बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं तर शिवचा ग्रुप आवडतो पण साजिद अजिबात नाही. आणि बिबी सारखे सारखे साजिदलाच फेवर करतात आणि साजिद शिव गॅंगला. त्यामुळे सगळा गेम डोळ्यावर येण्याइतपत बायास्ड झाला आहे. काल टास्क मध्ये विरुद्ध टीम ने पण धड चॅलेंजेस दिले नाहीत. काय तर पाणी पी आणि पुश अप्स काढ.. टक्कल करायला लावायचे, कपडे पाण्यात फेकून द्यायचे, रेशन ताब्यात घ्यायचं. जरा तरी आयडिया घ्यायची आधीच्या सीझन्सपासून...

ती निम्रत का यम रडका चेहरा ठेवून का असते?
ओ मग तुम्ही सुम्बलला काय म्हणाल?
बिगबॉस मधली अलका कुबल

मी पाहिलं तेव्हा सुम्बलला कोपऱ्यात गप्प बसायची शिक्षा केली होती.
मी रोज पाहत नाही. फक्त शुक्रवार शनिवार अधूनमधून.

सुंबुलच्या वडिलांचा फोन म्हणजे कहर होता. सरळ सरळ वोट्सबद्दल बोलत होते. >>> हो ना असं असेल तर जो तो आपल्या आपल्या मुलांसाठी फोन करून त्याची इमेज सुधारण्यासाठी प्रयत्न करेल. एकदा तिच्यासाठी वडीलांना बोलावले होते ना त्यावेळेस समजून घेतले की ठीक आहे. परंतू सारखे सारखे थोडी चालणार आहे. मला वाटतंय की सुंबुल अशीच वागत राहिली तर तिच्या वडीलांच्या तब्यातीचा बहाणा देऊन तिला घरी पाठवतील. आणि पुन्हा नीट पढवून काही दिवसांनी वाइल्ड कार्ड एंट्रीने परत आणतील.

बिग बॉस नवीन टास्क देताना पहिली हीच सोय करतो की सूत्रं साजिदच्या हातात दयायची. कारण त्याच्या टीम मधले सर्व टास्क करण्यात फुसके बार आहेत. मग त्यांना वाचवण्यासाठी अशा कंडिशन्स टाकायच्या की समोरची टीम हरलीच पाहिजे. त्यांच्यांत शिव म्हणे फार छान टास्क करतो. मग दाखवा ना कसे करतो ते . त्याला इतक्या रडीचा डाव टाकून का जिंकवता ?

साजिदला व्हेटोचा अधिकार दिल्यावर मग कुठले टास्क त्यांनी करायचे यावर पूर्ण अधिकार त्याच टीमचा होता. मग टक्कल करा वा कपडे पाण्यात फेका प्रत्येकाला साजिदने नकारच दिला असता. यापूर्वीच्या बिग बॉसमध्ये अशी व्हेटो पॉवर होती का कधी? अंकित शेवटी तेच म्हणाला की कुठलाही टास्क दिला तरी हे करत नाहीत. मग अब्दुने टास्कला दोनदा नकार दिला, हेडफोन काढले तेव्हाच तो आऊट होता पण बिग बॉसला त्याला कॅप्टन बनवायचे होते त्यामुळे इथे conveniently दुर्लक्ष केले

प्रियांकाच्या टीम ने धड टास्क दिले नाहीत कसे म्हणता ? निम्रतने पहिल्यांदाच म्हटलेले की तिला पुश अप्स जड जातात. प्रियंकाने तिला तोच टास्क दिला. मग बिग बॉस म्हणतात की यात तिचा शातीर दिमाग नव्हता. केवळ हेडफोन्स काढल्याने ती आऊट झाली. मग काय द्यायचे होते तिला, पाच मिनिटे रडून दाखव असा टास्क ?तो तिला लगेच जमला असता. जे जमणार नाही तेच देणार ना ? काय बिग बॉस तरी.

