Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंसाचाराला समर्थन हे शब्द
हिंसाचाराला समर्थन हे शब्द आले की मी मांडलेले सगळे मुद्दे चपखल बसतात. वाजपेयींपासूनच ते अनुराग ठाकुरपर्यंतचे दाखले आहेत. तिथे नुसतं समर्थन नाही. चिथावणी आहे. त्यानंतर शेकड्यांनी बळी गेलेले आहेत. की एका कारणासाठी, एका समूहाबद्दल केलेला हिंसाचार योग्य असं सांगायचं ठरलंय? कसला यज्ञ बिज्ञ असतो का तो?
एखाद्या मुस्लिम नवर्याने
एखाद्या मुस्लिम नवर्याने आपल्या हिंदू बायकोला मारहाण केली व ती आय सी यू मध्ये आहे अशी बातमी आली तर हिंंदुत्ववादी ती मरावी म्हणून देव पाण्यात घालतील नक्कीच !
>> Awara!
मुस्लिम नवर्याने आपल्या
मुस्लिम नवर्याने आपल्या हिंदू बायकोला मारहाण केली व ती आय सी यू मध्ये आहे अशी बातमी आली तर हिंंदुत्ववादी ती मरावी म्हणून देव पाण्यात घालतील नक्कीच !---
प्लीज केवढा तो विकृत विचार. काय पण लोक आहेत.
सोनिया गांधी इस्पितळात भरती
सोनिया गांधी इस्पितळात भरती असताना"क्या सर ग़ंगाराम हे उम्मीद रख सकते हैं ?" अशा पोस्ट्स हिंदुत्ववाद्यांच्या वॉलवर पाहिल्या आहेत. त्यामुळे यात मला अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.
भरत., राजकारणावर जनरल चर्चा
भरत., राजकारणावर जनरल चर्चा करण्यासाठी तुम्हा लोकांचे इतर धागे आहेत. तिथे त्याबद्दल लिहा.
इथे- इर्शाद व तत्सम अनुषंगाने जी चर्चा झाली आहे त्याबद्दलचा context - अभिव्यक्तिस्वातंत्र्य , न आवडलेल्या अभिव्यक्तीला विरोध करायची पद्धत काय असावी इत्यादि.
सत्य हेच की ज्या पक्षांचे तुम्ही लोक समर्थक आहात त्याच्या सर्वोच्च नेत्यांना चित्रपट आवडला नाही म्हणून हिंसा केलेली चालते. तरी आपला प्रचार चालू ठेवावा फक्त ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे पितळ आता उघडं झालं आहे इतकंच.
सोनिया गांधी इस्पितळात भरती
सोनिया गांधी इस्पितळात भरती असताना"क्या सर ग़ंगाराम हे उम्मीद रख सकते हैं ?" >> मायबोलीवरच्याच मंदार जोशीने, 'क्या गंगाराम मुक्ती दिलायेगा?' अशी पोस्ट टाकली होती,
श्रद्धा प्रकरणातला आरोपी
श्रद्धा प्रकरणातला आरोपी पारशी आहे असा खोटा प्रचार आता पूनावाला आडनावाचा फायदा घेऊन चालू आहे.
बिचाऱ्या पारशांना कशाला ओढता याच्यात.
विक्षिप्त मुलगा, https://www
विक्षिप्त मुलगा, https://www.hindustantimes.com/india-news/retired-army-doctor-who-choppe...
या बातमीवरून डॉक्टर किंवा सैन्यातल्या लोकांशी लग्न करण्याबद्दल किंवा टिफिन कॅरियर्सवर एखादं मीम आहे का हो?
श्रद्धा प्रकरणातला आरोपी
श्रद्धा प्रकरणातला आरोपी पारशी आहे असा खोटा प्रचार आता पूनावाला आडनावाचा फायदा घेऊन चालू आहे.
बिचाऱ्या पारशांना कशाला ओढता याच्यात.
Submitted by मोरोबा on 18 November, 2022 - 22:10
Exactly!!! Twitter वर तर हे जोरात सुरु आहे.
१. कुठला 'पारशी' दाढी वाढवून मिशा भादरतो???
