फॅन्सना काय उचकवणार. >>>> शिव व आरोहची ती क्लिप वायरल झाली आहेच, पब्लिकला माहित झाले तरिही बिबॉने गेम खेळून विकासला त्याबद्दल घरात बोलण्यास मनाई केली. त्यामुळे प्रियांका फॅन्सला अजून एक कारण मिळाले शिवविरुद्ध की बिबॉ त्याला फेवर करत आहेत. TRP वाढवायचा बिबॉला चांगला मोका होता, अर्चनाच्या हाती आयते कोलित मिळाले होते. तिने पुर्ण एपिसोड गाजवून काढला असता. पण तरिही त्यांनी प्रियांका विरुद्ध शिव गेम खेळला. यात प्रियांका कुठेही दिसत नसली तरी हा बनाव प्रियांकासाठीच आहे असे मला वाटते.
मुळात या सिझनला दुश्मनी हा बिबॉचा आवडता फॅक्टर मिस आहे. प्रियांका - शिव ची जी दुश्मनी आहे ती बाहेर पब्लिकमध्ये आहे. घरात त्यांच तेव्हढ्यापुरती असते. खरतरं साजिदमुळे भांडणे लगेच संपत आहेत तो मुखिया बनून जिथे तिथे पोहचत असतो. तो नसता तर गेम वेगळा असता.
काल शिवचा कॅप्टन पण कदाचित मंडळीमध्ये कुरबुर वाढवण्यासाठीच बनविला असण्याची शक्यता आहे.
त्या तिघांनी एकमेकांविरुद्ध
त्या तिघांनी एकमेकांविरुद्ध बोलायला नकार दिला, मस्त. शिव स्टॅन साजिद बरोबर गप्पा मारत असतील, पण त्यांनी कधी त्याचं काही ऐकलं असं वाटलं नाही. त्याला प्रश्न पण विचारलेत पण शांतपणे उगाच आक्रस्ताळेपणा मुद्दा करत नाहीत . जिथे बोलून गोष्टी साध्य होतात तिथे आरडाओरडा करायची गरज नाही, हे मला आवडलं. अंकित पण साजिद बरोबर गप्पा मारायचा, तोच बाहेर येऊन सांगतोय. पण ते सगळं एडिट केलं. काल अर्चना सौ मध्ये झालेली चर्चा, अर्चना किती मन लावून ऐकत होती, आणि प्रोमोमध्ये भांडणं, पालथ्या घड्यावर पाणी.
अंकित आक्रस्ताळेपणा करत
अंकित आक्रस्ताळेपणा करत नव्हता, भांडणे करत नव्हता म्हणून बिग बॉसने त्याला एखादी सासू नावडत्या सुनेला सतत टोमणे मारून त्रास देते तसा सतत अपमान केला. त्याला बोरिंग, कॅप्टन्सी शांततेत घालवली म्हणून टोचून बोलले. शेवटी बाहेरही काढून टाकले. शो मध्ये कन्टेन्ट देत नाही म्हणून. ओके फेअर इनफ ! पण हेच मंडलीने केले की मात्र किती छान बॉण्ड नाही का! बोलून गोष्टी साध्य होतात नाही का मग कशाला भांडणे करायची नाही का? पण ही सूट फक्त मंडलीला का ?
आणि मग अनफेअर बायस बिग बॉस मंडलीला फेवर करतात म्हटले तर मात्र पटत नाही.
अंकित झोपतो झोपतो म्हणताना रोज निम्रत , स्टॅन, अब्दू, साजिद पाय पसरून झोपायचे त्यांना एका शब्दाने कधी बोलले नाहीत. अर्चनाने तर स्क्रीनवर निमरीत आणि अब्दुला झोपताना दाखवलेही होते. पण ऑफ कोर्स ती मंडली आहे त्यांना बोलले की डायरेक्ट शोच्या बाहेरच जायचे, जसे विकास या आठवड्यात जाणार आहे , कारण लाडक्या शिवला उघडे पाडले ना त्याने.
अंकित खरंतर काहीच करत नव्हता.
