भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात म्हणजे गूळ मिश्रित अन्न शिळं होत नाही..याचा अर्थ काय? आपण प्रत्येक गोष्ट काही लाँग टिकावी म्हणून बनवत नाही. उदा वांग्याची भाजी. तीत चवीसाठी गूळ घालतात..जास्त वेळ टिकावी म्हणून नाही!
कैच्याकै लॉजिक!!!

भाजीत गुळ चवी साठी आहे याची ग्वाही खुद्द आंबट गोड देत आहेत. आय रेस्ट माय केस मिलॉर्ड!
(आंबट गोड Light 1 )

Lol

वांग्याची भाजी. तीत चवीसाठी गूळ घालतात..जास्त वेळ टिकावी म्हणून नाही! >>> हो ना. पुराणातली वांगी ऐकले आहे. पुरणातली नाही Happy

च्रप्स
नका वाट बघू. उगाच ताटकळत बसाल. कारण प्रतिसाद गुळमुळीत येणार आहेत. मायबोलीकर दोन गटात विभागले गेले आहेत.

च्रप्स
नका वाट बघू. उगाच ताटकळत बसाल. कारण प्रतिसाद गुळमुळीत येणार आहेत. मायबोलीकर दोन गटात विभागले गेले आहेत.

>> चवीसाठी गूळ घालतात..जास्त वेळ टिकावी म्हणून नाही!

हे तत्वतः अगदी मिठासारखेच आहे. थोडेसे मीठ चवीसाठी. पण अखंड मिठात खारवणे हे मात्र टिकण्यासाठी.

तेच गूळ, साखर, मध इ. ला लागू पडते.

पण फरक आहे .
मीठ आणि साखर (मग ती गुळ रुपात का असे ना) दोन्ही जलस्नेही असले तरी मीठ थोड्या प्रमाणात असताना सुद्धा जिवाणूंचे खाद्य नव्हे. पण साखर मात्र आहे. तेव्हा थोड्या प्रमाणात साखर (किंवा गुळ) हे किण्वन प्रक्रियेस मदत करते. मीठ नाही. ते किण्वन मंदावते.
साखरेचे जास्त प्रमाण झाले तेव्हा मात्र साखरेचा जलस्नेही गुण जीवाणुंमधील पाणी त्यांच्या आवरणातूनही शोषुन घेउन त्यांना पाण्यावाचून तडफडवुन मारतो.

च्रप्स माळ्याच मळ्यात वांगी तोडणारीकडे गेलेत. लवकर सांगा त्यांना. कोरिअन वांगी ( आणि तोडणारी) नाही ना हो च्रप्स. Wink Proud

पोस्ट आणि काही प्रतिसाद Lol

माळ्याच्या मळ्यामंदी पाकाचं पाणी जातं
'गूळा'ब वांगी भेंडी बटाटा टिकवितं

हालोईनला मुलांनी कितीही कँडी ख्याल्या तरी त्यांचे दात कसे किडत नाहीत? हा प्रश्न मला कित्येक वर्षे पडलेला. काल एका अमेरिकन माणसाशी बोलताना उलगडा झाला. तर अमेरिकन पूर्वजांना माहित होते की पोरांना हालोईनला कँडी दिल्या की त्यांचे दात किडणार. मग त्यांनी ट्रिक-ओ-ट्रीट प्रकार चालू केला. त्यामुळे मुलांना रोज एक कँडी मिळत असेल तर त्यादिवशी अचानक १०० कँडी मिळू लागल्या. आता एका कँडीत ५ गॅम साखर असेल तर १०० कँडीत ५०० गँम साखर होईल. तर इतकी साखर एकाच वेळी तोंडात गेल्याने तोंडात साखरेचा तीन काय चार तारी पाक होतो. साखरेचे संपृक्त द्रावण जंतूनाशक आहे हे तर पूर्वेजांच्या पूर्वजांनाही तोंडपाठ होते. त्यामुळे तोंडातले सगळे जंतू त्यादिवशी पूर्ण मरतात.
किती विचार करुन सण साजरे केलेत इथल्या पूर्वजांनी! आता हिवाळा सुरू होणार तर दाताचे आरोग्य सर्वप्रथम हे त्यांना त्या काळी ही माहित होतं याचं आज राहुन राहुन आश्चर्य वाटतं.

