Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिवसाठी वीणा ला आणणार होते ना
शिवसाठी वीणा ला आणणार होते ना गेस्ट म्हणून तरी, त्याचं काय झालं. जरी ब्रेकअप झाला असेल तरी तिने समजून घेतलं असतं त्याला.
अर्चना मेकर्सची पण फेवरेट आहे
अर्चना मेकर्सची पण फेवरेट आहे , अन्कितला काढायची (दूल्हेकि बिदाई)आयडिआ तिनेच दिली
त्याला काढले ते छान पण मग आधी
त्याला काढले ते छान पण मग आधी प्रियांकाला पावर का दिली उगीच त्याला वाचवायची? की ते फक्त तिची इमेज वाढवण्यासाठी ?
नक्की काढले का पण? कारण
नक्की काढले का पण? कारण प्रियांकाला २५ लाख ऐवजी अन्कितला वाचवण्याची पॉवर दिली होती ना? तरीही काढले असेल तर अनफेअर आहे हे.
अन्कित जायला तर पाहिजेच, पण मग तशी सिचुएशन तयार करायला हवी होती. कालचा एपिसोड बघते आधी मग समजेल नक्की काय झाले आहे.
प्रोमो कधी कधी trp साठी
प्रोमो कधी कधी trp साठी दाखवतात. गेला असेल तर बरंच , कारण तो bb ला आणि bb त्याला कंटाळले होते. भरपूर ट्राय केला bb ने त्याच्यासाठी. टास्क बघून जरा बरं वाटलं. अगदीच मोटी रोटी, पतली रोटी, मेरा घी तेरा घी पेक्षा बरंय. प्रियांका कालच्या रितेश जेनेलीयाच्या टास्कमध्ये पण किती बडबड करत होती. तिला पण झापलेलं दाखवलंय , आधीच अंकित बाहेर गेला तर एक ड्रामा आता हे, भरपूर खोर्याने सिंपथि मिळणार बिचार्या बहुला . शिव बहुतेक आजारी आहे म्हणुन जास्त दिसत नाहिये. साजिद खरंच जायला पाहिजे. बळंच गोष्टी ऐकवत बसतो.
ओव्हरॉल प्रियंकाच्या बाबतीत
ओव्हरॉल प्रियंकाच्या बाबतीत बिबॉ घीसापीटा फॉर्म्युला वापरत आहेत, सतत ती टारगेट होतेय असा अभास , मैत्रीणी भांडल्या, सलमान दर विकेन्डला रागवला , बॉफ्रे गेला, मग ट्रॅजेडी, पूर्ण घर वि. प्रियंका इ.
अर्चनाने ते ओळखलय म्हणून ती सतत प्रियंकाशी पंगा घेते.
एकच होप आहे इतर कोणी जिंकायची, मायग्लॅम ती जिंकल्यामुळे ट्रॉफीसाठी कदाचित इतर कोणाला निवडतील !
सध्या तरी प्रियंका वि शिव क्लिअर दिसतय पण बिबॉच्या लाडक्या निम्रित्/अर्चना गेम चेन्जर बनु शकतात !
https://navbharattimes
https://navbharattimes.indiatimes.com/tv/bigg-boss/bigg-boss-16-priyanka...
यांचं पण प्रियंका बद्दलचे मत माझ्यासारखच आहे. Pre planned Sympathy Winner.
प्रचंड इरीटेटींग आहे
प्रचंड इरीटेटींग आहे प्रियांका. ती कशाची विक्टिम वाटते.
Pre planned Sympathy Winner.
Pre planned Sympathy Winner. ,,,,,,
Exactly... असं केलं की बायसड असल्याचा आरोप पण होत नाही
आजचा एपिसोड आवडला.. एक तर
आजचा एपिसोड आवडला (मायनस प्रियंकाची रडारड)

एक तर अन्कित गेला हे बेष्ट शिवाय त्या विकासला ‘शिव-आरोह’ मराठी बिबॉ किस्सा इथे बोलून दाखवल्याचे चांगलेच महागात पडले, अख्या घरापुढे बिगबॉसने त्याच्या इज्जतका फालुदा केलाच आणि शिवला सपोर्ट केले , इनडायरेक्ट्ली बिबॉ मराठीची डिग्निटी राखली.. नाही तर मराठी बिबॉची बरेचदा टिंगल केली जायची , आता कोणी हिंमत नाही करणार या सिझनला तरी !