मग निम्रतने साजिदला बजावले की तुम्ही टास्क रद्द करू शकता. त्यानंतर साजिदने सर्व टास्क रद्द करण्याचा सपाट लावला. प्रत्येक वेळी तो अब्दू आणि शिवला विचारात होता की तू करशील का? मला वाटते शिवपेक्षा साजिदलाच यांनी कुठले टास्क करायला नको होते. अब्दुला ३ मिनिटात १ लिटर पाणीही प्यायचे नव्हते. मग काय निम्रतबरोबर बहुत मजे करत नाचायचा टास्क हवा होता का ?
आता हा बायस सगळ्यांच्याच लक्षात आला आहे. पण जर आवाज उठवला तर प्रियांका सौंदर्याला दाबले जाते, मग ते बॅकफूटवर जमेल तसे खेळत आहेत.
आज नॉमिनेशन्स आहेत त्यात पण बिग बॉसने साजिदचे चमचे कसे वाचतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका.
पुढच्या आठवड्यात सौंदर्या किंवा अंकित पैकी एकजण जाणार.

आरती निम्रत कशात होती, सौदर्या पण कोणत्या शो मधे होती का.>> अंजु निम्रत छोटी सरदारनी म्हणून शो मध्ये होती आणि प्रियांका-अंकित उडारिया म्हणून सिरीज मध्ये होते.खरे तर मलाही हे लोक माहित नव्हते कारण मी कलर्स एरवी पाहत नाही. गुगल केल्यावर कळले.
टीना उत्तरन मध्ये होती, श्रीजीता दे पण
शालीन झलक दिखला जा चा विनर होता त्यावेळी दलजित कौर त्याची बायको बरोबर होती. डोमेस्टिक अब्युझ म्हणून तिने त्याच्यावर केस केली होती. हाही कलर्स फेस.

गौतम कुठल्या सीरिझमध्ये होता काही कल्पना नाही , सौन्दर्या डेंटिस्ट आहे बहुदा मुझीक विडिओ केले असावेत. पण ती कलर्स किंवा टीव्ही सिरीज वर नव्हती.

शिव रोडिझ मध्ये सेमी फायनल पर्यंत होता, हाही व्हुटचाच शो आणि बीबी मराठीचा विनर म्हणून शिव ही कलर्सचाच फेस आहे.

साजिद फराह खानचा भाऊ आहे, ती बिग बॉस अधून मधून होस्ट करते. सलमानचे दोस्त असल्याने कुठलीच अडचण नाही त्याला. त्याला ट्रॉफीशी घेणे देणे नाही पण मी कसा फेअर खेळतो हे बोलून इमेज क्लीन करायची आहे. बरे झाले आला इथे. त्याने फिनालेपर्यंत राहावे म्हणजे सर्व काही अजून स्पष्ट होईल.

सुमबुल इमली मध्ये होती पण स्टारची फेस त्यामुळे तिला १२ लाख पर एपिसोड देऊन आणले पण काही करत नसल्याने कलर्सचा तिळपापड होत आहे.
राहिले स्टॅन आणि अब्दू.त्यांना त्याच्या सोमी वरच्या पॉप्युलॅरीटी मुळे आणले आहे. पण साजिदच्या छत्रछायेमुळे तेही सुरक्षित आहेत. अर्चना केवळ एंटरटेनमेंट म्हणून आली आहे

अंकितचे दिवस भरलेत आता. यावेळी तो जाईल. सौंदर्या हुशार आहे तिने लगेच प्रेमाच्या त्रिकोणाचा चौकोन बनविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे ती तरी सध्या जात नाही.
अब्दूला पाठवा घरी, त्याला का ठेवलाय समजत नाही.
शालीन फुल्ल सिद्धार्थ शुक्लाला कॉपी करतोय पण त्याला समजत नाही की तो नकली दिसतोय.

आरती थँक यु. छोटी सरदारनी अ‍ॅड बघितली होती, सुरु व्हायच्या वेळी.

टीना उत्तरन मध्ये होती >>> हे माहीतेय ना, ह्या रडीमुळे मी शो सोडला, अधुनमधुनच बघत होते पण हिच्यामुळे अगदीच क्वचित बघितला नंतर. रश्मी देसाई छान होती तिच्यापेक्षा. छोटी इचकी मस्त होती.

सुंबुल कलर्सची नसून तिला एवढं डोक्यावर का बसवतायेत बिग बॉस. सारखं काय तिचे बाबा फिडबॅक देतात, घरी घेऊन जा की.

साजिदची स्वतःची ओळख आहे. खूप पूर्वी तो टीव्हीवर काही शोज होस्ट करायचा. मला नावं आठवत नाहीत , पण ते लोकप्रिय होते. त्याचे विनोद मात्र क्रूड असत. त्याने एक चित्रपटही दिग्दर्शित केला आहे. हे बेबी - अक्षयकुमार, रितेश, फरदीन, विद्या बालन
तो फ राहचा भाऊ आहे हे खूप नंतर कळलं.