२. जर यांच्या म्हणण्याप्रमाणे तो पारशी असेल तर कोठडीत त्याला डुकराच्या मांसाचे (pork) चे पदार्थ द्यायला हरकत नाही ना!
३. ही केस काही लवकर आटोपणारी नाही, २०२३ मध्ये २१ किंवा २२ एप्रिलला 'रमजान ईद' आहे, म्हणजे त्याच्या महिनाभर आधी 'रोजे' सुरु होतील. तेव्हा याच्या मागण्या सुरु झाल्या की कळेलच.
४. Hopefully याला फाशीच होईल (आणि व्हायलाच पाहिजे, दुर्दैवाने याचेही जिवंतपणी 35 तुकडे करण्याची शिक्षा सुनावणारा कायदा आपल्याकडे नाही.) फाशी दिल्यावर जमिनीत गाडतात की Tower of Silence वर ठेवतात त्यावरूनही कळेल आणि हे अपप्रचार करणारे तोंडावर आपटतील.
खरेतर, पारशी समाजाचा या घटनेशी दुरान्वयेही संबंध नाही, ते बिचारे मी भला, माझे काम भले या वृत्तीचे आणि खऱ्या अर्थाने शांतीप्रिय असतात (कुत्सितपणे शांतीप्रिय म्हटले जाणारे नाही). पारशांचा या देशाच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे.
विक्षिप्त मुलगा,....
विक्षिप्त मुलगा,.... बातमीवरून डॉक्टर किंवा सैन्यातल्या लोकांशी लग्न करण्याबद्दल किंवा टिफिन कॅरियर्सवर एखादं मीम आहे का हो?
Submitted by भरत. on 19 November, 2022 - 08:53
मुळात तुम्हाला एखाद्या मुस्लिमाचे काळे कृत्य समोर आणले की त्याला defend करायला हिंदूने केलेले कृत्य का आणावे लागते?? मी कधीही म्हटले नाही की सगळे हिंदू धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत किंवा आजपर्यंत सगळेच मुस्लीम वाईट आहेत असेही म्हटलेले नाही. (म्हटले असेल तर screenshot टाका). पण एकूण लोकसंख्येचे प्रमाण आणि गुन्हेगारीचे प्रमाण यांची टक्केवारी पहा ना!
म्हणजे 'हिंदूंची लोकसंख्या सरासरी ८०-८५% आणि त्यापैकी गुन्हेगारी करणारे हिंदू vs मुस्लिमांची लोकसंख्या सरासरी १५% आणि त्यापैकी गुन्हेगारी करणारे मुस्लीम' असा तुलनात्मक अभ्यास करून तो इथे मांडा बरे.
आणि हो, तुम्हाला जर मुस्लीमाने केलेली गुन्हेगारी vs हिंदूने केलेली गुन्हेगारी असेच हवे असेल तर मी हजारो उदाहरणे देऊ शकतो पण समस्या ही आहे की तुम्हाला सनातन प्रभात, सामना, ओप इंडिया, तरुण भारत, पांचजन्य आदी मधील बातम्या चालत नाहीत (आणि इतर मिडिया अशा बातम्या समोर येऊ देत नाही).
जर खरोखर defend करायचेच असेल तर मुस्लिमाने केलेली गुन्हेगारी vs मुस्लिमाने केलेले चांगले कृत्य असे करा ना!!!
मुस्लिम नवर्याने आपल्या
मुस्लिम नवर्याने आपल्या हिंदू बायकोला मारहाण केली व ती आय सी यू मध्ये आहे अशी बातमी आली तर हिंंदुत्ववादी ती मरावी म्हणून देव पाण्यात घालतील नक्कीच !
मुळीच नाही, उलट हिंदुत्ववादी ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना, यज्ञ वगैरे करतील (आणि दाभोळी टोळी त्याला अंधश्रद्धा म्हणेल!) आणि तो मुस्लीम, त्याला लवकरात लवकर अटक होऊन फाशी व्हावी अशी प्रार्थना करतील. (मी तरी रोज देवाकडे प्रार्थना करतो की हिंदूंना त्रास देणाऱ्या मुस्लिमांचा लवकरात लवकर नाश कर! आणि यात मला काहीही गैर वाटत नाही.)