अब्दुने परत आल्यावर साजिद निम्रितला कोल्ड शोल्डर दिल्यावर त्यांची रिअॅक्शन पहाण्यासारखी होती, साजिद कित्तीवेळा अब्दुला कन्फ्रन्ट करत होता
सुम्बुलचा नंबर लागला पाहिजे आता बाहेर जायला, नुसती सगळ्यांची पर्सनल नोकर बनली आहे, काहीच सेल्फ रिस्पेक्ट नाही
Btw , ती प्रियंका मला आवडत नसली तरी काल तिचा साजिदने सुंबुल साठी बझर वाजवणे का इल्लॉजिकल होते हे बरोबर सांगितले खरं तर तरी सलमान साजिदची साइड घेत होता.
तो साजिद सुम्बुलला फार वाइट ट्रिटमेन्ट देतो !
प्रियांकाची रडारड आज खूप
प्रियांकाची रडारड आज खूप खेचली .किती ती ओव्हर ऍक्टिंग , बिग बॉस ने नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या पोराला एक्सपोज होता होता वाचवले. शिव जो “मी नाही त्यातली .. वाला फेक अटीट्युड घेऊन वावरतो त्याचा बुरखा थोडा का होईना घरातल्या मंडळींसमोर फाटला . वेल डन विकास . ती श्रीजीता टीना बद्दल बाहेरच्या गोष्टीवरून कॅरॅक्टर असासिनेशन करत होती तेव्हा बिग बॉस सोयीस्कर रित्या गप्प बसलेले. तो छपरी स्टॅन बाहेर फॅन बघून घेतील,मुंबईत राहायचं आहे का वगैरे धमक्या देतो तेव्हा अळीमिळी गुप्प .आणि शिव बद्दल फॅक्ट सांगितलं तर अगदी जिव्हारी लागला बिग बॉस च्या. जेव्हा शिव बिग बॉस मधल्या गोष्टी सांगतो कि त्यात असं झालेलं तस झालेलं ते बर चालत .बिग बॉस ने किती तरी वेळा या मंडळीला कॉन्फेशन रूम मध्ये बोलावून टिप्स दिल्यात ,गाईड केलाय ,नॉमिनेशन पासून वाचवलंय तरी ते सुधरत नाहीयेत. ती निमरीत तर एवढी vile वागतेय ,फक्त जेलसी शिवाय काही नाहीय तिच्या गेम मध्ये. शिव ने प्रियांका ला डिसेंसी दाखवत हग केलं तरी तिला चाललं नाही . फक्त साजिद च्या पायाशी बसून पांचट जोक वर हसणे आणि दुसऱ्यांची चुगली एवढाच चालेल असत आणि वीकएंड ला मेंटल हेल्थ इशू .
शेखर सुमन चा सेगमेंट महाबोर असला तरी तो शिव स्टॅन साजिद ला बरे शालजोडीतले लगवतो. तरी अजून शिव साजिद ह्या पाठी सर सर म्हणून लाळघोटेपणा करायचा सोडत नाहीय. आता अब्दू आलाय घरी होपफुली त्याच्या टीम ने त्याला सांगितलं असेल साजिद निमारीत पासून दूर राहायला .
तिकडे टीना स्टॅन च्या मागे लागलीय ,तो फाट्यावर मारतोय तरी. एवढा इंसल्ट होऊन पण. टीना जिकडे खोबरं तिकडं चांगभलं अशी आहे .शालीन तिच्यापासून दूर राहील तर त्याचा गेम पण चांगला होईल .पण तो पण टीना बरोबर तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना मोड मध्ये आहे.
सुमबुल ला खरंच अक्कल नाहीय कि ती प्रेटेन्ड करतेय काही समझत नाहीय. साजिद आणि कंपनी तिला किती बुली करतात,तिच्या वडलांच्या पोएटरी ची मस्करी उडवली ,तिचा फाहमान बरोबर च्या रेलशनशिप ची मस्करी केली ,विकास बरोबर जबरदस्ती काही पण नातं जोडायला बघताहेत ,तरी ती आपली कामवाली सारखं चहा कॉफी जेवण ,आणि साजिद चे कपडे धुणे यात खुश आहे.