Lol

Lol अस्मिता....
लोल.... परफेक्ट व्हॉटॅस्पिय संदेश अमितव!

अजून एक पोस्ट आज आली. आता तुमचे व्हॉट्सॅप कॉल रेकॉर्ड होणार, ब्लु टीक, लाल टीक, हिरवी टिक असे रंग मेसेज कोण वाचतंय त्यावरून कळणार वगैरे वगैरे. आवराच!
पण ती इथे डकवता येतच नाहीये. एरर येते आहे.

त्यामुळे तोंडातले सगळे जंतू त्यादिवशी पूर्ण मरतात. >>> Lol उद्या परवा हाच संदेश व्हॉट्सअ‍ॅप मधून आला तरी आश्चर्य वाटणार नाही.

अंजली, हा घ्या तो संदेशः

*उद्यापासून whtsap आणी फोन काँल चे नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील: -*

०१. सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील.
०२. सर्व कॉल रेकॉर्डिंग जतन केले जातील.
०३. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर व सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाईल.
०४. ज्यांना माहित नाही अशा सर्वांना कळवा.
०५. आपले डिव्हाइस मंत्रालयीन सिस्टीमशी कनेक्ट होतील.
०६. कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नये याची खबरदारी घ्या.
०७. आपल्या मुलांना, भाऊ, नातेवाईक, मित्र, ओळखीच्या सर्वांना माहिती द्या की आपण त्यांची काळजी घ्यावी आणि क्वचितच सोशल साइट्स चालवा.
०८. राजकारणावर किंवा सद्यस्थितीबद्दल आपण सरकार किंवा पंतप्रधानांसमोर असलेले कोणतेही पोस्ट किंवा व्हिडिओ ... इ. पाठवू नका.
०९. सध्या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठविणे हा गुन्हा आहे ... असे केल्याने वॉरंटशिवाय अटक होऊ शकते.
१०. पोलिस अधिसूचना काढतील ... त्यानंतर सायबर क्राइम ... त्यानंतर कारवाई केली जाईल ते खूप गंभीर आहे.
११. कृपया तुम्ही सर्व, गट सदस्य, प्रशासक, ... कृपया या विषयाचा विचार करा.
१२. चुकीचा संदेश पाठवू नका याची खबरदारी घ्या आणि सर्वांना माहिती द्या आणि या विषयाची काळजी घ्या.
१३. कृपया हे सामायिक करा.

गट अधिक जागरूक आणि सावध असले पाहिजेत.

*ग्रुप सदस्यांना व्हाॅट्सफ बद्दल महत्त्वाची माहिती...*

*वाॅटसॲप वरील ✔ माहिती*
*१. ✔= संदेश पाठविला*
*२. ✔✔= संदेश पोहचला*
*३. दोन निळ्या ✔✔= संदेश* *वाचला*
*४. तीन निळ्या ✔✔✔=* *शासनाने संदेशाची नोंद घेतली*
*५. दोन निळ्या व एक लाल ✔✔✔= शासन तुमच्या विरूध्द कारवाई करू शकते*
*६. एक निळी व दोन लाल = शासन तुमची माहिती तपासत आहे*
*७. तीन लाल ✔✔✔= शासनाने तुमच्या विरूध्द कारवाई सुरू केली असून लवकरच तुम्हाला न्यायालयाचे समन्स येईल.*
*जबाबदार नागरिक व्हा आणी तुमच्या मित्रांसोबत शेयर करा*..
*महत्त्वाचे म्हणजे पुढील ग्रुपमध्ये लवकर पाठवा...*

"सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील" >> इथे रेकॉर्डेड ऐवजी चालू भविष्यकाळ वापरला आहे ह्या चालू लोकांनी. ( का हे जिरंड आहे? मला त्यातलं नीट कळत नाही, पण गल्ली चुकले आहेत एवढं नक्की).
सकाळी सकाळी "व्हाॅट्सफ" असा शब्द वाचून पोट्सफ झालं.