दार - उल- हरब आणि दार - उल -
दार - उल- हरब आणि दार - उल - इस्लाम या संज्ञांचा अर्थ कोणी सांगेल का???
धाग्याच्या विषयाशी हे संबंधित
धाग्याच्या विषयाशी हे संबंधित नाही, पण येथे यावर चर्चा सुरू आहे व त्यावर प्रशासकांनी अजूनपर्यंत हरकत घेतलेली दिसत नाही म्हणून हे लिहीत आहे:
=====
या लोकांना खरा आनंद याचा झाला असू शकेल की त्या मुलीला मारल्यानंतर तिच्या देहाचे तुकडे करण्यात आले. म्हणजे, तिला वेदना झाल्या नाहीत. उलटे झाले असते तर जी पेटापेटी झाली असती ती झाली नाही म्हणून सुटकेचा निश्वास टाकून बिचारे आनंद लपवत आहेत.
विक्षिप्त मुलगा, मी डिफेण्ड
विक्षिप्त मुलगा, मी डिफेण्ड केलेलं नाही, करत नाही. मुळात अशा प्रकरणावर एखादं मीम बनवावंसं वाटणं हेच किती विकृत आहे ! म्हणून तुम्हांला ते उदाहरण दिलं.
"आम्हांला शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला नाही," असं छातीठोकपणे सांगणारा आयडी म्हणून तुमची पहिली ओळख माझ्या लक्षात राहिली आहे. आता तर तुम्ही फार पुढे गेला आहात, त्यामुळे तुमच्याशी आणखी चर्चा शक्य नाही.
आज पाकीझा पाहीला. ३४ व्या
आज पाकीझा पाहीला. ३४ व्या वेळी. एखाद्या समाजाचे काही ठळक अवगुण असतीलही जसे की धर्मांधता पण त्यांचे सामाजिक योगदान अपूर्व नाहीये का? सुंदर शायरी, राजकारणा मधील त्यांचा सहभाग, कला, वास्तुकला, वाखाणण्याजोगा नाहीये का? मग काही लोकांच्या विकृत आचरणाकरता, संपूर्ण समाज वेठीला धरणे हे अन्यायकारकच आहे. कोणावर तरी (इथे संपूर्ण मुस्लिम समाज म्हणायचे आहे मला) आरोप केला आपल्याला की आपल्याला तगमगीतून शांती मिळते, मुक्ती मिळते पण त्या मुळे त्या त्या समाजावरती, अन्यायच होतो ना. का आपल्या शांतीकरता लोकांवर अन्याय करायचा, त्याकडे डोळेझाक करायची? विषारी विचारसरणी आहे ही.
>>>>>पारशांचा या देशाच्या
>>>>>पारशांचा या देशाच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे.
अब्दुल कलला, मौलाना आझाद, सिनेक्षेत्रातील मुस्लिम कलावंत, कवि, शायर यांचा देशाच्या जडणाघडणीत वाटाच नाहीये का?
मुळात "देशाच्या जडणघडणीत वाटा
मुळात "देशाच्या जडणघडणीत वाटा" म्हणून "माझे हे झळाळते उदाहरण, आता तू दे तुझ्याकडचे" प्रकार चुकीचा आहे. देशाच्या जडघडणीत सर्व नागरिकांचा वाटा असतो, फक्त थोर ऐतिहासिक व्यक्तींचा नाही.
मराठी वृत्त वाहिन्यावरील मुली
मराठी वृत्त वाहिन्यावरील मुली मराठी बोलतात मग मराठी संस्कृतीची साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलता ना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्न कल्चर का आत्मसात करतोय', असं सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात म्हणाल्या.
The fun never ends!!! मविआ is the gift that keeps giving
टिकलीच्या मुद्द्यावर शेफालीताई आणि भिडेगुरुजी, सुधा मूर्ती यांच्यावर आक्रमक टीका करणाऱ्या फेमिनिस्ट काकूज आणि पुरोगामी राईट टू हिजाब वाले काकाज आता काय बोलणार? की तुमचे ते हिंसक कार्यकर्ते आता जीन्स टीशर्ट घातलेल्या पत्रकार मुलींवर हल्ला करणार का?(मुद्दा बरोबर पण मार्ग चुकीचा).
