Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याने काढला नाहीये, वीणाने
त्याने काढला नाहीये, वीणाने काढलाय. नंतर ती त्याला त्याबद्दल सॉरी म्हणाली. तो इथे यायच्या आधी तिला भेटला होता. मेघा धाडेही मागे म्हणाली की त्या दोघांत ब्रेकअप झालेला नाहीये, त्यांचं नातं फार सुरेख आहे.
Ithlya posts thamblya..
Ithlya posts thamblya.. sagale ekatra pakalo aapan >>
मी पाहत आहे पण पहिला उत्साह नाही.
असं आहे ना की जोपर्यंत घरातील equations बदलत नाहीत तोपर्यंत शो stagnant झाल्यासारखा वाटतोय. दोन ग्रूप्स आहेत शिव साजिदचा ग्रूप एकमेकांना घट्ट धरून आहे पण किती दिवस सुरज बडजात्याचा हम साथ साथ हैं पाहणार?शिव अब्दू बॉण्ड आता किती दिवस पाहायचा. हे काही डेली सिरीयल नाही की ये बंधन तो प्यार का बंधन आहे पाहत बसावे. दुसरीकडे बिग बॉस ने प्रियंकाला अंकितपासून दूर राहा, ब्रेकअप कर म्हणून सल्ला दिला तरी ते दोघे काही बदलणार नाहीत व प्रेम कबूलही करणार नाहीत. शालीन टीना महा बोर व फेक असल्याने त्यांना सपोर्ट नाही. अर्चनाला हे लोक पुढे जाऊ देणार नाहीत. त्यामुळे तेच तेच बरेच आठवडे पाहत आहोत असा फील येतो. चांगले टास्क नसल्याने किचन फाइट शिवाय काही मुद्देही नाहीत आणि किचन मुद्दे एका लेव्हलच्या पुढे बघवत नाहीत. खरे तर हा सिझन सुपर हिट आहे. पण जर काही घडले नाही तर आता रेटिंग्स मध्ये खाली येऊ शकतो.
जे लोक काही करत नाहीत त्यांना फॅन्स वोट करत असल्याने उदा स्टॅन, सुमबुल आणि काही बीबीला ठेवायचे आहेत उदा साजिद, निमरीत हे लोक शो मध्ये जागा अडवून आहेत व जे वोट्स मध्ये वीक आहेत उदा. सौंदर्या व व्हॅम्प असली तरी टीना कन्टेन्ट देतात म्हणून त्यांनाही काढता येत नाही. अब्दूला नॉमिनेट केले म्हणून सलमानने पहिल्या वीक ला झापले होते त्यामुळे त्याला कोणी नॉमिनेटही करत नाही. त्यामुळे तो काही विशेष ना करता फिनालेत जाणार हेही सर्वाना माहित आहे. सगळे खूप प्रेडिक्टबल झाले आहे.
आत वाइल्ड कार्ड आणणार आहेत तोही कोणीतरी जुन्या नेहमीचेच यशस्वी मधले आहेत म्हणे.
स्टॅन दोन कोटी देऊन बाहेर
स्टॅन दोन कोटी देऊन बाहेर जाण्याचा विचार करत आहे त्याला खूपच कंटाळा आला आहे. घरात एकदम लॉस्ट दिसतो. पण फॅन्स वोट्स देत असल्याने बिग बॉसलाही त्याला काढता येईना. व त्याचा काही कन्टेन्ट नसल्यानेही पंचाईत झाली आहे. मला वाटते की या आठवड्यात त्याला काहीतरी करून voluntary एक्झिट घ्यायला लावतील
तो बाहेर पडला तर त्याची वोटस
तो बाहेर पडला तर त्याची वोटस शिवकडे वळतील. तो का कंटाळला, त्याचे सोनेरी मित्र आलेत ना आता.
अंजु वीणा ने काढला असेल पण
अंजु वीणा ने काढला असेल पण शिव च्या हातावर ही आहे तिच्या नावाचा टॅटू...
मी पहिला त्या दिवशी.... कलाई ( मराठी त काय म्हणतात ) वर काढलाय त्याने....
हो त्याने ठेवलाय, वीणानेच
हो त्याने ठेवलाय, वीणानेच काढलाय.
दोन दिवसांपासून वीणाचे नाव
दोन दिवसांपासून वीणाचे नाव शोमध्ये घेतले जात आहे. कदाचित तिला वाइल्ड कार्ड म्हणून आणणार असावेत.
शिवने आजच्या एपिसोडमध्ये स्वतः च सांगितले की त्याचा व वीणाचा ब्रेकअप झाला, तो सिंगल आहे.
सिंगल असेल तर आणायचे नाहीत
सिंगल असेल तर आणायचे नाहीत वीणाला.