अर्चना आणि सौन्दर्य ला वाटतंय आता आपण मंडळींचा हिस्सा झालो म्हणजे सेफ झालोत. मंडळी पहिली संधी मिळाली कि या दोघीना बाहेर काढतील आधी.
अंकित म्हणत असेल, सुटलो
अंकित म्हणत असेल, सुटलो एकदाचा. हिच्या तावडीतून.
बाहेर बघून घेईन वरून सलमानने शाळा घेतली ना?
कसली आहे बाबा प्रियांका..
कसली आहे बाबा प्रियांका.. danger
ती श्रीजीता टीना बद्दल
ती श्रीजीता टीना बद्दल बाहेरच्या गोष्टीवरून कॅरॅक्टर असासिनेशन करत होती तेव्हा बिग बॉस सोयीस्कर रित्या गप्प बसलेले. तो छपरी स्टॅन बाहेर फॅन बघून घेतील,मुंबईत राहायचं आहे का वगैरे धमक्या देतो तेव्हा अळीमिळी गुप्प .आणि शिव बद्दल फॅक्ट सांगितलं तर अगदी जिव्हारी लागला बिग बॉस च्या.
<<<<
कारण हे गॉसिप थेट बिगबॉस शो बद्दल होतं !
अर्चना म्हंटली ना हिंसा केली तर हा विनर कसा झाला ?
त्यांच्या शो च्या रेप्युटेशन वर आलं तर बोलणं भाग पडलं असेल बिगबॉसला.
बाकी शिव लाडका वगैरे नाही वाटत बिबॉचा , त्यालाही बाहेरची (प्रियंका गांधी बद्दल) गोष्ट मधे आणली म्हणून बोलणी खायला लागली होती.
शिव /अर्चना स्ट्राँग कॉन्टेस्टन्टस आहेत म्हणून दखल घेतात, लाडके फक्तं साजिद आणि अब्दु !
श्रीजिता-टिना लिंबुटिंबु आहेत शो मधे, त्यांच्या गॉसिपने काही फरक पडत नसावा:)
कोणीही विनर झालं तरी चालेल.
कोणीही विनर झालं तरी चालेल. सुंबुल साजिद टिना कोणीही नॉन डीजर्विंग विनर झालेला चालेल पण प्रियांका अजिबात नको.
साजिद ला आन अब्दु ला डॉक्यावर
साजिद ला आन अब्दु ला डॉक्यावर चढवले आहे बिबॉ ने पण शिव मात्र काही लाडका वगैरे वाटत नाही मला तरी. त्याला साइड लाइन करतात कायम. वीक्न्ड ला पण फारसा स्पॉटलाइट देत नाहीत. अर्चना प्रकरणात तर चांगलीच बोलणी बसली होती.
काल चांगले कन्फ्रन्ट केले त्या विकास ला बिबॉ ने. तसाही त्याला ब्लेम करता येत नाही. आधीचेच इतके सदस्य सताना वाइल्ड कार्ड्स चा फारसा निभाव लागणे कठीण आहे आता. त्याला काहीतरी पंगा घेणे भाग होते.
प्रियांका अंकित चा ड्रामा किती खेचला काल. महा बोअर होते ते. प्रियांका सगळी सोप ऑपरा स्किल्स पणाला लावून डाय्लॉग बोलत होती आणि धाय मोकलून रडत होती. ओवरअॅक्टिंग असे की जणू काही कायमचा चालला आहे अंकित. फुल्ल कॅश केले तिने. सगळे उगीच सुतकी चेहर्याने उभे असताना अर्चना मस्त डान्स करत होती त्याची मजा वाटली मला
शेखर सुमन फार कंटाळवाणा होतो हल्ली. मी फा.फॉ. करते.
प्रियांका जिंकेल... जर खरेच
प्रियांका जिंकेल... जर खरेच वोट्स काउंट केले तर...
प्रियांका जिंकेल... जर खरेच
प्रियांका जिंकेल... जर खरेच वोट्स काउंट केले तर... >>> हो. हे खरं आहे.
स्टॅनला विसरू नका.
स्टॅनला विसरू नका. बाकीच्यांचे लाखात तर त्याचे करोडोमध्ये views आहेत.