अंकित खरंतर काहीच करत नव्हता. त्या दोघांचे स्पेशल सेशन्स घेऊन त्याला समजावून सांगितलेले. तरी काहीच उपयोग नाही झाला. शिव स्टॅन काहीतरी एंटरटेनमेंट देतात. पाहिजे तिथे बोलतात. त्यांचा बॉन्ड चांगला आहेच म्हणुन त्यांच्या मध्येच भांडणं सोडवतात. तिथे आक्रस्ताळेपणा नाही करत. म्हणुनच त्यांना साजिदच्या मागे मागे करतात असं लोकं म्हणतायत.पण त्यांची गेम ते व्यवस्थित खेळतात. लोकं म्हणाली म्हणुन साजिदशी उगाच भांडणं काढणारी नाहीत. स्वतःचं डोकं लावतात.
शिवला कॅप्टन केले कि घरात
शिवला कॅप्टन केले कि घरात काहीतरी जबर घमासान होते

टिझर मधे शालीन अर्चना राडा दिसतोय, शिवने त्यांना जेलमधे टाकायला हवे नाहीतर बिबी फायर करायला टपलेच आहेत
आरती तुमची भिती अनाठायी वाटते
आरती तुमची भिती अनाठायी वाटते
शिव वि. प्रियांका मधे बिबॉ प्रियांकालाच सपोर्ट करतील, त्यांच्या सिरियल चा फेस आहे ना ती? शिव चा काहीच वशिला नाहीये. अब्दु आणि साजिद , येस, त्यांचे काहीतरी सेटिंग असेल असे पटते. नाहीतर ते अजून तिथे का आहेत कळत नाही. अंकित मात्र कमाल बोरिंग आणि प्रियांकाला सपोर्ट करणे सोडता काहीही करायचा की बोलायचाही नाही. तो इतके दिवस टिकला हेच फार होते. सुंबुल चेही तसेच. कशाला तिला ठेवलेय?! साजिद चे बारकेसारके काम करण्यासाठी? काल मात्र छान नाचली ती. काहीतरी स्वतःचा प्रेझेन्स दिसला तिचा काल.
फॅमिकी विक लवकर होणार म्हणे,
फॅमिकी विक लवकर होणार म्हणे, न्यु इयर गिफ्ट आय थिंक !
तोपर्यन्त सुम्बुल राहु दे, मला तिचे वडिल येऊन काय ड्रामा करतात आणि शालीन-टिना कसे रिअॅक्ट करतात ते पहाण्यात इंटरेस्ट आहे
फराह खान आलेली पण बघायची आहे !
माझी पण इच्छा आहे की सुमबुलचे
माझी पण इच्छा आहे की सुमबुलचे वडील यावेत, बहुतेक येणारच आहेत, टिनाच्या आईने यावे, मागच्या वेळी टीनाच्या आईने मस्त सुनावले होते सुमबूलच्या वडिलांना.
पण फॅमिली विकनंतर मात्र काही चेंज व्हावेत शो मध्ये, नाहीतर आता तीच तीच भांडणे बघून बोर झालेय. आता तुम्ही म्हणाल की मला शिव ग्रुप पसंत नाही पण खरंच त्यांचे equation बदलले तर काही तरी स्पर्धा वाटेल. नाहीतर हे ३/४ लोक (निमरीत सोडून) तू जिंक, मला आनंदच होईल याच मोड मध्ये आहेत. सुमबुलने तर स्पर्धा सोडूनच दिली आहे.
आरती तुमची भिती अनाठायी वाटते
आरती तुमची भिती अनाठायी वाटते Happy शिव वि. प्रियांका मधे बिबॉ प्रियांकालाच सपोर्ट करतील, त्यांच्या सिरियल चा फेस आहे ना ती? >> असं का वाटतं तुम्हाला. ज्याप्रकारे बिगबॉसने सलमानद्वारे अत्यंत demeaning way मध्ये तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर contradictory टीका करून तिचा कॉन्फिडन्स पूर्ण घालवला आहे. माय ग्लॅम जिंकल्यावर तिला टोमणे मारले. कमीतकमी ५ मिनिटे तरी तिला विजयाचा आनंद घेऊ द्यायचा. त्यावरून त्यांना ती पसंत नाही हेच दिसत आहे. त्यांनी तिचा गेम डाउन केला आहे. काय करावे, कसे वागावे तिला पूर्ण गोंधळवून टाकले आहे.
वोट्समध्ये ती आघाडीवर असते. पण ते फॅन्समुळे.
आरती,
आरती,
तो जुना फॉर्म्युला आहे बिबॉचा, ज्याला विनर बनवायचं त्याचा छळ करायचा, दु:खी करायचं, एकटं पाडायचं , लोन वॉरीयर /शेरनी वगैरे म्हणायचं आणि सिंपथी द्यायची , फॉलॉड बाय ट्रॉफी!