शिवने वीणाचं नाव BBM मध्ये
शिवने वीणाचं नाव BBM मध्ये टास्कमध्ये टॅटू केलेलं. वीणा मला जास्त आवडायची तिथे . एकदम नो नॉन्सेन्स होती.
आताच शिव बोलला की आमचं ब्रेक
आताच शिव बोलला की आमचं ब्रेक अप झालं पण वीणा मूव्ह ऑन झाली नाहीय...
म्हणजे काय ते कळलं नाही...
वीणा त्याच्या प्रेमात अजूनही
वीणा त्याच्या प्रेमात अजूनही आहे आणि तो नाही असं म्हणायचं असेल.
Ho Veena cha ullekh bb ne
Ho Veena cha ullekh bb ne naahi shiv nech kela hota.>>>>> नाही. जेव्हा शिव म्हणाला की कोणाच्या तरी hug ची गरज आहे तेव्हा आधी बिग बॉस म्हणाले की वीणा चालेल का? त्यानंतर शिव म्हणालेला की आई किंवा विनि कोणीही चालेल त्या मला समजून घेतात.
मी पण बघतेय पण टाईप करायचा कंटाळा येतो म्हणून लिहीत नाही इथे.
स्टॅन, अब्दू, साजिद बोर करत आहेत एकतर त्यांना हाकला नाहीतर wild card आणा चांगले.
ट्विटरच्या ‘खबरी’ अकाउन्ट
ट्विटरच्या ‘खबरी’ अकाउन्ट वरून वीणा लवकरच वाइल्डकार्ड म्हणून येणार अशी न्युज आली आहे , खरं खोटं माहित नाही !
मला वाटतं पाहुणी म्हणून येईल.
ट्विटरच्या ‘खबरी’ अकाउन्ट
.
वीणाला मेकर्स बोलवतायेत हे
वीणाला मेकर्स बोलवतायेत हे महिनाभर येतंय न्युजमध्ये. तिने होकार दिला नव्हता तेव्हा. आता दिला असेल तर माहिती नाही. मी मागेही इथे लिहिलेलं की तिला बोलावतायेत अशा न्युज आहेत. तिने येऊन ब्रेकअपचे कारण जे गुलदस्त्यात ठेवलं आहे दोघांनी ते सांगू नये असं मला वाटतं. यायला हरकत नाही पण या गोष्टीचा इश्यू नको.
त्यांचा ब्रेकप च व्हायला नकोय
त्यांचा ब्रेकप च व्हायला नकोय असं वाटतं ... छान वाटतात दोघे एकमेकांसोबत.... दणकट आणि तगडे....
आता टिना डोक्यात जायला लागलीय माझ्या.... खूप जास्त....
आणि अब्दु ला काय लहान लहान गोष्टीवरून राग येतो....
सौंदर्या न इधरकी न उधरकी आहे....
अर्चना तर आवडते च पण तिला काय जास्त स्कोप मिळत नाहीय आजकाल....
कालचा एपिसोड पाहिल्यावर बिग
कालचा एपिसोड पाहिल्यावर बिग बॉसच्या भल्या भल्या चाहत्यांनाही धक्का बसेल. १५ सीझन्समध्ये बिग बॉसने कधीच संचालकच्या निर्णयावर मत प्रदर्शन केले नाही. इतकेच काय आतापर्यंत साजिदची मंडली सर्रास खोटे, अनफेअर खेळात असताना तोंडात मिठाची गुळणी धरून बसणारे बिग बॉस काल मात्र अंकितचा अपमान करण्याची, तो चुकीचा, अनफेअर आहे हे म्हणण्याची एकही संधी सोडत नव्हते. शो बायस्ड असतो हे माहित आहे पण बिग बॉसने एका टीमच्या पूर्णपणे बाजूने उघड उघड खेळणे हे शोची क्रेडिबिलिटी कमी करणे आहे. जो जिंकेल त्यालाही आपल्या असल्या रडीच्या जिंकण्याचा काय अभिमान वाटावा ?
आता मला खात्री आहे की प्रियांका नक्की जिंकणार नाही. स्टॅन ने या आठवड्यात बाहेर पडू नये. कारण वोट्सने तोच जिंकू शकतो. आणि तोच जिंकावा असेच आता मला वाटते. म्हणजे बिग बॉसच्या तोंडात मारल्यासारखे होईल. स्टॅन जिंकून चॅनेलचा काडीचा फायदा होणार नाही. and चॅनेल deserves इट.
शिव पण जिंकू दे पण निम्रत जिंकू नये. जिला myglam मध्ये दर ५ मिनिटाला बॉट्स मुळे २५ लाख मते मिळतात, जी विकली नॉमिनेशनच्या वोटिंग मध्ये सुमबुलच्या पण मागे आहे, जिला सतत स्पून फीडिंग होते अशी व्यक्ती जिंकू नये.. पण इथे गफला केला तर फिनालेत ही करता येईलच ना. त्यामुळे आतच ट्रॉफी देऊन टाका.
