बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टॅन चा शो किती फालतू होता.. त्याला एक गाणं बेसिक सुरात म्हणता येत नव्हतं.. बॅकग्राऊंड ला एकच ढाकचिक ट्यून .. त्यावर काहीही बोल टाकलेले.. एक लिरिक्स धड ऐकू आलं नाही .. मागे रेकॉर्डेड सॉंग वाजत होता आणि स्टॅन मनाला येईल तसं अर्धे शब्द गाळून , मधेच थांबून , विसरून कसाही गात होता.. पुढे कॉन्टेस्टंट्स ना पण काही कळत नसावच आता काही इलाज नाही म्हणून सगळे आपले व्वा व्वा करत होते.. हे असले इन्स्टा मुळे फेमस झालेले फालतू लोक .. कशे काय त्याला फॅन आहेत आणि काय बघून फॅन झाले देवाला माहिती.. तोंडातून धड शब्द निघत नाहीत .. एरवी कवी रॅपर लेखक इ. लोकांकडे एक स्पॉन्तानिटी असते ते तर नाहीच.. आवाज चांगला नाही.. सूर नाही.. है क्या भाई वो.. खरे अस्सल कलाकार लोकांना अलीकडे अशा ऑटो ट्यून ने फेमस झालेल्या लोकांशी सामना करावा लागत असेल.. वाईट वाटलं खरंच.. तो चार पाच टपोरी शब्द इकडे तिकडे फेकून स्वतःला जाम भारी समजत होता.. जस कि क्या पब्लिक.. रावस राडा न ऑल ..देवा

मलाही ते रॅप झेपत नाही फारसे, पण यंग जनरेशन चे प्रचंड फॅन फॉलोविंग आहे या प्रकाराला हे माहित आहे. स्टॅन ही ऑलरेडी बराच पॉप्युलर आहे हे दिसतेच आहे. आपला फॅन बेस आणि ऑडियन्स वाढवण्यासाठी त्याला कालच्या संधीचा फायदा नक्कीच झाला असणार.
शालीन टीनाचे वेगळेच चालू होते साइड ला. मंडली गँग धमाल करत होती. सौंदर्या आणि श्रीजिताचा बळेच तेवढ्यात सेक्सी मूव्ह्ज वगैरे करायचा प्रयत्न सुरु होता. Happy

रफ्तार रोडीज मध्ये बघितला आहे.. ऑन द स्पॉट बरच मिनिंगफ़ुल रॅप करतो तो.. एम टीव्ही हसल मध्ये बरेच चांगले रॅपर असतात.. त्या शो मध्ये मागे स्क्रीन वॉर लिरिक्स दाखवतात रॅपर म्हणत असतो तेव्हा.. गली बॉय नंतर याची क्रेझ वाढली वाटतं जो तो ट ला ट जुळवून काहीही करतो.. खरंतर गली बॉय मध्ये मिनिंगफ़ुल रॅप होते.. उगाच यमक जुळवलं न्हवत त्यात बाकी रॅपर पण छान रॅप करत होते.. मुराद चा प्रवास त्याच्या रॅप मधून खूप सुंदर दाखवला होता.. आणि फास्ट नाही स्लो रॅप पण होते.. स्टॅन कडे मात्र काहीच नाही.. अलीकडे अशे बरेच दिसतात इन्स्टा / सोमी वर.. ..एखादी रीळ विडिओ काहीतरी कारण ने फेमस होतो आणि मग लोक असच फॉलो करू लागतात.. जाऊ दे झालं

हाहाहा रॅप नाइट एक निमित्त , ती रॅपर फॅन्स सोडून मेजॉरीटी पब्लिकला बोअर झाली असणार , टिना शालीनच्या चावट चाळ्यांमधेच बिबॉला इंटरेस्ट होता Proud

हिंदी शो चे बरेच fans शिव निमरीत, शिव प्रियंका, शिव सुमबुल एकत्र जोडी करून त्यांचे शॉर्टफॉर्म्स करून व्हिडिओ, फोटो टाकतायेत, शिव कॉमन आहे बघून बरं वाटलं पण बाकी काहीही. मी बघितले नाहीत पण यूट्यूब सजेस्ट करते .