आम्हांला शाळेत छत्रपती शिवाजी
आम्हांला शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला नाही," असं छातीठोकपणे सांगणारा आयडी म्हणून तुमची पहिली ओळख माझ्या लक्षात राहिली आहे.--- भरत.
असे मी कधीही म्हटले नाही (म्हटले असेल तर screenshot टाका), मी कोणत्यातरी धाग्यावरील प्रतिसादात (नक्की कोणता ते आठवत नाही) मी म्हटले आहे की, मुघलांचा इतिहास पानच्या पाने भरून शिकवलं गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काही ओळींत आटपला. (शब्द अगदी हेच नसतील पण आशय हाच आहे) (भविष्यात आपल्याला या मुद्द्यावरून इतरांशी प्रतिवाद करावा लागणार आहे, हे जर तेव्हा माहीत असते तर तेव्हाचे इतिहासाचे पुस्तक रद्दीत न देता जपून ठेवले असते! कोणाला सन २००१-२००२ सालचे इ. ७ वीचे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे (SSC बोर्ड) इतिहासाचे पुस्तक मिळाल्यास पहावे. नक्की पृष्ठ क्र. आता आठवणे शक्यच नाही पण उजव्या बाजूच्या पानावर खालच्या २-३ ओळीत महाराजांचा इतिहास, तो सुद्धा 'मराठ्यांनी' अशी संज्ञा वापरून दिलेला आढळेल.)
माझ्या आठवणीनुसार शाळेत इतिहासाची सर्वसाधारण विभागणी काहीशी अशी होती.
इ. १ ली व इ. २ री. - इतिहास हा विषयच नाही.
इ. ३ री - अश्मयुगीन कालखंड
इ. ४ थी - छ. शिवाजी महाराजांचा इतिहास (कथारूप)
इ. ५ वी - भारताचा स्वातंत्र्यसंग्राम (विशेषतः क्रांतीकारकांची माहिती)
इ. ६ वी - मनुष्याची उत्क्रांती (ते होमो सेपियन, निअँडरथल माणूस वगैरे बहुतेक याच इयत्तेत होते)
इ. ७ वी - मध्य-युगीन इतिहास - मुघलांचा इतिहास (बाबर, हुमायून वगैरे)
इ. ८ वी - भारताचा स्वातंत्र्यसंग्राम (सखोल, विविध करार, गोलमेज परिषद, चळवळी, आंदोलने यांची माहिती, सनावळ्यांंसह)
इ. ९ वी व इ. १० वी - आधुनिक जगाचा इतिहास (औद्योगिक क्रांती, पहिले व दुसरे महायुद्ध, त्याचे जगावर झालेले परिणाम, बोस्टन टी पार्टी वगैरे वगैरे)
यात विशेषतः इ. ७ वी मध्ये जो मुघलांचा इतिहास शिकवला गेला त्यात साधारण format असा होता.
इ.स. अमुक अमुक मध्ये हा बाबर आला, त्याने इतका राज्यविस्तार केला. मग त्याचा मुलगा आला, त्याने इतका राज्यविस्तार केला मग त्याचा नातू आला, त्याने इतके राज्य गमावले वगैरे वगैरे. अरे आम्ही काय करू आता हे जाणून घेऊन???
हा मुघलांचा इतिहास शिकवण्यापेक्षा छ. शिवाजी महाराजांचाच इतिहास detail मध्ये repeat करता आला नसता का? म्हणजे कोणत्या साली महाराजांनी कोणती मोहीम आखली? ती कशी यशस्वी केली? त्यात आलेल्या अडथळ्यांवर महाराजांनी आपल्या तल्लख बुद्धीने कशी मात केली?? अमुक एखादी मोहीम पावसाळ्यातच का राबवली? त्यामागे महाराजांचा काय विचार / अभ्यास होता? अमुक एखादी मोहीम अमावास्येच्या दिवशी करण्यामागील कारणमीमांसा वगैरे वगैरे. शिवाय महाराज जनतेची कशी काळजी घ्यायचे, त्यांची न्यायप्रियता कशी होती, आपल्या प्रजेला त्रास होऊ नये यासाठी महाराजांनी आपल्या सरदार / सैनिकांना काय सूचना केल्या होत्या वगैरे वगैरे.