असो. कालच्या एपिसोडनंतर थँक यू बिग बॉस. मला जरा addiction झाले होते, त्यातून बाहेर पडण्यास मदत होईल. आता शो बघणे बंद
स्टॅन नाही जाणार, सलमान
स्टॅन नाही जाणार, सलमान प्रोमो मधे त्याला जायचं तर जा म्हणताना दाखवलाय पण त्याला खूप सपोर्ट आहे फॅन्सचा !
टिना गेल्याची चर्चा आहे पण ती कन्टेन्ट देतेय, तिला घालवून श्रीजिता आल्यामुळे काय फायदा होणार काय माहित !
टिनाला सिक्रेट रूममध्ये नाही
टिनाला सिक्रेट रूममध्ये नाही का ठेवणार?
टिनाला सिक्रेट रूम मध्ये
टिनाला सिक्रेट रूम मध्ये ठेवलं तर बिग बॉसला जास्त फायदा आहे!
हा सिझन extend होणार आहे, as
हा सिझन extend होणार आहे, as per युट्यूबर आर जे आदिश.
टीना च इतकं कौतीक काय म्हणून
टीना च इतकं कौतीक काय म्हणून केलं काल, तिला च तर विनर नाही न बनवायचं bb ला....
तो काल नवीन माणूस आला तो काय हॉट बीट नाहीय... जरा बरा तरी आणायचा....
त्या गरिबांच्या सैफ अली खान ला म्हणजे शालीन ला बघून बघून बोर झालं....
काल अशी ही बनवाबनवी बघताना,
काल अशी ही बनवाबनवी बघताना, धनंजय माने हा माझा बायको म्हणून नयनतारा ला ओळख करून देतो तेव्हा म्हणतो न," शालीन आहे शालीन आहे "
मला या शालीन च तोंड डोळ्यासमोर आलं पटकन....
टीनी गेली हे छान झालं. जाताना
टीनी गेली हे छान झालं. जाताना आपलं फेकनेसचं गाठोडं शालीनला देऊन गेली. थोडा फेकपणा प्रियांकालाही चिकटला.
मला अर्चनाची रिअॅक्शन आवडली. धमाल आहे ती.
साजिदला एकानेही पाणी प्यायला बोलावल नाही. अगदी सर्वगुणसंपन्न असावा.
शिवबद्दल अंकित आणि प्रियांकाने सांगितलेलं बरोबर आहे. त्याने ते लगेच सिद्धही केलं.
मी शुक्रवारचा भाग पाहिला नाही. पण काल सलमान खूप कमी वेळ दिसला.
श्रीजिता छान आहे. तिची अन्नु की हो गई वा भई वा ही मालिका मी पाहिली होती. उतरन ती यायच्या खूप आधी बघायची सोडली.
उतरन मधले तिघेजण आतापर्यंत बिग बॉसमध्ये आलेत. आणखीही आले असतील तर माहीत नाही. मी मागचे काही सीझन पाहिले नाहीत. रेशमी देसाई ट्विटरवर ट्रेंडिंग असायची त्यामुळे ती आहे ते कळलं होतं.
टिना कुठेही गेली नाहीये, येइल
टिना कुठेही गेली नाहीये, येइल उद्या..ड्रामा नुसता !
महिना उलटून गेला , कोणी जात तर नाहीच, अॅड होतायेत उलट
नाहीतर काय. . बोर व्हायला
नाहीतर काय. . बोर व्हायला लागले आता.
बिग बॉसला ज्यांना हाकलायचे म्हणजे स्टॅन तर तो वोटिंग मध्ये टॉप ला आहे. आणि ज्यांना कमी वोट आहेत पण ते फुटेज देतात त्याच्यामुळे त्यांना काढू शकत नाही.
नवीन कोणी यायला तयार नाही वाटतं म्हणून जे जुने गेले त्यांनाच परत आणतात.
कुणालाच काढत नाहीत हे लोक
कुणालाच काढत नाहीत हे लोक
सीझन वाढवलाय त्यामुळे करुदे
सीझन वाढवलाय त्यामुळे करुदे सर्वांना पिकनिक एंजॉय.
साजिद अचानक मास्टरमाईंड कसा
साजिद अचानक मास्टरमाईंड कसा काय झाला. काहीही, त्या गोरीलापण एका wkw मध्ये बळच मास्टरमाईंड मास्टरमाईंड करत होते, काहीपण स्क्रिप्ट लिहितायत आजकाल. शेवटी टिनाने सगळा फोकस स्वतःवर घेतलाच. चलाख आहे. ती गेल्यावर शालीनचा ड्रामा मोड असह्य होता.
मला खात्री झालीय की बीबीने
मला खात्री झालीय की बीबीने यांची ओव्हर ॲक्टिंग बघूनच विनिंग अमाऊंट शुन्य केलीय.
Pages