प्रियांकाला किती स्पूनफीडिंग चालू आहे. बाकीच्यांना शा टि बद्दल विचारलं, तिला किती काय काय सांगितलं.Dsktalks तिची पोल खोल मस्त करतो. कधी कधी जास्त बोलतो पण पोल खोल पुराव्यासकट करतो. शा टि खूपच डेस्पो वाटायला लागलेत, अख्ख्या एपिसोड खातायत पण. बीबॉला पण तेच पाहिजे.

काय धमाकेदार मसालेदार एपिसोड होता Proud
स्टॅन वि. अर्चना , तिला तिच्या लेव्हलला जाऊन स्टॅन बोलला कि झाली अर्चना आउट ऑफ कन्ट्रोल, स्टॅन ऑन फायर !
सर्वात हसु आलं ते सुम्बुल या सगळ्या कडाकाच्या घर हादरवणार्‍याला भांडणात गाढ झोपली होती Rofl
Btw , त्या अब्दुचं काय स्टेटस आहे नक्की , बिबॉ म्हंटले होते कि त्याला गेस्ट ठेवायच कि कॉन्टेस्टन्ट ते हाउसमेट्स ठरवतील , विसरून गेले का बिबॉ Uhoh

अर्चना अगदी खालच्या लेवलला जाऊन शिव्या देते, तिचीच भाषा तिला ऐकवली की मात्रं रडं सुरू. ती काहीही बोलू शकते,दुसऱ्यांनी बोलताना मात्रं नियम पाळावेत. साजिद काय करत होता नक्की. तिच्याकडे जाऊन अर्चनाचं ऐकून आला , स्टॅनकडे येऊन स्टॅन शिवचं ऐकून घेतलं.

कालचा अर्चनाचा मुद्दा चूक नव्हता, बहुधा तिचे नेहमीच तसे होते. मुद्दे बरोबर असले तरी एकदम पर्सनल शिवीगाळ करते. त्या बाबतीत स्टॅन काही कमी नाहीये पण अर्थात. ते फॅन्स पावर चे पण सारखे ऐकवत असतो.
साजिद ला टीना ने ऐकवले ते मला बरे वाटले. सारखे काये "मेरेसे उंची आवाज मे मत बात कर", हा कोण लागून गेला आहे!! सगळे कन्टेस्तन्ट्स तिथे सेम लेवल ला आहेत हे त्याच्या गावीही नाहीये.
अब्दू ला खैरात की कॅप्टनसी मिळाली पुन्हा Uhoh

साजिद फार बेकार माणुस आहे, हीन मनिवृत्ति कायम दिसते, हुषार आणि एन्टरटेनिंग असला तरी !
Btw मुलींमधे एकटी सौंदर्या अ‍ॅथेलेटिक वाटली काल, टास्क मधे छान खेळली , शालीन पण भारी खेळला , शिवला भारी पडला.. बिबीने फिजिकल टास्क द्यायला हवेत!

काल टीना शालीन ला असले फटके पडलेत.... की मजा आ गया..
टिना ची आई तिच्या पेक्षा चलाख लोमडी आहे फॉर शुअर..... बघून च 2 ठेऊन द्याव्याश्या वाटलं....
प्रियांका , साजिद आणि सौंदर्या च्या घरातून कोणी आलं नव्हतं....
तौकिर साहेब न येता त्यांचा भाऊ आलेला....
शालीन ची आई खूप क्लासी वाटली. शालीन करतो तसे फालतू drama करत नव्हती...
पण टिना ची आई तर उफ!
अर्चना ला पण जबरा झापलं. ती हे फालतुपणा न करता पण पुढे जाऊ शकते. पण तिला बोलताना भान राहत नाही हाच काय तो प्रॉब्लेम...
शिव ला निमरीत आवडते का???? म्हणजे मला मध्ये 2दोन तीनदा वाटलं तसं. पण तो डोक्याने खेळणारा आहे त्यामुळे तो अशा गोष्टींमध्ये अडकून ही नाही पडणार....
स्टॅन ची आई उगाच भांडणारी नाही वाटली.
शिव च्या आई शी सलमान विशेष प्रेमाने बोलत होता असं उगाचच वाटलं....