काल निम्रितची शिव स्टॅन खेचत होते ते आवडलं मला. उगाच फुशारकी मारते. प्रियंकाने विदाई सीन मध्ये कोणाकोणाला येऊ दिलं नाही. अॅक्टींग तर अति बेक्कार , अंकित पण कंटाळलेला. किती वेळ रडगाणं. जाताना गाणं काय म्हणाली. एकदम फिल्मी. शे सुला मी पण फाफॉ करते, पण त्याने पण काहीतरी गाणं म्हटलं म्हणे . खोर्याने सिम्पथी.
शिवबद्दल सांगून बीबॉने खरं तर गेम खेळलाय. त्याचे हेटर्स शोधून शोधून विडिओ टाकतील आणि इकडे कर्ण कर्कश्येला सिम्पथी. तसे कोणी धुतल्या तांदळाचे नाहित तिथे पण त्याला साईड लाइन करणं गरजेचं होतं. आजचा अचानक नॉमिनेशन पण आवडलं. विकासला थोडं उसकावलं की तो पण नक्की हाणामारीवर येणार. एव्हढे सगळे नॉमिनेट झालेत, डबल एविक्शन करायला हरकत नाही.
विकासने मराठी bb विषय काढला
विकासने मराठी bb विषय काढला असं दाखवलं का, मिन्स ते कट करू शकत होते ना, काय दाखवायचं काय नाही ते बिग बॉस टीमच्या हातात असतं ना. कधीच्या भागात आहे, voot वर बघेन.
Btw स्टॅनने शेम्बडी शब्द फेमस केलेला दिसतोय, एका शॉटमध्ये अब्दु म्हणत होता. हल्ली कोणी म्हणत नाही इथेतरी , मी लहान होते तेव्हा जास्त ऐकू यायचा.
विकासने मराठी bb विषय काढला
विकासने मराठी bb विषय काढला असं दाखवलं का, मिन्स ते कट करू शकत होते ना, काय दाखवायचं काय नाही ते बिग बॉस टीमच्या हातात असतं ना. >> तेच तर ना. प्रियंका फॅन्सला उचकावण्यासाठी बीबॉने खरं तर गेम खेळलाय. अन्कितचे एलिमिनेशन = प्रियंकाला सिम्पथी, शिवला बिबॉचा सपोर्ट = प्रियंकाला डबल सिम्पथी वोट्स. प्रियंका वोटींगमध्ये सिम्पथी + तिच्या सिरियल कॅरेक्टर मुळे पुढे आहे. बिबॉमध्ये ती खूप इरिटेटींग आहे.
यात प्रियांका फॅन्सना काय
यात प्रियांका फॅन्सना काय उचकवणार. शिव ने मराठीत एका कॉंटेन्स्टन्टला चावले होते व त्याला माफ केले गेले होते हे बाहेर सर्व फॅनडमना तेव्हाच कळले होते जेव्हा त्याच्या डिसिजनमुळे अर्चना बाहेर गेली होती. तेव्हाच तो किती hypocrite आहे ह्याची चर्चा झाली होती. सर्व कॉंटेन्स्टंटच्या PR नी व युटूबर्स वाल्यांनी शिव व आरोहची ती क्लिप वायरल केली होती आता नव्याने सांगून काही कोणत्याही लोकांच्या मतात फरक पडणार नाही. फॅन्सनी ऑलरेडी कोणाला मत दयायचे याचा निर्णय घेतला आहे.
माहिती नव्हते ते फक्त घरच्यांना. आणि स्पेशली अर्चनाला जिला वाटत होते की शिवने चांगुलपणा दाखवून तिला परत घेतले. घरच्यांना ही शिवाची असलीयत कळली .यात शिवही स्वतः मी बिग बॉसमध्ये असे प्रेम केले आणि तसे केले आणि मी सर्वत्र हार्ट्स करायचो याची कथा सांगत बसतो तेव्हा बीबीला अडचण नाही वाटली पण त्यांच्या क्रेडिबिलिटी वर प्रश्न उठल्याने ते जागे झाले. त्यामुळे ही सारवासारव. शिवाय शिव सर्रास खोटे सांगत होता की आरोहने त्याचा गळा दाबला म्हणून मी चावलो.