त्यात अगदी सुरवातीपासूनच चर्चा आहे कि प्रियंकाला जिंकवणार त्यामुळे अजुनच स्पष्ट होतय !
कलर्स फेस सोडून इतर कोणी जिंकलं तरच नवल.. प्रियंकाचे फॅन्स तर शिवलाही कलर्स फेस म्हणतात
होय दिपांजली. मला कबुल आहे,
होय दीपांजली मला कबुल आहे, सर्व नाहीत पण मीही पहिले आहेत बिग बॉस पूर्वीचे. गोहर, रुबिना, हीना एवढेच काय आपली मेघा दाढेच्या बाबतीतही हाच फॉर्मुला होता. पण त्यातही बिग बॉस एक भाषेचे तारतम्य पाहून टीका करायचे. यावेळच्या टीकेत एक प्रकारचा खुनशीपणा आहे, below the belt आहे.
सलमान काही शो पाहत नाही, तो स्क्रिप्ट वाचून बोलतो, त्याला एकही बिग बॉसच्या कॉन्टेस्टन्टमध्ये काडीचा इंटरेस्ट नाही (साजिद सोडून) आणि या सीझनमध्ये तर त्याने स्क्रीन टाइमही प्रचंड कमी ठेवला. आहे तो फक्त कोणी प्रोमोशनसाठी आले की उत्साही दिसतो. उलटसुलट कॉन्ट्रडीक्टरी प्रियंकाला बोलतो पण त्याला काहीही माहित नसते हे उघड दिसते. पण त्याला जे स्क्रिप्ट पुरवले जाते ते क्रिएटिव्हज कडून. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात तिला झापले जाते, एकदा म्हणतात फ्रेंड्स नाहीत, फ्रेंड्स केले कि तेही convenience साठी केले म्हणून टोमणे. किती ते confusion. anyway प्रियांकाला झापायाला काहीच हरकत नाही पण काहीतरी योग्य पॉईंट्स घ्या.
कलर्स फेस ४/५ आहेत शोमध्ये आणि कितीही नकारले तरी शिवही विनर आहे ना एका कलर्सच्या शोच्या. मग तो कसा नाही फेस ? मला असे वाटते की निमरित प्रोजेक्टड विनर होती, तिला सर्व बाजुंनी बिग बॉसने मदत केली आहे आणि अजूनही करतही आहेत. पण तिचा गेम वर आलाच नाही व बाहेर ती कोणालाच आवडत नाही. निमरीत वि प्रियांका यात प्रियंकाला व्हिलन आणि निमरीतल ट्रॉफी असा प्लॅन होता. प्रियांका अंकित प्रेमाची कबुली देतील, लव्ह अँगल मिळेल अशी स्क्रिप्ट होती. पण अंकीतने बिलकुल ऐकलं नाही, सलमान बोलून गेला की पहिल्या आठवड्यात जसे दोघे होतात तसेच आताही आहात . मग त्याला हाकलले. तेही ठीकच आहे.
प्रियांका विनर होईल फक्त जर वोट्स खरंच मोजले तर. पण झलक दिखला जा वरून वाटते की आयत्या वेळी काहीही होऊ शकते.
प्रियंका हिंदी कलर्स फेस आहे,
प्रियंका हिंदी कलर्स फेस आहे, शिव मराठी. त्यामुळे दोघांपैकीच एक जिंकेल.
मराठी मध्ये अजूनही कलर्सच्या फेसला जिंकवले नाहीये, पाचात नेतात फक्त . तिसरा ठेवतात एकवेळ .
कालच्या राड्यात अर्चनाने बिलो
कालच्या राड्यात अर्चनाने बिलो द बेल्ट बडबड केलीच पण समोरचे पब्लिकही काही कमी नव्हते, शालीन तर ओव्हरर्क्टिंग कि दुकान , विकासचे चिडणे समजु शकतो पण इतर पब्लिक फुटेज के भूखे !

प्रियंका अॅज ऑल्वेज स्वतःचा काही मुद्दा नसताना मधे घुसून फुटेज घ्यायचा प्रयत्नं करत होती , पण शि इज जस्ट गेटिंग टेस्ट ऑफ हर ओन मेडिसिन्, तिनेच सपोर्ट केलं होतं ना ‘ब्रिंग बॅक अर्चना‘ , घ्या आता, हॅव फन.. उकळतं तेल उडाय्स्चं थोडक्यात राहिलं तिच्या अंगावर, तिला इन्ज्युरी झाली असती तर केलं असतं का अर्चनाला माफ ?