मला तर वाटले होते की तो फर्हा खान चा भाऊ आहे ही अफवाच आहे की काय Happy
साजिद ची सीरीज कहने मे क्या हर्ज है. फनी होती तशी पण येस, बरेच ग्रोस जोक्स पण असायचे

साजिद ने बरेच मूवी डायरेक्ट केले आहेत की ..me too ऍलीगेशन मूळे मध्ये सगळंच बंद झाला त्याचा. त्या बद्दल नेट वाचलं .. बाप रे किती सारे आरोप आहेत त्याच्यावर.. आणि किती किती घाण पण.. पण इथे भांडणात पण कोणी त्याच्या ह्या हिस्टरी चा उल्लेख करत नाही.. किंवा बिग बॉस कट करत असावेत..

काल अर्चना ने उंगल्या करून जाम मज्जा आणली.
टीना एक नंबर ची इनसिक्युर बाई आहे. मला तर वाटतंय तीच obsessed आहे.
आणि तो शालीन नुसता टॉक्सिक आहे
काल सो कॉल्ड डेट वर गेले आणि 2 मिनिटात भांडले. मिठी तर अशी मारतात की किती प्रेम आणि काय....
काल प्रियंका , अर्चना आणि सौंदर्या मजा करत होत्या. कित्येक दिवसात बर्यापैकी रिलॅक्स दिसल्या.

काय चाललंय सध्या? मी तर दोन दिवसांपासून बघणे सोडून दिले. एकतर बायस एकतर्फी शो आणि बघावे तेव्हा ते इरिटेटिंग शालीन टीना जोडीचा फेक रोमान्स. बोर होते. कहर म्हणजे वीकेंडलाही म्हणे यांचेच घरचे लोक येणार आहेत.

मी पण पूर्ण बघत नाही आता.. उद्या बहुतेक टीना शालीन ला सुमबुल आणि तिच्या बाबांचा संवाद दाखवणार आहेत.. दोघेही सुमबुल वर खूप चिडलेले दाखवले आहेत.. सुमबुल चा मित्र फाहमान येतोय वाइल्ड कार्ड म्हणून दाखवलाय पण तो प्रोमोशन साठी येणार आहे

इमलीचा आर्यन येतोय बहुतेक. तो तर कलर्सच्या येणाऱ्या प्रोजेक्टचा धर्मपत्नीचा हिरो आहे, प्रोमोज बघितलेत मग वाईल्ड कार्ड म्हणून कसा येतोय. आनंदी बरोबर, तो त्या सिरियल प्रमोशनसाठीच असणार.

टीना दत्ता उतरनमध्ये अभिनयात खूप तोकडी पडली होती. त्या मुलीच्या लहानप णीच्या भूमिकेत स्पर्श खानचंदानीने खूप छान अभिनय केला होता.
रश्मी देसाईचा निगेटिव्ह रोल होता. पण अभिनय बराच चांगला. इथे ही टीनाची बोलायची तीच ढब. तिच्या मेकपकडेच जास्त लक्ष जास्त. शनिवारी किंवा रविवारी शालीनला जवळ घेऊन ब्रीथ ब्रीथ करत होती ते आणि एरवीही खूप फेक वाटते ती. शालीन त्यादिवशी तोवर जेन्युइन वाटला. मग हिचा फेकनेस त्यालाही लागला. (हे मी अर्धा एपिसोड पाहून लिहितोय. चूक असू शकेल)

प्रियांका हायर लेव्हल चा टॉर्चर देतेय अंकित ला.......<<<< अंकित नॉमिनेट झालाय म्हणून प्रियांका मूद्दाम फूटेज साठी सगळं जमवून आणतेय, तो इतका साधा आहे की तो हे बोलला शेवटी.

लेटेस्ट प्रोमो मधे सुंबुल च्या बाबाच्या कॉलवरून मोठेच स्कँडल होणार असे दिसते. सुंबुल साठी वाईट वाटते मला. दोष बिबॉ आणि तिच्या बापाचा दोघांचा तेवढाच आहे.

टीना दत्ता उतरनमध्ये अभिनयात खूप तोकडी पडली होती. त्या मुलीच्या लहानप णीच्या भूमिकेत स्पर्श खानचंदानीने खूप छान अभिनय केला होता.
रश्मी देसाईचा निगेटिव्ह रोल होता. पण अभिनय बराच चांगला. >>> परफेक्ट.