अमितव Lol

>> सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील

आला होता हा संदेश काल परवा मला सुद्धा. ते ही चक्क सोसायटीच्या ग्रुपवर! मग मी त्याला डिसलाईक (डाऊनथम्ब इमोजी) केल्यावर फॉरवर्ड करणाऱ्याने डिलिट केला. (तेच जर मी प्रतिसाद देऊन "हे खोटं आहे, असले मेसेज पाठवू नका" म्हणून सांगितलं असतं तर त्याला आवडलं नसतं Lol )

अनेक भोंदू फॉरवर्ड एकाच वेळी सर्वत्र पसरले जातात तेंव्हा जरा आश्चर्य वाटते. कुठल्यातरी एखाद् दुसऱ्या ग्रुपवर कोणीतरी टाकत असेल आणि तिथून लोक एकमेकांना फॉरवर्ड करत करत तो पसरला जात असेल, असे सुरवातीला वाटले होते. पण ते तसे (तितक्या सहजपणे) होत नसावेसे वाटते. There must be some gimmicks.

औषधी वनस्पती च्या बिया ,फळं, साल, पान ह्यांचे विविध औषधी गुणधर्म आहेत.
आयुर्वेदात त्याची माहिती आहे.
वनस्पती आहे म्हणजे नैसर्गिक आहे त्याचा दुष्परिणाम होत नाही .
मला वाटतं हा सर्वात मोठा गैर समज आहे.
शरीर च biochemical क्रिया प्रक्रिया वर कार्यरत असते किंवा काही चुकले की बिघडत.
औषधी वनस्पती मध्ये पण रसायन च असतात.
त्याचे प्रमाण किती असेल तर शरीरास चांगले,कोणत्या अवस्थेत शरीरास चांगले ह्याचे काही गणित असते
पण forward मध्ये आवळा शरीरास चांगला असा msg फिरला की लोक आवळे खाण्यास सुरुवात करतात
काय काय अती हुशार तसे लगेच शरीर तंदुरस्त व्हावे म्हणून चार चार आवळे रोज खातात.
मग नेमका उलट परिणाम होतो.
आणि आवळा बिचारा बदनाम होतो.
स्वस्थ विषयी पोस्ट ह्या पूर्ण माहितीवर च आधारित असाव्यात arthvat माहिती वर नसाव्यात.
चुकीचे दावे केलेले नसावेत. अती शोक्ती नसावी.
आणि त्या पोस्ट मध्ये इशारा पण असावा.

>> साखरेचे जास्त प्रमाण झाले तेव्हा मात्र साखरेचा जलस्नेही गुण जीवाणुंमधील पाणी त्यांच्या आवरणातूनही शोषुन घेउन त्यांना पाण्यावाचून तडफडवुन मारतो.

✔ छान माहिती मानव. Thanks for sharing.

अरे पण आमच्याकडे गुळाच्या ढेपीलाच फंगस लागलेले... ते लागु नये म्हणून त्यावर थोडा गुळ किंवा साखर पेरायला हवी होती बहुतेक!

अती शोक्ती नसावी.
<<
म्हंजे काय?

बंगालीत लिहिलं आहे का शोक्तिमॉन सर?

सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील" >> इथे रेकॉर्डेड ऐवजी चालू भविष्यकाळ वापरला आहे ह्या चालू लोकांनी..
Lol
समहाऊ हे सर्व भोंदू फॉर्वर्ड्स फार घाईघाईत लिहील्या सारखे वाटतात. जणू काळजी पूर्वक, ग्रॅमॅटीकली करेक्ट लिहीलं...तर लोकांना समजेल की हे फेक आहे !!! Happy

हो ना, त्यामुळे आजकाल कुणी चुकीचं व्याकरण मोठ्या प्रमाणात वापरू लागलं की मला वाटतं की ती व्यक्ती भोंदूच असणार.

Pages