प्रियांका चक्क आवडायला लागली मला अंकित गेल्यापासून.... तिचा मेकप आणि ड्रेसिंग चांगलं नसतं पण तिने ते छान केलं तर सुंदर दिसेल.

साजिद खूप टॉक्सिक आहे. चांगलं बोलून वाट लावतो. बेकार..

काल आणि आज फार मस्तं झाला परत विकेन्डचा वार Happy
गौतम सौंदर्या नंतर शालिन-टिना फेक लव्हची गजब बेइज्जत्ती झालीच !
सलमान खाननी स्टॅन आणि अर्चना मधला फरक छान सांगितला , स्टॅन ज्या बॅकग्राउंड मधून आलाय तिथे हीच लँग्वेज आहे, अर्चना जे करतेय त्याचं जस्टिफिकेशन असुच शकत नाही !
श्रीजिता काय बोलली ते सेन्सॉर कट केलं बिबॉने, आजच कळलं अन्दाजे !
मला सुम्बुलच्या वडिलांना घरात आलेलं पहायचं होतं पण बिगबॉसने येऊ दिलं नाही वाटतं Biggrin
टिना-शालीनच्या आयाही पोरांसारख्या फेक वाटल्या , अर्चनाचा भाऊ तिच्या सारखा नमुना आणि स्टॅन शिवच्या आया मुलांसारख्या साध्या आणि स्ट्रेट फॉरवर्ड .
शिवच्या आईला छान ट्रिट केलं सलमानने, पहिल्यांदाच शिवचं कौतुक झालं, इतर पालकांना त्यांच्या पोरांच्या चुकांबद्दल विचारलं !

नाही दिपंजली शालीन टिना त्यांच्या आई सारखे च फेक आहेत असं म्हणायला हवं...

कारण टिना ला इतकं झापलं सलमान ने तरी तिची आई बोलते," तिने मला खूप प्राउड फील करून दिलं आहे" .

म्हणजे हे चाळे कुठल्याही पालकांना प्राउड फील करून देतात??? सिरियसली????

सलमान फुल्ल फॉर्म मधे एकदम, मस्त झाला वीकेन्ड चा वार!
टीना - शालीन चा गेम एक्सपोज्ड! दोघेही किती म्हणजे किती फेक आहेत ! कोलांट्या उड्या चालू होत्या सतत. "डोन्ट बी सो हार्ड ऑन हर" चा जोकच करून टाकला सलमान ने Lol तेवढ्यात पण शालीन उशीरा येणे वगैरे अटेन्शन सीकिंग करत होता! Happy
फॅमिली वाल्यांनी फार भांडणे नाही केली.
स्टॅन च्या आई ची भाषा त्याच्याइतकी टपोरी नाही वाटली मला. ज्या बॅकग्राउंड मधून आली आहे त्या मानाने संयमित आणि डीसेन्ट उत्तरे देत होती. अर्चनाचा भाऊ तिच्यासारखाच वाटला Happy दिसायला पण किती सिमिलर!

आता बघता मला अजूनही शिव च नीट वाटतोय विनर .. प्रियांका आणि शिव यांनाच लोक विनर म्हणून बघत आहेत..
प्रियांकाला फॅन कशे आहेत हे मला खरंच समाजत नाही .. खरंच फार आगाऊ आहे ती.. मंडली आधी लोक त्यांना चिडवायला म्हणायचे आता बघितलं तर त्या सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेऊन फॅमिली टाईप चित्र बनवल आहे .. साजिद खराब आहेच.. निम्मो च पण चुकतं.. पण घरात तास बघितलं तर कोणीच दूध का धुला वगैरे नाही . सगळेच ओके ओके आहेत.. मंडली बुली पण आहेच.. पण घरात सगळेच एका माळेचे मणी आहेत ..

शिव आत्तापर्यंत बऱ्यापैकी नीट खेळला आहे .. त्याचं पहिल्यापासून एक चुकलंय कि साजिद ला ठाणे विरोध केलाय पण म्हणावा असा तीव्र विरोध कधी केला नाही. शिव आणि तास बघितलं तर घरातले सगळेच साजिद थोडं तर घाबरून बोलतात..