असो, खूप म्हणजे खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं प्रियंकाला अर्चनामुळे चडफडताना बघून
शिव समोर काल सुंबुलने सगळ्यांचा गेम छान डिकोड केला, सुंबुल आत्ता कुठे ट्रॅक वर येतेय, पण तब्बल १३ आठवडे लागले तिला व्होकल बनायला
शिव-सुंबुल बाँड पब्लिकला सोशल मिडियावर फारच आवडतोय , त्याने तिला नॉमिनेशन मधून सेफ केले म्हणे !
शालीन ला इतकं रिअॅक्ट
शालीन ला इतकं रिअॅक्ट करण्यासारखं अर्चना काय बोलली ते समजले नाही. आपल्याला दाखवले नाही का ते? बायको आणि मुलावरून बोलली म्हणे. ते तर मग शालीन ने पण तिला वाईट शब्दात टॉन्ट केले होतेच.
हो सुंबुल नक्कीच जरा सुधारली आहे, आता कुठे तिची खरी पर्सनॅलिटी जरा दिसते आहे. गुड फॉर हर.
बी बी ने प्रियांका निम्रित ला
बी बी ने प्रियांका निम्रित ला कन्फेशन रूम मध्ये बोलावून स्पून फीडींग केलं. बीबी चा त्या दोघींकडे असलेला ओढा सरळ सरळ दिसून येतोय. सो प्रियांकाच विनर व्हायचे चान्सेस दिसतात मला.
क्वालिटी शून्य आहे खरं तर
क्वालिटी शून्य आहे खरं तर प्रियंकाकडे, ना टास्क्स समजत , ना लॉजिकल बोलता येत , ना रिलेशसन्स डेव्हलप केली , ना लिडरशिप क्वालिटी, ना ठाम मुद्दे मांडत .. नुसतीच हिपॉक्रसी !
विकासला काढतील, त्याने
विकासला काढतील, त्याने जातीवाचक शिव्या दिल्या का अर्चनाला. त्यामुळे बिग बॉस ला नोटिस पाठवलीय आणि सात दिवसांत उत्तर द्यायला सांगितलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=HKuNXIujNkM
इथे बघून लिहिलं वरचं .
बहुतेक evict झाला तो. आता बाहेर येऊन माफी मागायला लागेल .
तसाही तो किंवा श्रीजिता जाणार
तसाही तो किंवा श्रीजिता जाणार होते , सुरवातीपासून आला असता तर पुढे गेला असता विकास, स्मार्ट प्लेयर होता तो !
आतापर्यंत निर्बुद्धपणात
आतापर्यंत निर्बुद्धपणात consistentcy कायम ठेवणारा एकच सदस्य घरात आहे. टास्क न समजणे व आपले मित्र सांगतील तसे बुगुबुगु मन हलवून वागणे ह्यात सातत्य आहे पण तरीही ह्या सदस्याला शेवटपर्यंत राहण्याची संधी मिळणार, पण त्याच्यापेक्षा स्मार्ट प्लेअर मात्र लगेच जातात.
विकास नक्की च स्मार्ट प्लेयर
विकास नक्की च स्मार्ट प्लेयर होता पण त्याला बोलताना भान राहत नाही.
अर्चना ने उघड पणे म्हटलं असताना की मला इंग्लिश येत नाही तरी त्याने तिचं आणि मला वाटतं सौंदर्या च शिक्षण काढलं... आणि ते ही रिपीट मोड....
त्याच्याकडे एक ती लहानशी बॅग कायम लटकवलेली असते... त्यात काय असतं कोण जाणे. मला सारख तो ऑफिस किंवा शॉपिंग ला चाललाय असा फील येतो
बाकी प्रियांका बाबत दिपांजली एक मुद्दा राहिला... ती कामचोर पण आहे
बिना मेकप ची गोड दिसते तोंड बंद असेल तर... पण मेकप आणि बहुतेक दा ड्रेसिंग पण भयानक असतं.
आता बिग बॉस ला तिला च विनर करायची असेल तर आपल्याला बोलायला बरं पडेल ही कदाचित, "काही न करता झाली ही विनर"
लोल....
बाकी मला सगळ्यात जास्त नाही आवडत ती टीना...