प्रियांकाला असल्या सिम्पथीची गरज नाही. पॉप्युलॅरिटी बद्दल म्हणाल तर ती पहिल्या दिवसांपासूनच व्होट्समध्ये आघाडीवर होती आणि आहे. आणि शो मध्ये येणाऱ्या प्रत्येक कॉन्टेस्टण्टचा स्वतःचा फॅनडम आहे. ते आपापल्या क्षेत्रात पॉप्युलर व इन्फ्लुएन्सर आहेत म्हणून तर त्यांना इथे आणले आहे. सुमबुलकडे, स्टॅन कडे तर तिच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, शिव स्वतःच म्हणतो मी आणि वीणा सर्व महाराष्ट्रभर फेमस व लाडके होतो, तो तर विनर आहे त्याला पूर्ण मराठी लोक सपोर्ट करतात. मग तो कुठे कमी आहे? पण व्होट्समध्ये कुठलीही पोल घ्या .. शिव विरुद्ध प्रियांका पोल असली की शीवच्या बाजूने स्टॅन, अब्दू, निमरित ह्याचेही फॅन्स वोट करतात. तरीही प्रियांका आघाडीवर आहे. मग कोणाला कितीही राग येऊ दे . जर फेअर खेळ झाला तर ती व्होट्समध्ये नक्की जिंकू शकेल. पण जे बीबी आतापर्यंत पूर्ण अनफेअर खेळत आहेत ते यापुढेही काय करतील हे बघणे इंटरेस्टिंग आहे. बिगबॉसला प्रियांका नाही तर निमरीत किंवा स्टॅन ला जिंकवायचे आहे. पण प्रियांकाच्या व्होट्सची अडचण असल्याने ते सतत तिचा सलमानद्वारे अपमान करणे, मनोबल घालवणे हे प्रकार चालू आहेत. अंकितला ही वोट्सशिवाय घालवले तसे कदाचित हिलाही कोणत्याही कारणाने काढू शकतात.
शिवला बिग बॉसने भरपूर फेवर केले आहे, प्रत्येक गोष्टीत इझी वे मिळाला आहे. पण त्याने साजिदचा नोकर बनून राहण्यातच आनंद मानला आहे. मग आता साइड लाईन नाही करणार तर काय त्याचे 'सर सर सर आप सही हो ' दाखवणार का? हा कसला विनर !
आज मंडळींचा बाउन्सर बॉय शिव
आज मंडळींचा बाउन्सर बॉय शिव कॅप्टन बनला तिसरऱ्या वेळी ! ते पण ऑडियन्स वोटिंग ने. अंकित ला घराबाहेर पाठवायचं होत तेव्हा पब्लिक वोटिंग बंद आणि घरातल्या मंडळींच मतदान . आता पुन्हा सगळी मंडळी कॅप्टन रूम मध्ये लोळत पडणार ,साजिद च्या थुक्रट जोक वर निमरीत हसणार ,आणि ती सुमबुल कामवाली सगळ्याची काम करणार . आणि आता तीन कॅप्टन ची कन्सेप्ट बाद का तर आता मंडळींचा कॅप्टन बनवायचा म्हणून . किती बायसनेस कराल बिग बॉस ? एकदाच सर्व मंडळींना मिळून ट्रॉफी देऊन टाका .
या मंडळींना पण समजत का नाहीय कि साजिद कस गॅसलाईट करतोय सर्वाना .आधी गोरी ,मग निमरीत ,सुमबुल आणि आता अब्दू .
आरतीचा फारच नावडता आहे शिव
आरतीचा फारच नावडता आहे शिव

साजिदचा नोकर वगैरे फक्त बाहेरच्यांना (प्रियंका फॅन्सना) वाटतो, बिबी घरात सगळ्यांना फॅक्ट माहित आहे, शिव मंडली गृप चालवतो/ कोणी गेम मधे काय करायचं डिसाइड करतो हे घरच्यांचं ऑब्झर्वेशन आहे , म्हणून तर प्रियंकानी तिचा फोकस निम्रित वरून बदलून शिव वर केला
कालही शिव साजिद आणि स्टॅनला सांगून गेला कि एका तरी राउंडमधे आपल्यापैकी कोणीतरी गेलेच पाहिजे म्हणून आडून रहा, नाहीतर साजिद मला खाण्याची बार्गेन जमत नाही म्हणून बाजुला बसला होता !