आता तर शालीन टिना आणि सुंबुल तिघांचेही पेरेंट्स शो मध्ये येणार आहेत. चाळिशीच्या वयात शालीनच्या आई-वडिलांनी या गोष्टीत लक्ष घालणं किती खराब दिसते. कायच्या काय दाखवायला लागलेत

दर्जा एकदम खालावला आहे
तसा तो वर होताच केव्हा म्हणा ! पण तरी इतका वाह्यातपणा याच सिझन ला होतोय बहुतेक

खरं काय माहिती नाही पण खरंच सुमबुल चे बाबा जाम खोटारडे वाटतात . बीबी ला फेअर बनायचं नसेल तरी बनाव लागेल आता. कारण त्यांचा कॉल नंतर जाम तेहेलका झाला सोमी वॉर..
मग त्यांनी सगळ्यांच्या आई बाबाना बोलवून टाकलं .. पहिल्यांदा तिचे बाबा आले त्याच वेळी असगळे अन फेअर म्हणत होते.. शिव ला बाहेरच्या मुद्द्यांवर बोलायचं नाही सुनावल्यावर हे तर झाल. कॉल war सुम्बुल चे बाबा सगळी बाहेर ची माहिती देऊन गेले...
प्रोमो मध्ये सुम्बूल चे बाबा म्हणतात तुमची मुलगी एवढं काय काय बोलली माझ्या मुलीला तुम्ही माफी मागितली का?.. त्यावर टिना ची आई म्हणाली .. मी काय तिला के जी मध्ये शिकायला नाही पाठवलं बी बी मध्ये पाठवलाय.. तुमची मुलगी केवढी लहान आहे तिला स्कूल कॉलेज सोडून तुम्ही इथे कुठे pathawal.

सुंबुल वर खूपच मेन्टल स्ट्रेस येतो आहे असे दिसते आहे. ३५-४० चे अ‍ॅडल्ट्स असे फर्निचर ला लाथा मारत तिच्यावर शिवी गाळ करत ओरडतायत. सगळे तिला चूक म्हणताहेत, बिबॉ तर तिच्या बापावर पण ताशेरे ओढताहेत. तिला सगळे ओवरवेल्मिंग झाले नाही तरच नवल.
बिबॉ चा टीआरपी साठी आटापिटा हा हलकटपणा आहेच - त्यांना तो कॉल ऐकू येत होता, अनुचित/ अनअ‍ॅक्सेप्टेबल बोलल्यास ते नक्कीच कॉल बंद करू शकत होते. प्रेक्षकांना आणि इतर कन्टेस्टन्ट्स ना किती दखवायचे तेही त्यांच्याच हातात होते. मग सरासर गलत फायदा उठाया वगैरे कशाला नाटकं ?!!! टेक्निकली लीगली ठीक आहे तिचे वय १८+ आहे सो ती इतर कन्टेस्टन्ट्स सारखीच ट्रीट केली जाऊ शकते. पण ही जरा बॉर्डरलाइन केस होती, तशी लहानच आहे ती, त्यांनी थोडे तिला प्रोटेक्ट करायचे होते, शालीन आणि टीना च्या नॅस्टी रीअ‍ॅक्शन्स तिला झेलायला न लावता एलिमिनेट करायचे अन घरी पाठवायचे.
तिच्या बापाबद्दल तर मला फार शंका आहेत. बिबॉ पेक्षा त्याला जास्त दोष देईन मी.

बिग बॉस कोणी एक माणूस तर नक्की नाही .जरी एक आवाज रेप्रेझेन्ट करत असला तरी बॅकग्राऊंड ला हजार लोक विथ डिसिजन पॉवर असतील.. कॉल चालू असताना थोडा बेनेफिट् ऑफ डाऊट देऊ shakato बीबी ला.. कारण खरंच तिच्या बाबांचा बोलणं नीट ऐकू येत नव्हतं..

तरी पण सुंबुल ला एकदा तिचे वडील येऊन समजावून गेले होते, नंतर परत सलमान ने शाळा घेतली होती, आता परत वडिलांचा कॉल आला तरी तिला त्याचच जॅकेट घालायचं होतं.. एवढी डोक्यावर पडल्यासारखी का वागते काय माहित. दुसरी कोण असती तर शालीन ला समोर पण उभा केला नसता. तशीही तीच सुरूवातीपासून त्याच्या गळ्यात पडत होती म्हणा.

Pages