आणि जर मुघलांचा इतिहास शिकवायचाच होता तर त्यांच्या राज्यविस्ताराचे कसले कौतुक?? उलट त्यांनी कसा येथील जनतेला त्रास दिला, कसा अतोनात छळ केला. जिझिया कर न देणाऱ्यांवर कसे अनन्वित अत्याचार केले, किती देवळे उद्ध्वस्त केली, उभी पिके कशी आडवी करत, तक्षशीला व नालंदा विद्यापीठांना का आगी लावल्या हे सगळे शिकवायचे ना! ('स्त्रियांवर बलात्कार केले' हे ११-१२ वर्षाच्या मुलांना शिकवणे योग्य नाही, म्हणून त्याचा उल्लेख केला नाही.)
@सामो, तुमच्या प्रतिसादाला
@सामो, तुमच्या प्रतिसादाला लवकरच उत्तर देईन फक्त आधी 'दार - उल- हरब' आणि 'दार - उल - इस्लाम' या संज्ञांचा अर्थ मला कोणी सांगेल का?
आता जरा व्यग्र (बिझी) आहे, मुंबई पोलीस आणि नॅॅशनल कॉलेजचे प्राचार्य यांचे आभारपत्र type (टंकलिखित) करायचे आहे.
देशाच्या जडघडणीत सर्व
.
प्रिन्स यादव ,गोरखपूर ह्यांनी
प्रिन्स यादव ,गोरखपूर ह्यांनी केलेल्या कार्याबद्दल अजून टिप्पणी नाही का?
विक्षिप्त मुलगा, तुम्ही तसे
विक्षिप्त मुलगा, तुम्ही तसे म्हटले होते. मग तुम चं शाळेतलं एका वर्षीचं निकालपत्रही इथे दिलं होतं. तुम्हांला मराठीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांची लिंक देण्यात आली होती.
मुघलांच्या बरोबरीने पेशव्यांचाही सविस्तर इतिहास होता. तो तुमच्या लक्षात नाही बघा.
बाकी तुमच्या ज्या सूचना आहेत, त्यानुसार आता अभ्यासक्रम बदलतच असेल.
मागेही तुम्ही म्हणालात की फक्त मुसलमानच स्त्रियांवर बलात्कार करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाचा चौरंग केला होता, आठवतंय का?
तुम्ही ज्या संकेतस्थळांची नावं घेतलीत त्यांचा अजेंडाच मुळी मुस्लिम द्वेष आहे. त्यामुळे त्यात अशाच बातम्या येणार. त्याही कित्येकदा खोट्या किंवा ट्विस्ट केलेल्या.
मी म्हणतो तसं तुम्ही एका वाटेने भरपूर पुढे गेला आहात.
<<<तुम्हाला सनातन प्रभात,
<<<तुम्हाला सनातन प्रभात, सामना, ओप इंडिया, तरुण भारत, पांचजन्य आदी मधील बातम्या चालत नाहीत (आणि इतर मिडिया अशा बातम्या समोर येऊ देत नाही).>>>
ख्याख्याख्या. म्हंजे मेनस्ट्रिम चॅनल्स वर येऊ शकत नाहीत इतक्या bad evidence वर आधारित बातम्या हव्यात तर. पतीने पत्नीला मारले अश्या कित्येक बातम्या दररोज पेपरात येतात. त्यातल्या एखाद्या बातम्या का इतक्या जोरजोराने रिपोर्ट होतात ?
<<<हिंदूंची लोकसंख्या सरासरी ८०-८५% आणि त्यापैकी गुन्हेगारी करणारे हिंदू vs मुस्लिमांची लोकसंख्या सरासरी १५% आणि त्यापैकी गुन्हेगारी करणारे मुस्लीम' असा तुलनात्मक अभ्यास करून तो इथे मांडा बरे.>>>
का दुसऱ्यांनी का करायचा ? तुम्ही करून मांडा की. का व्हॉट्सॲप वर वाचले आहे, पण शोधले तरी विदा सापडत नसल्याने जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलताय?