इथे कोण कोण आहेत काय
इथे कोण कोण आहेत प्रियांकाचे फॅन्स??
अर्चनाने रागात विकास वर गरम
अर्चनाने रागात विकास वर गरम पाणी उडवले असे सोमि वर वाचले. टू बॅड , तीही माझ्या मते फिनाले वीक मधे डिजर्व करते खर तर , पण असे झाले असेल तर तिला आता बाहेर काढले पाहिजे. एकदा चान्स देण्यात आला होता, आता दिला तर बिबॉ च हास्यास्पद होईल.
सुंबुल, अब्दु, श्रीजिता, विकास, सौन्दर्या , निम्रित , साजिद हे टॉप १० सुद्धा डिजर्व करत नाहीत. कधी जाणार हे इतके लोक?!!
टॉप ५ मला प्रियांका, शिव, स्टॅन, अर्चना, आणि टीना किंवा शालीन हे असतील असे वाटते.
शिव जिंकलेला मला आवडेल, तो फिनाले ला जाईल पण जिंकेल असे नाही वाटत आहे सध्या. प्रियांकाला जिंकवून देतील असेच वाटते.
अर्चना खरं तर हवी टॉप ५ मधे,
अर्चना खरं तर हवी टॉप ५ मधे, प्रत्येक एपिसोडचा किमान ७० % कन्टेन्ट ती देते !
पाणी फेकल्याचा व्हिडिओ पाहिला, लुपहोल्स आहेत त्यात, धक्कबुक्कीत पाणी उडले असे म्हणायला स्कोप आहे , तिला काढले तर एपिसोड्स् कोण चालवेल ?
मला शिव, प्रियंका, स्टॅन ,अर्चना आणि निम्रित असतील असं वाटतय टॉप ५.
अर्चना मनी बॅग नेईल
इथे कोण कोण आहेत प्रियांकाचे
इथे कोण कोण आहेत प्रियांकाचे फॅन्स?? Wink
>>>>>
मला प्रियांका जिंकेल असं वाटतं. आणि बाकी लोकांपेक्षा तिनेच जिंकायला हवं असही वाटतं. त्या घरात ती एकटीच भांडत नाही. सगळेच भांडत असतात. भांडताना प्रियंकाच नाहीतर सगळेच इरिटेट करतात.सगळ्यांचाच आवाज असह्य होतो. प्रियांकाच नाही तर शो मध्ये सगळेच स्वताचे गुणगान गात असतात.
शिव, स्टॅन,निम्रित,साजिद,टीना तर मला कितीही प्रयत्न केला तरी बिलकुलच आवडत नाहीत.
तो सीन बघितला मी विकास
तो सीन बघितला मी विकास अर्चनाला सांगत असतो, परत बिग बॉस खेल गये अपना खेल. हे सर्व संभाषण सुरु झालं तिथेच विकासला बोलाऊन बिग बॉस थांबवू शकत होते (हे एपिसोडमधून सर्व कटही करू शकत होते बिग बॉस) पण सर्व घराला बिग बॉसने कळू दिलं की शिव चावला होता आणि मग मलमपट्टी करुन विषय आटोपता घ्यायला लावला. घरात कोणालाही हे माहीती नव्हतं. आता हिंदी प्रेक्षक जे शिव विरोधात आहेत ते जाऊन जाऊन तो सीन बघतील .
कॅप्टनशिप टास्क मधे
कॅप्टनशिप टास्क मधे #शिब्दुस्तान रॉक्ड !
मंडली म्हणा किंवा गृपिझम म्हणा, अजिबात एकमेकां विरुद्ध काही न बोलता , जबरदस्तं युनिटी दाखवत पब्लिकचे मन जिंकले तिघांनी आणि घरातल्या कॉन्टेस्टन्ट्सना रिअॅलिटी चेक दिलं , सौंदर्यानी बोलूनही दाखवलं ते अर्चनाला !
अब्दु झाला नाही कॅप्टन ते बरं झालं, मला शिव स्टॅन दोघांचही बोलणं आवडलं, सुंबुलचा डान्सही खूप भारी !
विकास अर्चना फाइट मधे उकळत्या तेलात पाणी उडलं , कोणाला लागलं असतं तर झाली असती आज आउट !
Pages