टीना शालीन ला मस्त पडली काल.. शालीन वेडाच आहे पण टीना मात्र काले दिलवालीच आहे.. तिची आई आणि ती दोघी अगदी सारख्या.. टीना जेलस, आणि बरंच काही आहे.. अशा स्वभावाला काही नाव असावं परफेक्ट ऍडजेक्टिव्ह सुचत नाहीये Lol

फॅमिली विक मधे शिवची आई आली आहे त्या ऐवजी बहिणीने यायला हवं होतं, ती जास्तं करेक्ट फीड्बॅक देऊ शकली असती, शिवचे सोशल मिडिया तीच सांभाळते !

शिव जिंकेल यावेळी. मांडवली झाली असेल कलर्स मराठीत कलर्स हिंदी फेस जिंकवतो, तुम्ही कलर्स मराठी फेस जिंकवा. अर्थात शिव योग्य आहेच जिंकण्यासाठी.

मला वाटतं बहिणीचे मुल लहान आहे म्हणून ती आली नसेल आणि साधी आई दिसली की वेगळं इंप्रेशन पडतं की शिव किती साध्या घरातून आला आहे.

काही शॉटस बघितले फॅमिली मेंबर्सचे. मला प्रियंकाचा भाऊ आणि stan ची आई आवडली.

त्या stan ला तुफान वोटिंग होतंय, आत्तापर्यन्त एवढं कोणाला झालं नाही असं तो अॅक्ट रायडर्सचा मंदार म्हणत होता.

मी काही हा सीझन बघायला घेतला नव्हता, आता कनेक्ट होताही येणार नाही, छोटे छोटे शॉटस बघते.

फराह खान आणि शिवची आई एपिसोड होता काल, ऑडियन्सला फारच आवडली आहे शिवची आई, ट्विटर वर ट्रेन्डिंग होत्या काकु Happy
प्रियंकाच्या भावाला अजिबातच फुटेज नाही मिळालं, सिंपल-शाय होता !
फराह खान-साजिद खान बहिण भाऊ दोघांना जाम सेन्स ऑफ ह्युमर आहे, शालीन टिनाला चक्क फेक लव्हकरून पहा सांगितलय फराहने !
शिवची आई पण शालीनचे जरा जास्तच लाड करत होती, शिव पेक्षा जास्तं सल्ले शालीनला Proud
हे पहा गंमत
https://twitter.com/bhanotshalin/status/1612880328858963968?s=61&t=2bx50...
प्रियंकाचं काही फार प्लेझन्ट कॉन्व्हर्सेशन नाही झालं भावाशी , ती इथे असतानाच तिच्या बहिणीची घाईघाईत एन्गेजमेन्ट उरकली याचं तिला वाईट वाटलं , साहजिक आहे. तिच्या बोलण्यात आलं होतं कि ती मिळून सहा बहिण भावंडं आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावर आहे, म्हणजे फायनॅन्शिअल सपोर्ट तिचाच असणार पण तिच्यासाठी थांबले नाहीत.
काल बिगबॉसने ‘हायपरअ‍ॅक्टिव्ह कॅटॅगरी‘ बनवून इनडायरेक्ट्ली टॉप ४ सांगितले , शिव अर्चना प्रियंका साजिद !
कन्टेन्ट बघता हेच लोक असणार , काही गडबड नाही केली तर स्टॅन पण नक्की टॉप ५ मधे !

शाटिने आटोपतं घेतला असता ड्रामा, आता फराहने येऊन एक काडी टाकली. फराहचा स्क्रीन प्रेझेंन्स काय मस्त आहे. आवडते मला ती. शिव स्टॅनची आई अगदी साध्या सरळ आहेत. आज चक्क मला शालीन बरा वाटला. टिनापासून लांब, ड्रामा नाही, छान बोलला सगळ्यांशी. प्रियांका सौंदर्याने तरी त्यातल्या त्यात भांडणं काढलीच. अर्चनाचा भाऊ अति उत्साही दिसतोय. ते फ्रीज रिलीज जरा जास्तच होतंय.

ऑडियन्सला फारच आवडली आहे शिवची आई, ट्विटर वर ट्रेन्डिंग होत्या काकु Happy >>> अरे वा, मी त्यांचं बघितलं नाही अजून. वर लिहिलेल्या दोघांचेही छोटे शॉटस बघितले दोन दोन मिनिटांचे.

Pages