***भारत सरकारने धर्माधारीत गुन्ह्यांचा विदा प्रकाशित केला नाहीये. उपलब्ध विदा आहे तुरुंगातील कैदी. ज्यात आहे १८% मुस्लिम आणि ६७% हिंदू. मुळात, आर्थिक परिस्थितीनं केलेलं विभाजन हे धर्मापेक्षा कित्येक पटीने जास्त रेलेव्हंट असते, आणि आहे. पण धार्मिक द्वेष पसरवायला नसलेल्या विदासाठी दुसऱ्यांना चॅलेंज करणारा आयडी एव्हढा विचार करणार अशी अपेक्षा चुकीची ठरावी.***
अरे आम्ही काय करू आता हे
अरे आम्ही काय करू आता हे जाणून घेऊन???
>>>
का नाही जाणून घ्यायचं? आपलं आता जे काय चाललंय, किंवा आजूबाजूला दिसतंय त्याची पाळंमूळं काही दशकांपूर्वी किंवा शतकांपूर्वी असू शकतात. त्या वेळचं सारं जाणून घेतलं तर आजूबाजूच्या सगळ्याचबद्दल एक प्रकारची एम्पथी तयार होईल. मी तर म्हणतो, काँग्रेसच्याच काय, पण कुठच्याही सरकारच्या काळात तयार झालेल्या पाठ्यपुस्तकांवर विश्वास ठेऊ नये. सरकार नावाचा पदार्थ आपल्याला फसवण्यासाठीच तयार झालेला असतो हे काय आपल्याला माहित नाही? शाळेत होतो तेव्हा इलाजच नव्हता. पण आता मोठं झाल्यावर कळलं आहे तर सगळे संदर्भ, दस्तावेज आणि विद्वान इतिहासकारांनी शोधून ठेवलं आहे, ते अभ्यासावं.
या बुद्धिवादी आणि तर्कवादी पुरोगाम्यांचा प्रतिवाद करायचा तर आपणही भावना बाजूला ठेऊन बुद्धी आणि तर्क वापरला पाहिजे. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त केलेला हा वरचा खरा अभ्यासच त्यासाठी उपयोगी पडेल. आपल्याला अनेक गोष्टी नव्याने कळतील, हा बोनस.
एक माहिती हवी आहे, बँकेचे
एक माहिती हवी आहे, बँकेचे working hours आणि weekly off हे RBI ठरवते की ती बँक स्वतःहून ठरवू शकते???
एक माहिती हवी आहे, बँकेचे
एक माहिती हवी आहे, बँकेचे working hours आणि weekly off हे RBI ठरवते की ती बँक स्वतःहून ठरवू शकते??? >>> बहुतेक RBI च ठरवते, पण बँका (RBI च्याच परवानगीने) काही विशिष्ट शाखांचे वेळापत्रक नियमित वेळापत्रकांपेक्षा वेगळे ठेवू शकतात. जसे, माझ्या घरासमोर असलेली SBI ची शाखा, दुसऱ्या व चौथ्या रविवारी व प्रत्येक सोमवारी बंद असते. तर घरापासून हाकेच्याच अंतरावर असलेली दुसरी SBI ची शाखा नियमित वेळापत्रक पाळते (दुसरा व चौथा शनिवार व प्रत्येक रविवार बंद).
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/girl-married-off-ex-bf-in-up-c...
आणखी एक केस श्रद्धा सारखी. लिंक पोस्ट करण्याचे कारण असे की सगळ्याच धर्म असे विकृत असतात, वि मु
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/girl-married-off-ex-bf-in-up-c...
आणखी एक केस श्रद्धा सारखी. लिंक पोस्ट करण्याचे कारण असे की सगळ्याच धर्म असे विकृत असतात, वि मु
एक माहिती हवी आहे, बँकेचे
एक माहिती हवी आहे, बँकेचे working hours आणि weekly off हे RBI ठरवते की ती बँक स्वतःहून ठरवू शकते???>>>>>> गोवंडी एस बी आय बद्दल बोलताय का? चक्क शुक्रवारी सुट्टी ठेवलीय म्हणे.
Pages