फार घाण आहे मन तिचं... सगळे च बोलतात तिला तिकडे तसं तर," मन काला है उसका"
शिव मला आवडतो आहे.... साजिद कळत नाही आणि खूप इरिटेटिंग आहे.... काल अब्दु ला जास्त दाखवलं नाहीय....
शालीन ला तर कशावरून ही एकदम हायपर होऊन भांडण्याइतक कारण होतं.....
शालीनला लवकर काढणार नाहीत.
शालीनला लवकर काढणार नाहीत. त्याचं अजून माकड करणार मग काढणार. तसंही त्याचं आणि अर्चनाचं भांडण झालं की आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला अशी स्थिती असते त्याची.काल सकाळी जमदग्नी अॅक्टींग आणि संध्याकाळी डान्स. टिनाचं अजून भलतच काहीतरी.
आजचा टास्क भारी होता, सगळे माईंड गेम्स. साजिद अगदीच फुस्स निघाला. सेफ खेळतोय. शालीन आणि ग्रुप नुसता चरफडतोय. मजा आली. सुंबुल काही करत नाही, जायला पाहिजे सगळं खरं असलं तरी खूप क्यूट आहे. शिवने तिला छान समजावून सांगितलं.
मला वाटतंय wkw पूर्ण अर्चना शालीनवर फोकस राहणार.
आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला
आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला अशी स्थिती असते>> नाही. तसं तो मुद्दाम करतो. भले व्हीलन असेल पण त्याला बघणं बोअर होत नाही. माकडचाळेच असतात पण वेगवेगळ्या मुद्द्यांवर कन्टेन्ट देतो. नाहीतर बाकीच्यांच्या खेळ एकसुरी झाला आहे.
पूर्ण एपिसोड मधे शिव छा गया,
पूर्ण एपिसोड मधे शिव छा गया, मस्तं अॅटिट्युड आणि टास्क !
शालीन-शिव वाजल्यावर मौका बघून साजिदने लग्गेच शालीनची जुनी चुगली केली शिव कडे
सुम्बुलचा गेम जबरदस्तं पलटलाय, कन्टेन्ट आणि अॅटिट्युड दोन्ही देतेय, ती नाही जाणार आता इतक्यात !
प्रियंका निर्बुद्ध बिगबॉस तिला काय सांगतायेत डोक्यात शिरत नव्हतं बहुतेक, निम्रितला समजून काही उपयोग झाला कि नाही कळेत आता !
नाही. तसं तो मुद्दाम करतो.>>
नाही. तसं तो मुद्दाम करतो.>> हो हो मुद्दाम करतो, घरातल्यांना माहितीये बाहेरच्यांना माहितीये. ते भेजा फ्राय मध्ये जसं करमणुकीसाठी आणायचे ना, तसं त्याला ठेवलंय. तो आणि टीना काही ना काही करत राहतात, wkw चा एक सेगमेंट तरी शालीनवर असतोच, त्यामुळे त्याला कळतंय तो जे काही करतो ते चालतंय.
कालच्या टास्कमध्ये ४ लोक
कालच्या टास्कमध्ये ४ लोक मंडलीची आणि १ अर्चना होती. साहजिक होते कि मंडलीतली १ तर वाचणारच. अर्चनाला पटवून निमरीतला वाचवले असते तर शिवचे कौतुक केले असते की काय गेम खेळला आहे. नेहमीप्रमाणे बिग बॉसने लाडक्या मुलाच्या हाती एकतर्फी टास्क दिलेले. यात काय डोके चालवायची गरज होती का
एम्सी स्टॅन इज डार्क हॉर्स ,
एम्सी स्टॅन इज डार्क हॉर्स , झपाट्याने पुढे जातोय विदाउट ट्रायिंग टु हार्ड, ट्रुली बिइंग हिम्सेल्फ !
सुम्बुलने पण निम्रितला मागे टाकलय .
यावेळी फायनलिस्ट्स मधे खूप सरप्रायजिंग नावं असणार असं वाटतय !
बाकी एपिसोड बोरींग होता , मोस्ट्ली फॉरवर्ड केला .
स्टॅनला सपोर्टही तगडा आहे .
स्टॅनला सपोर्टही तगडा आहे, स्टॅन आर्मी आहे सपोर्टर्सची. जिंकवतील असं वाटत नाही, आवडेल जिंकला तर. शिव किंवा प्रियंकाच विनर मात्र.
Pages